[ १५५ ] श्री.
राजमान्य राजश्री तुळाजी आंगरे सरखेल यासी आज्ञा केली ऐसी जेः-
सुभा प्रांत राजापूर व सुभा प्रात दाभोळ हे दोन्ही प्रांतांचा जिल्हा हुजुरून राजश्री गोविंदजी भोसले याजकडे आहे त्यास हरदू सुभ्याचा अंमल हुजुरून राजश्री भगवंतराऊ पंडित अमात्य यासी सागितला आहे हे दोन्ही प्रांतात एकदर आकार होईल त्याची निमे शामळाबाबत ऐवज वसूल घेतील तुह्मीं मुताबीक होऊन आमलास खलेल कराल तरी न करणें येविशीचें अवश्यक स्वामीस आहे. तुह्मी जाणतच आहा. तुमचे तर्फेनें अमलास तिळप्राय खलेल झालिया स्वामीस मानणार नाही, ऐसे जाणून मानिल्हेकडे सुरळीत अमल चालो देणे. हुजूर बोभाट न ये ते गोष्टी करणें . सुज्ञ असा.