Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.
( शकें १७१५ वैशाख वद्य ११ मंगळवार. )

पु. राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी. विनंति उपरि, औरंगाबादेस तनख्याचे वसुलाकरितां कारकुन गेला. त्याचें पत्र सरकारांत आलें. त्याची नकल पाठविली. त्यावरून मैं॥र समजला. छ २२ शवालीं मध्यस्तासी बोलण्यांत आलें व सखो सिवाजी कारकुन तनख्याचे वसुलास औरंगाबाद येथें गेला. त्याचे पत्राची नकलच वाचून दाखविली. फकरुदौला व अजीमुदौला दोघांकडून तनख्याचे ऐवजांस दिलातिचें बोलणें हें मध्यस्ताचे ध्यानांत आणोन दिल्हें. मध्यस्त बोलले कीं:--“सुभेदाराचे घालमेलीमुळें ऐवजास दिवसगत लागली. याउपरी कांहीं ऐवज जगधन याचे दुकानीहून व कांहीं अजीमुदौलाकडून फडच्या करावितों”. “परंतु “एकंदर तनखा ऐवजाच्या येथून पेशजी केल्या त्याप्रों अहसनुदौला व कृपावंत यांचे विद्यमानें वसूल पावला असेल तो वजा जातां ततीमा ऐवज काय राहिला हें

१ छ-चंद्र ह्मणजे मुसलमानी तीथ, ही १५ पर्यंत शुल्क पक्षाची व पुढें कृष्णपक्षाची समजावी. २ पुरवणी. ३ मजकूर.

समजलें पाहीजे. त्यास, ऐवज आला किती व येणें किती याची चौकसी करुन मागाहून लिहितों " ऐसें तुह्मीं लिहिलें. त्यास, बाकी ऐवज तनखा प्रों वसुल पावला तो वजा जाऊन, किती येणें त्याचा ता।। लवकर लेहून पाठवावा. त्या प्रों मध्यस्तासी बोलोन जगधनाचे दुकानावर व अजीमुदौला यांस निक्षूण पत्रें घेऊन पाठविण्यांत येतील- उत्तर सत्वर यावें. रा। छ. २४ सवाल हे विनंति.

श्री.
( शके १७१५ वैशाख वद्य ११ मंगळवार. )

विनंति उपरि “आलेमानी धाकटी बंदुख, नमोण्या करितां सांडणी स्वाराबराबर, यांनीं येथून-सदरहू प्र॥ दोनसें बंदुख खरीद करण्याकरितांपाठविली. त्या बेताच्या बंदुखा पुण्यांत मिळत नाहींत; ममईहून आणविल्या येतील. परंतु तेथील जनराळास मिस्तर कीनवी दिलावरजंग याचे पत्र यावें. सरकारातूनही पत्राविषयीं मदारुल माहाम यांस वीनंति केली " इत्यादिक तपशील, तुमचे लिहिल्या बमोजीव, मध्यस्तास सांगितला. यांनीं उत्तर केलें कीं:-“ कीनवी दिलावरजंग हैदराबादेहून येथें अद्याप आले नाहींत; आल्यानंतर पत्राविषयीं त्यांस सांगू. ” याप्र॥ यांचे बोलण्यांत आलें ॥ छ. २४ सवाल हे विनंति.

[ १७३ ]                                      ।। श्रीरामचंद्राय नम: ।।                                     ६ जून १७४८.
                                                                                                                 पंत स्वामी प्रतिनिधि.        
                                                                                                           

