Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.
ज्येष्ठ शु. ४ बुधवार शके १७१५

विनंति उपरि. तेजवंत भारामल यांनीं सांगितलें कीं “खासगत आह्मांस मोतीं पुण्याहून आणावयाचीं; येविषई गोविंदराव यांस लेहून मोतीं आणवावीं. त्याचा ऐवज येथें देतों” त्यावरून मोत्यांचे किंमतीचा अजमास व सुमारी मोतीं बि. ।।
४०० कि।। (किंमत) मोर्ती, दाणे १००. दर ४ प्र॥.
६०० कि।। दाणे १०० दर ६ प्र।।
५०० कि।। दाणे ५० दर १० प्र।।
                                   ----------
                               २५०

--------------
१५००

येकूण मोतीं सुमार आडीचशें, किमत दीड हजार. याशिवाय भावसिंग चौधरी जिनसीकडील यास जोडी नथेची–तीनसें, निदान च्यारसें, सेवटीं पांचसें पावेतों किंमतीची-उत्तम. या प्र॥ सदरहू मोतीं खरीद करून पाठवावीं. ह्मणजे ऐवज यांजपासोन येथें घेतां येईल. र॥ छ, २ जिलकाद हे। विनंति.

छ ६ जिल्कादीं टप्यावर. खानगी पत्रें.

श्री.
ज्येष्ठ शु. ४ बुधवार शके १७१५

विनंति उपरि. “पुण्यांत दुखण्याचा झपाटा भारी ! सीतज्वरानें बहुत लोकांस हैराण करून पाडलें, कितेक जीवें गेले, कितेक दुखणाईत, कांहीं नव उमेदी, कितेक कुणकुणतात.” त्याचा नांवनिसीवार त। लिहिल्यावरून कळला. मोठा उपद्रव जाला! हल्लीं मृगसीतळाई पडल्यापासोन शम जाले असेल, तुमची प्रकृत आतां कसी आहे ? निस्तोष आरोग्य जाल्याचें ल्याहावें. या दिवसांत प्रकृतीस तुह्मीं फार सावधपणें जपून अवषधपथ्यास आळस न करितां प्रकृत नीट राखावी. चिरंजीव तात्यास मधुरा जाला होता. मोठी चिंता प्राप्त होती. श्रीकृपेनें आराम जाल्यावरून समाधान वाटलें. रा छ २ जिल्काद हे विनंति.

श्री.
ज्येष्ठ शु. ४ बुधवार शके १७१५.

विनंति उपरि.
१ राजश्री हरिपंत तात्या व आबा चिटणीस तात्याचे बागांत भोजनास गेले. तेथें खिलबत झालें. याचा त। लिहिला व येथून तुह्मांस कुफिया लिहिलें होतें; त्याचीं उत्तरें तुम्हीं लिहिल्यावरून ध्यानांत आलें. त्यास तुमचे लिहिण्यावरून तर खर्चातसें वाटतें. जोंपर्यंत हिंदुस्थानांत गेले नाहींत, तोंपर्यंत आमची खातरजमा होत नाहीं.

१ बेदरच्या गोष्टीविषई संज लि. येथें नाहीं. बलकी मागील फडचे व पुढें स्वच्छता व्हावी ऐसी कल्याणराव यांची आर्जू ह्मणोन लिहिलें. त्यास ईश्वर असेंच करो !

१ साहासें चाळीस मोहरा खरीदी केल्या ह्मणोन लि. त्यास तूर्त इतकेंच । पुरें करावें, याचा ऐवज व आणखी खरीदीचे ऐवजाची तरतूद करूं तेव्हां खरीदी करावी.
-----

कलमें सुमार तीन र॥ छ २ जिल्काद हे विनंति.

श्री.
विनंति उपरि.

