श्री.
पौष शु. ९ शके १७१५ शुक्रवार ता. १० जानेवारी १७९५.
विनंती विज्ञापना. शंकरराव भोंग नागपुरास गेल्याचें वर्तमान यांजकडे आलें होतें. त्यावरून दौलांनी माधवराव रामचंद्र, भोंसले यांजकडील, यांजकडून सेनासाहेब सुभा यांस लिहविलें कीं, शंकरराव हरामखोरी करून पळून गेला, सरकारचा माहा सबेदार लाखोचाच. चौकशी करून जेथें शोध लागेल तेथें अटकाऊन त्यास पाठवावे.' सदरहू अन्वयें सेनासाहेबसुभा यांस भारामल यांचीही पत्रें गेलीं होतीं. त्याचे जबाब सेनासाहेब सुभा यांजकडून आले 'की हजरतीचे सरकारचा हरामखोर तो इकडील; त्याची तंबी जरूर. नागपुरांत शोध केला, परंतु कोठें आढळ पडत नाहीं. हजारों मनुष्याची अमद रफ्त. त्यांत असा चोरून जो येणार तो कोणें स्वरूपानें व कसा येतो हें कशावरून समजावें ? तलाश फार केला, परंतु शोध लागत नाहीं; याप्रा उत्तर आलें. र।। छ ७ जाखर हे विज्ञापना.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)