Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ व. १ बुधवार शके १७१५.
विनंति. उपरी
सर्व समजोन आहे. हरयेक कामास दिवसगत लागती असें वाटतें. परंतु कारणाखेरीज नाहीं ह्मणोन लिं. त्यास समजोन दिरंगावर पडल्यास चिंता नाहीं. परंतु सर्व कामें तशींच नाहींत, कोणतीं दिरंगावर, कोणतीं जलदीनें करावीं याचा विचार असावा, सारीं कामें येकसारखीं असें असूं नये. पाटील कुळकर्णी यांचे जवाब येण्यास महिने लोटले; अद्याप कांहीं नाहीं. त्यांत कुळकर्णी यांची तो अति निकड-सांगतां येत नाहीं. पत्राचा जाब येणें यास किती महिने जाले ! आद्याप कांहींच कळतही नाहीं याजवरून आमची मनाची तसती कसी होईल ? ऐसें नित्य पुसतात. कांहीं बाहना सांगून ठेवितों. बाहना तरी किती दिवस? आतां पत राहत नाहीं. जवाब मात्र यावयाचा संदेह असल्यास पत्र त्यास दाखऊन माघारें घेऊन ठेवण्यांत येईल तेव्हां त्यांचें पत्रही माघारें घ्यावें लागेल. त्या पत्रासुद्धां जवाब लवकर पाठवावा ह्मणजे ठीक. कलम.
१ तुह्मीं पत्रें पाठविलीं.
२ रामचंद्र याचे चिरंजिवाचे नांवे लखोटे.
१ रघोत्तमराव याची अर्जी पंनास हजार सुरापुरचे पावले ह्मणोन मध्यस्तास.
१ माधवराव मुरार यांस.
१ बाळाजी रघुनाथ यांचा लाखोटा.
१ थोरला लाखोटा.
१ किता लाखोटा.
-----
७
सात लाखोटे पावले. कलम----
१ बाळाजीपंत बारामतीस जाऊन पांडुरंग रघुनाथ यांस आपलेकडे रवाना करून येथें आलीयावर लवकरच रवाना करतों ह्मणोन लिहिलें त्यास उत्तम आहे. कलम.-----१
१ जुजयातीचे सात कलमें ठराविलीं त्याची नकल रघोत्तमराव यांनीं केली ह्मणजे लवकर आपलेकडे पाठवितों ह्मणोन लिं तें कळलें. त्यास लवकर लिहावें. त्याचा सिधांत काय हाही लिहावा. त्या धोरणानें बोलावयासी येईल. कलम.----
१ रामचंद्र दादो यांचे चिरंजीवाचे नांवाचे लाखोटे पावते केले. कलम----
१ मुकुंद जोसी याचे जमिनीचे दुमोहरीचे तयारीस षुरुवात केली. कलम----
१ बाळाजीपंत यांजवर बाजीनीं नाहक पेंच आणला याविसीं आपण त्यास बोधरूप च्यार गोष्टी सांगून यांचे त्याचे मिळवून द्यावें ह्मणोन लिं. त्यास तसेंच होईल. कलम----
१ सुरापुरकर याजकडील भरणा----
१००००० सुरापुराहून रोख यैवज बापु सिक्दत्त याचे मारफत आला तो नवाबाचे खजान्यांत पावता करून तुमचें नांवें आह्मीं रसीद लिहून सुरापुराकडे पाठविली.
५०००० पन्नास हजाराची आर्जी रघोत्तमरावबाची तुह्मीं पाठविली ती मध्यस्तास प्रविष्ट केली.
५०००० बापु सिवदत्त याचा रोखा आषाढ वद्य १ मुदतीचा पाठविला तो पावला. त्याचें बंधू ह्मणाले भरणा जालीयावर तुह्मांस लिहून पाठवूं.
२०००००
सदरहु अन्वयें भरणा जाला. रघोत्तमराव यांजकडील यैवज पैकीं दाहा हजार कोणास देविले ? बाकी तसेंच असूं देणें ह्मणोन लिं. याप्रमाणें मध्यस्तांनीं नवाबापासि तपसीलवार बयान केला. कलम----१
-----
८
९ येकूण आठ कलमें र॥ छ. १५ जिल्हेज हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ व. १ बुधवार शके १७१५.
