Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.
ज्येष्ठ शु. ७ बुधवार शके ७११५.

यादी बाळाजी रघुनाथ यांजकडे आफ्तागिरा व मशालची याची तैनात सरकारांतून पावत आहे व खिजमतगार नि।। आहे. त्यास तैनात पो। रोजमरा द्यावा लागतो. स।। (सबब) महाराजांनीं कृपा करून खिजमतगाराची तैनात आवलसालापासून सरकारांतून करार करून देविली पाहिजे. तैनात दरमहा ५ पांच रुपये दरमहा येणेंप्र।। करार चाकरी बारमाही व कबज आकार याही शिरस्ते बमोजींब येणेंप्र।। करार.

छ, ६ माहे जिल्काद आर्बातौसईन सन फसली १२०३ मु।। बेदर. तैनातपैकीं रोजमरा दरमहा रुपये ४ चार एकमाही रोजमरा नेमणुक येणें प्र॥ करार.

तेरीख आवलसालापासून छ. २५ शवाल आर्बा तीसैन मयां व अलफ येणेंप्र॥ करार.

[ १७८ ]                                            श्री.                                          १९ ऑगस्ट १७४८.                                                                                                                             

श्रीमंत राजश्री भगवतराऊ रामचंद्र हुकुमतपन्हा स्वामीचे सेवेसीः -
विनंति सेवक नारो महादेव मुकाम शहर अवरंगाबाद करद्वय जोडोन साष्टाग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल भाद्रपद शुद्ध सप्तमी शुक्रवारपर्यंत स्वामीचे कृपाप्रातबळेंकरोन यथास्थित असे विशेष स्वामीनीं सिदोजी व राऊजी हरकारी याजबरोबर पत्रें पाठविली ते पावली त्यात आज्ञा केली जे, नबाब नासरजंग यासी अर्जी देणे त्यावरून अर्जी तयार करोन छ १४ शाबानी तिसरा प्रहरा शेर स्वारीत नजरबेगखान बक्षी याच्या माफीतीनें गुजराणिली नबाबांनीं अर्जी पाहोन बहुत खुश जाले, आणि नजरबेगखानास आज्ञा केली जे, इनायतनामा सिताब तयार होय आणि राऊजी सत्वर येऊन पोहोचत, त्याचा आपल्या सरकारांत बहुत दिरिंग दिसोन येतो आणि आपण तों स्वामीचेच नांवावर जागिराचाही फर्द दिल्हा त्याचा नबाबाहीं जाब दिल्हा जे, रा। उदाजी चव्हाण यांची जहागीर अकरा लक्षांची विजापूर प्रांतीं देतों, बाकी जहागीर वराड प्रातीं देतो. ऐसा करार नजरबेगखांजीशीं केला. आपणहि रुबरु होतो. त्यासी, बजिन्नस नजरबेगखांजी याणीहि पत्र सेवेसी लिहिलें आहे आपण जे कांही विनंति पत्रें लिहितो त्यांचा अर्थ घडोन येत नाहीं. तस्मात् दिसोन आलें जे, स्वामीचे चित्तांत हें कार्य कर्तव्य नाहीं तरी नाहक तहखर्चाखालें काशास यावें. ऐसेंच असले तरी आह्मांस तैसेंच उत्तर लिहिणें. आपण या कामांत एकंदर नाहीं, आणि नबाब साहेबांसही अर्जी देऊजे, त्यांचे येणें होत नाहीं. आणि जो कोणी मोंगलाईत आला आहे तो कोणी श्रमी झाला नाहीं. पदासच चढला आणिख जाणें पूर जालें हें आपणही परस्पर ऐकिलें