श्री.
पौष पु।। ९ शके १७१५ शुक्रवार ता. १० जानेवारी १७९४.
श्रीमंत रावसाहेब यांस मामुली हवाल्याचें पत्र.
श्री.
पौष शु। ९ शके १७१५ शुक्रवार ता. १० जानेवारी १७९४.
विनंती विज्ञापना. दौलाचे बोलण्यांत आलें कीं राजश्री परशरामपंत भाऊ यांचे चिरंजीव रामचंद्रपंत फौजसुधां कोल्हापुर प्रांतीं येके मातबर गढीस लागोन लडाई करून गढी व गांव घेतला. फौज लुटावयास गुंतली. आपण जातीनें सेंदोनसें स्वार सुधां गांवापासोन येक कोसाचे फासल्यावर उभे होते. हे बातमी कोल्हापुरकरास समजताच त्याचे लोक हजार पांचसें येऊन रामचंद्रपंत यांस धरून घेऊन गेले. याप्रा वर्तमान लिहिलें आलें. लढाई करून प्रथम फते जाली असतां येकायेकीं अशा त-हेनें दगा जाला हें मोठें ताजुब. याप्रा बोलण्यांत आलें. त्यास याचें कचें वर्तमान सरकारांत आलेंच असेल. यांजकडे सदरहुप्रा। वर्तमान आलें. यांनीं सांगितलें त्याची विनंती लिा असे. दोन जखमां त्यास आहेत. राजश्री परशराम भाऊ तासगांवाहुन निघाले. तिकडे जाणार यैसें यांचें सांगण्यांत आलें र॥ छ, ७ माहे जाखर हे विज्ञापना.