Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. १० बुधवार शके १७१५.
राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.”
विनंति उपरि तुमचे पत्रापो। मामलत समंधें घासीमियां व सरबुलंद जंगाकडील ऐवजाचा व जगधनास ऐवज पावल्याचा मार लिहिला होता, त्याचे जाब हली पा आहेत त्यावरून ता कळेल. राजश्री नाना यांस पत्रें लि॥ आहेत त्यावरून दिनचर्या वगैरे वर्ममान कळेल. वरचेवर तिकडून पत्रें रवाना करीत जावीं. इकडील पत्राचे जाब येणें फार तटले आहेत. छ. १२ जिल्कादची तुह्मांकडील पत्रें छ. १८ माहे मा।रीं पावलीं. यांचीं उत्तरें उदईक रवाना होतील. रा छ २३ जिल्काद हे विनंति. चिनापटण आखबार पा आहे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. ९ मंगळवार शके १७१५.
भावसिंग चौधरी यानें पत्र मागितले सबब.
राजश्री याविराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी
पो।। गोविंदराव कृष्ण स।। नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लि।। जावें.
विशेष राजश्री गोपाळ नाईक वानवले यांचा ऐवज शंकरदास साहुकार हैदराबादकर यांजकडे सतराशें रुपये मुद्दल याजकरितां याचा मूल मनुलाल यास पैठण येथें वानवले यांनीं अटकाविलें येविषयीं रोशनराव व भावसिंग चौधरी यांनीं बहुत वेळ आम्हांस सांगितल्यावरून वानवले यांस पत्रें पाठविलीं, परंतु मनुलाल याची सुटका जाली नाहीं. सांप्रत भावसिंग चौधरी याचे मारिफात साहुकारी निशा सतराशें रुपये मुद्दल घेण्याची खातरजमा बशर्त मनुलाल येथें आल्यावर ऐवज घ्यावा. याप्र।। घेऊन वानवले यांस पत्र 'समागमें जासूद देऊन पैठणास पाठविलें. त्यास म॥रनिलेनी मनुलाल यास मोकळीक करूं नये. येथें पाठविल्यास उत्तम. कदाचित व्याज वगैरे आड करूं लागतील यास्तव तुह्मांस लि।। त्यास शंकरदास याजपासी देण्याघेण्याचा आहवाल कांहीं. नाहीं वाडा वस्तवांनीं गाहण ठेवून चौधरी यानें मोठे बलानें साहुकाराकडून निशापाती केली आहे यास्तव व्याज वगैरे तंटा कांहीं एक न करितां मुदल फेडच्यांत समजोन मनुलालास सोडून रवाना करावें. आह्मापासी पोहचते करून द्यावे, या प्र।। वानवले यांस तुह्मी परभारा लेहून सदरहु प्र।। अमलांत आणीत ऐसा बंदोबस्त करावा. र॥ छ. २२ जिल्काद बहुत काय लि।। लोभ कीजे हे विनंति.
छ. २३ रोजीं टप्यावर रवाना पत्रें.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. २ बुधवार शके १७१५.
विनंति उपरि. राजश्री बाबाराव मध्यस्तापाशीं बोलत होते की राजश्री तुकोजी होळकर यांचीं पत्रें मदारुलमहाम यास आलीं की सिद्यासी आमसी हा प्रकार उपस्थित जाहला, हा तेथील आज्ञाव्यतरिक्त नाहीं त्यास त्यांची जमीयेत फार, इकडील थोडी, याजमुळें लढाईचा प्रसंग आप्तरे जाहला. पुढें कसी आज्ञा ? केलें कर्म सिद्धीस तर गेलें पाहिजे याचें उत्तर लवकर यावें ऐसीं पत्रें आली त्याजवरून मदारुलमहाम आंदेशांत पडले आहेत. पहावें काय जबाब देतात. याप्रमाणें वर्तमान ऐकिलें त्याजवरून लिहिलें आहे. खरें खोटें नकळे. याचा शोध तुम्हांसही तेथें लागला असेल. लिहून पाठवावें, र।। छ, १६ जिल्काद हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. ३ बुधवार शके १७१५.
विनंति उपरि. जफरुदौलायहतेषामजंग यांनीं राजश्री नाना व तात्या यांस पत्रें दिल्हीं. ती पाठविलीं आहेत. प्रविष्ट करून उत्तरें घेऊन पाठवावींत. यांनीं आमचे नांव लिहिलें आहे तिकडून पत्रें येतील त्यांत आमचे नांव असावें किंवा नसावें याची सलाह राजश्री नाना, तात्या सांगतील तसें करावें. मनांत संशय आला याजकरितां लि।। आसे, पत्रांत दोस्तीचे खातरजमेचा, मजकूर लिहावा. उत्तरे लवकर यावी ह्मणजे खातरजमा त्यास वाटेल. दिवस गत न लागावी. र।। छ. १६ जिल्काद हे विनंति. *
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. ३ बुधवार शके १७१५.