असेल. आणि स्वराज्यांत होते तेव्हांही स्वामीस विदितच होतें जे, कोणकोण रीतीनें नांवलौकिक होता, आणि सरंजाम कोणें प्रकारें होता. ऐसा प्रकार असोन स्वामीचा तो नावलौकिक थोर असोन, नबाबसाहेब आपणहून हमेशा स्मरण करीत असतां, न यावें हें अपूर्व दिसोन आलें. राजश्री बाळाजी बाजीराव यांपेक्षां स्वामीस नबाबसाहेब बहुत चहातात. आणि नबाब आसफज्याहा यांसी सांगून गेले जे, कुल म-हाटे राज्यातील सरदार याचे पायजाम आहेत. ऐशियावरोन नबाबसाहेब बहुत चहातात आणि जैसी फौज येईल तैसी जहागीरही देतील आणि मुळाजमत जालिया मदतखर्चही उमदा देतील. ऐसें असोन महाराज चित्तीं कार्य न धरीत हें अपूर्व आहे. तरी आतां नबाब नासरजंग यांची नजर सवाशे मोहरा गुजराणावी लागतात. व वस्त्रें व दरबारखर्च व आपला सरंजाम देऊन राजश्री गंगाजी संकपाळ यासी सत्वर रवाना करोन पाठविजे सर्व कार्य विजयादशमीपावेतो होऊन आलें तरी उत्तम नाहीं तरी, पुढें काही बेत नाहीं गंगाजीस सत्वर पाठविजे कासीद पाठवावा त्यासी अजुरा पोहोचत नाहीं याकरितां कासीद येयास अनमान करितात पंथपूर येथे कासिदानी रुपये १० दहा आह्मांपासोन घेतले तरी गंगाजीस सत्वर पाठविजे फौजेच तिकडे अनुकूल पडत नसली, तरी येथे पाच हजार स्वार तयार आहेत बितपशील - जमादार हकीमबेगजी स्वार ५००, व खोजे रहिमतुल्ला स्वार ५००, भिवसिग स्वार ५००, व शिदोजी पाटील जलगावकर स्वार ५०० , व खानदेशांत जमातदार स्वार १००० आणिकही कितेक लोक उमेदवार आहेत. तरी यांचे नावे कौल वेगळे वेगळे पाठविजे येथे जनात आणि दरबारात हांसें होय तें न कीजे आज दहा महिने या कामास जाहले परंतु पैसा दृष्टीस येत नाहीं. येथें तों आधी पैसा खर्च केलियावेगळें कार्य होत नाहीं. हे गंगाजीनेंही सेवेसी विनंति केली असेल तरी गगाजीस सरंजाम देऊन सत्वर पाठविजे. राजश्री पिलाजी जाधवराव यांचा लेक राजश्री जोत्याजी जाधव हेहि येऊन नबाब साहेबांस भेटले त्यांसी मदतखर्च लक्ष रुपये दिल्हे आणि जहागिरा चौलक्ष्याच्या दिल्या महाल उंडणगांव वगैरे महाल गुलजार दिले स्वामीस विदित होय. येथईल कैफीयत आपाजी जासूद सांगतां विदित होईल आपाजीस व राजश्री गंगाजी संकपाळ यासी सत्वर पाठविणें. विलंब न करणें. राजश्री मल्हारजी होळकर हेहि पातशाही चाकर जाले त्यांचा मुलूक जहागीर हुजरीहून माळव्यांत दिल्ही. व यशवंतराव पोवार यांसीही जहागीर माळवा प्रांतीं दिल्ही आणि किताब पंचहजारी साहेबनौबद केले आंवदा रा।।

श्री.
ज्येष्ठ शु. ७ रविवार शके १७१५

विनंति उपर. “औरंगाबादचे तनख्या व।। वसूल किती व बाकी किंती याची याद पाठवितों " ह्मणोन लिहिलें, परंतु याद येत नाहीं. तुह्मांकडून याद येण्याचा उसीर. यास्तव याद लौकर यावी. कलम----१
.

