Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.
विनंति उपरि. “सुरापुरकराकडील करार जाल्यांत तथा नाहीं. वागवून घेणें. मंत्रीकडे व्यत्यास पडूं नये. ऐवजही येतो. व्यंकटराव उण्यावर असतील त्यास जपावें. गोपाळ आपा त्यांचे त्यांजकडे पाठवावा.'' इत्यादिक लिहिलें. त्यास सुरापूरकराकडील मजकूर मंत्रीसी बोलण्यांत आला. यांचें बोलणें कीं--“एक महिन्याचा करार असतां, आपण या कामाचे दरमीयान, बदल खातर आपली, ह्मणोन आठ महिने सबुरी केली. शेवटीं पैशास ठिकाण नाहीं. कितीही दिवस वाट पाहिली, तत्रापि शेवटीं हेंच. याजकारितां सुरापुरकरास एक वेळ थोडीशी चमक दाखविल्याशिवाय त्यांचे डोळे उघडत नाहींत. हे पक्कें समजलें. यास्तव हा उद्योग याजवर करणें जरूर. शेवटीं समेट करणें तो आपले विचाराशिवाय होणार नाहीं. परंतु कांहीं त्यांजला समजूं द्यावें " या प्रा बोलले. आह्मीं यांचीं उत्तरें केलीं कीं ‘करार बमोजीब ऐवज सुरापुरकराकडून येईल. परंतु आपण वागवून घेतलें पाहिजे.' मंत्रीचें बोलणें “आणीक किती वागवावें ? येक महिन्याचे आठ महीने झाले. अद्याप प्रथम दिवस. वागविण्याची रीत अशीच असते कीं काय ? हें आपणच सांगावे " याजवर बोलणें फार जालें. गोपाळ आपाचा मा॥र यांसी बोलावा तर यांचे ऐवजास ठिकाण नाहीं यामुळें यांची मर्जी नाईकावर खपा. त्यांत गोपाळ आपाचा म॥र बोलल्यास रुचणार नाहीं हें समजोन तूर्त गोपाळ आपाचा जाबसाल बोलण्यात आला नाहीं. दोन लक्ष रुपये तूर्त पाठविणार. त्यांत लाख पुण्याकडून व लाख परभारा येथें पाठवावे. ऐसा बेत. परंतु तोही ऐवज नाहीं. पुण्याकडून येणें त्याची अवस्था तसी. येथें येणें तो अद्याप पैसा नाहीं. मंत्रीसी भिडेनें सुरापुरकराविषयी किती बोलणे आंगेजीचें होतें ? हें त्याचे गांवीं नाहीं. त्यापक्षीं यांचे येहसान अंगावर घेऊन त्यांजकडून काहींच अमलांत न यावें. याप्र॥ कोठ पावेतों दिवसगत करावी ? हें कांहीं चांगलें नाहीं. यास्तव इकडूनही सुरापुरकरास बहुत कांहीं लिहिण्यांत आलें. तुह्मींही हे सर्व प्रकार लेहून ऐवजाची तोडजोड आठ पंधरा दिवसात होत असल्यास ल्याहावें, तो प्रकार त्यांजकडून घडणें असाध्य. ऐसें असतां मंत्रीसी बोसणें तसें अंग टाकून बोलतां येईल. यांची नजर तूर्त त्यांजवर वांकडे चालीची दिसती. ऐवजाची सरंबराई होऊन आल्यास बोलूनच फेदफे ' करण्याची शकल ठरवितां येईल. नाहीं तर केलें कर्तव्य व्यर्थ होऊन बखेडा पडतो. हें मनन करून त्यांजकडे लिहिणें ते ल्याहावें व इकडे खुलासा उत्तर पाठवावें. त्याप्र।। समजोन बोलतां येईल. सुरापुरफर यांचा प्रतरणेचा कारभार, बोलावें त्याप्र।।, कांहींच अमलांत येत नाहीं. लबाड कारभार त्यांत हर्फ येण्याचा प्रकार. याजकरितां बेजार जालों. कृष्णाजीपंत तुह्मांपासीं बजावून गोष्टी सांगतात, तितकेंच ! परिणाम सुधा नाहीं. पार पडणें ईश्वराधीन आहे ! र॥ छ० २ जिल्काद हे विनंति.