श्रीरघुराजचरणसेवातत्पर श्रीमंत राजमान्य राजश्री भगवंतराऊ स्वामीचे सेवेसीः -
आज्ञाधारक नारो महादेव कृतोनक साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल छ २० माहे जमादिलाखर जाणून निजानंदवैभव सदैव इच्छितों. विशेष. राजश्री गंगाजी संकपाळ स्वामीचीं पत्रें नबाबसाहेबांकडे घेऊन आलेत. मशानरइलेही दरबारांत जो तलाश करावयाचा तो केला. परंतु अर्जी मुख्यास गुजरणावयासी कोण्हीं साह्यता न केली. दरबार थोर. बावीस सुभे हिंदुस्थान व सा सुभे दक्षण, अठाविस सुभियांचें काम या गृहांमध्यें आलें आहे ।।। आपलें वर्तमान. पूर्वी आपण गदक लक्ष्मेश्वर येथील देसाई व्यंकपाया यांचे चाकर होतों. जे समयीं रेडी श्रीमंत राजश्री स्वामीसी भांडत होती, त्याप्रसंगीं देसाईजीहीं आपणास तीनशें स्वार व तीन हजार बारकंदाज समागमें देऊन मदतीस पाठविलें होतें. आपण तीन वर्षे श्रीमंतजीचे सेवेमधें होतों. प्रतापास सर्व जाणत होतों. गंगाजी संकपाळ यांही वर्तमान निवेदन करतांच कळों आलें की, पत्र हिंदवी आहे. आपणावरी श्रीमंतजी स्वामी कृपा बहुत करीत होते. त्यापरीस विशेष कृपा स्वामींनी करावी ऐसा मनोरथ चित्तीं धरोन एके दोघा अमिरांसी विचारलें तों त्यांची आज्ञा कीं, हिंदवीपत्र नबाब साहेबास गुजरत नाहीं हें वृत्त परिच्छिन्न ध्यानास येतांच हिंदवी पत्र फिरविलें पत्रार्थ ध्यानास आणोन राजश्री गोपाळराम मुनसी यांचे हस्तें फारसी अर्जी तयार करोन, थैली दाखल करोन, दरबारचे मोहोर हशममुल्लाखा पातशाही व बक्षी व अनवरखांजी व फतरुद्दीअल्लीखांजी अर्जबेगी व नजरबेगखांजी बक्षी फौजेचे व ज्यान मिर्जाखा मुनसी व दरगाह कुलीखां दरोगे हरकारे मुसाहेब सरकारचे बहुत व हकीम हसनअल्ली सर्व साधून, माह्यतेवरी आणोन, नजरबेगखां बक्षीचे मा। अर्जी गुजराणिली हें वर्तमान सर्व गंगाजी संकपाळ यासी विदित आहे पत्रीं सर्व लिहिले असेल त्यावरून निवेदन होणार आणि दरबार येथील श्रम व द्रव्यसाध्यें हातात येतो गंगाजी रिक्तहस्तें येथें आले. यास द्रव्य कोठें मिळणार ? स्वामीचे चरणासी जोड परिच्छिन्न करावी हा हेतू पूर्ण स्मरोन, अनेक उपाय योजून, इनायतनामा दरबारामधून काहाडोन कंठुराय कमलापंत साऊकार याचे दुकानीं आणिला. स्वामींचे नांव थोर ह्मणून हरएक मुत्सद्दी वगैरे हजारो मागतात. सेवकानीं तडजोड करून दरबार खर्च ठरवून आपला जातरुका साहू मजकुरास देऊन, त्या हातीं मुत्सद्दी यांची निशा करविली. तपसील जैल नजरबेगखा बक्षी ५०० रुपये, व मुनसी ५००, व अर्जबेगी ५००, व मुनसीचे पेशकार दोघे व खिजमतगार, चोपदार वगैरे किरकोळ खर्च ५०० एकूण दोन हजार रुपये मोठ्या युक्तीने ठरावून कार्य संपादिले गंगाजीस पैसा मिळत नाहीं ह्मणून अजुरदार कासद करोन सेवेसी पाठविला आहे. येथे रुपये १० नक्त कासदास दिधले. स्वामीनीं तेथें बावीस रुपये सध्यां देऊन रसीद बावीस रुपयांची घेऊन पत्राबरोबर पाठवावी, कीं कासदाचे मिरधियापासून रुपये मुजरा घेतले जातील पत्राचें उत्तर पत्र सेवेसी प्रविष्ट होतांच ऐवजाची हुंडी व कोण्हीं आपले सरकारचे मनुष्य समागमें देऊन रवाना करावें. कामदानें १६ रोजाचा वायदा करून आला आहे. यास अविलंबें मार्गस्थ करावें. कासद येथें पावलियावरी राजश्री गोपाळराम व राजश्री शिवराम शामराज उभयता इनायतनामा घेऊन सेवेसी येतात. भेटीअंती सर्व वृत्त मनसुबा पेस्तर करावयाचा विचार सत्वरच केला पाहिजे. यांस यासमयीं फौजेचें बहुत अगत्य आहे. इनायतनामा देतेवेळेस नबाबसाहेबीं आज्ञा केली कीं, पन्नास हजार स्वार व पंचवीस हजार बारकंदाज सामान चांगलें घेऊन येणें. सरंजामही तुह्मांस जो पाहिजे तो दिधला जाईल. मतलब हाच की, जैसे वैकुंठवासी श्रीमंतजीचें नांव थोर आहे तैसाच सामान योजिल्या उत्तम आहे उभयतांच्या भेटी जाहलियावरी कामें बहुत होतील या कामांत गंगाजीनें बहुत मेहनत केली. पत्रीं लिहितां विस्तार होतो. मा। हुसेन स्वामीकडोन गंगाजीचे समागमें आला ते मनुष्य समागमायोग्य नाहीं. कार्याचा नाश यानें बहुत केला. स्वामीचाच प्रताप होता कीं, काम नाश न पावलें उभयतां सेवेसी पावता निवेदन करितील नबाब साहेबांच्या चित्तीं बहुत आलें आहे कीं, एक वेळ स्वामीनीं यावें आणि भेटीअंतीं स्वामीचे उर्जित करोन मग एकचित्तें जें करावयाचें तें करावें. नबाबाहीं बोलूनही दाखविलें कीं, महाराष्ट्र राज्यामध्यें तुह्मीं बहुत दिवस चाकरी करिता, कामेही बहुत केलीं असतील, एक वेळ मोंगलाईचीहि मजा येऊन पाहणें, आणि आपला नक्ष करावा. ऐसें वर्तमान । आहे. सत्वर भेटीचा विचार जाला ह्मणजे यास फौजेचे जरूर ह्मणोन जागिरा चित्तानरूप मिळतील. आणि मदत खर्चही घेतला जाईल श्रुत व्हावें. नजरबेगखानाचे पत्राचे उत्तर बहुत थोरपणें लिहून पाठविलें पाहिजे कीं, कितीएक कामें त्यांचे हातें घेतली पाहिजेत. ते मुरब्बी आहेत कळावे हे विनति.
राजश्री गोपाळराम व शिवराम शामराज यांचे नावें अभयपत्रें पाठविली पाहिजेत. या उभयतांना पाठवावयाकारणे नजरबेगखानजीहीं सांगितले. मनुष्ये थोर कार्याची आहेत स्वामीचे भेटीअतीं सर्व कळों येईल विशेष काय लिहिणे हे विनंति.