छ. १६ रोज रवाना टपा.
राजश्री गोविंदराव स्वामींचे सेवेसी----
विनंति उपरि. जफरुदौलायहतेषामजंग यांचे बोलणें कीं “माझे बापापासून श्रीमंताचे दौलतखा तुमचे दोस्तीचा सीलसिलांही कदीमपासून असें असतां माझे कामावर आपण कांहींच मुतवले होत नाहीं. हें अपूर्व आहे ! पानगलचे मुकामीं मध्यस्त आल जपूरचें काम मजकडे सांगत होते ते वेळेस आपण खातर केली असती तर माझें काम होतें. श्रीमंताचे दौलतखाह तुमची दोस्ती कधीं कधीं उपयोगीं पडावी " इत्यादिक बहुत गिला केला. त्याचें उत्तर त्यांस दिल्हें कीं " तुह्मीं ज्या गोष्टी बोलिलां त्या ख-या. परंतु इतके दिवस या विषईचा तुह्मांस खियालच नाहीं. जर खियाल असता तर आजपरायेंत स्वस्थ का बसलां? तुमचे बाप सरकारचे दौलतखा हें समजोन निर्मळचे मोहिमेचे वेळेस मदारुल माहम यांनीं तुह्मांविषई आमचे बरोबर नवाबास कित्येक गोष्टी सांगून पाठविल्या. तेव्हां हजरतीनीं मान्य करून आह्मांस सांगितलें. त्याजवरून ज्यांत तुमचें स्वैरखाहीची गोष्ट ती सांगून पाठविली. हजरितींनी ही मान्य करून लढाई मोकूफ करून तुह्मांकडीलजबाब सवालाचे इंतज्यारींत होते. सेवटीं तुमचे असंमजसपणाचें बोलणें पडलें; तेव्हां आह्मी लाचार होऊन निरोप घेऊन पुण्यास गेलों. सेवटीं जें व्हावयाचें तें झालें. आह्मी बोलत होतों त्याचे शतांश तरी तुम्हांस कांहीं लाभ जाहला ? कांहींच नाहीं ! त्याजवरून आमचे मनांत निश्चये कीं अद्याप दुनयायीचे उंच नीच गोष्टींविसीं प्रवीणता नाहीं. आणि तुमचे बापाची काय माई याची ही माहितगारी नाही. तेव्हां तुमचा विश्वास खातरजमा कोण त-हेचा कसा मानावा? याजकरितां या गोष्टीचा गिला आह्माकडे नाहीं. तुह्मी हुषीयार जालीयावर पुढें तुह्मासच बरें वाईट कोणतें हें समजत जाईल," ऐशा कितेक गोष्टी सांगितल्यावर सावध होऊन बोलिले कीं “जें मागें जालें तें गुदस्ता आतां मदारुल माहम यास माझी पास असावी. माझे दौलतरवाहीचा सिलसिला कायम करावा. मदारुलमाहम व हरिपंतजी यांस पत्रें लिहून देतों हीं पाठवावीं. माझे कार्याविषयीं तुह्मी मध्यस्तापासीं सई करावी. मदारुलमाहम यांचे लक्षाखेरीज मी नाहीं. याची खातरजमा जसी पाहिजे तसी करून देईन. त्यांत आंतर पडावयाचें नाहीं " म्हणोन बहुमताप्रकारें बोलिलें, त्यावरून त्याची खातरजमा केली. “मदारुल माहम यासही लिहितों. उत्तर येईल. नंतर तिकडील खातरजमेचा प्रकार तुमची बोलण्यांत येईल. '' याप्र।। बोलण्यांत आलें, आस्थाही लावून ठेविली आहे. हा मजकूर राजश्री नानास श्रुत करावा. र॥ छ. १६ जिल्काद. हे. विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.
राजश्री याविराजीत राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.