२ दोप्रकारच्ये लिहिले आहे चिवड्याच्या सबब

१ वेंकोजी गिरमाजी देशपांडे प्रा। वाई याचे साक्षीत मूळ जोतीषपणाची वृत्ती कोणाची दखल नाही यजुरवेदी च आनभवीत आले ज्यापासून यास प्राप्‍त जाली त्यापासून कृष्णराव याचे वेलेस कजिया जाहाला तेव्हा त्यानी मनास आणून वासुदेव जोसी याचे वडीलावडीलास दिवाण जोसी व यजुरवेदी यास गाव जोसी केले ते वेलेचा महजर शामजी झुगोजी देशपाडे याचे हातचा आहे ह्मणोन याजवर दुसरियाने छ २६ रमजानी लेहून दिल्हे की कसबे मा।रची मूळवृती आराधे याची त्याचे लेकीचा वश केजले काही दिवस चालवीत होते उपरात केजले टाणपे सबब त्याणी वासुदेव जोसी ॠग्वेदी याचे वडीलास जोसीक दिल्हे तदनतर दलपतराव जाहागीरदार आले त्यासमागमे यजुरवेदी आले ॠग्वेदी विद्येमुळे प्रतिष्ठित यास्तव दलपतराव याणी जोसीपण यजुरवेदी यास दिल्हे वासुदेव जोसी याचे वडील रसूलखानाचे आमलात कसबे मा।रास आले कृष्णराव याचे वेलेपासून वासुदेव जोसी याचे वडील कोटातील फौजदार व सेखदार वगैरे लोक कोट नि॥ याजकडील करू लागले गावनि॥ यजुरवेदी करीत आले ह्मणोन

१ दताजी वलद सिंदोजी परीट ह्मेतर कसबे वाई उमर वर्षे ५० याचे साक्षीत मूळ वतदार दिवाण जोसी ते च दिवाणपण व गावजोसीपण खात आले आपले पणज्यापासून आपणापावेतो यजुरवेदी खातात पणज्यापलीकडे कसे चालत होते हे न कलेल इदलशायानी दिवाण जोतीष इनाम दिल्हे गावजोसपणाचा भोगवटा पुरातन यजुरवेदीयाचा चालत आला ह्मणोन कलम
-------

-----

७ क्रियाबल काही ठाऊक नाही

१ तुसाजी माहाजन कसबे वाई उमरवर्षे ४०
१ होनापा ताबोली कसबे वाई उमर वर्ष ३५
१ दादसेट कोष्टी कसबे वाई उमर वर्ष ४०
१ जाननाक माहार मौजे बोरगाव उमर वर्ष ३५
१ सुरा माहार मौजे मालतपूर उमर वर्ष ४०
१ केदारजी पाटील मौजे पानस उमर वर्षे ५०
१ नाईकजी पा। मौजे सोनगीखाडी उमर वर्ष ४०
-----

----


बाकी आसामी साक्षीदार १०१ एकसे एक याचा साक्षीतील सारोख - →पुढे वाचण्यासाठी इथे क्लीक करा

श्री.

यादी जमाखर्च आमदनी देहात वगैरे.

एकंदर रूपये
१६५००
तपशील----
१०००० बावत आमदनी देहात.
४००० मौजे देवलाली.
४००० मौजे जांतेगांव उमरगांव.
२००० मौजे जवळें तीजपामर्जी ?
----------
१००००
६५०० सीवाय कलमें.
   ६००० रंगराव दिवाण.
    ५०० आहमद साहेब निंबालकर.
   ------------
    ६५००
---------
१६१००
यास वराता बदल. रूपये
४००० कुबेरचंद मोदी.
३००० जाधव मारवाडी.
३००० रायेचंद मारवाडी.
३००० साहेबखान आफखान.
२००० म्यानचंद मारवाडी.
८०० आंदाप्पा कोरपे.
५०० सलमखान.
२०० सुभाना माहर,
---------
१६५००
सोळा हजार पांचशांच्या वराता केल्या होत्या, त्या माघा-या फिरल्या. सबब ऐवज द्यावा, या प्र।। रावरंभा यांचें बोलणें.

