Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.
विनंति उपरि. रघुनाथ बाबुराव साहुकार पुण्यांतील यांजपासोन जीवनराव पांढरे यांनीं पेशजी मामलत समंधे कर्ज घेतलें होतें त्यांत वसूलही बहुतकरून हणमंतराव सभापत यांचे विद्यमानें पावला. कांही ऐवज देणें त्यास, सांप्रत हणमंतराव यांची चित्तशुद्धी नाहीं. तुफान करून रघुनाथ बाबुराव यांचे देण्याचा तोदा मनस्वी समजावितील यास्तव त्याचे देण्याचा अजमास याजकडील वसूल काय पावला व बाकी राहीलें काय ? हें तुह्मी समजोन घेऊन त्याची आकसात बंदी वाजवी ऐवजाची ठरावून पाठवावी. “नेमाप्रा ऐवज पावता करीन" ऐसें जीवनराव यांचें बोलणें, त्यास, हणमंतराव यांचे समजाविल्यावर न जातां रघुनाथ बाबुराव यांचा हिसेब खचित समजोन घेऊन ऐवजाची वायदा मुदत ठरवून ल्याहावें. यास आळसाखालें न टाकितां जरूर करून ल्याहावें. र॥ छ. १५ जिल्काद हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.
विनंति उपरि. गोपाळराव पांढरे तेथें आले आहेत. जीवनराव यांचा त्यांचा प्रकार तुमचे माहीतगिरींतच आहे. सांप्रत जीव नराव यांचें व कारभारी यांचें वैमनस्य, यास्तव ते कांही गोपाळराव यांस चिमटा घेऊन फंद उभा करतील. रकारनामक तुह्मांस बोध करून नानाप्रकार समजावितील. ते मनांत न आणितां, बोलतील तें ऐकून घेऊन आंतृन जीवनराव यांचे लक्ष चित्तापासोन ठेऊन गोपाळराव समंधीं नवीन दरज कांहीं न चाले, पूर्वी नेम जाला त्या प्र।। त्यानें आपला दरसाल ऐवज घेणें तो घेऊन स्वस्थ राहावें, दौलतीचा कारभार जीवनराव यांजकडे सर्व ठरल्याप्रा। चालावा, ऐसा बंदोबस्त जरूर करून ल्याहावें. कारण कीं जीवनराव यांची चाल आपल्यासि बहुत घरोब्याची व निखालसपणें आहे. यांत तथा नाहीं. तो प्रकार बदमामलीचे सिरोमणी, सर्व भाताचा वैश्वदेव करून पाहतां कशास कांहीं ठिकाण नाहीं. हा स्वभाव पुर्ता विचार समजला हे तुमचेंही मनांत आसावें. सारांश गोपाळराव वगैरे हरयेक फंद उभे राहिल्यास त्यांचें निराकरण करून जीवनराव यांजकडे लक्ष राखून बंदोबस्ताच्या शकली ल्याहाल त्याप्रा येथें पकें करितां येईल. या गोष्टीचा वाच्यांश तेथें न होतां येहतीयातीनें या बंदोबस्तांत मन ठेवावें, ज़रूर ! रा। छ, १५ जिल्काद हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व २ मंगळवार, शके १७१५
विनंति उपरि, जीवनराव पांढरे यांचे व कारभारी यांचे वांकडें आलें. त्यांनीं कांहीं विच्यार मागें पुढें न पाहतां मन माने तसी धूम केली आहे. हल्लीं जीवनराव यांचे ह्मणणें “आपले मांडीवर मान आहे,” त्यापक्षीं अन्याय व्हावा हें कांहीं चांगलें नाहीं. व त्या करण्यांत फायदा तर कोणता ? वाजबी तेंच कां न घडावें. येविसीं तेथें तुह्मांस कदाचित रकारनामक यांची भीड पडत असेल. त्यास येविषीं मुरवत व भिडेचा संकोच पडल्यास आह्मांवर टाकून बोलावें ह्मणजे चिंता नाहीं. परंतु भिडेमुळें वचनीं गुंतूं नये. खरें वास्तविक तें खुलाशानें इकडे लेहून पाठवावें. तेथें त-हे त-हेनें गैरवाका सांगितल्यास त्याजवर न जातां कचा हिसेब व कर्तव्य तें लिहून पाठवावें. त्याप्रा बंदोबस्त करतां येईल. र॥ छ, १५ जिल्काद हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १७९ ] श्री. ५ ऑक्टोबर १७४८.
