श्री.
वैशाख व. ११ मंगळवार शके १७१५.
विनंति ऐसी जे-मध्यस्तांनीं नवाबास सालगिरेचे संमारभांत आपले तरफेनें जवाहीर गुजराणावयाकरितां खरीद केलें. छ २२ सवालीं आह्मीं मध्यस्ताकडें सांवतखान यांस घेऊन गेलों. तेसमयीं मध्यस्तांनीं बोलण्यांत आणिणें की “हजरतीस सालगिरेकरितां द्यावयास जवाहिर तीन तन्हेचें घेतलें तें तुह्मीं पाहावें. पसंद होईल कीं नाहीं हें सांगावें." या प्रा बोलून तीन जोड जवाहीर दर जोडांत कंठी, सरपेंच, जिगा, भुजबंद, दस्तवंद, तुरावलज्या याप्रा हि-याचा जोड एक व जमरुप पांचेचा जोड एक व तिसरा माणकाचा ऐकूण तीन जोड जवाहिर दाखविलें. जवाहीर उमदे ! किमतही भारी. आह्मी पाहिल्यानंतर तसेच नवाबाकडें गेलों. जवाहिराचे खोन मध्यम्तांनीं समागमें घेऊन नवाबास दाखविले. त्यांनीं एक एक रकम पाहून मजकडें पाहावयास देत गेले. पाहून ज्या रकमेची जसी तारीफ करणें तसी केली नबाबास पसंद जालें सालगिरेच्या दिवशीं मध्यस्न गुजराणार. ध्यानांत यावयाकरितां विनंति, रा। छ. २४ शवाल हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)