[ १७५ ]                                             श्री.                                         ६ जून १७४८.                                                                                                                                       

राजमान्य राजश्री राऊसाहेब भगवंतरायजी स्वामीचे सेवेसीः -
1अखंडलक्ष्मीसुप्रसन्न राजमुद्राविराजित स्ने।। गंगाजी संकपाळ, मुकाम शहर अवरंगाबाद विनंति उपरि येथील कुशल छ २० जमादिलाखर जाणून निजानंदलेखन सदैव इच्छितो. विशेष. अजूरदार कासद व रायाजी व सिदोजी जासुदांबरोबर पत्रें व खलित्या व लखोटे पाठविले, ते शहरीं प्रविष्ट जाले. येथील वर्तमान सर्व राजश्री नारो महादेव यांचें पत्रीं लिहिलें आहे, त्यावरून कळों येईल. येथें कार्याची उभारणी करावयासी आळस केला नाहीं. अगत्य जाहलें, ह्मणून अजूरदार कासद सेवेसी पाठविला. त्यासी उत्तर साफ आलें. येथें पैसा मिळत नाहीं, ह्मणून पत्रीं लिहिलें होतें. आणि उत्तरें ऐसीं आलीं. ऐसियासि, आपला इलाज काय ? सर्व रायाजी व सिदोजी रोबरो पाहून आले आहेत, निवेदन करितील. तें ध्यानास आणून साहित्य येऊन पोहोचत आहे, तरी सर्वही होऊन येतें. याहीवरी सरदार आहेत! सांप्रत साउकारांस रोखा राजश्री नारो महादेव याणीं दिधला आहे. त्यास तकाजा बहुत आहे. त्याचें साहित्य होऊन येईल, तरी उत्तम आहे. साहेबीं वचन इमानप्रमाण घेतले ह्मणून हें कार्य करणें आलें. अभिमान सर्व साहेबांस आहे. अभिमानपूर्वक साहित्य प्रविष्ट जालिया यशकीर्ति स्वामीची आहे आणि साहेबाचेंहि कार्य थोर होऊन येतें कळलें पाहिजे. विशेष काय लिहिणें हे विनंति.

श्री.
पु॥ राजेश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.

विनंति उपरि. रावरंभा यांनीं मध्यस्तास समजाविलें कीं “तालुकियाचे का रभाराशिवाय माझा ऐवज साडेसोळा हजार येणें या ऐवजीं हरिपंत याजवर वराता मीं केल्या असतां त्यांनीं वराता माघारा दिल्या. तो ऐवज देवावा” त्यावरून मध्यस्त आह्मासी बोललें कीं “वराता  यांनीं आपले शिवाय ऐवजीं केल्या त्या माघा-या देण्याचीं सबब काय” ? आह्मीं उत्तर केलें “ याचें कारण समजण्यांत आलें नाहीं " मध्यस्तांनीं यादबाजीनीं त्यांजपासीं पारसी करून दिली होती ते दाखविली आणि बोलले कीं “ या पारसी यादीची हिंदवी करून गोविंदारव यांजकडे पाठवावी आणि त्यांस लिहावें कीं हा ऐवज यांस येण्याचा असतां वराता माघा-या दिल्या; सबब काय? ऐवज यांचा पावता व्हावा.'' ह्मणोन सांगितलें त्यावरून पारसी यादीची हिंदवी प।। आहे. ‘रकमा मनन कराव्या, सदर्हू ऐवज नगदी द्यावा ' ऐसें यांचें बोलणें आहे. मुषीरुल्मुलुकही बोलले कीं ‘करारामदाराशिवाय यांचा ऐवज; यास हारपंत यांनीं दिलात घालणें ठीक नाहीं. हा ऐवज यांजकडील अनामत यांस पाठवावा.' याचें उत्तर लवकर यावें र ॥ छ २ जिल्काद हे विनंति.

१ सन मा।री शके १६३७ मध्ये शाम जोसी व नारायण जोसी गाव जोसी का। वाई यास लिग जोसी दिवाण जोसी याणे यजितखत लेहून दिल्हे त्यात तुह्मी गावजोसीक कदीम मिरासी ऐसे चालत आले त्यास तुह्मी कोटात दखल करू लागलेत यामुले गावजोसीक दरोबस्त आपले तुम्ही मुतालीक म्हणोन उभा राहिलो तेव्हा साहेबी, आवघे वतदाराच्या साक्षी घेतल्या त्यावरून जोसी कोटातील आम्ही व गावचे तुम्ही याप्रमाणे जाले आम्ही खोटे पडलो म्हणोन कलम

१ सन मा।री कृष्णाजी बि॥ दताजी कीरदत विश्वासराव नाइकवाडी याणी सातारियाचे मुकामी साक्ष पुसिली तेव्हा लिहून दिल्हे त्यात लिगोजी दिवाण जोसी याणे कोटात सदरेस पचाग सागावे गावजोसी यास भाडावयास समध नाही त्याचे वडीलानी आमचे वडीलाची व बाजे नाईकवाडी - याची लग्ने लावली नाहीत शाम जोसी व नारायण जोसी याचे वडील लावीत आले ह्मणोन कलम १