विनंति. उपरि तूर्त मोठा कारभार सिंदेप्रकर्णी. प्रातःकालीं तर बनत नाहीं. तृतीये प्रहरीं दरबार, त्या अवसरांत जितका कारभार होईल तितका; प्रस्तुत घरचे कामामुळें तर दुसरीं कामें होतच नाहींत; इत्यादिक मजकूर लिहिला तो सर्व कळला. त्यास दौलतीचें काम मोठें, यास दोन वेळ दरबार जाल्याखेरीज कसें होईल ? दुसरे, दरबारचे जाबसाल तटून राहतात आणि त्यांचे तगादेहि लागत असतांना जाब मिळत नाहीं. याचा खियाल इतर दौलतदार काय करतील तो करोत ! कलम ----१
जावीतजंगप्रकर्णी पत्रें पावतीं केलीं. उत्तरें घेऊन पाठवितों. गोविंदराव खटपट फार करितात ऐसें बोलिले म्हणोन लिहिलें तें कळलें, त्यास उत्तरें लवकर पाठवावीं. यास दिरंग पडला म्हणजे मनुष्यास उमेद राहत नाहीं आमचे खटपटीचें रूप करणें खावंदाकडे. कोणतें म्हणाल त्यास जाबसालाचें उत्तर होऊन गोष्ट मार्गास लागली म्हणजे करावें त्याचें सार्थक. नाहीं तर वंध्यामैथुन; ऐसें होतें हें तात्पर्य. कलम ----१
सरकारचे फराषखान्याचा सरंजाम पानगलास अटकावावा आणि नवाबाकडील लांकडाविसीं आम्हीं दस्तकें द्यावीं कीं काय ऐसें राजश्री नाना आपल्यास लिहिणार ह्मणोन लिं तें कळलें. पत्र आलियावर त्याचें उत्तरही समर्पक लिहिण्यांत येईल. कलम----१
वराड प्रांतांतील खुर्द्याची चाल कसी असावी याचा नेम आपण लिहिला व खुर्दा पाहवयासी पाठविला त्याजवरून उमरखेडकर यांस राजश्री नानांनीं ताकीद केली याचा मजकूर लिहिला तो समजला. कलम-----१
पाटील बाबास लग्नाची मेजवानी सरकारवाडयांत जाली. त्याचे स्त्रीस ऋतु प्राप्त जाला म्हणोन श्रीमंतास आहेर घेऊन गेले होते इत्यादिक लिं तें कळलें. कलम----१
टिपूचे मसलतविसीं पुढें तींही सरकारांनीं कसें चालावें याची याद आपणाकडून आली व मालीटही निकड करीत आहे. हररोज घोळ-पाटीलबावाचें एकमत, राजश्री नानाचे एकमत म्हणोन लिं तें कळलें. त्यास पाटीलबावाचें म्ह(ण)णें दौलतीचे दार्ढ्याचें परंतु सर्वांची येकवाक्यता होऊन घडणें कठीण याजकरितां नाना म्हणतात हेंच खरें. परंतु त्यांतहि येखादी दरज राखून जाल्यास चांगले. संकट आहे! केवळ हात बांधून देणें हेंहि चांगलें नाहीं.नदि- ल्यास गत नाहीं. याविसीं खावंदास समज होऊन आंगेजीनें करावें तर परिणाम नाहीं. तर नाना तरि काय करतील? दौलतीचे नसीबीं असेल तेंच घडेल आणि करणें प्राप्त ! जाब लवकर येत नाहीं याजकरितां नित्य येथील निकड आहे. त्याचा बयान काय लिहावा? कलम----१
नवाबाकडील लांकडाचे खरिदीस रघोतमराव यांजकडील कारकुन गेला. खरीदी षुरू झाली. ऐवजाची चिठी आपण तात्यावर दिली. त्यास ऐवज देतात ह्मणोन लिं तें कळलें. याप्रकर्णी मध्यस्त बाजुरांत बो(ल)ले त्याची पुरवणी आलाहिदा लिहिली असे. कलम----१
पुण्यावर आरंभापासून पाउस नाहीं. वर्कड सर्वत्र आहे. याचा विस्तार लिहिला तो कळला. त्यास रघोत्तमराव याची आखबार छ. २५ जिल्हेजची नवाबाचे येथें आली त्यांत चवथे माहेमारापासून पर्जन्य पडत आहे ह्मणोन लेख होता. आतां जाहलाच असेल. इकडे पिकाचे उपयोगी पर्जन्य जाले. कलम १
आठ कलमें रा छ. १५ जिल्हेज हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ शुद्ध ८ मंगळवार शके १७१५.
