Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ वा ७ सोमवार शके १७१५.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचें सेवेसी.
पो। गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति. उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लिहित जावें. विशेष तो मानूर मौ बीड हा तालुका नवाब शमशूल उमरा बाहादुर यांजकडे आहे. तेथील अमिली अबदुल समदखां यांजकडे आहे. खान मार यांनीं आपल्याकडून तेथें नरसिंगराव नायब यांस ठेविलें. त्याजकडे हिसेबकितेबाचा लडा सबब त्याजला कैद केलें. त्यास तेथील मोकासी माहरणवर वगैरेनीं राजश्री पाटिलबावा यांस गैरवाका समजाऊन तालुकियास लोक पाठवून उपसर्ग करणार ह्मणून बोभाट आला. त्यावरून राजश्री नाना यांस पत्र दिल्हें आहे. येविषीं तुह्मीं विनंति करून बंदोबस्त करावा. तालुकियांतील जमीदारास पुण्यास येण्याविसीं पत्रें पाठविलीं वगैरे उपद्रव फार केला आहे. यास्तव येविषीं बोलून बंदोबस्त करून लेहून पाठवावें. शमषुल उमरा यांजकडील पागेचा तालुका तो नवाबाचा खासगत तालुका यास्तव याचा बंदोबस्त जरूर होणें. येणेंकरून नवाबाचा संतोष हें समजावें. र॥ छ २० जिल्हेज बहुत काय लिं ? हे विनंति.
छ. २१ जिल्हेजीं रावरंभा यांनीं मागितलें सबब.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ वा ३ शुक्रवार शके १७१५.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामींचे सेवेसी.
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति, उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लि जावें. विशेष येहतषामजंग नफरुदौला मुबारनुल मुलुक बाहादुर यांनीं शहर ब-हाणपुर येथें किनखाब वगैरे जिंनस दाहा हजार रुपयांचा खरीदी करविला. ते जटील कारीगर यांजकडून चौरती कलाबत तयार तीन हजाराचा करविला. त्यास कारिगर परवानगी मागतात. याजकरितां बाहादुर मवसूफ यांनीं बहुत अगत्यवादानें आह्मास सांगितलें. त्यावरून लिहिलें असे. त्यास येविषीं राजश्री नाना यांस विनंति करून ब-हाणपुरकर सुभेदार यांस राजश्री पाटिलबाबा यांचें पत्र कलाबतू व किमखाब वगैरे जिंनस दहा हजारांचा खरीदी करतील त्यास महसूल वगैरे मुजाहिमत न करितां -हादारीचें दस्तक वगैरे बंदोबस्त करून देऊन जिंनस रवाना करावा, याप्रों निक्षूण ताकीद महमद ईसफ तुह्मास सांगतील त्याप्रों द्यावी. रा। छ १७ माहे जिल्हेज बहुत काये लिहिणें? लोभ किजे हे विनंति.