----

----
२४

२ वासुदेव जोसी याजकडील कागद

१ शके १४८६ मधील त्यात पील जोसी बिन बोप जोसी प्रा। वाई यासी माल पटेल व गणो बिन माहाद पटेल पालवे वस्ती मारघर याणी आपली बटीक दिल्ही येविसीचे पत्र यास वर्ष आज ता। २१४ होतात कलम

१ शके १५०६ त्यात गोविंद जोसी बि॥ पील जोसी यास आबा जोसी याणे लेहून दिल्हे की वाघोलीचे जोतीष व कुलकर्ण आपण आनभऊन तुह्मास मान भाग होन ३ व गला दाहा मण दर साल देत जाऊ ह्मणून यास वर्षे आज ता। १९४ होतात कलम

-----

सदरहू प्रो। हरदो जणानी कागद दाखविले यानतर मनसुबीचा पचाईतमते सित्धात होईल त्याप्रा। वर्तावे ह्मणून वर्तणुकेस जामीन दिल्हे

तुह्मास जामीन मोकदम वासुदेव जोसी यास
मौजे धोम प्रा। मा।र १ जामीन मोकदम मौजे
का प्रा। मा।र १

याप्रा। जामीन दिल्यावर आपल्या तकरीरातील मजकूर लेहून दिल्याप्रा। कोणाचे मुखे खरे करून देता तो सागणे ह्मणोन हरदो जणास सरकारातून आज्ञा जाली तेव्हा तुम्ही व त्यानी साक्षीदाराचे साक्षीस मान्य होऊन साक्षीदाराची नावनिसीची यादी लेहून दिल्ही त्याच्या साक्षी धोमास घ्यावयाचा ठराव उभयताचे रजावतीने जाला त्यावरून हुजूरचे कारकून धोडो बलाल रसाल यास पाठविले त्यानी साक्षीदार धोमास आणून श्री कृष्णेमधे प्रथकारे उभे करून त्याचे माथा बेल तुलसी घालून साक्षी लेहून घेतल्या व देशमुख व देशपाडे यास हुजूर आणून पुरसीस केली एकूण साक्षीदार आसामी ११० पैकी वजा

श्री.
पु॥. राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.