“करनुळकराकडें ऐवज फसला. येविषयीं स्वस्थ असो नये. तगाद्यास कोणी पाठवावें. भिंवरायास फजीत करून ल्याहावे '' ह्मणोन विस्तारें लिहिलें; तें कळलें. त्यास तगाद्यास पाठविणें अथवा भिंवरायास पत्र लिहिणें-दोहींतही फळ नाहीं. अलफखानास येविषयीं आह्मीं पत्र पाठविलें होतें. त्याचा जाब आला कीं रणदुलाखां बाहदुर तेथें येत आहेत. दरबारचा जाबसाल होऊन आपल्या तिही ऐवजाचें ते बोलतील. त्यासे रणदुलाखानही लौकरच येणार आहेत. ते आल्यावर येविषयीं त्यांसि बोलणें होईल तें लिहून पाठवूं. कलम. १.

“बाळाजी रघुनाथ यांस दिवटी आबदागिरीची नेमणूक आहे. खिजमतगाराची नव्हती. त्यास याद प॥ त्याजवर करार होउन यावा." ह्मणोन लि।। त्यावरून यादीवर करार करून प॥ आहे. कलम. १.

“वसमतचे ऐवजाचें अद्याप ठरलें नाहीं. निश्चय करून लिहितों. याचें कारण दरबारची गोष्ट आजची पंधरा दिवसांवर जाती " ह्मणोन लिहिलें. त्यास, यास उपाय तुमचा काय आहे ? परंतु कामाची खराबी ! कलम. १.

“रावरंभाकडील तालुक्यास तगई देणें वगैरेचे जाब हरिपंतास सांगून लिहविलें. मागाहून पाठवू '' ह्मणोन लि।। उत्तम आहे. जाब लौकर यावे. कलम-----१.


मारडकराचें दिवाळें वाजलें याचा त।। लिहिला तो कळला. कलम १.

दुखणीं होऊन माणसे फार मरतात याचा त।। लिहिला तो कळला. कलम.------१
.

मुकुंद जोशी याचे इनामाचे दुमोहरी विषयीं वारंवार सूचना तेथें होती. त्याचा बयान लिहिला तो सर्व कळला. कोन्हेरपंतास या उद्योगास लाविलें. परंतु तुह्मी मुकुंद जोशी याची दुमोहरी सनद इतकीच सूचना लिहीत असावी. कलम-------१.

कलमें सुमार आठ र।। छ. ६ जिल्काद, हे विनंति.

श्री.
ज्येष्ठ शु. ७ रविवार शके १७१५

विनंति उपरि. “ताटांत सांडलें काय? वाटींत सांडलें काय ? पाटीलबावाही समंजस! दौलतीची काळजी सर्वांस आहे. दुस-यांनीं तमाषे पहावें हें कोणास गोड वाटेल कीं काय ? समजोन वहिवाट चालली'' ह्मणोन लि।. त्यास असेंच असावें हें चांगलें. हीच इच्छा आहे ! कलम १ “करनुळकरांचे कसें ठरलें हें ल्याहावें. दोहींकडे सिलसिला राखावा ह्मणोन लि.'' त्यास, इब्राहिमखां याचा कारभार करून मध्यस्तांनीं त्यांस पागटुरीं बसविलें. अलफखानाचें राजकारण पकें करून रणदुला येथें येणार. येथें आल्यावर कारभारही बोलण्यांत येईल. सध्याचा काल वाजबीवर नाहीं. जबरदस्त असेल त्याचा आहे. आह्मीं दों. हींकडे सिलसिला ठेविला. परंतु घडणार असेल तसे घडेल ! कलम---- १

“लांकडाचे खरेदीस ऐवज द्यावयास तात्यास आपण लि।।. कीं ‘एक लाख बत्तीस हजार जगधनास पावले. बाकी राहिला ऐवज तो आपण द्यावा. त्यास, मी तो तात्यासी उत्तर केलें कीं कमकसर दीड लक्ष पावले असतील, त्यास ऐवज यापेक्षांही अधिक पावला असावा. आपण लिहिलें त्यांत थोडा. याचें कसें आहे तें ल्याहवयास आज्ञा व्हावी " ह्मणोन ता।। लिहिलें व त्याची याद पाठविल्यावरून समजलें. त्यास तुह्मास समजावयाजोगी याद तयार करविली आहे. एका दो दिवसांत रवाना करूं. त्या बराबरच्या पुरवणीचा जाब ता॥ वार लेहूं. ह्मणजे सर्व समजण्यांत येईल. कलम-- १