विनंति. उपरि राजश्री आनंदराव नरसिंह येथें आले, भेट जाली, वर्तमान समजलें. मारनिलेनीं हलीं पत्रें पुण्याकडे दिल्हीं आहेत तीं रवाना केलीं वि।
१ तुमचे नांवे, लखोटापत्रें पाहून उत्तरें यावीं.
१ मालोजी राजे घोरपडे यांचा लखोटा.
१ अबदुल गनीखां हकीमजी आदितवार पेठेंत.
१ बालंमा देसाई गुंड मटकलकर लखोटा सिदगीर गोसावी याचे मठांत अथवा आपाज़ी बाबाजी आठवले यांजपासी द्यावा.
------
४
सदरहू च्यार लाखोटे जिकडील तिकडे पावते होऊन उतरें येतील तीं इकडे रवाना करावीं. रा छ. ७ जिल्हेज हे विनंति.
टपा रवाना पुणें छ. १५ रोज.
आषाढ़ व. १ बुधवार शके १७१५.
राजश्री गोविंदराव स्वामीच सेवेसीं.
विनंति. उपरि तुह्मी छ. २९ माहे जिल्कादचीं पत्रें पाठविलीं तीं छ. ५ माहे जिल्हेजीं पावलीं. याचीं उत्तरें राजश्री नानाचे नांवाचीं पत्रें दिल्हीं. सर्व मजकुर समजला म्हणोन लिहिलें तें कळलें. कलम.—१
होळकर महेश्वरास येणार म्हणोन लिं तें कळलें. इंदुरास आले. अलीकडे हि येतील. सरदारीची मजा राहिली नाहीं. स्त्री नायेक, बाल नायेक आणि बेमसलहत-तीन गोष्टी येके ठिकाणीं चवथा आहंकार, तेव्हां ईश्वर त्या सरदारीची आबरो ठेवील तर ठेवो! कलम---१
सुरापुरकराचे कारभारी येथें आले, सरकारांत बोलून येकोपा ठरला, देवदुर्ग नजर वगैरे ठराव जाहला, नवाबास साहित्यपत्रें दिल्हीं, इत्यादिक तपसील या उपरि लिहीन म्हणोन लिं. त्यास साहित्यपत्रें व गोपाळ आपा यानीं लवकर यावें, देवदुर्गप्रकर्णी याचें मनांत विपरीत आलें आहे. तिकडे फौज मध्यस्तानीं कांहीं बंदोबस्ताविसीं पाठविली ऐसें ऐकण्यांत. शोध घेऊन बोलण्यांत येईल. परंतु तिकडून पत्रें जरूर लवकर यावीं म्हणजे बोलण्यास दुहेरी नेट पडेल विस्मरणांत येऊं नये. कलम---१
राजश्री पाटील बाबा सरकारवाड्यांत दोन वेळ व येक वेळ नानाचे येथें आले होते, तीन खलबतें जालीं. श्रीमंताचें दैव थोर ! राजश्री नाना, तात्या, पाटीलबाबा, तिघेहि थोर समंजस, तिघांसही दौलतीची काळजी आहे, इत्यादिक मजकूर लिहिला तो कळला, त्यास ईश्वराजवळ हेंच मागणें आहे त्रिवर्गाची ऐकता (ऐक्यता ) यांतच दौलतीची बोहबुदी आहे. कलम ---१
बाळाजी व्यंकटेश व येमा खिदमतगार आले. ज्या कामास आले तें होत आहे. त्यास आपली निशा होऊन चिठी आली पाहिजे, याविसी कसें म्हणोन लिं. त्यास निशा जाली. परंतु येक चिठी येणें त्याचा खोळंबा आहे. त्याविषईं पूर्वी लिं आहे त्याप्रमाणें सैदास सांगून चिठी आणून पाठवावी. त्या ग्रहस्ताकड़ील पत्र आम्हास आलें होतें, त्याचा जबाब आम्हीं पाठविला कीं चिटी लवकर यावी, त्याविसीं खोळंबा आहे, ताकीदपत्रें तयार आहेत, चिटी आली म्हणजे पत्रें तुम्हासी पोंचतील, त्यास येविषंई तुम्ही सैदास सांगून करवावें कलम.-----१
पांच कलमें र। छ. १५ जिल्हेज हे विनंति, चीनापटणच्या दोन आखबारा पा आहेत. प्रा करावें; हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ शुद्ध ८ मंगळवार शके १७१५.