विनंति उपरि “बजाजीपंत व वक्षी व जामदार यांजला दफ्तराचा
तगादा रावरंभा यांनी केला हें मध्यस्तासी आमचें बोलणें झालें, दर्याफ्त होणार '' इत्यादिक पेशजी लिहीण्यांत आलेंच आहे. छ. २२ सवालीं दोन प्रहरास मध्यस्तांनीं जलसा केला. रावरंभा आले; बाबाराव व हरराव यांजलाही बोलाऊन आणिलें. बजाजीपंत, बक्षी, जामदार आणून दफ्तराविषयींची भवति न भवति जाली. मध्यस्तांनीं आम्हांकडे येण्याविषयीं सांगोन पाठविलें. त्यास, अस्तमानीं सांवतखान यांस घेऊन जाण्याचें, सबब दोनप्रहरीं जावयास अवकाश न जाला. दुसरा चोपदार आला कीं ‘आपल्याकडून कोणास पाठवावें. त्यावरून माधवराव यांस पाठविलें. आडीच प्रहरपर्यंत जलसा जाला. “उदईक याच समयीं निर्णय सांगतों' याप्र।। सांगोन , ते दिवसीं इतकें जालें. अस्तमानी आह्मीं गेलों तेव्हां जाला म।।र मध्यस्तांनीं सांगितला. “उदईक जलसा आणिक होणार ' याप्र।। बोलले. त्यावरून छ, २३ रोजीं मध्यस्तीकडे अगोदर रावरंभा, बजाजीपंत वगैरे गेले. दोन प्रहरा आह्मीही गेलों, बक्षीचे हतची एकंदर याद दफ्तराची पाहावी ह्मणोन मध्यस्तानीं दिल्ही. त्यांत कितेक दफ्तरें सरेबमोहर; व कितेक 'बेमोहरेचीं याप्रा। लिहिलीं,-त्यांतच बीबीकडील दफ्तर लिहिले आहे. बक्षीचें ह्मणणें–“बजाजीपंत दफ्तरें सांगत गेले. मी लिहीत गेलों. जामदारानें उचलोन ठेविलीं. मध्यस्त आह्मांस विचारू लागले–' ह्याचें कसें ?' आह्मीं उत्तर केलें ‘ ज्याचे जिमेस त्यानें द्यावें. रावरंभा यांचें ह्मणणें ‘दफ्तर लाल छींटाचें.' बक्षी, बजाजीपंताचे बोलण्यांत ‘पांढरे रुमालाचें' ; जामदारास फुरसीस केली, त्याचें ह्मणणें ‘वरता सफेत रुमाल आंत छीटाचें लाल.' याजवर मध्यस्तांनीं तर्क केला कीं:--दफतर कोठें गेलें नाही त्यांतच आहे. रावरंभा यांनीं पाहतां ‘लाल.’ छीटाचें नाहीं, वरतें सफेत कपडा आहे, ह्मणोन सांपडलें नाहीं' ऐसें त्यांचें ह्मणणें. यांनीं कांहीं दफ्तर सोडून पाहिलें नाहीं. त्यापक्षीं तेथेंच आहे. मोहराचीं दफ्तरें तितकीं आणावीं म्हणजे तें दफ्तर सांपडतें. याजवर आह्मी बोललों कीं - अगर तें दफ्तर तेथें न सांपडल्यास जिमा कोणाचा ?' मध्यस्त बोलले ‘ यादी बमोजीब एकंदर दफ्तरें जामदाराचे स्वाधीन मोजून केली; यांत उणें आल्यास जामदारानें द्यावें, या प्रा भवति न भवति होऊन ‘ दफ्तराचे शोधाकरितां बक्षी व बजाजीपंत व जमादार यांनीं हैदराबादेस जावें' याप्रा मध्यस्त बोलले. आह्मीं उत्तर केलें “यांनीं जाण्याचें काय कारण ? जामदारांनीं जावें. ' मध्यस्तांनीं सांगितलें “मुजाका नाहीं. नोकर आहेत, त्यापक्षीं जावें व जामदारास दफ्तरें कोणतीं हें समजणार नाहीं यास्तव यांणीं जाऊन सरबमोहर दफ्तरें येथें आणावीं. खोलणें तीं येथें खोलावयास येतील.” याप्रा। ठरलें. बजाजीपंत वगैरै चौघे शहरास जाणार. कचें समजावें सबब लि।। असे. बजाजीपंत वगैरे शहरास दफ्तरे आणावयास गेले. आज उद्यां येतील, रा। छ. २ जिल्काद हे विनंति.

१ दताजी केशव नाईक देसाई व शामजी लिंगोजी व गिरमाजी झुगो देशपांडे याणी सन १११५ मध्ये पत्र दिल्हे त्यात शाम जोसी बि॥ रग जोसी मौजे धोम व आपदेव भट आडकर साकिन मौजे मा।र यास उभयतामध्ये पायरीयापासील उपाध्यपणाचा कजिया लागला होता त्याचा गोत बसून निवाडा करून थडीचे उपाध्यपण आपण निमे निमे उभयताकडे करून महजर दिल्हा त्याची हरकी रुपये १०० तुह्मी दिल्हे फौजदार स्वारीहून आलियावर फरमाना तुह्मास करून देऊ आमचे हाकदारीचा तगादा लागणार नाही ह्मणोन आहे कलम २

१ शके १६२७ सन १११५ मध्ये महजर जाला त्यात आप जोसी व उधव जोसी कसबे वाई यामध्ये लिग जोसी दिवाण जोसी यामध्ये भाडण लागून सदरेस आले त्यास सडिया साक्षीवरून यजुर्वेदी खरे जाले लिग जोसी खोटा जाला याजला लग्नमुहूर्त व जे वानी सरावा व कसबेयाचे चावडी व नावरस व गावात पचाग कोणास सागावयास निसबत नाही मुख्य राजमुद्रे यासी प्रतिदिवसी पचाग मात्र सागावे लग्न होई तेव्हा गावजोसी याणी जाऊन घटका घालावी ह्मणून कलम १

१ सदरहू आन्वये आनाजी जनार्दन सुभेदार प्रा। वाई याचे पत्र कलम १

१ महजर शके १६२७ मधील त्यात धोमच्या पायरीयावरील उपाध्यपण हाकीम व गोत मिलोन इनसाफ करून आडकर व जोसी यासी निमे वाटून दिल्हे गावचे उपाध्यपण व जोतीष जोश्यानी घ्यावे आउकरास समध नाही ह्मणोन कलम