१ “अजमसाहेब यांसि बोललों ‘सध्या हुंड्या घेऊन पाठवाव्या.'
१५००० ममईचे खरेदीबदल.
३०००० मोहरी खरेदीबदल,
--------------
४५०००

पंचेचाळीस हजाराच्या हुंड्या सत्वर घेऊन पाठवाव्या. दिवसगत लागो नये'' ह्मणोन लि। त्यास, ममईची खरिदी पंधार हजारांची करावयाची नाहीं. पांच सात हजारपर्यंत करणें ऐसें यांचें बोलणें. तेव्हां पांच सात हजार काय देतील तो व मोहराबाबत तीस हजार सदरहूचे हुंडीविषयीं आह्मीं त्यांजकडें सांगून पाठविलें. त्यांस, “प्रस्तुत हुंडी होत नाहीं. पुण्याचे हुंडीचा भाव साहुकारांत सेंकडा साडेचार, पांच, साडेपांच, असा असोन हुंडी होत नाहीं. याजकरितां ऐवज आपल्यापाशीं देतों. याप्रा यांचें ह्मणणें. आमचें बोलणें कीं एथें ऐवज घेऊन खरेदीचे तेथें उपयोगी काय ? अगर हुंडावनसुद्धा ऐवज दिल्ह्यास हुंडी करितां येईल. त्यास हुंडावनसमेत ऐवज दिल्यास तुह्मांस लेहूं. ऐवजाचा भरणा कसा करतात त्याप्रा लेहूं. तोंपावेतों तुम्हीं तेथें खरिदी न करावी, यांजकडून ऐवज येण्यास दिवसगत लागल्यास ताण बसेल यास्तव लेहूं तेव्हां खरेदी करावी.

१ “शमषुल उमरा यांचे षादीकरितां सरंजाम आणावयास श्रीरामास मुंबईस रवाना केलें. मजपासीं तर ऐवज नाहीं. तेव्हां मानुरकर का। दार यांनीं एकोणीस हजार ऐवज भरला. त्यापैकीं बारा हजारांच्या हुंड्या करून श्रीरामासमागमें दिल्या” ह्मणोन तुह्मी लि।। ल्यास बारा हजारांचाहि जिन्नस खरीदी करू नये. पांच निदान साहापावेतों खरीदी करवावी. ह्मणोन आज मखां यांनी सांगोन पाल्यास मुजरद मनुष्याबराबर तुह्मीं श्रीरामास मुंबईस लेहून पाठवावें. १ “सिदी इमामखां यांचीं मोती खरीदी करणें, त्यास पुण्यात माहाग; सबब मुंबईस खरीदी करविली '' ह्मणोन लिहिल्या प्रा सिदी इमाम यांस सांगीतलें, ‘उत्तम' ह्मणाले.
परंतु फार दिवस जाले.
-------

कलमें सुमार तीन रा। छ. २ जिल्काद हे विनंति.

श्री.

विनंति उपरि. छ. १३ शवालचीं आह्मांकडील पत्रें पावल्यांचा दाखला छ. १६ मिनहुचे रवानगींत तुह्मीं लिहिल्यावरून कळला, कलम----१

“राजश्री पाटील बावांस समाधान नहीं, सीतज्वर येतो, राजश्री नाना व तात्या समाचारास गेले होते; त्यांचे स्त्रीसही समाधान नाहीं. “ ह्मणोन लि।, तें कळलें. पाटील बावांस अलीकडे समाधान कसें ? हें ल्याहावें कलम---- १

“गोविंदराव गायकवाड यांस सरकारांतून वस्त्रें दिल्हीं; परंतु सरंजामी होऊन जाणें होत नाहीं; मानाजी गायकवाड बडोद्यांत हुशारीनें राहून सरकार नजरेचें संधान लाविलें” हा त। समजला. सरकारांतून दोघांतून कोण ठरेल हें ल्याहावें. कलम-----१

“श्रीमंतांची स्वारी हाथी व वाघाची लढाई पाहावयाकरितां छ. १७ रोजीं गेली," हें लिहिल्यावरून समजलें. अलीकडे नवल विशेष ल्याहावें. कलम----१