लेखांक १७६                                                                    श्री  

यादी गोविंद जोशी बि॥ शाम जोसी लक्ष्मण जोसी बि॥ रामचद्र जोसी यजुरवेदी जोतिषी कसबे वाई व जोरखोरे जाबुबखोरे समत मुर्‍हे वगैरे गाव समत हवेली व किले पाडवगड व किले कमलगड व किले कलेजा को। मा। सु॥ तिसा सबैन मया व अलफ सन ११८८ शके १७०० विलबी नाम सवछरे तुह्मास दिल्हे निवाडपत्र ऐसे जे तुह्मी हुजूर किले पुरदरचे मुकामी येऊन विदित केले की सदरहू जोतिषपणाविसी वासुदेव जोसी बि॥ लिग जोसी ॠग्वेदी याणे कजिया करून कैलासवासी श्रीमत नानासाहेब याजपासी फिर्याद होऊन मनसबीबदल आह्मास हुजूर पुणियास आण उपरात त्याणे व आह्मी तकरीरा व जामीन देऊन प्राचीन कागदपत्र दाखविले त्याजवर वाद्याने वतनाची जप्‍ती करविली यानतर हर दोजण साक्षीदाराचे साक्षीस मान्य जालो त्याच्या साक्षी कैलासवासी श्रीमत माधवरावसाहेब याचे वेलेस जाल्या वतन जप्‍त होते ते मोकले करून तुह्माकडे पहिलेप्रो। चालते केले परतु निवाडपत्र जाले नाही तरी हाली साहेबी मनास आणून मनसुबीचा फडशा करावा ह्मणुनु विनति केली त्याजवरून दप्‍तरातील कागदपत्र पाहाता शके १६१८ मध्ये उभयता वाद्याही तकरीरा लेहून दिल्ह्या त्यातील आन्वय

