श्री.
कार्तिक व. ४ गुरुवार शके १७१५. ता० २१ नोव्हेंबर १७९३.
१ श्रीमंत रावसाहेब पेशवे यांस नेहमी प्रमाणें हवाल्याचें पत्र *
श्री.
कार्तिक व.४ गुरुवार शके १७९५. ता० २१ नोव्हेंबर १७९३.
विनंती विज्ञापना. सिकारगा कारितां नवाबांनी बाहेर निघावयाचा बेत दौलाचे विच्यारें ठरून तमाम लोकांस तयारीची ताकीद जाली. बेदराहून तीन कोस मौजे कमठाणें हवेली तालुकियाचा गांव चिटगोप्याचे मार्गावरील येथें शिकारग्याचे डेरे देण्याचें ठरलें. तेथील जागा मैदान, पाणी चांगलें. पूर्वी बेदरी पातशाहा राहात गेले, त्यांचे शिकारीस जाण्याचें मकान कमठाणें, याचाही बयान होउन जागा पाहून येण्याकारतां छ. १५ रा खरीं दौला प्रथम च्यार घटिका दिवसां स्वार होऊन कमठाण्यास गेले. तेथें जागा पाहून येणार, ते आल्यानंतर नवाबांनीं छ. १९ अथवा छ, २१ या दोन तारिखा पैकीं येके तारिखेस निघोन खैम दाखल व्हावें यैसा बेत आहे. नवाब निघाल्याचें वर्तमान मागाहून विनंती लिहिण्यांत येईल. या छ. १६ रा खर हे विज्ञापना.