श्रीमंत राजश्री शिवरामपंत व राजश्री कृष्णराऊजी स्वामीचे सेवेसीः-
पो। नारो महादेव मुक्काम अवरगाबाद साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल ता। छ २२ सवालपर्यंत यथास्थित असो. विशेष इकडील वर्तमान श्रीमंत मा। राजश्री राऊसाहेबास लिहिले आहे, त्यावरून श्रुत होईल. जर तुह्मांस कार्य कर्तव्य असेल तरी श्रीमत राजश्री राऊजीस विनति करोन कांही खर्चास व कोण्ही इतबारी पाठविजे कार्य करणें जर चित्तांत कर्तव्य नसेल तरी तैसेंच उत्तर पाठविजे लोभ असो दीजे यमाजी जासूद जोडी एक पाठिवला यासी अजुरा रुपये २२. त्यापैकीं रुपये ५ पांच आपण दिल्हे. बाकी रुपये १७ आपण दीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
बाळाजी बाजीराव पेशवा याचा व नबाबसाहेब यांचा कटाक्ष बहुत आहे. यामुळें व आणीक कितेका कार्यामुळे नबाबसाहेब यांस फौजेची बहुत जरूरी आहे. तरी स्वामींनीं आपला दुर्गसरंजाम सत्वर पाठविजे. दरिंग करावयाचें कार्य नाहीं यावर महाराज थोर आहेत. आपण वारंवार लिहितों आणि स्वामी चित्तीं धरीत नाहींत. तस्मात् दिसोन आलें जे, आपणास कार्याचें अगत्य नाहीं अगर आमचा व गगाजी सकपाळ यांचा इतबार नसेल तरी साहेबी आपला कोणी जो इतबारी असेल त्यासी पाठविजे. त्यांची व नबाब साहेबांची मुलाजमत करून देऊं आणि त्यांचे मार्फतीनें कार्यभाग केला जाईल सत्वर पाठविजे. लोकांत बदनक्ष होय तें न कीजे नबाब साहेब वारंवार आपलें स्मरण करितात जे, मा। रा। राऊ सत्वर येत तरी उत्तम आहे. यावर महाराज समर्थ आहेत सांप्रत महाराज राजश्री छत्रपति स्वामी यांचीं वस्त्रें व घोडे व हत्ती व जंबूर छ १ रमजानी त्रितीय प्रहरीं नजर गुजराणली व राजश्री पेशवे यांचीं वस्त्रें जवाहीर व एक हत्ती, पाच घोडे व नजर मोहरा सहस्त्र एक छ ५ रमजानीं नजर गुजराणली. आणीक राऊ फतेसिग व रघोजी भोसले यांच्या नजरा आल्या आहेत. गुजरतील व बहिरजी पांढरे छ २४ शाबानीं येऊन नबाब साहेब यांची मुलाजमत केली. दमाजी गायकवाड यांचा वकील येऊन नबाब साहेबास भेटला नबाबसाहेबी नजरबेगखान बक्षी, बहिरोजी पवार, पेशवा आणावयास पाठविले आहेत दमाजी गायकवाड यांनी तीन क्रोड रुपये नजर कबूल केली, आणि मोंगलाईत येतात आणि आपणास तों नबाब साहेब आपण ह्मणून चहातात ऐसें असतां अपूर्व आहे जे, स्वामी चित्ती धरीत नाहीत ! सर्वांविषयी स्वामी समर्थ आहेत उभय राज्यात स्वामींचें नाव थोर आहे. आणि हा समय फिरोन येणार नाहीं. नवा राजा जाला आहे. येथेंही निजामनुमुलूक यामागें सर्व नूतन व्यवहार जाहला आहे या संधींत जो जडला तो अक्षयी जाला.ऐशा समयांत जो नबाबसाहेबांस जो अर्ज जागिरा व मनसबा व मदतखर्च मुलाजमत जालिया कराल तो घडोन येईल. त्यासी अविलंब !! आपाजी व मलकोजी जासूद यांजबरोबर आपला कोणी इतबारी असेल तो, व गंगाजी संकपाळ व खर्चास बितपशील - पेशजी इनायतनामा नबाब थोरले यांचा दरबारखर्च रुपये दोन हजार, व हाली नबाब नासरजंग यांच्या इनायतनामियाचा खर्च रुपये चार हजार, नजर नबाब साहेबांची आपलें स्वरूपात योग्य. व मुत्सद्दियांस वस्त्रें आपला कोणी इतबारी पाठवाल त्याजबरोबर पाठविजे, कीं कार्य सत्वर घडोन ये हा सरंजाम येथें पोहोंचलियानें येथील बंदोबस्त