“राजश्री परशरामपंत भाऊ तासगांवास गेले, मुंज जाली, सांवताचे कामाकरितां करवीरास जाणार, सरंजाम करितात, सरकारांतून तोफा रवाना होणार." ह्मणोन लि।. त्यास सरकारांतून भाऊकडे तोफा किती गेल्या ? भाऊ आद्याप तासगांवींच आहेत ? किंवा करवीराकडे? हें वर्तमान आलें असल्यास ल्याहावें. सांवताकडून बोलणार सरकारांत येणार, जें ठरेल ते लेहून कळवावें. कलम----१

सागवानी लांकडाचा व बंदुखाचा मार. लिहिला. त्यास यापूर्वी येथून त। वार लि॥ आहे. त्यावरुन कळेल. कलम---१ कलमें सुमार साहो र॥ छ० २ जिलकाद हे विनंति.

[ १७६ ]                                            ।। श्रीभवानीशंकर ।।                                       १९ ऑगस्ट १७४८.                                                                                                                   

श्रीमंत राजमान्य राजश्री शिवरामपंत व पा। राजश्री कृष्णराऊ स्वामीचें सेवेसीः-
सेवक नारो महादेव साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून निजानंदेलखनार्थ आज्ञा इच्छितों. विशेष. कृपा करून पत्रीं सनाथ केलें उत्तम समयीं प्रविष्ट होऊन परम संतोष जाहला. येथील सर्व भावगर्म श्रीमंत राजश्री रायांचे पत्रीं लिहिलें आहे ध्यानास आणून सरंजामाची रवानगी अति अविलंबें येऊन पोहोचते तरी सर्व कार्याची उभारणी होऊन येते स्वामी प्रसगीं सुज्ञ आहेत हें कार्य सर्व स्वामीचे उर्जितांचें आहे आपलें उर्जित उत्तम प्रकारें करणें आहे. तरी श्रीमंतजीस विनति करून सरंजाम व वस्त्रें अविलंब पावतीं जालींत, ह्मणजे सर्व होऊन येईल. याहिवरी स्वामी सुज्ञ व सरदार आहेत जें विचारास येईल तें करतील. येथे सामाईन पावलियाचे वेगळें काहीं कार्य होत नाहीं, ऐसें परिच्छिन्न जाणून जें चित्तास येईल तें करावें. विशेष काय लिहिणें हे विनंति.

श्री.

विनंति उपरि “ होळकराकडील बापूजी होळकर व कासीराव यांच्या व सिंद्याकडील गोपाळराव यांच्या परस्परें भेटी जाल्या; कलह राहीला. " ह्मणोन लि।।, ते कळलें. त्यास, मल्हारराव-तुकोजी बावाचे पुत्र-मागाहून गेल्यावर मागतीं त्यांनीं कलहास आरंभ केला, ऐसें ऐकण्यांत, तर वास्तव्य ल्याहावें. रा छ २ जिलकाद हे विनंति.

श्री.

विनंति उपरि. राजश्री कल्याणराव कवडे छ, १४ शवालीं राजश्री नानाकडे आले. आपले खासगत कामाची विनंति करून ‘नवाबाकडील कामें उगवावीं, मध्यस्तासी स्वच्छता असावी, हें काम मला सांगून पहावें’ इत्यादिक बोलण्यावर उत्तर जालें-कामें उगवल्यावर काय गुंता ? इतकें जालें आसतां बाहेर लोकापासीं जसा स्वभाव त्याप्रमाणें बोलणें, त्याच अन्वयें इकडे मध्यस्ताकडेंही बजाऊन पत्रें आलीं. हा म।।र मध्यस्तांनीं आह्मांसीं बोलण्यांत आणिला. याचीं उत्तरें प्रत्युत्तरें, प्रथम मध्यस्त आह्मीच, मागाहून बाबाराव यांस बोलाऊन घेऊन, बोलणें जालें याचा कचा त। ‘बाबाराव आह्मांकडे आले' इत्यादिक राजश्री नाना यांचे पत्रीं लिहिल्यावरून कळेल. सारांश ज्याचा जो स्वाभाविक धर्म त्यांनी त्या प्रे॥च करावें हा त्यांचा मार्ग. समजणारास सर्व समजतें. तुम्हांपासीं कल्याणराव येऊन बोलले त्याचाही मार समजला. या प्रकर्णी राजश्री नानास पत्रें लिहिलीं त्याचीं उत्तरें लौकर यावीं. रा। छ० २ जिलकाद हे विनंति.