विनंति, उपरि शंकरदास साहुकार हैदराबादकर यांजकडे वानवळे हरबाजी ना यांचा ऐवज सतराशें रुपये याजकरितां पैठणांत गोपाळ ना। यानीं शंकरदासाचा पुत्र मनुलाल यास आटकेंत ठेविलें. रोशनराव व भावसिंग चौधरी यानीं रदबदल फार केली; सबब तीन च्यार पत्रें वानवळे यांस पाठविलीं, तुह्मांसही लि परंतु अद्याप त्याची सुटका जाली नाहीं. सांप्रत भावसिंग चौधरी यांनीं शंकरदासाची हवेली गहाण ठेउन वस्तवानी तडामोडा करून सतराशें रुपयांची साहुकारी खातरजमा करून दिल्ही कीं मनुलाल येथें येतांच साहुकारानें सतराशें रुपये द्यावे; व्याजाचे कांहीं ह्मणों नये. याप्रा ठरून आह्मीं गोपाळ नाइक वानवळे यांस मुजरद जासुदाबराबर पत्र पा आहे कीं याप्रा ऐवज मनुलाल येथें आल्यावर फडच्या होतो. या पत्रावर बहुतकरून वानवळे मनुलाल यास इकडे पाठवितील. कदाचित् व्याज वगैरेची हरकत केल्यास तुह्मी साफ तिकडून त्यास लेहून रंगोवा नाइक यास सांगोन मनुलालाची सुटका होऊन इकडे पाठवीत ऐसें करावें. रा छ.७ जिल्हेज हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १८२ श्री १६४६ आषाढ शुध्द ७
स्वस्ति श्री राज्याभिषेक - शके ५१ क्रोधिनाम संवत्सरे आषाढ शुध सप्तमि भोम वासरे क्षत्रिय-कुलावतंस श्रीराजा शंभु छत्रपति स्वामि याणि सेटे-माहजनानी व रयानी का। उबरज पा। कराड यासि आज्ञा केली ऐसि जे कालोजी बिन जोगोजी जाधव पाटिल का। मा।र याणे स्वामिसनिध येऊन विनति केली की का॥ मा॥रची पाटीलकी महतकदीम आपली त्यास आपला गोत्र-पुरुष सटवोजी बिन शमनाजी जाधव याणे आपणासि कथला वडीलकीकरिता आरंभिला आहे आणि आपण वडील ह्मणवितो त्यास त्याचा व आपला मूळपुरुष येक वडील घर पान मान आपले ऐसे असता सटवोजी रेटाई करितो त्यास सटवोजीचे वडिलानी आमचे वडिलासि पुर्वी इदलशाही कारकिर्दीस वडीलकीकरिता कथले बहुत करीत आले परतु आपले वडिलि सटवोजीचे वडिलास वडिलकीचे पानमान घेऊ दिल्हे नाही मधे दिवाणीतून एकदोनि वेला स्थलास हि त्याचे वडील व आपले वडील निवाडियाबद्दल जाऊन स्थली मनसुबी होऊन स्थल-पत्रे आणीली तेव्हा सटवोजीचा वउील दताजी व तिमाजी खोटे जाले असता मागती सटवोजी कथले करितो या करिता स्वामीनी आपले कागदपत्र मनास आणऊन बर हक निवाडा करावा ह्मणून विदित केले त्यावरून मनास आणिता मूळपुरुष कालोजी जाधव याचा व सटवोजी जाधव याचा ऐक परतु वडील जाखो पाटील व धाकटा पाको पाटील या दोघा भावाची सतत हे दोघेजण वडीलपण पानमान नाठार जाखो पाटील याचा त्यास याचा वशज कालोजी पाटील या करिता वडीलपण पानमान नागर कालोजी पाटील याचा धाकटा पाको पाटील याचा वशज सटवोजी बीन शमनाजी याणे वडीलपण व नांगराखेरीज आपली निमे तकसीम पाटीलकी मात्र खाऊन असावे ऐसे असता सटवोजी पाटील उगा च वडीलपणाकरिता कथले करितो त्यास स्थलीची पत्रे व वरकड कागदपत्रावरून पाहाता कालोजीने मूळपुरुष भोगवटा लेहून दिल्हा त्यावरून धर्मता त्रिविधप्रकारे कालोजी जाधव पाटील का। मजकूर हा वडिलकीस खरा आहे याकरिता याणे वडीलपण पानमान नागर निमे पाटीलकीचा कारभार करून पाटीलकी अनभवावी व सटवोजी जाधव आपण वडील ह्मणऊन कथला करीत होता परतु मूळपुरुष वंशावली व भोगवटा व स्थलीची व वरकड पत्रावरून वडीलपणास लागू होत नाही धाकट्या भावाचा वंश सटवोजी याणे निमे पाटीलकीची तकसीम अनभवावी ऐसे जाले त्यावरून याप्रमाणे चालवावयाची आज्ञा करून तुह्मास हे आज्ञापत्र सादर केले असे व सविस्तर निवाडपत्र आलाहिदा दिल्हे आहे तरी तुह्मी का। उबरज येथील निमे पाटीलकी वडीलपण पानमान नांगर कालोजी बीन जोगोजी पाटील यास व निमे पाटीलकी सटवोजी बीन शमनाजी यास ऐसे हरदू जणास वंशपरंपरेने चालवावयाची आज्ञा केली असे यांत कथला होऊ न देणे या पत्राची तालीक लेहून घेऊन असल कालोजी पाटील याजवळ परतोन देणे जाणिजे निदेश समक्ष
सुरु सूद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ शुद्ध ८ मंगळवार शके १७१५.