---

किता पत्रे यास वर्षे आज ता। ७२ होतात कलम १

१ महजर शके १६२८ मधील विठल गोपाल नामजाद प्रा। जावली व देशक प्रा। वाई याणी करून दिल्हा त्यात यजुर्वेदी जोतिषी याजवल रामाजी रघुनाथ कजिया करीत होता की समत मुर्‍हे येथील जोतीष तुमच्या वडलानी आमच्या वडलास काही पैकी घेऊन व काही आपण धारादत दिल्हे ऐसे बाहालपत्र लेहून कपालास बाधून दिव्य केले खोटा जाला त्याणे यजितखत यजुर्वेदी जोतिषी यास लेहून दिल्हे आहे ह्मणोन कलम १

१ आज्ञापत्र कैलासवासी परशरामपत प्रतिनिधी याचे सन सबा मया अलफातील यजुर्वेदी जोसी याजला तेरा गाव व जाबुलखोरे येथील वृत्ती आपली ह्मणोन रामाजी रघुनाथ भाडत होता त्याणे तेल तुपाचे दिव्य घेतले तो खोटा जाला वतन तुह्मी यजुर्वेदीयाचे खरे जाले च्यारसे रुपये हारकी तुह्मापासून घेतली आसे ह्मणून कलम १

१ मोगलाकडील ठाणेदाराचा कौल सन १११६ तील विठल जोसी व शाम जोसी कसबे वाई व समत मुर्‍हे याचे नावे त्यात मुऱ्ह्यातील तेरा गावाचे मुतालिकीस रामाजी रघुनाथ व त्रिंबक सिवदेव याचे वडीलास विठल जोसी मा।र याचे वडीलानी ठेविला होता तेच खावद ह्मणोन भाडो लागले त्याचा निवाडा गोतमुखे करिता रामाजी रघुनाथ खोटा जाला आसे म्हणोन कलम १

१ सदरहू आन्वये देशमुख देशपाडे प्रा वाई याचे पत्र मोकदमानी यास

कलम

---

---

३ कितापत्रे आज ता। वर्षे ६३ होतात कलम
१ कौल रसूलखान याचा सन हजार ११२५ शाम जोसी गाव जोसी कसबे वाई याचे नावे लिग जोसी वलद आनत जोसी याणे जाहीर केले जे कालीवर पाढर रचली त्यापासून कसबे मा।रच्या जोसपणाची मिरास आपली आहे शाम जोसी नारायण जोसी हे आपले मुतालीक हे गावकराचे तोडे खरे करून देईन त्याजवर तुह्मी लेहून दिल्हे की गावजोतीष कदीम आपले वतन आहे कोटातील पचाग लिगोजीचे वडील सागत होते आपण त्याचे मुतालीक नव्हो येविसीचा पेशजी कृष्णरावजी फौजदार याचे वेलेस गोत मेलऊन निवाडा केला लिगोजी लटका जाला आपल्यास महजर करून दिल्हा त्याप्रो। वतन खातो त्याजवरून उभयतापासील कागद पाहाता लिगोजीने विजापूरचे पातशाहाचे वजीर याची खुदखते दाखविली त्यामध्ये इनाम व आडसेरी तेल पाने मरामत केले ऐसे आहे कजियाचा मा।र नाही तुह्मी आपली सनद गोत आहे ह्मणून सागीतले तेव्हा उभयता गोताचे साक्षीस राजी जालेत गोताने साक्ष दिल्ही त्यावरून लिगोजी खोटा जाला त्याणे तुह्मास यजितखत लिहून दिल्हे आहे तरी गावातील जोसीकास त्याजला तालुका नाही येविसी गोताने महजर करून तुह्मास दिल्हा आहे त्याप्रो। तुमचे गावजोसीक तुह्मी खाणे कोटातील जोतीष तो करील ह्मणोन कलम १

[ १७४ ]                                      ।। श्री भवानीशंकर ।।                                     ८ मे १७४८.                                                                                                                          