सदरहूप्रमाणे साक्षीदाराचे साक्षीत गुदरले आहे त्यास हाली हरदो वाद्याच्या तकरीरा दिल्ह्या व कागदपत्रातील व साक्षीतील हुजूर हाजर मज्यालस पंचाईत बसोन आन्वय मनास आणता यजुरवेदीयाकडील कागद लिग जोसी ॠग्वेदी याणे कजिया सन १११५ मध्ये केला त्यापलीकडे ई॥ शके १४२४ सन सलास तिसा मया ता। सन मया अलफ पर्यत आहेत त्यातील साराश कसबे मा।रचे वृत्तीविसी पहिल्याने यजुरवेदियाजवल केजल्याने कजिया केला होता तेव्हा केजल्याने रव्याचे दिव्य केले तो खोटा जाला त्याआलीकडे थिटे याणी कलह केला त्याचा निवाडा गोही साक्षीवरून होऊन थिटे खोटे जाले याप्रो। देना वेला कसब्याचे वृतीवर वादी उभे राहिले होते ते खोटे होऊन यजुरवेदी खरे जाले आहेत व यजुरवेदीयाणी कसब्याची वृत्ती थिटे याजपासी गाहाण ठेविली होती ती सोडऊन खत माघारे घेतले ते पत्र व गुरवापासून वाडा विकत घेतला त्याचे पत्र एकूण दोन कागद त्याजवर वासुदेव जोसी याच्या वडलाची साक्ष पणदरेकर ह्मणोन आहे व आपले भाऊपण्यात वृत्तीचे विभाग करून घेतले त्यावेलेस पत्रे साक्षेनिसी आहेत व वासुलकर जाबुलखोर्‍यातील वृत्ती आपली म्हणोन वादास उभे राहिले होते तेव्हा रव्याचे दिव्य रामाजी रघुनाथ वासुलकर याणी केले तो खोटा जाला धोमचे थडीचे वृत्तीविसी आडकर याणी कजिया केला होता त्याचा निवाडा पचाईतमते जाला आहे ऐसे वाद यजुरवेदीयाणी सागून वादे खोटे केले व वृत्ती गाहाण ठेविली व भाऊपणात वृत्ती वाटून घेतल्या याप्रो। दाखल्याचे कागद यजुरवेदियाजवल आहेत जर करिता वृती वासुदेव जोसी ॠग्वेदी याचे वडलाची असती तरी इतक्या वेलेस कोठे तरी उभे राहिले आसते ती गोष्ट जाली नाही व थिटेयाजपासी वृत्ती यजुरवेदीयाणी गाहाण ठेविली त्या कागदावर साक्षी वासुदेव जोसी याचे वडलाची आहे यावरून व सदरहू कागदपत्रावरून पुरातन वृत्ती यजुरवेदीयाची च ऐसे स्पष्ट दिसण्यात येते व आलीकडे सन १११५ पासून वासुदेव जोसी याचा बाप लिग जोसी याणे दोन वेला कजिया केला तेव्हा तो खोटा जाला वृत्याशी नव्हे याप्रो। निवाडे जाले आहेत वासुदेव जोसी याजवल शके १४८६ तील व शके १५०० तील एकूण दोन कागद आहेत त्यापैकी चवदासे शासीतील कागदात पील जोसी बि॥ बोप जोसी कसबे वाई ऐसे ह्मटले आहे त्यास वासुदेव जोसी याचे वउील वाईस राहात आले यामुळे जोसी कसबे वाई यावरून वृती त्याची च कसी ह्मणावी दुसरा कागद तो वाघोलीचे जोतीष कुलकर्णीविसीचा आहे त्यास तो गाव या कज्याचे वृतीतील नव्हे एकूण हे दोन कागद या मनसुबीचे उपयोगी नाहीत याप्रो। उभयताकडील कागदाचा मा।