करून राजश्री गोपाळराम व राजश्री शिवराम शामराज व राजश्री राजारामपंत गु ।। कठोराम साउकार इनायतनामा नबाब साहेबांचा घेऊन सेवेसी पोहोंचतील. सांप्रत थोरले नबाब साहेब यांचा इनायतनामा व पत्रे नजरबेगखान बक्षी व हाकीमबेगखांजी जमातदार मातबर व एक पत्र आह्मांस नजरबेगखान याहीं लिहिलें आहे , तें बजिनस पाठविलें आहे. याचा अर्थ पारसनवीस बोलावून अक्षरश: अन्वयें ध्यानास आणावा ह्मणजे समाधान होईल. स्वामीच्या नांवावर कुल अम्मलदार व मुत्सद्दी बहुत खुशवक्त आहेत, कीं ऐसे थोर सरदार या प्रसंगी असतां बहुत उत्तम आहे यावर जें विचारास येईल तें कीजे, आणि आह्मांस साउकारापासून मुक्त कीजे आपाजी व मलकोजी यांसी अजुरा रुपये ३२ व पहिले जोडा १ जासूद पाठविले होते, यांची बाकी रुपये १०, एकूण रुपये ४२ बेताळीस याचे पदरीं घालणें यानीं स्वामीच्या कार्यामध्यें श्रम बहुत केले आहेत यांसी वस्त्रें द्यावीं सत्वर मार्गस्त कीजे. पंधरा दिवसांचे वायदियानें आले आहेत. पथ दूर आहे तिकडे यावयास मनुष्य अनमान करीत आहेत वर्तमान तो इकडील तिकडील आलें पाहिजे अजुरा तो भारी पडतो. आज्ञा येईल तरी चार जोड जासूद ठेविले जातील सांप्रत आपाजी व मलकोजी सेवेसी आले आहेत, यास सही करावे आपाजी मनुष्य कामचंग मोंगलाईत वाकीफ आहे . याचा दरमहा मोकरा गौर करार कीजे. येथील सर्व अभिप्राय आपाजी सेवेसी निवेदन करितां कळों येईल.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.
विनंति उपरि, जीवनराव पांढरे यांनीं आपल्याकडील हिसेब आणिला. त्यांत हणमंतराव यांचे विद्यमानें माहाल समंधी वगैरे ऐवज बहृत पावला. यांचे हिसेबी फाजील निघते. तुह्मांकडून याद आली त्यांत बाकीचा ऐवज येणें. या हिसेबास व यादीस कांहींच मिळत नाहीं. यावरून हे याद हणमंतराव यांनी सांगितल्याअन्वयें पाठविली ऐसें दिसोन आलें. त्यास पांढरे यांजकडे जो ऐवज हिसेब ठरून वाजवी निघाला त्याच्या कच्या यादी नकला आह्माकडे पाठवाव्या व जीवनराव यांजकडून फडच्या कसा करून घेणें. याचेंहि खोलून लिहावें. त्याप्र।। समजून होईल. आपले ऐवजास यांचें कांहीं वाकडेपणाचें नाहीं. त्यापक्षीं आपणही यांसि सरळपणें खरें तें समजाविल्यांत काय बाध आहे ? जीवनरावही थोर उमदा मनुष्य ! पहिलपासोन याची चाल दुसरी नाहीं. पुढेंही “आज्ञेप्र॥ सांगाल तसी वर्तणूक करीन '' ऐसें निखालसतेचें बोलणें. याअर्थी त्याचा खुलासा घराउ लेहून पाठवावा. व यादी हिसेब लौकर यावे. र॥ छ, १५ जिल्काद हे बिनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १७८ श्री १६१५ चैत्र शुध्द ६
स्वस्ति श्री राज्याभिषेकशके १९ श्रीमुख नाम संवछरे चैत्र शुध शष्टि मंदवासरे क्षेत्रियकुलावतंश श्रीराजारामछत्रपती याणि राजमान्य राजश्री तुलजी जाधव वजारतमाब यासि आज्ञा केली ऐसी जे तुमचे विशी राजश्री धनाजी जाधवराऊ यांनी चंजीचे मुकामी विनंति केली की मा। तुलाजी जाधव यास सिलेदाराची पंचसहश्रीची सेवा आहे देशीहून कर्नाटकात जमाव घेऊन आपणांबराबरी एऊन सेवा एकनिष्टपणे करीत आहे तरी यास भाग्य देविले पाहिजे ह्मणऊन श्रुत केले त्यावरून तुह्मी स्वामिकार्याचे मर्दाने व सेवा हि एकनिष्टपणे करीत आहा तुमचे ऊर्जित करणे स्वामीस अगत्य यास्तव स्वामी तुह्मांवरी दयाळू होऊन तुह्मास भाग्य पा। होनु १००००० एक लक्षा होनाचे दिल्हे असे तरी धड घोडें व धड माणूस जमाव करून स्वामिसेवा इमाने इतबारे करीत जाणे यास खासा जातीस व जमेत चालवावयाची मोईन बिता।