राजमान्य राजश्री भगवंतराऊ साहेबाचे सेवेसीः-
1अखडितप्रतापयशस्वी परउपकारपरायण सेवक गगाजी संकपाळ दडवत विनंति उपरि येथील क्षेम साहेबांचे कृपेकरून वैशाख वद्य ८ जाणून निजानंदवैभवलेखन अखंडित इच्छित असतो विशेष. साहेबाची आज्ञा घेऊन रुकसत होतेसमयी आपणापासून स्वामीनीं शपथ कार्याची घेतली याउपरि स्वार जालों, ते शहर औरंगाबादेस पावलों. दरबारमध्यें थैली पावती करावयासी तलास बहुत केला. हिंदवीपत्र कोणी नबाबास प्रविष्ट करीना. दोन अडीच महिने तलास केला. मग अगत्य काम केले पाहिजे ह्मणून पहिले राजश्री गोपाळराम व राजश्री नारो महादेव यासी स्नेह होता यापाशीं येऊन वृत्तांत निवेदन करतांच, याहीं उभयतां एक होऊन हिंदवीपत्र थैली काढोन पाहिली वृत्तात ध्यानास आणून, पारसीपत्र सिद्ध करोन, थैली दुरुस्त करून, मार्गेश्वरमासी नारो महादेव यांनीं नजरबेगखा बक्षी नबाबाचे फौजेचा याचे मार्फत गुजारणली. थैली पाहताच नजरबेगखानास आज्ञा केली कीं, कृष्णराउ खटावकर यांचे कोणीं आहेत कीं आणिक कोणी आहेत. कुलवर्तमान ध्यानास आणून अर्ज करणें. त्यावरून नजरबेगखानानीं वर्तमान आणविले मग राजश्री नारो महादेव स्वामीचे प्रतापास बहुत दिवस जाणतात. याहीं वर्तमान स्वामीन लिहून नजरबेगखानापाशीं दिधलें दुसरे दिवशीं फर्द नबाबास गुजराणिला. स्वामीचें वृत्त ऐकोन बहुत खुशाल जाले कीं, ते येत असले तरी उत्तम आहे, आपण त्यांचें सर्वस्वें चालऊन. इनायतनामा मुनसी यासी ताकीद करून मुखानें तयार करविला तितकियामधें नजरबेगखा वराडात खजाना आणावयासी पाठविला. आणि नबाबाचाही कुच होऊन ब-हाणपुरास लष्कर गेलें. राजश्री नारो महादेव यास समागमें घेऊन आपण ब-हाणपुरास गेलो. दरबार थोर. कुलराज्य हिंदुस्थान व दक्षण एकस्थली आलें आहे इनायतनामा हातास यावयासी बहुत दिवस लागले तलास करोन इनायतनामा करविला. तो नजरबेगखानही खजाना घेऊन लष्करास आलेत. नजरबेगखानास साहेबाचे नांवें आपण पत्र लिहून दिधलें होतें. त्यासी साह्य करोन याचे विद्यमानें दरबारचे मोहोर हातास आणून साध्यता त्या हातीं करवून इनायतनामा घेतला देतेवेळेस नजरबेगखानास नबाब बोलले की, तुह्मींहि लिहिणें कीं, जलदी फौजेचा सरंजाम, पन्नास हजार स्वार, पंचवीस हजार बरकदाज, सामानचागले आणणें सरजामही माकुल दिधला जाईल आह्मांस त्याचे उर्जित करणें अगत्य त्याचे वडलास आपण जाणतों सत्वर फौजेसहवर्तमा येऊन मुलाजमत करीत त्याचे मुदेमाफिक सर्व होऊन येईल भेटीउपरि खर्चाचीहि मदत केली जाईल ऐसी आज्ञा नजरबेगखानास जाली त्यावरून खान मजकूर याणीं सेवेसी पत्र लिहिले आहे त्यावरून निवेदन होणार साहेबापासून या मुलकांत आलिया शहरचा मोकदमा आणि महागाईही बहुत खर्चवेचास बहुत हैराण जालो पत्रीं लिहिता विस्तार होतो साहेबांचे नावावरी चौघे भले मनुष्याही संगत द्यावयाची ते दिधली खर्चवेचहि पुरविला. आणि मुत्सद्धीयाही थोर नांव ऐकोन मोठे तोंड पसरलें अनेक उपाय रचोन दरबारखर्च नजरबेगखान ५०० रुपये व मूसा ५०० रुपये, अर्जबेगी ५०० रुपये व पेशकार मुनसी व दरबारचे खिजमतगार, चोपदार वगैरे किरकोळ रुपये ५००, एकूण दोन हजार रुपये मोकरार करून इनायतनामा कठुराय कमलापंत साउकार याचे दुकानीं ठेविला आणि रोखा राजश्री नारो महादेव याणीं एका महिनियाचे वाइदियानें दिधला साउकाराकडोन मुत्सद्दीयांची निशा करविली मग आपण अवरंगाबादेस आलो येथें पैशाचा तलाश करावयाचा तो केला परंतु द्रव्य साध्य जालें नाहीं ह्मणून कासद अजुरदार अजुरा रुपये ३२ मोकरार करून १६ रोजांचे वायदियानें सेवेसी पाठविली आहे. येथे १० रुपये सध्यां कासदास दिधले. रुपये वीस साहेबीं कासदास देऊन रसीद लिहून घेऊन येथें या कासदाबरोबर रसीद पाठविली पाहिजे कीं, मुजरा घेतले पाहिजेत. दरबारखर्च लिहिलेप्रमाणे कासदाबरोबर कोणी इतबारी माणूस देऊन पाठविले पाहिजे कीं, तो आपले हातें ज्याचा करार त्यास देऊन इनायतनामा घेऊन सेवेसी पोंहचतो. साहेबीं रुकसतसमयीं आज्ञा केली होती कीं, दरबार खर्च काय लागेल आपण विनंति केली होती कीं, हे मोईन नाहीं. जे वेळेस जें ठरेल ते विनति केली जाईल त्यास सांप्रत इनायतनामा द्यावयासी दोन हजार रुपये लागले या वेगळा पोटखर्च राजश्री गोपाळराम व राजश्री नारो महादेव व राजश्री शिवराम शामराज तिघे भले मनुष्य यांहीं आपले पदरचा आह्मासकट खाऊन कार्य केले. नजरबेगखानाही गोपाळराम व शिवराम शामराज उभयतास सेवेसी पाठवावयाचें सां। आहे यांचे विद्यमाने जो विचार करणें तो करून सत्वर मुलाजमतीचा मनसुबा करणे ह्मणून सांगितलें आहे. त्यास, उभयतांचे नांवें आज्ञापत्रेहि पाठवावी, कीं गृहस्थ निर्भय चित्तें सेवेसी येऊन मनसुबा थाट करतील. फौजेचे तजविजेमध्येही असावयास अगत्यही आहे ऐसियामध्यें मनसुबा योजोन आला तीर आपले मुद्देमाफीक कार्य होऊन येईल. जागिरा व मदत खर्च चांगला घेतला जाईल. जमाव पडले साहेबी शपथ घेतली ह्मणून शरीरश्रम करोन कार्य केले आता सर्व अभिमान साहेबास आहे देखतपत्र ऐवज जासूद पत्र उत्तर पाठविले पाहिजे दिवस जातात कळले पाहिजे पांच महिने जाले की, शेख अहमद व सुभाना जासूद पत्र देऊन पाठविला पा। कीं नाहीं, संशय आहे मुलामाणसांची खबर काहीं नाही साहेब धणी आहेत परामृश करोन उत्तर पाठविलें पाहिजे. मा। हुसेन समागमें दिधला. त्याची स्थित पत्री लिहितां नये, काम खराब जालें होतें. परंतु तिघे गृहस्थ मातबर यांची भीड पडोन काम जालें. याची स्तुत लिहितां पत्र विस्तारेल. भेटीअंतीं सर्व निवेदन करूं हे विनंति.