विनंति. उपरि, ननुमल याचे विद्यमानें येथून पेशजी तुम्हावर हुंड्या नऊहजाराच्या व भगवंत नाईक याजकडील तीन हजाराच्या ऐशा रावरंभा यांचे माहवारी समंधें केल्या. पौं कांहीं ऐवज पावला व बाकी देणें तो दिल्हा नाहीं येविर्षीचा बोभाटा पुण्याकडून हरदो साहुकाराकडे आला. त्यास हुंड्यांचें काम नाजूक, तुह्मांस सर्व माहीत; याअर्थी येथून पेशजी हुंड्या केल्या. त्याचे मुदतीप्रों ऐवज पावता केला असल्यास उत्तम. नसल्यास ऐवज देऊन भरपाया करून घ्याव्या व ऐवज पावता झाल्याचें इकडे लिहावें. त्याप्रों उभयतांस सांगून हुंड्याबाबत ऐवज पावला नाहीं याजमुळें ननुमल व भगवंत नाइक बहुत घाबरे. आम्ही खातरजमा करून सांगितलें कीं हुंडीस हरगीज दिकत होणार नाहीं. तुम्हास सूचनार्थ लि असे. ऐवज पोंचवून उत्तर पाठवावें. रा छ ७ जिल्हेज हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ शुद्ध ८ मंगळवार शके १७१५.
विनंति. उपरि रावरंभा प्रकर्णी मार. मौजे जवळे हा गांव बांदलाकडे होता तो तुह्मी त्यास कर्ज देऊन आपल्याकडे करून घेतला. बांदल वारला, सबब बाजीनीं त्या गांवची जफ्ती हलीं करविली ऐसें ऐकलें, त्यास आपला ऐवज बांदलाकडून किती येणें हे ता वार ल्याहावें ह्मणजे यासी बोलून ऐवजाचा फडच्या होईल तेव्हां गांव स्वाधीन करावयाचा. उत्तर लौकर यावें. रंभाजी याजकडील जफ्ती बसून द्यावी. कलम----१
तगई प्रकर्णी व वाबले समंधीं उत्तरें पेशजी पत्राचीं आद्याप आलीं नाहींत, पाठवावीं. कलम---१
बजाजी पंत दफ्तराचे पेंचांतुन मोकळे जाले. मध्यस्तापर्यंत पंचाइत जाली. यामुळें बाजीची मर्जी यांजवर कांहीं उदासीन आहे. एक वेळ मध्यस्तासी व बाजीसी बजाजीपंताविषीं बोलून बंदोबस्त होईल तो मागाहून लिहूं. कलम-१
उंदरतप्याचा पाटिल येथें आला आहे. त्याचे भावाबंदाकडे येक हजार रुपये बाजीचें येणें. सबब यानीं चिठी केली. याचा मार वास्तविक कसा तो ल्याहावा. त्याप्रा बोलून बंदोस्त करतां येईल. कलम----१
वराता बाजीनीं पेशजी साडे सोळा हजाराच्या केल्या, त्या फिरल्या.ऐवज पावला नाहीं येविषीं मध्यस्तांनीं सांगितल्या प्रो पेशजी लिहिलें, त्याचें उत्तर यावें. कलम----१
बाजीनीं गोपाळराव बक्षीस पुण्याकडे रवाना केलें. सिंरसाबचे जाबसाल करितां.ह्मणोन बोलतात; परंतु आंतून बाबाराव यांचे विद्यमानें पाटील बावा कल्याणराव यांजकड़े गेले ऐसेही ऐकण्यांत. त्यास तेथे याचा शोध करून काय डौलावर आले हें सावधगिरीनें बातमी ठेऊन ल्याहावें. येथील बंदोबस्त करणें तो करितां येईल. कलम---१
--------
६
कलमें सुमार साह र। छ, ७ जिल्हेज हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