खासा जातीस पा। होनु श्वार ३०० आ। रास ६०० यासि
१०००० ऐन रास मजुरादास्त
५७३ २५ हत्तीस व हत्तिणीस
चालवा- वेयास ५
२ उंटावरील दमामा
-----
२७
यासि दर सदे पंधरा हजारी प्रमाणे
९००००
एकून पातशाही एक लक्ष होनाची दौलत दिल्ही असे इ॥ सनद पा। पासून खासा जातीस व श्वार जे जे तेरिखेस बिलामोहला नावनिसीवार गणती देऊन हजिरी लेहवाल त्या त्या दिवसापासून दरबारदंडकाप्रमाणे वजावाटाऊ करून उरली बेरीज तुमच्या जमावामाफीक खासा जातीस व जमेतीस होईल ते पावेल जमाव करून राजश्री धनाजी जाधवराऊ याचे ताबीन राहून इमानेइतबारे स्वामिसेवा करीत जाऊन एकनिष्ट वर्तणे जाणिजे बहुत काय लिहिणे
रा। छ ९ रमजान
तेरीख ४ शाबान माहे साबान
सु। सलास तिसैन
बार सूद
संमत सुरू सूद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.
विनंति उपरि, जीवनराव पांढरे यांनीं एकान्ति घराऊ रीतीनें बोलण्यांत आणिलें कीं “ पहिलेपासोन आपल्याशिवाय दुसरे कोणाचा आश्रय नाहीं. आणि आपल्यासी ई॥पासून माझी चाल कशी हें सर्व ध्यानांत असेल. पुढेंहि आपण सांगतील तशी वर्तणूक करीन. नेम करून देतील त्या प्र॥ राहीन. महालचा कारभारही सर्व आपल्याकडे ठेवून जशी नेमणूक होईल त्यांत तफावत न येतां चालेन. पेशजीं ऐवज आपल्याकडील घेतला, तो आदा केला किती ? ऐसें असोन मजकडून माहालासमंधीं जो ऐवज पावला तो गोविंदराव यांस पावला न पावला हेंहि कळेना. कारभारी यांचे हातीं मोहर देऊन मुखत्यारीचें काम सांगितलें त्यांची वर्तणूक व चाल कसी याचा बयानकारितां विस्तार ! गोविंदराव यांजकडें तरि ऐवज पावला असल्यास चिंता नाहीं. माझे उपयोगावर आहे. तें न होतां दरम्यान कळेल तसी धांदल केली आहे. दोन च्या कलमांवरून प्रत्ययासही आलें. ई॥ पासोन त्यांजकडे हिसेब येणें हेंही केवळ माझ्यानें होतें असें नाही. आपले आश्रयावर होईल. आपला ऐवज एकंदर व्याजसुद्धां किती ? त्यांत वसूल पाहेंचून बाकी निवळ किती राहिला याचे वास्तविक समजावें. फडच्या करून घ्यावा.
आपले ऐवजास मजकडून कसूर सहसा व्हावयाचा नाहीं " या प्र।। फार बोलले. आह्मींहि यांची खातर जमा करून सांगितलें कीं जो ऐवज वाजवी असेल त्याचाच फडच्या करून घेऊं. कोणी गैरवाका समजाविल्यास ध्यानांत यावयाचें नाही. हिशेबाच्या कच्या यादी आहेत त्या गोविंदराव यांस लेहून आणवितों.'' या प्र॥ सांगितले. त्यास पांढरे यांजसमंधीं हिसेब वाजवी ऐवजाचे असतील त्या यादी कच्या पाठवाव्या. बाकी राहिले ऐवजांचा तडजोड करून घेतां घेईल, यांचें बोलणें की “हणमंतराव यांनीं गैरवाका समजाविल्यावरून गोविंदराव यांनीं याद पाठविली. त्यांत पसतीशाची रकम किता ह्मणोन लिहिली. असा हिसेब येऊं नये. खरें असेल तें लिहिलें यावें. त्याप्र॥ हजर आहे.” याप्र।। बोलणें. त्यास हिसेबांच्या यादी जो ऐवज खचीत दिल्हा व व्याजसुधा हिसेब ठरला तो त॥वार लौकर यावा. र॥ छ. १५ जिल्काद हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.