“मालीटाकडून याद आली. त्याविषयीं सलाह पाटीलबावांस पुसावी ऐसें ठरलें. त्यांचे येणें होऊन ठरेल तसें उत्तर लिहीन” ह्मणोन लि।।. त्यास लौकर उत्तर यावें. कलम----१

“नन्हुमलास तीन हजारांच्या हुंड्या दिल्या. याचा ऐवज देतों. याउपरि हुंडी होऊं नये. घासीमियांकडे माझा ऐवज येणें त्याची याद मागाहून पाठवितों " ह्मणोन लि।।. त्यास हुंडी इतक्यावर करीत नाहीं. परंतु तुमची याद लौकर यावी, ह्मणजे समजेल. कलम-----१

“पालख्यांचे दोन सरंजाम पाठविले. याविषयीं बाळाजी हरि यांचे लिहिलें आलें. त्यास, येथून सांडणीस्वार पाठवून सरंजाम आणवितों. पसंद पडल्यास घेतील. नाहीं तर माघारा रवाना होईल. निदान-निदानची किंमत आज्ञा यावी” ह्मणोन लि।।. त्यास सरंजामाचे किमतीची याद पेशजी टप्यावर तुह्मांकडे पा।। आहे. त्यांत निदान किमतच ठराऊन लिहिलें आहे. तेव्हढ्यवर ठरत असल्यास ठेवावा. नसल्यास माघारा रवाना करावा. कलम-----१

" बालाघांट वगैरे बाबतीची मामलत बाळाजी महिपतरायाकडील याचा मा।।र व बाजी खंडेराव सरदेशमुख याचा ता।। मागाहून समजोन उत्तर लिहिण्यांत येईल. कलम----१

“घासीमियांकडील तीन हप्ते जाले. त्यांत दोन तर आलेच असतील. पैकीं सखाराम अनंतास साडे सत्तावीस जातां बाकी ऐवज रदकर्जास पावल्यास व्याज कमी होतें. रदकर्जास ऐवज पावला नाहीं, तेव्हां काय व्यवस्था ? याची समजूत पडत नाहीं." ह्मणून लि।।. त्यास, तुह्मीं लिहिल्याप्र।। हप्ते आले असते तरी तुमचें लिहिणें नीटच. तीन हप्त्यांत एक तो ऐवज निमे आला. याचा ता।। मागाहून लेहुं. तेव्हां समजूत पडेल. कलमें सुमार आठ. प।। छ. ६ जिल्काद हे विनंति.

श्री.
ज्येष्ठ शु. ७ रविवार शके १७१५

विनंति उपरि. नवाबांनीं श्रीमंताकडील जबाब आला तो वाचून पाहते समई जवळ कोणी गृहस्थ होते. त्यांजला कोन्हेरपंत यांनीं पत्र वाचते समईचा प्रसंग विचारिल्यावरून त्यांनीं सांगितलें कीं “श्रीमंतांचें पत्र नवाब वाचीत होते, ते समंई नबाब हास्यमुखें वाचून वरचेवर हांसून बोलत होते. त्यांत मध्यस्तांनीं अर्ज केला कीं ‘पीर मुर्शद ! या पत्राचा झाडून मजमुन हजरतके खतका जबाब लेकिन् गुलामके उपर सब मारका ' याप्रा मध्यस्त अर्ज करित गेल्यानंतरही नबाब पत्रांतील मजमुन एक एक पाहून हांसत होते, याप्रा समीपचे गृहस्थाचे मुखें ऐकिलें. त्यावरुन लिंहिलें असे. साराश मध्यस्तांनीं सांगितलें त्यांत ‘पत्र वाचून हजरतीची मिजाज खफा;’ दुसरे वर्तमान, तेंच समयींचे, दुस-याकडून अंतरंगींचे याप्रा; यावरून यांतील कयास कसा तो पाहावा, रा छ. ६ जिल्काद हे विनंति.