र आहे व साक्षीतील आन्वय पाहाता बहुतेकानी जोतीषपण पुरातन या यजुरवेदियाचे सागीतले आहे व काही साक्षीत माघे वाद इतराचे पडले होते त्याजला यजुरवेदीयाणी खोटे केले त्या वेलेस कागद जाले आहेत त्यावर आपल्या वडलाच्या निशानिया आहेत ह्मणोन आणखी साधने यजुरवेदीयाचे साक्षीत गुदरली आहेत वासुदेव जोसी याचे साधन पाहाता काही कसबेयाचे साक्षीदाराचे बोलण्यात मूळ वतदार लिग जोसी ॠग्वेदी ऐसे सागोन भोगवटा हि कोठे कोठे कसब्यात चालत होता ऐसे सागीतले त्यास हाली मूळचा वतदार ह्मणोन साक्षीदारानी सागीतले हे खरे ह्मणावे तरी कसब्याखेरीज इतर साक्षी पाहाता एका एका हि साक्षीत दाखला पुरत नाही व प्राचीन कागद यजुरवेदियाजवल आहेत त्या कागदावर साक्षी कसबे मा।रचे वतदाराच्या आहेत तेव्हा हाली बोलण्याचे प्रमाण कसे धरावे भोगवटा चालल्याचा मा।र तरी यजुरवदियाचे लिहिल्यात वासुदेव जोसी याच्या वडलास दिवाणचा आश्रय आणि विद्यापात्र दिवाणात पचाग सागत यामुळे कोठे कार्य प्रयोजन सागू लागले आमचे वडील दुर्बल आणि आविद्वान होते ह्मणोन व साक्षीत हि दिवाणजोसी ऐसे पुरले व पेशजी लिग जोसी याने कजिया केला तेव्हा हि दिवाणजोसी ह्मणोन निवाडा जाला आहे त्यास दिवाणच्या आश्रयाने पाचा दाहा घरी भोगवटा जाला त्यामुळे कसबेयाच्या साक्षीत कोठे कोठे सशय पडला तो जर करिता वृत्यशी आसता तरी खोरी वगैरे साक्षीत दाखला पुरता तो काही च पुरला नाही तेव्हा वृती त्याची नव्हे याप्रो। सर्व हि आन्वय पाहाता पुरातन जोतीषपणाची वृती या यजुरवेदियाची खरी आसे सदरहू प्राचीन कागदावरून व हालीचे साक्षीवरून जाले वासुदेव जोसी वृत्ती आपली यजुरवेदी मुतालीक ऐसे ह्मणत होता त्यास साक्षीमुखे आथवा कागदपत्री दाखला पुरला नाही खोटा जाला त्याप्रो। यजितपत्र तुह्मास आपला पुत्र बाल जोसी याचे दस्तुरे आपले सहीनिसी लिहून दिल्हे आहे व हाली हे निवाडपत्र भोगवटियास तुह्मास करून दिल्हे आसे तरी सदरहू कसबा वाई व खोरी वगैरे गाव व किले येथील जोतीषपणाची वृती पुरातन तुमची आहे वासुदेव जोसी ॠग्वेदी तुह्मासी वृती आपली ह्मणोन कजिया करीत होता तो खोटा जाला त्याजला वतनासी समध नाही तरी तुह्मी जोतीषपणाचे कायदे पुरातन चालत आले आसतील त्याप्रो। घेऊन आपल्या पुत्रपौत्रादिवशपरपरेने वतन आनभऊन सुखरूप राहाणे तुम्ही खरे जाला ते सबब तुमचे माथा जीवनामाफीक रुपये केले ते पोता जमा आसेत म्हणोन पत्र १