तुहमी गोविंद जोसी याणी लेहून दिल्हे जे पूर्वी वासुदेव जोसी ॠग्वेदी याचा वडील कृष्ण जोसी पणदरेकर थोर विद्यापात्र होता त्याजपासी मुरार जगदेराव ब्राह्मण दरिद्री भक्षावयासी नाही यास्तव त्याणे कृष्ण जोसी याजवल आपले हवाल सागीतले तेव्हा जोसी याणी त्याचे सामुद्रिक लक्षण पाहोन ईश्वर तुझे बरे करील ऐसे सागून आपण कोलापुरास जाऊन श्री चे आराधन केले देवी प्रसन करून घेतली आणि मुरार जगदेराव यास विजापुरास पातशाहाकडे पाठविला तेथे त्याला सेवा लागली उपरात त्याणे कृष्ण जोसी यास पालखी व घोडी पाठऊन विजापुरास घेऊन गेले आणि पातशाहास भेटऊन गौरव करविला कसबे मा।री श्री बिदुमाधवाचे देवालय पडले होते तेथे घर बाधून देऊन कर्‍हाड व कोल्हापूर प्राती गाव इनाम कसबे वाघोली व बावधण व कसबे वाई वगैरे गावी इनाम वर्षासने करून दिल्ही त्यापासून कसबे मा।री दिवाणात चाल पडली त्यामुळे गावातील ब्राह्मण व लोक आर्जव करू लागले व दिवाणात पचाग व मुहूर्त सागून कार्य प्रयोजने सागू लागले प्रशसा बहुत जाली दिवाणातून तेल व पाने व पासुडी व पायपोसीचा जोडा व वाखणी व आडीसेरी व रस ऊस सेरीमध्ये व तश्रीफ याप्रमाणे करून घेतले त्याबरहुकू(म) काही दिवस चालत होते मरारपती तुला केली तेव्हा कृष्ण जोसी यास लक्ष रुपये प्राप्‍त जाले व तुलापुरामधे आसामी करून घेतली आणि सोला सेराची सुवर्णाची मुहूर्त अनुष्टानास्तव केली होती ती त्यास दिल्ही तिजवरील द्रव्य पलाले ईश्वरक्षोभ जाला तेव्हा मुहूर्तीचे हातपाय मोडून खाऊ लागले दरिद्रता प्राप्‍त जाली ते समई शरीरसमधी गावामध्ये होते त्याणी सरक्षण केले त्या कृष्ण जोश्याचा पुत्र आनत जोसी त्याचा लिग जोसी त्याचा हाली वासुदेव जोसी याप्रा। वाद्याची हाकीकत आहे आमची हाकीकत तरी आपले वडील वडील ताब-सिलसे व हेलवाक कोले यापासून रोहिडखोरे यापर्यत जोतीषपणाची वृती आनभवीत होते व कसबे मा।री आपले कडत जोसी होते त्यास आक्षर नाही आणि एकटे यामुळे वृती चालवावयास आजुलास गेली वृती नाकर्तेपणे बुडाली गावात लग्नमुहूर्त जाली तरी घरोघरचे ब्राह्मण आक्षत घेऊ लागले भाऊबद एकदोन होते त्याणी वृत्तीस नागवण पडली ह्मणोन नारायणभट थिटे यापासून कर्ज वृत्तीचा त्याजला गाहाण दिल्हा कर्ज द्यावयास सामर्थ्य नाही ह्मणोन ते हि वृत्ती टाकून पलोन गेले नारायणभट वृत्ती खाऊ लागला त्याची पाठ सर्व ब्राह्मण राखू लागले पुढे कडत जोसी गावास आलियावर कतबा सोडऊन वृत्ती घेतली परतु चालवावयासी कोणी नाही तितक्यात वासोलकर व धोमचे मुतालीक वादास उभे राहिले वासोलकर याणी भुते घालून कडत जोसी यासी मारिला त्याचा पुत्र रग जोसी लाहान भक्षावयास न मिले दावेदारानी कसाले दिवस दिवस करावे कोठे उभे राहू न देत वाईस आले तरी धर्मास कोणी अक्षत देत ऐसे काही दिवस चालले पुढे थोर जालियावर वासोलकराचा धोमचे थडीचा वाद लागला

