श्री.
कार्तिक व.४ गुरुवार शके १७१५. ता० २१ नोव्हेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. नवाबांनीं बाहेर निघावयाची तजवीज दौलाचे विच्यारें ठरलीं. त्यास डेरे दाखल होऊन फौज जमा करण्यांत षोहरते पडती,याजकरितां शिकारगाचे निमित्यानें कमठाणें येथें डेरे दाखल होऊन सैर शिकार करावी; इतक्यांत फौज सरंजाम कुल जमा होतो. सिकारगाचे मकानावर वाडाही मोठा देण्याची योजना जाली आहे. कारण कीं बाडयाचे रखवालीस फौज गाडद सभोंवतीं ठेवावी. येणेकरून फौज तयारी वगैरे दोष दिसण्यात नाहीं. यैसा बेत ठरून दौला जागा पाहावयास गेले. तेथून आल्यानंतर नवाब कुच करून जाणार. खैम दाखल होणार. येथें फौज गाडद जे जमियत आहे, ते हमराह कुच करते दिवसीं बाड्याचे बंदोबस्तास राहावी, आसपास दाहापंधरा कोसीं जमाव चराई वगैरेस आहे, त्यांजला ताकीद आंतून निक्षूण जाली आहे कीं जलद येऊन जमा होणे, पंधरा वीस दिवसांत कुल जमाव येकत्र करावा. यैसी धुन दिसत. येथील लोकमुखें वर्तमान कोणाचें ह्म (ण) णे नवाब बाहेर निघोन फोंज समवेत औरंगाबादेस जाणार. कोणाचे