श्री.
ज्येष्ठ शु. ७ राविवार शके १७१५

विनंति उपरि. नबाबाचे पत्राचा जबाब श्रीमंताकडून रघोतमराव यांचे विद्यमानें यांजकडें आला. तो नबाबांनीं मध्यस्त समीप असतां वाचून पाहिला. छ. ५ जिल्कादीं मध्यस्ताकडें कोन्हेरपंतास पाठऊन विचरिलें कीं “श्रीमंतांकडलि जबाब आला तो हजरतींनीं पाहिला कीं नाहीं” मध्यस्त बोलले “मी जवळ असतां पत्र अक्षरशा हर्फबहर्फ पाहिलें. त्यावरून हजरतीची मर्जी बहुत खफा जाली; आणि बोलले कीं मागती याचा जबाब राव पंत प्रधान यांस मी लिहितों” याजवर मीं अर्ज केला कीं “पुन्हां या पत्राचा जबाब लिहिण्याचें कारण नाहीं, येकवेळ पत्र लिहिलें. त्याचा जबाल तिकडून या त-हेचा आला, आतां पत्र लिहिल्यानंतर तिकडून जवाब काय येईल ? तकरारीनें तकरार वाढेल. यांत फायदा नाहीं. सबब मागतीं पत्र लिहिण्याचें मवकुफ करविलें” याप्रा मध्यस्त बोलले, रा छ, ६ जिल्काद. हे विनंति.

उंबरज-जाधव

लेखांक १७७                                                                                                                              १५८९ कार्तिक वद्य ७                                          

                                                                                                        177

अज रख्तखाने मशरुल हजरत मैफरुलरु + + हैबयतराऊ अजम द्यानत राव साहेब दामदौलतहू ता। हुदेदारानि हाल व इस्तकबाल व मोकदमानि का। उबरज पा। कराहाड बिदानद के अज सुहुरसन समान सितैन अलफ दरीबिल हुजूर मालूम जाहले जे बहिरोजी बिन अंबाजी जाधव यानी लडाईमधे बहुत खस्त केला अखेर ठार पडिला ह्मणौन त्यावरी मेहरबानी फर्माऊन त्याचे बाप अंबाजी व रांडरोटीबदल इनाम पडी जमीन .।. तीस बिघे अजरामराहमत करून दिल्हे असे तरी पडी मिलामत तीस बिघे हदमाहादूद घालून दीजे बाआहूब बअवलाद व अहफाद चालविजे दर हर साल ताजा खुर्द खताचे उजूर न कीजे तालीक लिहून घेऊन असल परतोन दीजे जाणिजे

                                                                                                                                                                                                                        177 1

                                                                                               तेरीख २० माहे जमादिलवल
                                                                                               रुजू सूद

 