महाराष्ट्र इतिहास.

खर्ड्याच्या लढाईचा पत्रव्यवहार.

( गोविंदराव काळे यांचे दफ्तर; खासगी. )

श्री.
( शके १७१५ वैशाख वद्य ११ मंगळवार. )

विनंति उपरि “येक हजार बंदुखा तीन नमोण्या प्रो।।, खरीद करण्याच्या; पैकीं पुणीयांत इंग्रजी व फरासीसी दोन मासल्याच्या मिळतात. त्या, नमोण्याचे बंदुखाहून, वजनास आदसेर पावसेर जाजती आहेत. " इत्यादिक ते॥ २  लिहिल्या अन्वयें मध्यस्तासी बोललों. नमोण्याच्या बंदुखा जुन्या, सबब नवे खरीदीच्या बंदुखा वजनास यापेक्षां अधिक हें कारणही सांगतले. याजवर मध्यस्त बोलले कीं:---“थोर बंदुखाचे दोन नमुणे पाठविले त्याबमोजीब इंग्रजी व फरासीसी बंदुखा पुण्यांत मिळतात. नेमाप्र।। च्यारसें त्या व दुस-या च्यारसें एकूण आठशा बंदुखांची खरीदी व्हावी. नव खरीदीच्या बंदुखा जुन्यांहून अलबता वजनास आदतेर पावसेर जाजती असतील, याची चिंता नाहीं. परंतु पुण्यांत नव खरीदीच्या बंदुखा, याची किंमत ईंग्रजी बंदुखांची कसी व फरासीसीस काय पडतें? हें कांहींच गोविंदराव ह्यांनीं न लिहिलें व रघोतमराव यांजकडूनही लिहिण्यांत आलें नाहीं; हें काय” ? या प्र।। बोलले. त्यास इंग्रजी व फरासीसी बंदुखांची किंमत चौकसीनें लेहून पाठवावी. त्या प्र।। मध्यस्तासी बोलतां येईल र॥  छ २४ सवाल हे विनंति.

श्री.
ज्येष्ठ व. ३ बुधवार शके १७१५.

विनंति उपरि. बाळाजी रघुनाथ यांची रवानगी लौकर करावी. तेथें रिकामे आहेत. येथें कामें फार तटलीं. यास्तव म।रनिलेस सत्वर र॥ करावें. र॥ छ, १६ जिल्काद हे विनंति.

श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.

