श्री.
आश्विन शु. ३ मंगळवार शके १७१५.
विनंती विज्ञापना. शंकरराव भोंग यांजकडे निर्मळ, इंदुर, बोधन, बालकुंडा आदिकरून नफरुदौला बाबत माहालाची अमीली होती. ताहुदाची बेरीज होऊन पराकाष्ठा सालोसाल बेरजे अन्वयें हिसेब कागदी पत्रीं व्हावें. त्यांत माहालातीचा यैवज कस्त मेहनतीनें वसूल होईल, त्यापैकीं खर्चवेंच वजा जाऊन बाकी सरकारदाखल होत आला. तो वसूली पोंहचून बाकी येकंदर व्याणव लाख निघाली. त्याची किस्तबंदी पांच लाख दरमाहा दाखल करावे. शिवाय सालमारचा यैवज. याप्रा नक्षा दौलांनीं ठराऊन शंकरराव यांस रुखसत केलें, च्यार महिने जाले. तीन लाख मात्र सरकारांत आले. वरकड यैवजास ठिकाण नाहीं. यामुळें शंकरराव यांजवर दौलाची मर्जी खफा होऊन तालुकियाची नफी करविली. येथून स्वार शंभर व कांहीं गाडद सुध्धां जप्तीस अमील खाना केला. याप्रा। वर्तमान आहे. या छ. २ माहे। रावल हे विज्ञापना.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)