लेखांक १२३ १५८९ आश्विन शुध्द ८
अज रखतखाने खुदायवंद सैद मखदुम शर्जाखान खलद अयाम दौलतहू बजानीब कारकुनानी हाल व इस्तकबाल व देसमुखानी पा। वाई बिदानद सु॥ समान सितैन अलफ दरीविला बो। गिरमाजी त्रिंबक जुनारदार सो। का। मजकूर येऊन मालूम केले जे आपणास इनाम जमीन चावर १ एक दर सवाद का। मजकूर देखील महसूल व नकदयाती व खा। गला व तूप व बाजू कुलबाब बा। खुर्दखत मुकासाइयानी माजी सालाबाद चालत आले आहे हाली कारकून पा। मजकूर ताजा खुर्दखताचा उजूर करिताती साहेबी नजर इनायत करून दुंबाले खुर्दखत मरहामत कराव्या रजा होय ह्मणउन तरी बराय मालुमाती खातिरेस आणुउन सदरहू सदर इनाम जमीन चावर १ एक दर सवाद मौजे मजकूर देखील महसूल व नखतयाती व बाबहाय सदरहू प्रमाणे बिमोजीब खुर्दखत मुकासाइयानी माजी कारकीर्दी भोगवटा व तसरुफात सालाबाद ता। सालगु॥ जैसे चालिले असेल तेणेप्रमाणे चालवीजे अहवलाद अहफवाद चालवीजे दर हर साला ताजा खुर्दखताचा उजूर न कीजे ता। लेहून घेऊन असल खु॥ परतून दीजे पा। हुजूर मोर्तब सूद
रुजु सुरु-
निवीस
रंवा सूद
तेरीख ६ माहे रबिलाखर सुरु सूद
रबिलाखर
गिर्माजी त्रींबक पौ छ २६ जमादिलावल