सदरहू आन्वये थोडक्यात सारा गोशवारा लेहून त्रोटित पत्रे ल्हाहावी की पत्राची तालीक घेऊन आसल पत्र यजुरवेदी जोसी याजवल परतोन भोगवटियास देणे म्हणोन

१ देशाधिकारी लेखक वर्तमान भावी यास
१ देशमुख व देशपांडे प्रा। वाई यास
१ भवानी शंकर हैबतराव यास
३ तीन किल्यास
४ मोकदमास च्यार
         १ कसबा वाई
         २ खोरी दोन एकूण
         १ समत हावेलीचे गाव
       ----
         ४
---
१०

श्री.
विनंति उपरि.

येथून छ. २२ रमजानापासोन छ. ८ माहे हावाल पावेतों पत्राच्या रवानग्या सात केल्या. तीं पत्रें पावल्याची ता तारीखवार लि।। तो समजला
कलम---१

पाटील बावा कूच करूनं वानवडीवर आले. नदीकडील जमीन काळवट, दिवस पर्जन्याचे; हें कारण लिहील्यावरून समजलें. कलम---- १

“राजश्री नानास पत्रें अपार्ली येतात; ते जाबाकरितां मजपासीं देतात. मला समाधान नाहीं. सबब जाब तटले, बोभाट लेहूं नये." ह्मणोन लि. त्यास तुमची प्रकृत स्वस्थ जाली असेल. नानाकडील पत्राचे जाब फार येणें ते तयार करून लौकर पाठवावे. वरचेवर जाब येण्यास आळस करूं नये.
कलम--- १

रामचंद्र दादो यांचे दोन लखोटे त्यांचे चिरंजीव माधवराव यांस पावते झाले. कलम-----
“सावकार, सराफ, मातबरांनीं हात आटपले. तमाम लोकांची दिवाळी निघतात.” ह्मणोन लि।।. त्यास पुण्यांत साहुकाराची आसी अवस्था हे गोष्ट कठीण ! येथील ही साहुकारांत हुंडीपांडी करण्याची दिकत फार तूर्त आहे. कलम----१

“बावड्याहून ताईवाईकडून हरिकाळा आला. मिरज प्रांतीं वगैरे पाऊस दोन तीन जाले. पुण्याकडे पर्जन्य नाहीं." ह्मणोन लि।। त्यास मृग नक्षत्राचे पाऊस कांहीं जाले न जाले ? धारण कसी ? हें ल्याहावें. इकडेही पर्जन्य जाले. कलम----१

“गंगाधरराव रास्ते यांस वेड लागलें, रामचंद्रराव वारले; बाळाजीपंत ढेकण्यांचा काळ झाला; लक्षुमणराव व्यथिस्त, उदास, काशिस जाणार, तुळा केली; '' इत्यादिक लि। तें समजलें. ईश्वरी इच्छा ! कलम----१

“दत्तपुत्र केडगांवकराचा घेणार, बापु व बाबा दोन्हीकडील संधान राहून त्रितियपंथ करणार,” हे लिहिल्यावरून कळलें. दत्तकपुत्र कोणता घेतला ? सरकारांतून ठराव कसा जाला ? हें कचें ल्याहावें ‘कलम----- १

“मारडकर घाईस आले; मी व आपाजी बाबाजी कांहीं मदत करून पाहातों" ह्मणोन लि।। त्यास देश, काल, समय येक प्रकारचा, वास्तव मदत करणें तें बहुत समजोन पाहून करावी. पेंच न पडे ऐसें जाल्यास करावें. कलम----१