लेखांक ११९ १५८७ कार्तिक वद्य ३
अज रखतखाने मा। अनाम राजश्री खंडोजी अंबाजी राजे घोरपडे साहेब दामदौलतहू ता। हुदेदारानि व मोकदमानि मौजे निगडी किले सातारे सु॥ सीत सितैन अलफ बो कमलनयन मानभाव सो समत नीब पा। वाई यासि इनाम जमीन बिघे
१५ पंधरा मौजे मजकुरी मर्हामत करून दिल्हे असता बरहुकूम खुर्दखत प्रमाणे भोगवटा होउ देत नाही दरम्याने इस्कील करून गोसावी मजकूरयासि रजीस करिता ह्मणोन हुजरु मालूम जाहाले तुमचे खुर्दखत काय असे आता रसीदने खुर्दखत देखता चि गोसावी मजुकराचे इनामतीचे वाटे न जाणे बरहुकूम खुर्दखत प्रमाणे विलाकुसूर चालवीजे दुसरेने हुजरू फिर्याद हुजरू आलिया बवाजीब बरजोर ताकीद होईल सालगुदस्ता कुलकर्णी मौजे मजकूर यानी गोसावियापासून इनामतीचे पैके घेतले आहे ह्मणे तरी हे खुर्दखत देखता दर हाल पैके फिराऊन दीजे येबाबे दराज लिहिणे नलगे तालीक लिहून घेऊन असल खुर्दखत गोसावी मजकुराजवली फिराऊन दीजे गोसावी आपले इनाम ज्या कुलास लावितो त्यास तुह्मी पैकेबदल तगादा करिता ह्मणे हे काय माना आहे आता गोसावीयाचे कुलाचे वाटे गेलिया तुह्मी जाणे मागती हुजरु फिरीयाद येऊ न दीजे मो।
तेरीख १६ माहे जमादिलोवल