[ १७८ ] श्री. १९ ऑगस्ट १७४८.
श्रीमंत राजश्री भगवतराऊ रामचंद्र हुकुमतपन्हा स्वामीचे सेवेसीः -
विनंति सेवक नारो महादेव मुकाम शहर अवरंगाबाद करद्वय जोडोन साष्टाग नमस्कार विनंति उपरि येथील कुशल भाद्रपद शुद्ध सप्तमी शुक्रवारपर्यंत स्वामीचे कृपाप्रातबळेंकरोन यथास्थित असे विशेष स्वामीनीं सिदोजी व राऊजी हरकारी याजबरोबर पत्रें पाठविली ते पावली त्यात आज्ञा केली जे, नबाब नासरजंग यासी अर्जी देणे त्यावरून अर्जी तयार करोन छ १४ शाबानी तिसरा प्रहरा शेर स्वारीत नजरबेगखान बक्षी याच्या माफीतीनें गुजराणिली नबाबांनीं अर्जी पाहोन बहुत खुश जाले, आणि नजरबेगखानास आज्ञा केली जे, इनायतनामा सिताब तयार होय आणि राऊजी सत्वर येऊन पोहोचत, त्याचा आपल्या सरकारांत बहुत दिरिंग दिसोन येतो आणि आपण तों स्वामीचेच नांवावर जागिराचाही फर्द दिल्हा त्याचा नबाबाहीं जाब दिल्हा जे, रा। उदाजी चव्हाण यांची जहागीर अकरा लक्षांची विजापूर प्रांतीं देतों, बाकी जहागीर वराड प्रातीं देतो. ऐसा करार नजरबेगखांजीशीं केला. आपणहि रुबरु होतो. त्यासी, बजिन्नस नजरबेगखांजी याणीहि पत्र सेवेसी लिहिलें आहे आपण जे कांही विनंति पत्रें लिहितो त्यांचा अर्थ घडोन येत नाहीं. तस्मात् दिसोन आलें जे, स्वामीचे चित्तांत हें कार्य कर्तव्य नाहीं तरी नाहक तहखर्चाखालें काशास यावें. ऐसेंच असले तरी आह्मांस तैसेंच उत्तर लिहिणें. आपण या कामांत एकंदर नाहीं, आणि नबाब साहेबांसही अर्जी देऊजे, त्यांचे येणें होत नाहीं. आणि जो कोणी मोंगलाईत आला आहे तो कोणी श्रमी झाला नाहीं. पदासच चढला आणिख जाणें पूर जालें हें आपणही परस्पर ऐकिलें असेल. आणि स्वराज्यांत होते तेव्हांही स्वामीस विदितच होतें जे, कोणकोण रीतीनें नांवलौकिक होता, आणि सरंजाम कोणें प्रकारें होता. ऐसा प्रकार असोन स्वामीचा तो नावलौकिक थोर असोन, नबाबसाहेब आपणहून हमेशा स्मरण करीत असतां, न यावें हें अपूर्व दिसोन आलें. राजश्री बाळाजी बाजीराव यांपेक्षां स्वामीस नबाबसाहेब बहुत चहातात. आणि नबाब आसफज्याहा यांसी सांगून गेले जे, कुल म-हाटे राज्यातील सरदार याचे पायजाम आहेत. ऐशियावरोन नबाबसाहेब बहुत चहातात आणि जैसी फौज येईल तैसी जहागीरही देतील आणि मुळाजमत जालिया मदतखर्चही उमदा देतील. ऐसें असोन महाराज चित्तीं कार्य न धरीत हें अपूर्व आहे. तरी आतां नबाब नासरजंग यांची नजर सवाशे मोहरा गुजराणावी लागतात. व वस्त्रें व दरबारखर्च व आपला सरंजाम देऊन राजश्री गंगाजी संकपाळ यासी सत्वर रवाना करोन पाठविजे सर्व कार्य विजयादशमीपावेतो होऊन आलें तरी उत्तम नाहीं तरी, पुढें काही बेत नाहीं गंगाजीस सत्वर पाठविजे कासीद पाठवावा त्यासी अजुरा पोहोचत नाहीं याकरितां कासीद येयास अनमान करितात पंथपूर येथे कासिदानी रुपये १० दहा आह्मांपासोन घेतले तरी गंगाजीस सत्वर पाठविजे फौजेच तिकडे अनुकूल पडत नसली, तरी येथे पाच हजार स्वार तयार आहेत बितपशील - जमादार हकीमबेगजी स्वार ५००, व खोजे रहिमतुल्ला स्वार ५००, भिवसिग स्वार ५००, व शिदोजी पाटील जलगावकर स्वार ५०० , व खानदेशांत जमातदार स्वार १००० आणिकही कितेक लोक उमेदवार आहेत. तरी यांचे नावे कौल वेगळे वेगळे पाठविजे येथे जनात आणि दरबारात हांसें होय तें न कीजे आज दहा महिने या कामास जाहले परंतु पैसा दृष्टीस येत नाहीं. येथें तों आधी पैसा खर्च केलियावेगळें कार्य होत नाहीं. हे गंगाजीनेंही सेवेसी विनंति केली असेल तरी गगाजीस सरंजाम देऊन सत्वर पाठविजे. राजश्री पिलाजी जाधवराव यांचा लेक राजश्री जोत्याजी जाधव हेहि येऊन नबाब साहेबांस भेटले त्यांसी मदतखर्च लक्ष रुपये दिल्हे आणि जहागिरा चौलक्ष्याच्या दिल्या महाल उंडणगांव वगैरे महाल गुलजार दिले स्वामीस विदित होय. येथईल कैफीयत आपाजी जासूद सांगतां विदित होईल आपाजीस व राजश्री गंगाजी संकपाळ यासी सत्वर पाठविणें. विलंब न करणें. राजश्री मल्हारजी होळकर हेहि पातशाही चाकर जाले त्यांचा मुलूक जहागीर हुजरीहून माळव्यांत दिल्ही. व यशवंतराव पोवार यांसीही जहागीर माळवा प्रांतीं दिल्ही आणि किताब पंचहजारी साहेबनौबद केले आंवदा रा।।