त्यावरून असीनखानाने आमचे कबीले व आह्मास धरून न्यावे ऐसा तह केला ते खबर आह्मी ऐकिली इतके करून धीर धरून होतो तो महादजी जगदळे यानी शामभाऊ सेखदार मसूरी होता त्यासी रदबदल करून अमानत मोडिले होळीचीपोळी तिमाजीचे हवाला केली ऐसी जारावरी जाल्यावरी आपण गावाबाहीर पडिलो त्यावरी गाव लागेनासा जाला मग सटवोजी व तिमाजी आईसाहेबाकडील अतोजी डावरा ऐसे मिळून माधवरायाकडे गेले त्यास गाविचे वर्तमान सागितले गाव आईसाहेबाचा आहे गाव पडिला तरी नाईकजीस व भागोजी पाटिल बोलाऊन आणून त्याची सटवोजीची समजावीस करून देणे त्यावरून रायानी बोलाऊ पाठविले मग आह्मी गेलो रायाची भेटी घेतली त्यानी आह्मास हकीकत विचारली आमची हकीकत होती ते आह्मी जाहीर केली अमानत दिवाणात जाऊन मोडिले आह्मास दिवाण मोगली भेटावयास नये चार तुफाने केली त्याकरिता तिमाजी जाऊन दिवाणात लाच लुसबत देऊन अमानत मोडिले याकरिता आह्मी गावाबाहीर पडिलो ऐसी हकीकत रायास विदित केली त्यावरून रायानी सटवोजीस व तिमाजीस पुसिले जे तुमचा याचा कज्या असता अमानत मोडिले हे तुह्मास बरे नव्हे त्यावरी सटवोजी व तिमाजी बोलिला जे अमानत कोणीही केले नाही त्यावरून आपण जाब दिल्हा जे तळबीडचे पाटील जानोजी मोहीते व भानजी गोपाळ सुभेदार व मोरो उधव यानी अमानत केले आहे यास सडी पाठविणे त्याचे उत्तर आल्यावरी आह्मी ह्मणतो हे खरे की लटके मग रायानी कागद देऊन त्याला व आह्माला तळबिडास मोझ्यास पाठविले तळबिडिहून गोताचे कागद तिमाजीस व सटवोजीस आणिला जे तुह्मी उभयतानी गाव लावावा हक लाजीमा होली पोही अमानत देवापासी ठेविली इतके न करिता तुह्मी अमानत मोडिले हे उचित केले नाही ऐसा कागद तिमाजीस आणून दिल्हा मग तो कागद रायानी पाहिला रुजू मोकाबिला आला मग रायानी जे सटवोजीस व तिमाजीस विचारले जे याची वाट काय करिता त्यास त्यानी उत्तर दिल्हे जे पुर्वी अमानत चालत आले आहे त्याप्रमाणे पुढे ही चालवावे आणि आमच्या भावास समजाऊन गावास लाऊन द्यावे ते व आह्मी एक मते राहून ऐसे बोलिले त्यावरी रायानी अमानत ठेऊन थलास लाऊन दिल्हे थलास रजावद आहा की नाही ऐसे आह्मास व त्यास विचारले त्यानी सटवोजीने व तिमाजीने रजावद होऊन राजीनामा लेहून दिल्हा व आह्मी राजी होऊन राजीनामा लेहून दिले हर्दू जणापासी जमान घेऊन सोमयाच्या करंज्यास चीरपत्रे देऊन पाठविले मग आपण निरोप घेऊन थलास गेलो थलकरियासी ते व आह्मी भेटलो थलकरियानी करिना विचारला जे वंशपरंपरा लेहून देणे ह्मणून आज्ञ ०॥ केली आह्मी व तिमाजीने व सटवोजीने वंशपरंपरा लेहून दिल्हे मग थळकरियानी निश्चय केला जे वाती लावाव्या ऐसे केले अगर बेल काढून द्यावा अगर बावीचे उदक आणावे ऐसे तीन दिव्य नेमून त्यास तिमाजी च सटवोजी पाटील नामुकूर होउुन खलवाद करून पांढरीवरी च दिव्य करू ह्मणून बोलिले बोलिल्याप्रमाणे थळकरीयानी कागद दिल्हा तो कागद आह्मी घेऊन जाधवरायापासी आलो जाधवरायानी कागद मनास आणून लटके ऐसे ध्यानास आले मग दोघाची समजावीस केली जे दीपवाली करिता गावावरी दिव्य देऊन ऐसे करून अमानत करून आह्मास गावास पाठविले मग जाधवरायाची पाठी करून जाधवरायानी सटवोजीस असीनखानाचे हाती दिल्हे मग ते उंबरजेमध्ये कोट बांधोन जोरावारी करून राहिला बळे च वतन खात आहेत आह्मी परागंदा होऊन फिरत आहो जाहाला करीना बादगीस लेहेला आहे ते तकरीर लिहीली सही बळी सुमार ४२५ बंद ११