पो गोविंदराव कृष्ण सा नमस्कार विनंति, उपरि, येथील कुशल जाणून स्वकीयें लिंहित जावें. विशेष—मौजे शिरसांव पा हवेली परंडा जागीर-राजश्री राव रंभाजी जयवंत निंबाळकर यांची-तेथीलं व मौजे देगांव पा बारसी या दोगांवचे सिवेचा कजिया बहुत दिवस, सा पांच चाहूर जमीन आज पावेतों मोहगम पडिक अनामत असतां सालगुदस्ता मौजे देगांव व कांदेलगांव पा बारसी या दोगावांनीं अनामत राण जबरदस्तीनें पेरलें. तेव्हां सिरसांघकराचा त्यांचा कजिया जाला. बारसीकर कमाविसदारांनीं सरकारांत गैरवाका समजाऊनः सिरसांवची जमीन-कदीम पांच चाहूर कजीयाची व जदडि साडेबारा चाहूर येकूण-साडेसतरा चाहूर जमीन सिरसांव येथील जप्त केली. कमाविसदारांनी वाडा बांधून जमीन वहिवाटावयास लागले. येविषंई राव मारनिले यांनी तुह्मास पांच चार वेळां लि सिरसावकर रयेत येक वर्ष पुण्यांत बसले. परंतु बंदोबस्त न जाला. दिवस लावणीचे. त्यांत यांची जमीन देगांवकर व कांदलगांवकर जप्तीचे.राण पेरतात. सा सिरसावची रयेत उठोन बेदरास आली.. गांवची खराबी ज़ाली. राव मारनिले यांचें ह्मणे कीं “ याप्र। गैरवाजबी होणें हें उचित कीं काय ? '' त्यावरून लि॥ असे. तरी सालगुदस्ता मौजे म॥राचा माल च ऐवज नेला असेल तो माघारी देवऊन वाजवीचे रुईनें नवी जमीन रेटंली तिची मोकळीक व्हावीं, कदीम पांच चाहूर कजियाचा निर्णय होऊन ठरेल त्या प्र॥ दोहीं गांवांनी वर्तावे. येविषीं तुह्मीं राजश्री नाना यांस विनंति करून बंदोबस्त करून घ्यावा.
र॥ छ० १५ जिलकाद बहुत काय लिहिणें लाभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १८० ] श्री. ५ ऑक्टोबर १७४८.
पुरवणी राजश्री पंत स्वामीचे सेवेसीः-
विनंति उपरि. स्वामीनें गतवर्षी अनंतभट व बाळंभट रुईकर यांजपासून मोहरा १९।। व रु. १७ देविले. त्यास, जमान नीळकंठभट रुईकर आहे ऐसियास, मुदती श्रावणांतील केली ते येऊन गेली त्याजवर आह्मीं भाद्रपद्रमासीं रोख सटू वसुलास अनंतभटाकडे पाठिवला. तेव्हां गांवास आला नव्हता. ह्मणोन रिकामाच फिरोन आला. याजवरी कालीं आह्मीं अवरंगाबादेहून येतेसमयीं स्वामींचीं पत्रें व आपलीं पत्रें व खताची नक्कल ऐदी देऊन सेख सटूस छ १ सफरीं त्रिंबकास अनंत भटाकडे पाठविला. याणें जाऊन पत्रें दिधलीं अनंतभट व बाळभट भेटला. त्यास पत्रें देऊन पैकियाचें मागणें लाविलें तेव्हां त्याणें जाऊन शहरचे फौजदारापाशीं फिर्याद केली. आणि त्यास अंतस्थ लाच रुपये ४० देऊन त्यांच्या प्यादियापासोन धरून सेख सटूस खोडियांत अवग्र आठ दिवस घालविले तेव्हां आह्मीं उमरखानाचें पत्र पाठवून सोडवून आणविला ऐसे भट लोक होऊन त्रिंबकांतील वास जाहले आहेत !!! याउपर रुपये त्याजपासून येत नाहीत. त्याचे जमान नीलकंठभट तेथें स्वामीपाशीं आहेत त्यास तेथेंच जमान घेऊन त्यासी नसिहत करून पाठवावया आज्ञा करावी ह्मणजे अनतभटाबाबती रुपये नीलकठभटापासून वसूल घेऊन याउपर स्वामीने या रुईकराचा इतबार सहसा धरिला न पाहिजे. स्वामीपाशीं येऊन गरिबी दाखविताती परंतु हे लोक ऐसे मवाशीनें वर्तणूक करिताती तर नीलकंठभटाची बळकटी करून पाठविला पाहिजे सेवेशी श्रुत होय. याउपर रुईकराचा इतबार केला स्वामीनें याचा विश्वास न धरावा हे लोक भले मनुष्य नव्हेत अपहार करावयाचे लोक आहेत तर यांजपासून द्रव्य हातास ये ऐसी योजना केली पाहिजे. सेवेसी सूचना मात्र लिहिली असे श्रुत होय.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५
विनंति उपरि. घटाल्याकडे दोन तनखाबाबत साडे चौतीस हजार रुपये येणें, त्याचे वसुलास तिमणा नाइक पांच महिने बसोन निकड संतत केली. तेव्हां पंधरा हजार रुपये वसूल जाला. ऐवज त्याजकडील प्यादे बादरका समागमें देऊन नाइक म॥र यांनीं रवाना केला. तो येथें पावला. पंनास रुपये परत होऊन बाकी नन्हुमल यांचे दुकानीं जमा केला. ‘बाकी साडे एकुणीस हजार येणें. त्याची निकड होत आहे. परंतु दोन माहिन्यासिवाय तूर्त ऐवज हातास येता दिसत नाहीं." याप्र।। नाइक यांनीं लिहिलें. मध्यस्ताची ताकीद घटाले यांस पाठऊन निकड करणें तितकी करितां येईल. याजवर ऐवज वसूल, येईल तेव्हां प्रमाण र।। छ. १५ जिल्काद हे विनंति.