छ २० जिल्हेजीं शमषुल उमरा यांनीं मागितलें सबब.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १८३ श्री १६५१ भाद्रपद शुध्द ७
स्वस्ति श्री राज्याभिषेकशके ५६ सौम्या नाम संवत्सरे भाद्रपदशुध सप्तमी मंदवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शंभु छत्रपती स्वामी याणी मुकदमानि कसबे उंब्रज सुभा प्रा। सातारा यासि आज्ञा केली ऐसी जे कालोजी बिन जोगोजी पाटील कसबे मजकूर हे स्वामीच्या राज्यातील पुरातन सेवक वडील वडीलापासून स्वामीच्या पायासि निष्ठा करून त्रिकर्णशुध्दीने सेवा केजली याचे बाप व आजे स्वामीकार्यावरि पडिले व हाली याचे भाऊ खेत्रोजी जाधव राजश्री उदाजी चव्हाण हिंमतबाहदर यासमक्ष साहेबकामावरि खर्च जाहाले आणि मशारनिलेहि स्वामीच्या पायासि एकरूप निष्ठा धरून मनोभावे सेवा करीत आहेत याणी किले पनालाचे मुकामी स्वामीसनिध विनति केली कीं आपण स्वामीच्या राज्यात वडील वडिलापासून सेवा करीत आहो माहाराजानी मेहेरवानगी करून कसबे मजकूर आपले पाटीलकीचा गाव आपणास लेकराचेलेकरी चाले ऐसा इनाम करून द्यावयासि माहाराज समर्थ आहेत ह्मणून विदित केले त्यावरून मनास आणिता मशारनीले पुरातन वडिल वडिलापासून निष्ठेने वर्तत आहेत याचे बाप आजे भाऊ स्वामि कार्यावरी खर्च जाहाले याचे सर्वप्रकारे चालवणे हे स्वामीस परम अवश्यक हे वतनदार प्रामाणिक याकरिता स्वामीयाजवरी कृपाळु होऊन यास नुतन इनाम कुलबाब कुलकानू हाली पटी व पेस्तर पटी जलतरूपाषाणनिधिनिक्षेपसहित खेरिज हकदार व इनामदार करून कसबे मजकूर याचे पाटीलकीचा गाव यास इनाम अजरामर्हामत करून दिल्हा असे तरी तुह्मी याचे रजातलबेत वर्तोन गावचा ऐवज सुरक्षित देत जाणे आणि मौजे मजकूर इनाम मजकूर इनाम यासि व याचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने चालवित जाणे निदेश समक्ष
रुजू
सुरुसूद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ वा १ बुधवार शके १७१५.
विनंति, उपरि राजश्री मानाजी बळवंतराव देवकांते यांचे पतक सरकारांतून आमचे तैनात आहे. त्यास सांप्रत मारनिलेस सरंजामसुधा हुजूरचाकरीस येण्याविषीं सरकारची आज्ञा जाली आहे. त्यास येविषीं तुह्मी विनंति करून देवकांते यांस हुजूर चाकरीस येण्याची मनाई व्हावी. इकडे चाकरीची नेमणूक त्यापक्षीं सरकारचाकरीवर हजर आहेत. र॥ छ १५ जिल्हेज हे विनंति.
छ १७ जिल्हेजीं येहतषामजंग यांनीं मागितलें सबब.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ वा १ बुधवार शके १७१५
राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसीं.
विनंति. उपरि प्यादे दि॥ रामजी नाईक गलांडे नि।। सरकार यास पेशजी माहागाईमुळें पटणचे स्वारींत व हैदराबादीं आगाव ज्याजती रोजमरे च्यार, खर्चास नाहीं सा, दिले; तो यैवज उगवून घेतला पाहिजे. येविषयीं तुह्मास जातेसययीं सांगितलें होतें. परंतु अद्याप यैवजाचा फडच्या करून घेतला नाहीं. तर येविषीं राजश्री नानास विनंति करून यैवज उगवावा. न उगविल्यास हे गरीब बुडतात; व आपला यैवज फसतो. याची काळजी आपणास असावी. याजकरितां लिं असे. तर हें काम आधीं करून घ्यावें. येविषीं बगाजी प्यादाही तुह्मा समागमें स्मरण द्यावयास दिल्हा आहे. तर यैवज उगवून घ्यावा. रोजमरे तैनात इजारा करून घेण्याची याद तुमचे रूबरू केली होती. ती रोजमुरे याचा यैवज उगऊन घ्याल त्याने समागमें करून घ्यावी. पेशजी रोजमरे आगाव पावले च्यार व यासिवाय तुह्मी गेलियावर आणखी येक रोजमरा ईजाफा, खर्चास नाहीं, ह्मणोन दिल्हा. येकूण रोजमरे पांच. याचा यैवज ष्याद्याकडून उगविला पाहिजे. याजकरितां हे पेचांत; व आपला यैवज उगविला पाहिजे. तर सरकारांत बोलून यैवज उगवावा ह्मणजे हे पेचांतून निघतील; व आपलाही यैवज उगवेल. तर पत्र पावतांच कामाचा फडच्या करून घ्यावा. र॥ छ. १५ जिल्हेज हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ वा १ बुधवार शके १७१५.