श्री.
पु॥. राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसीं,

विनंति उपरि. ‘वाबले प्रकर्णी पत्रें तुह्मीं पाठविण्याचा त।। पेशजी लिहिला होता. त्याप्र।। मध्यस्तासी बोलणें जालें इत्यदिक पेशजी लिहिल्यावरून कळलें असेल, मध्यस्तांनीं बाबाराव यांस पत्रें देण्याची ताकीद केल्यावरून बाबाराव यांनीं पत्रें आपली दिल्हीं तीं र॥ केलीं आहेत बि।। .
१ पाटीलबावांस.
१ आबा चिटणिस,
१ कल्याणराव,
१ हरि नारायेण यांचे पत्राचें उत्तर.
----

येकूण चार पत्रें खुलीं बेगोंदै   प॥ आहेत. प्रयोजन असल्यास देऊन, बंदोबस्त करणें तसा करुन घ्यावा. मध्यस्तांनीं ‘आपलें पत्र कल्याणराव । यांस देतों' ह्मणोन बोलले. पत्र आलें ह्मणजे रवाना करूं. पाटीलबावांस मध्यस्त आपलें पत्र देत नाहींत, याचा त।। अलाहिदा त्यांचे बोलल्या प्रा। लिहिल्यावरून कळेल. र॥ छ० २ जिलकाद हे विनंति.