(निशाणी नांगर)
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ शु. ८ मंगळवार शके १७१५.
विनंति. उपरि रावरंभा यास माहे रावल कार्तिक मासापासोन माहवारी वगैरे ऐवजाचा भरणा ता। जिल्हेज आषाढ मासपर्यंत जाला. त्याचा तपशील मारनिलेपासोन रोखे घेतले ते जमा धरून आलाहिदा याद पाठविली आहे त्यावरून कळेल. सदरहुप्रा जमाखर्च तुह्मीं केला असल्यास उत्तंम. नसल्यास याप्रा करावा. ऐन वसूल नगदी सत्याहतर हजार रु पावले. यापैकीं तुह्माकडील वसूल वजा होऊन आठावीस हजार बाकी येथें मुबादला दिल्हा. हा ऐवज तिमाराम हरि यांचे ऐवजीं अथवा हरयेक येथें फडच्या करून लिहिण्यांत येईल त्याप्रा करावें. रदकर्जाऐवजीं पंचवीस हजार रुपये आजपर्यंत वजा करून घेतले.त्यास मानिलेकडे कर्जाबाबत ऐवज पटणचे स्वारीचा व मोहरमाबाबत किती आहे ? त्यांत पंचवीस वजा जातां बाकी येणें किती राहिलें? तें दरमाहा श्रावण मासापासोन वजा कसें करावें ? याचा तपशील खोलून लेहून पाठवावा. त्याप्रा। कारतां येईल. त्याची समजूत पडे असी प्रांजल समजोन याद पाठऊन द्यावी. हलीं मोहरमाबाबत सालमारचे पांच हजार यांस मध्यस्तांनीं सांगितल्याप्रा। दिल्हे. याची व्यवस्था कसी ? माहवारींत वजा करून घेण्याचे किंवा माहवारीसीवाये हें ल्याहावें.करमाळ्यांत खर्च-हाती,घोडीं वगैरेस आजपर्यंत काय पडला हें हरिपंत यांचे माहितगारीनें समजोन ल्याहावें. त्याप्रा। माहवारीचे ऐवजीं रोख्यांत चौदा हजार रुपये जिल्हेज पर्यंत वजा आले आहेत. बाकी येणें किती तें लिहावें. त्याप्रा यांसी बोलतां येईल. र॥ छ, ७ जिल्हेज. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
भेटी घेतली सुभेदारास राजपत्रे होती ते दिल्ही सुभेदार निघोन उबरजेस आले बारा बलुते व सिवधडे पाटिल बोलाऊन आणून उभयताची मनसुबी मनास आणून जागो पाटिलास विचारले जे तुझा करीना कैसा आहे तो सागणे मग आपला करीना सविस्तर सागितला आमानत मोडिले ऐसा करीना सुभेदारापासी सागितला मग सुभेदारानी दिवाणचे अनामत मोडिले ह्मणून चार हजार टके सटवोजीचा चुलता तिमाजी व दताजी पासून घेतले तो मनसुभी होत च होती त्यावरी माहाराजानी कोनेर रगनाथ सुभेदार हजूर बोलाऊ पाठविले मग सुभेदारानी मनसुभी तहकूब केली जे येका दोनी महिनीयात निवाडा करून विल्हे लाऊन देऊन मग सुभेदार हजूर गेले त्यावरी सुभेदार निरोप घेऊन माघारे सातारेस आले त्यावरी आपले बाप जागोजी पाटिल जाऊन गौळमाडवेत