श्री.
पौष शु. ९ शके १७१५ शुक्रवार. ता. १० जानेवारी १७९४.
* नेहमींप्रमाणे छ १ ते छ ५ बुधवार पावेतों नवाबांसंबंधीं कमठाण्याची अखबार, छ ७ जाखर.............शंकरराव भोंग यांजकडील तीनसें गाडदी बरतरफ केले.
छ. ९ रोज मकरसंक्रमण निमित्य पत्र पो.
श्री.
पोष व. ११ शके १७१५ रविवार ता. १२ दिसेंबर १७९३.
श्रीमंत राजश्री------------------------रावसाहेब
स्वामीचे सेवेसीं---------------------------------------
विनंति सेवक गोविंदराव कृष्ण कृतानेक सानमस्कार विनंति विज्ञापना, तागायत छ ९ माहे जमादिलाखर पर्यंत मुकाम बेदर येथें स्वामीचे कृपावलोकनें करून सेवकाचें वर्तमान यथास्थित असें विशेष. स्वामीचे सेवेसीं मकरसंक्रमणयुक्त तिलशर्करासहित थैली पाठविली आहे. याचा स्वीकार होऊन उत्तरगौरवामृतसंतोषसंपन्न सेवकास करणार स्वामीं सगर्थ. सेवेसीं श्रत होय हे विज्ञापना.