छ १५ रावरंभा यांनीं
मागीतल्यावरून.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व २. मंगळवार शके १७१५.
विनंति उपरि. राजश्री रावरंभा यांनीं दफ्तराचें झट बजाजीपंत वगैरेकडे लाविलें होतें. याची पंचाईत मध्यस्तापासी होऊन ठरलें त्याचा त।। पूर्वी लिहिल्यावरून कळला असेल. बजाजीपंत व बक्षी व जामदार ऐसे दफ्तराचे शोधाकरितां हैद्राबादेस गेले होते. तेथून दफ्तरें आणिलीं, बाजीस दाखविलीं. त्यांत तें दफ्तर सांपडलें. बाजींनीं यांस सर्वांस सांगितलें कीं “ आमचें दफ्तर आह्मास सांपडलें.'' या प्र॥ जालें. बजाजीपंत वगैरेवर आळ रिकामा आला होता तो दूर जाला. तुह्मास कळावें सबब लि।। असे. मध्यस्थानी बाजीदेखत आह्मांस सांगितलें कीं “रुमाल-कागद सांपडलें. ऐसें बाजीसाहेबांचें ह्मणणें मुबारक" ह्मणोन. आह्मीं बोललों “नाहक पेंच ब्राम्हणावर आणिला होता. आतां पार पडला. "बाजी आम्हासी बोलले कीं “ घरची गोष्ट मुषीरुल्मुलूकपर्यंत बजाजींनीं कशास नेली ?” याचें उत्तर त्यास आह्मीं केलें कीं हा दोष बजाजीकडे किमपि नाहीं. माझी ताकीद बजाजीस होती कीं मुषीरुल्मुलूक यांजपाशी गोष्ट न काढावी आणि आम्हीही याविसीं बोललों नाहीं. तुम्हीच जामदार आदिकरून प्रथम मुषीरुल्मुलूक यांजपासी घेऊन गेला. नंतर मध्यस्ताचे बोलावण्यावरून बजाजीपंतास पाठविलें, ऐसें असतां आपण बजाजीपंत यांजकडे फायष केली याचा दोष ठोवितात हें मलाच आश्चिर्य जालें.” याजवर बाजींनीं कांहीं उत्तर केलें नाहीं. आणखीच गोष्ट काहडली, सारांश म-हाटे काबाडीचे ! ईश्वर या कारभारांतून तुम्हास कधीं सोडवील याचे नवस कारतों. र॥ छ. १५ जिल्काद हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
ज्येष्ठ व. २ मंगळवार शके १७१५.
विनंति उपरि. रघुनाथ बाबुराव साहुकार पुण्यांतील यांजपासोन जीवनराव पांढरे यांनीं पेशजी मामलत समंधे कर्ज घेतलें होतें त्यांत वसूलही बहुतकरून हणमंतराव सभापत यांचे विद्यमानें पावला. कांही ऐवज देणें त्यास, सांप्रत हणमंतराव यांची चित्तशुद्धी नाहीं. तुफान करून रघुनाथ बाबुराव यांचे देण्याचा तोदा मनस्वी समजावितील यास्तव त्याचे देण्याचा अजमास याजकडील वसूल काय पावला व बाकी राहीलें काय ? हें तुह्मी समजोन घेऊन त्याची आकसात बंदी वाजवी ऐवजाची ठरावून पाठवावी. “नेमाप्रा ऐवज पावता करीन" ऐसें जीवनराव यांचें बोलणें, त्यास, हणमंतराव यांचे समजाविल्यावर न जातां रघुनाथ बाबुराव यांचा हिसेब खचित समजोन घेऊन ऐवजाची वायदा मुदत ठरवून ल्याहावें. यास आळसाखालें न टाकितां जरूर करून ल्याहावें. र॥ छ. १५ जिल्काद हे विनंति.