[ १४४ ] श्री. २६ जुलै १७३३.
स्वस्तिश्री राज्याभिषेक शके ६० प्रमादी नाम सवत्सरे आषाढ बहुल द्वादशी गुरुवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजा शभुछत्रपति स्वामी याणीं समस्त राजकार्यधुरधर विश्वासनिधि राजमान्य राजश्री भगवतराऊ अमात्य हुकमतपन्हा यासी आज्ञा केली ऐसी जेः -
राजश्री सदाशिव बावा उपाध्ये यासी तुह्मीं पत्र पाठविलें तें त्याणीं विदित केलें त्यावरून सविस्तर कळों आलें. ऐशास, तुह्मीं स्वामीचे यख्तयारी ममतेचे तुह्मांवरी कृपा करून तुमचें विषेशें विशेष चालवणें हें स्वामीस आवश्यक आहे. कोंकणचे महालची पत्रे तुह्मीं आणविलेप्रमाणें पाठविलीं आहेत. स्वामीची सेवा करून स्वामीस संतोष पावणे. पक्ष व नवरात्र उत्साह समीप येणार. व श्रावण मासींचा खर्च आहे. येविशी स्वामींनी लिहावेसे काय आहे ? येप्रसंगीं पोख्ती अनुकूलता करून पाठवून स्वामीस संतोषी करणें. वरकड सदाशिव बावा उपाध्ये यांजवळ आज्ञा केली आहे तुह्मांस लिहितील त्यावरून कळेल. बहुत लिहिणें तर तुह्मीं सुज्ञ असा,
मर्यादेयं
विराजते.
बार बार.