राहिले वस्ती केली उदईक उठोन सुभेदाराचे भेटीस सातार्यास जावे तो रात्री सटवोजीचे सोइरे गोदजी पाटिल व खळोजी गाढव व माग व किरोलीकर रवळोजी पाटिल यानी येऊन आपला बाप जागो पाटिल माडवेत मारिला त्यावरी पुढे माहाराज सभुपातशहाकडे गेले धामधूम फार जाहली मुलूक वोस पडिला वेव्हार तैसा च राहिला मग सर्जाखान घेतला माहाराज राजाराम छत्रपती यानी मुलूकास कौल देऊन मुलुक भरविला त्यास गाव भरावयास कौल द्यावयास तिमाजी दताजी व बहिरोजी सटवोजीचे चुलते ऐसे भानजी गोपाल सुभेदार याकडे गेले कौल घ्यावा तो नाइकजी व भागोजी पाटिल यानी सुभेदाराकडे जाऊन कौल राहविला की आपले वतन वडीलपणाचा कथला आहे अमानत चालत आले गाव लावावयास कौल घ्यावयास हे कोण आहेत ह्मणून खटखट केली त्यास तिमाजी व दताजी व बहिरोजी पाटिल सटवोजीचे चुलते व आपले भाऊ यास व नाईकजी व भागोजी पाटिल यासी सुभेदार व भानजी गोपाल सुभेदार व मोरोबाज्या सबनीस व जानोजी मोहिते पाटिल कसबे तळबीड गोत मिळोन गाव न भरिता कथला कशास करिता अमानत गाव लागे तोवरी नागर व हक व पानमाम व होळीची पोळी देवाचे गचे गळा आसो देणे गावाला गेलेवरी निवाडा करू ह्मणून ऐसे बोलिले तिमाजी व दताजी व बहिरोजी हे रजावद जाले नाइकजी व भागोजी पाटिल रजावद जाले हरदोजणापासी जामीन घेऊन गाव लावावयास रजा दिल्ही गाव उभयतानी मिळोन लाविला दाहा पाच साले ऐसे च चालत आले त्यावरी माहाराज राजाराम साहेब चदीहून सातारेस आले मागती तिमाजी सटवोजी जाधव यास घेऊन माहाराजापासी उभे राहून फिर्याद जहला मग माहाराजानी रामचद्रपतास सागितले जे याचा कज्या काय असेल ते मनास आणणे मग पती आह्मावरी मसाला करून हुजूर नेले करिना विचारला त्यास त्याचा आमचा करिना तळबीडचे थळी जाहाला तो सागितला तो करिना मनास आणून मागती तिमाजी यमाजी सुभेदार त्याकडे पाठविले जाऊन हर्दूजण सुभेदारास भेटले सुभेदारानी करिना विचारिला त्यास करिना जाहिर केला मग हर्दू जणापासून जमान घेऊन तळबिडास थळास पाठविले आह्मी उभयता थळी जाऊन उभे राहिलो मग जानोजी मोहिते व गोत बोलिले की पहिले अमानत होते तैसे च आता आसो देणे दिपवाळीस निवाडा करून देऊन मग तिमाजी व सटवोजी व आह्मी मिळोन गावावरी आलो गाव लाऊन गावावरी राहिलो पानमान नागर व होळीची पोळी देवाची या मुलुकात पातशहा आले मुलुक लुटिला सातार्यास वेढा पडिला आसीनखान कराडास येऊन ठाणे बाधले मुलुकास कौल दिल्हा गावगन्नाचे पाटिलास बोलाऊन तश्रिफा घ्यावयास नेले तेवेळेस तिमाजी पाटिल सटवोजीचा चुलता व आम्ही मिळोन तश्रिफा उभयतास दिल्या त्या अमानत घेऊन गावास आलो तिमाजी बोलिला जे तश्रिफा अमानत ठेवीत नाही ते आह्मी ऐकोना मग तिमाजी सटवोजीचा चुलता कर्हाडास गेला असीनखानापासी जाऊन सागितले जे नाईकजी व कालोजी गनीमाई करितात ह्मणून च्यार चुकल्या सांगितल्या