पु॥ राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी, विनंति उपरि. राजश्री जीवनराव पांढरे समशेरबहादर येथें आले. भेट जाली. यांनी आपलें वर्तमान सांगितलें. इतक्यांत तुम्हांकडील पत्रें आलीं कीं “राजश्री हणमंतराव सभापत यांचे विद्यमानें मा।रनिलेकडून कर्जाबाबत वगैरे ऐवज येणें, याजकरितां सन १२०२ सालचे मोकाशाची मामलत. त्यांजकडील आटकाऊन पांढरे म।।रनिलेकडे मामलतीचा वसूल न जाय ऐसा, बंदोबस्त व्हावा " ह्मणोन लिहिलें व ऐवज येणें . त्याची याद पाठविली यावरून समजलें. मा।रनिलेसही बोलण्यांत आलें कीं “आमचे ऐवजाचा फडच्या जाल्यासिवाय मामलतीचा ऐवज तुम्हांकडे पावणार नाहीं.”, या प्र।। बोलून सजावरुदौलाकडील आवराद निठूर दोनी माहालाचे मोकाशाचा ऐवज अनामत ठेवण्याविषई त्यास सांगोन बंदोबस्त केला. सिद्दी इमाम याजकडील बेदरचाही बंदोबस्त होत आहे. वसूल यापूर्वी हणमंतराव यांजकडे पावला, तो वजा जाऊन बाकी ऐवज अनामत राहील. कोटगीर, हुसें, पोतंगल घांसीमियाचे भरण्यांत सन १२०१ पावेतों आले. पुढें सन १२०२ सालचाही ऐवज बंद करविला. जीवनराव यांचें बोलणें कीं “आपले, ऐवजास काय गुंता आहे ? वाजवी हिसेबाचे रुईनें जो ऐवज असेल त्याचा फडच्या आपण ठराऊन देतील तसा करीन.'' आमचेंही बोलणें कीं “वाजवी ऐवज आमचा तोच घेऊं. गैरवाजवी होणार नाहीं. या प्र॥ जालें. र॥ छ. १५ जिल्काद हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.
राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.
विनंति उपरि. तुह्मांकडून फार दिवस जाले, आलीकडे पत्र येऊन तिकडील वर्तमान कांहीं कळत नाहीं. त्यास, हे दिवस पत्रें वरचेवर येऊन समजावयाचे. अशा प्रसंगीं आळस होतो, हें चांगले नाहीं. राजश्री नानाकडील पत्राचे जाब बहुत तटले. त्यांसुधा तुह्मी आपले पत्राची उत्तरें व वर्तमान पैहाम लेहून पाठवावें. अलीकडे प्रकृत कसी आहे ? दरबारास जाणें येणें इत्यादिकचा त।। ल्याहावा. इकडील वर्तमान, सिंदे, होळकर यांचे लढाई प्रकर्णी वगैरे नबाब व मध्यस्ताचे बोलण्यांत आल्या अन्वयें त।। मर।।र राजश्री नाना यांचे पत्रीं लि।। आहे त्यावरून कळेल. उत्तरें लवकर रवाना करावीं.
चार महिन्यापासून खासगत तुह्मांस पत्रें लिहिलीं. त्यांतील नुकते व चुटके उत्तरें यावयाजोगें बहुत लिहिण्यांत आलीं, परंतु बहुतां पत्रांचीं उत्तरें आलीं नाहींत. त्या गोष्टी मागती आठवत नाहींत. तुमचे विसरण्यांत आलें. अथवा आळसामुळें किंवा दुखण्याकरितां उत्तरें न आलीं. हें खरें. उत्तर पत्राचें न आलियावर चैन पडत नाहीं. समजण्यांत येत नाहीं. याविसीं वारंवार किति लिहावें? लिहितां थकलों. आतां ईश्वर तुह्मास प्रेरणा करील ती खरी. र॥ छ. १५ जिल्काद हे विनंति.