विनंति ऐसी जे-पेशजी गोंविंदराव यांचे लिहिण्यांत म॥र आला होता कीं “उमरखेड वगैरे प्रांतांत खुर्दा नवी पडतो. त्याची जमाबंदी होती. याजमुळें सरकारचे नुकसान फार, दरसाल कमाविसदारांस सरकारांतून नुकसान मुजरा द्यावें लागतें. त्यास याचा मजकूर मध्यस्तांसी बोलून प्रांतांत मोगलाईकडील मा( मलत ) तेथील बंदोबस्त व पैशाचा ठराव करून........ ल्याहावें. ह्मणजे इकडोनही उमरखेडकर कमाविसदारास ताकीद अमलांत येईल. ह्मणोन सरकारची आज्ञा निकडीची आहे. त्यास सदरहू म।।र मध्यस्तांसी बोलून बंदोबस्त करून लौकर ल्याहावें.” ह्मणोन लि। होतें. त्याजवरोन मध्यस्तांसी बोलणें जालें. यांणींही आपले माहलांतील नुकसानीचा बयान फार सांगितला; व उमरखेडकराचा बयान फार केला. एक उमरखेडकराचा बंदोबस्त जाला ह्मणजे आह्मी आपले माहलांत बंदोबस्त करवितों ह्मणोन नेम करून शाहआलमबादषाह याचे नावें सिका व पैसा निखालस तांब्याचा दाहा मासे असावा याप्र॥ करार करून सैदमुजवरखान यांस याणीं आपलेकडील माहलचे टांकसाळेचे अमीनीचें काम करार करून नवाबाचे मोहरेनसी सनद करून पाठविली. .... .... ही सांगितलें कीं “ तुह्मीं मदारुलमाहम ........ ल्याहार्वे व ऐक पत्र आपले नावें दिल्हें तें रवाना .... ............ पावेतों जागाजागाचे पैसे खोटे चालीचे .... .... ते ते यांचें येथें अमीलांनीं पो। होते तेही पाहाण्यास पो। आहेत. अवलोकनें ध्यानांत येईल. उमरखेडांत पैसा होणें तो दाहा मासे वजनाचा व्हावा ऐसी ताकीद कमाविसदार यांस व्हावी आणि मुषीरुलमुलुक यांचे पत्राचे उत्तराविषईं आज्ञा व्हावी. । र।। छ. १५ जिल्काद हे विनंति.

श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.

विनंति ऐसी जे-राजश्री रघोजी भोंसले सेनासाहेब सुभा यांसी व वेंकोजी भोंसले उभयेता बंधूंत कलह होऊन सेनासाहेब सुभा यांनीं त्या कलहांत आपले कपाळावर तांब्या मारून घेतला. असी आखबार नवाबाचे येथें आली. खरें लटकें याचें वर्तमान-तेथें वर्तमान आलें असेल तें खरें. वर्तमान ऐकून आश्चर्य वाटलें. र।। छ, १५ जिल्काद हे विनंति.

[ १७२ ]                                      ।। श्रीभवानीशंकर ।।                                        ६ जून १७४८.                                                                                                                                        

