[ १४५ ] श्री. तालीक
२ ६ जुलै १७३३.
राजश्री बाळाजी खडेराव मुतालिक सरदेसाई ता। साळसी गोसावी यांसीः -अखडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्नो। संभाजी आगरे सरखेल रामराम सु।। सित सलासिन गया अलफ राजश्री भगवतराऊ अमात्य याणीं तुह्मांस आचरे येथें येऊन वतनी अमलाची सेवा तुमचे हाते घ्यावी ह्मणून लिहून पाठविलें. त्यावरून हें आज्ञापत्र सादर केलें असे. तरी आचरे यास कबिलासुद्धां येऊन राहणे आणि पूर्ववत् वतनी अंमल चालवीत जाणें माहालास ताकीदपत्र सादर केलें असे जाणिजे. रा। छ २४ रजब.