उंबरज-जाधव
लेखांक १७७ १५८९ कार्तिक वद्य ७
अज रख्तखाने मशरुल हजरत मैफरुलरु + + हैबयतराऊ अजम द्यानत राव साहेब दामदौलतहू ता। हुदेदारानि हाल व इस्तकबाल व मोकदमानि का। उबरज पा। कराहाड बिदानद के अज सुहुरसन समान सितैन अलफ दरीबिल हुजूर मालूम जाहले जे बहिरोजी बिन अंबाजी जाधव यानी लडाईमधे बहुत खस्त केला अखेर ठार पडिला ह्मणौन त्यावरी मेहरबानी फर्माऊन त्याचे बाप अंबाजी व रांडरोटीबदल इनाम पडी जमीन .।. तीस बिघे अजरामराहमत करून दिल्हे असे तरी पडी मिलामत तीस बिघे हदमाहादूद घालून दीजे बाआहूब बअवलाद व अहफाद चालविजे दर हर साल ताजा खुर्द खताचे उजूर न कीजे तालीक लिहून१ घेऊन असल परतोन दीजे जाणिजे
तेरीख २० माहे जमादिलवल
रुजू सूद