श्री.
ज्येष्ठ शु. ७ रविवार शके १७१५


विनंति उपरि. नवाबांनीं श्रीमंतासी पत्र पाठविलें. त्याचे जबाबाचा मसविदा हिंदवी पाठविला. त्यांत परस्परें नोका लाऊन जबाब लिहिला. त्याचे कुन्हे ध्यानांत येण्याकरितां आलाहिदा पुरवणी तुह्मीं लिहिली. त्याप्रा। अक्षरश: मननांत आलें. हा मसविदा मध्यस्तास वाचून दाखविल्यांत त्यांजला कांहीं खुषी व्हावयाची नाहीं; हें समजोन त्यांस न दाखवितां मसविदा आपल्याजवळ ठेविला. पत्र जबाबाचें रघोतमराव यांजकडून आल्याचें वर्तमान समल्यावरून मध्यस्ताकडें कोन्हेरपंत यांस पाठवून त्यांजला विच्यारिलें कीं श्रीमंतांकडून हजरतीचे पत्राचा जबाब रवाना जाला. ऐसें आह्माकडें लिहिलें आलें. त्यास पत्र आलें कीं नाहीं ? उत्तर केलें कीं “पत्र आलें. परंतु अद्याप हजरतीस गुजराणिलें नाहीं. गुजराणिल्यानंतर पत्रांतील भाव काय याची इतला तुह्मांस होईल”. याप्रा बोलले. र। छ. ६ जिल्काद हे विनंति.

श्री.
ज्येष्ठ शु. ७ रविवार, शके १७१५
राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.

विनंति उपरि. छ, २५ माहे शवालचीं तुह्मीं पत्रें प॥ तीं छ ३० माहे म।।रीं पावलीं. त्यांची उत्तरें-“श्रीमंतांस पत्र नबाबांनीं प॥ होतें त्याचा जवाबाचा तरजुमा हिंदवी पाठविला. त्यास श्रीमंताचें उत्तर तयार करविलें. चिटणिसास मसविदा करून दिल्हा. पत्र होऊन आलें ह्मणजे रवाना कारतों.'' ह्मणोन लि।. त्यास, ज्या हेतूस्तव पत्र लिहिलें कीं श्रीमंतांकडून त्याचें उत्तर ज्यासमयीं यावें तेव्हां न आलें. नवाबाचे पत्राचा जाबही येथें येऊन पोंचला. तुह्माकडून मसविदाही आह्मास आला. आद्याप श्रीमंताचें उत्तर नाहीं. आतां जें उत्तर येणें तें, आह्मीं पत्र लिहिलें त्याचें उत्तर, कधींतरी आलें. इतकेंच फळ! र॥ छ ६ जिल्काद हे विनंति.

[ १७७ ]                                            श्री.                                         १९ ऑगस्ट १७४८.                                                                                                                                      

श्रीमंत राजश्री शिवरामपंत व राजश्री कृष्णरावजी स्वामींसः -
विनंति सेवक नारो महादेव मुकाम शहर अवरंगाबाद साष्टांग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल भाद्रपद शु।। ७ शुक्रवारपर्यंत स्वामीचे कृपेकरोन यथास्थित असे. विशेष. बहुत दिवस जाले. परंतु अभय पत्र पाठवून सो । परामृश न केला. हें अपूर्व ढिसोन आलें इकडील वर्तमान सविस्तर मा। रा। रावसाहेब यांचे पत्रीं लिहिलें आहे, त्यावरून विदित होईल. आणि राजश्री रावसाहेब हें कार्य स्वामीसच करोन देणार, आणि स्वामी निसूर बसले आहेत, हें अपूर्व आहे ! जर हें कार्य स्वामीस कर्तव्य नसलें तरी गंगाजीस सत्वर पाठविजे. ज्याच्या वडिलीं घोडे कधीं दृष्टीस पाहिले नव्हते. ते या राज्यांत येऊन पंचहजारी मनसबदार जाले ! आणि स्वामीस तों नबाब साहेब आपणहून चहातात. वारंवार आपल्या वडिलांची स्तुति करितात. आणि बहुत खुश आहेत जे, राजश्री राव येथें आलिया उत्तम आहे. तरी स्वामींनीं हें कार्य चित्तीं धरून कीजे. तरी तुह्मीं मा। रा। रावसाहेब यासी सांगून गंगाजीस व आपला कोणी इतबारी असेल त्यासी पाठविजे. त्याच्या मार्फतीनें कार्यभाग केला जाईल. या कामास विलंब न कीजे. उत्तर व गंगाजीस सत्वर पाठविजे. हे विनंति.
                       जासूद
                       आपाजी
                       मलकोजी.