श्री.
पौष शु। ९ शके १७१५ शुक्रवार ता. १० जानेवारी १७९४.
विनंती विज्ञापना. उमरखेडकर का दाराकडील दोघे कारकुन भारामल यांनी समागमें नेले होते. पैकीं भगवंतराव यांस पेशजीच उमरखेडास रवाना केल्याची विनंती लिहीण्यांत आली आहे. रामराव यांस येथें पाठऊन देण्याविषई भारामलास दौलांनी पत्र दिल्हें तें पाठविलें. त्यावरून भारामल यांनी समागमें स्वार देऊन मारानलेस दौलांकडे पाठविलें. छ. ४ रोजी बेदरास आले. छ. ५ रोजी दौलांनीं रामराव यांस आह्मांकडे पाठविलें, आणि निरोप पाठविला कीं, यांस आपले जवळ ठेऊन घ्यावें. मावजी नाईक सोईटकर यांस हजर करणें वगैरे येकदोन जाबसालचा गुंता आठ पंधरा दिवसांत यांनी उरकोन उमरखेडास जावें. मजला विच्यारल्याशिवाय यांची रवानगी उमरखेडास अथवा कोठें न व्हावी, त्यास रामराव आह्मांपासीं आहेत. इतक्यावर दौलांसीं याजप्रकर्णी बोलणें होऊन जसें ठरेल तसी विनंती मागाहुन लिहिण्यांत येईल, र॥ छ. ७ जाखर हे विज्ञापना.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)