श्रीमंत महाराज राजमान्य राजश्री भगवंतराऊ स्वामीचे सेवेसीः -
सेवक नारो महादेव मु।। अवरंगाबाद साष्टांग नमस्कार विनति उपरि येथील कुशल छ २० माहे जमादिलाखर त्रिसीय प्रहर जाणून निजानंदलेखनार्थ आज्ञा इच्छितों. विशेष. स्वामीनीं अजूरदार कासद आमचा व रायाजी व सिदोजी जासूद सा। चे याबरोबर पत्रें पाठविलीं ते छ १७ माहे जमादिलाखरी भृगुवासरीं शहरी पावलीं पत्रार्थ ध्यानास आणून बहुत संतोष जाहला, तो पत्रीं लिहितां न ये. येथील वर्तमान सांप्रत स्वामीस विदित नाहीं आधींच तो मोगलाई दरबार, दुसरे नवाब निजामनमुलूख यांची बुद्धीस ताम्ररा्ज्यामध्यें कोणास आहे ? मोठें प्रेत्नें मुत्सद्दीयासि व मूसाहेब अमीर पल्लियावरी आणोन कार्य संपादिलें त्याचे खर्च जरूरी लागला त्याचे समारभाकारणें येथें पैसा हातीं लागेना ह्मणून अजुरदार सेवेसी पाठविले त्यासी उत्तर साफ लिहिले की, परभारें तुह्मींच सरकारांतून ऐवज खर्च घ्याल त्यापैकीं साउकारास उगवणी करणें ऐसियासि ऐसें होत नाहीं दरबारचा व्यवहार ऐसा आहे कीं, खर्च ज्या मुत्सद्दीयासि करार करावा त्याचे घरीं आधीं थैली पावती करावी, आणि नित्य घरी दुवख्ता पाणी भरावें, मग जे होणार ते होतच आहे ऐसा रग दरबारचा आहे ऐसेही असता मुरबी मातबर पाहिजे स्वामीचे कार्यनिमित्य मुरबीही मातबर केले, आणि कार्य केले, आणि अजुरदार सेवेसी रवाना केले. यावरी मागें छ ४ जामदिलाखरी नबाब आसफज्याचा काल जाला ताबूत रोजियास पावला कुल सलतनत नबाब नासरजग यांसी सोपिली. ऐसें वर्तमान जालें ऐसियासी नबाब साहेबांचे सरकारांत जे मुत्सद्दी आहेत ते तो पल्लियावरीच आहेत. साप्रत नबाब नासरजंग यांचे सरकारांत मुत्सद्दी मातबर आहेत त्यासी स्नेह बहुत आहे. आणि नबाब नासरजंगजीस अगत्य फौजेचे बहुत आहे राजश्री पेशवेयासीही निर्मल चित्त दिसत नाहीं. पुढे पहावे राजा व सुबा नवा जाला आहे. परतु स्वामीचे नामाभिधान नबाब नासरजंग यास परिच्छिन्न इनायतनामा मोठे नबाबास देती वेळेस विदित आहे यास अर्ज करिता इनायतनामा द्यावयासी विलंब करणार नाहींत, हें आपण जाणतो. जरी स्वामीसरंजाम अति सत्वर पावता होतो तरी दोन्हीही इनायतनामे सेवेसी येऊन पोहोचतात. तैसी तजवीज फौजेची संचणी स्वामी करितील सांप्रत नबाब नासरजग यासी मोतम आहे. मोतम पुरसीची वस्त्रें पाचं उभयतास वेगळीं वेगळीं व नजर पाठविली पाहिजे ते व सरंजाम आलियावरी नजर नबाब साहेबास गुजराणून थैलीयाद व लखोटे स्वामीस पाठविले आहेत अर्जी तजवीज करोन गुजराणिली आहे येथील सर्व वृत्तांत रायाजी व सिदोजी जोडकरी पाहून आले आहेत. निवेदन करिता ध्यानास येईल. स्वामी येथील बदोबस्त जाला ह्मणजे हस्तनापुरीं वकील पाठवून हुजूरचा बंदोबस्त करितों हस्तनापुरी नवी मुद्रा जाली. मा। शाह पातशाह निवर्तले त्याचा पुत्र अहमदशाह तख्ती बसलेत. गजशिक्का शहरीं आला. त्यासी तेथील बंदोबस्त केला जाईल जे मतालब स्वामीचे असतील ते सर्व होऊन येतील मूळ, येथील बदोबस्त जाला ह्मणजे कीर्तही स्वामीचे थोरपणासारखी होईल हस्तनापूरचा बंदोबस्त हातास आला ह्मणजे मुराद सर्व गोष्टी व मनसुबा हासल होईल ऐसे आहे. याहीवरी स्वामी थोर व सरदार आहेत जो मनसुबा हितास येईल तो करतील कठुराय कमळापंत साहुकार याचा वायदा जाला ह्मणून तगादा रुपयाचा आहे तकरार लिहावयास कारण हेंच कीं, साऊकारापासून आह्मास मुक्त करावें, ह्मणून विनति असे. याचें उत्तर अतिसत्वर आह्मांस प्रविष्ट जाले पाहिजे तैसी वर्तणूक केली जाईल. मार्गप्रतिक्षा उत्तराची करितों कळले पा। हरकारे येतील त्याचबरोबर शहत लहान मासीचे २।। व आबासाल दहा शेर पाठविले पा। विशेष काय लिहिणे हे विनति.

श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.

विनंती ऐसी जे-मिस्तर किनवी दिलावरजंग हैदराबादेस आहे. बेदरास येणार होता. परंतु तबियेत आराम नाहीं. मांदगी ! सबब तेथें राहून त्यांनी आपले तर्फेनें भिस्तर ईष्टवट यास रवाना केलें. ईष्टवट बेदरास येऊन नवाबाची मुलाजमत जाली. सांप्रत ईष्टवट व मवलवी दोघे दरबारीं जाबसालास येथें आहेत. किनवी दिलावरजंग हैदराबादेहून अद्याप आले नाहींत. र।। छ, १५ जिलकाद हे विनंति.