विनंति. उपरि राजश्री जीवनराव पांढरे यांजकडे यैवज येणें. यास्तव पा अवराद व निटूर या दो माहालाचा यैवज मोकाशाचा आटकाऊन ठेवावा व मारनिलेचे आणि आनंदराव सभापत यांचें रहस्य करून द्यावें इत्यादिक मार तुम्हीं लिहिला. त्यावरून सजावरुदौला यांजकडे सांगोन दो माहालचे मोकाशाचा यैवज सन १२०२ सालचा आटकाऊन ठेविला. जीवनराव यांचे आनंदरायाचें रहस्यही करून द्यावें या तजविजींत असतां आनंदराव यांनीं परभारा सजावरुदौलाकडे राजयाजी यांचा निरोप पाठऊन यैवज आम्हांकडे ने द्यावा यैसें सांगितलें होतें व मध्यस्तासही परभारा सुचविलें कीं, हसनावाद व येकहलीं हे दोन माहाल पांढरे यांजकडे नवाबाचे सरकारचा यैवज येणें त्या यैवजीं सरकारांत घेतले आहेत. त्याचप्रा। सरकारचे रदकर्जी आवराद निठूरचा यैवज द्यावा याप्रों सांगोन यैवज आपल्याकडे येणें असतां असी दिकत घातली हेंही मध्यस्ताकडूनच आम्हांस समजलें. आह्मीं उत्तर केलें कीं, दोन माहाल पहिलेच आपले रदकर्जी आहेत. आवराद व निठूर हे जीवनराव यांजकडे चालते माहाल, याचा यैवज घेण्याची सा काय ? तेव्हां मध्येस्तांनीं राजयाजीस सांगितलें कीं, यांचा दस्तायैवज पाहण्यावर ठरलें आहे. सारांश तुम्हीं लिहिलें कीं, आपला यैवज येणें सा ते माहालचा यैवज’ आटकाऊन जीवनराव याजकडे न द्यावा. त्याप्रों केलें असतां आनंदराव यांनीं परभारा याप्रों उपस्थित केलें. यावरून आश्चिर्य वाटतें कीं तुमचीं पत्रें येतात तीं कसीं ! रघोत्तमराव यांचेंही पत्र आलें तो प्रकार कसा ?आणि वर्तणुकींत आनंदराव यांची चाल हे ! तुम्हींच समजावें. रा छ. १५ जिल्हेज हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ वा १ बुधवार शके १७१५.
विनंति. उपरि रावरंभा यांस यैवज तुह्मीं पुण्याकडे गेल्या ता जिल्हेज आखर पावेतों येकंदर दिल्हा. याचा ता पेशजी लिहिल्यावरून समजला असेल. साडें सोळा हजार रुपयाच्या वराता रावरंभांनीं हरिपंतावर आपल्या यैवजाच्या केल्या होत्या. त्या फिरोन आल्या येविषीं त्यांनीं मध्यस्तास बोभाट सांगितला. मध्यस्त आह्मासी बो (ल) ले त्याचा तपसील तुह्मांस लेहून फार दिवस जाले. परंतु उत्तर आलें नाहीं. त्यापैकीं जाधव मारवाडी यास येक हजार रुपये देण्याची निकड रावरंभांस भारी बसली. त्यांनीं मारवाड्याकडे नवाबाचे सरकारचा यैवज पटीबाबत, त्यांचे मागें चोपदार सबब, बाजींनीं या वरातेपैकीं यैवज त्यांस लाऊन दिल्हा. दोन महिन्यांचा वायदा तोही होऊन गेला. मध्यस्त आह्मासी बो(ल)ले येक हजार रुपये यास वराती. यैवजीं द्यावे. तुम्हांकडून उत्तर आल्यानंतर द्यावे यैसें होतें, परंतु इकडून जीं पत्रें लिहिण्यांत येतात त्यांचीं उत्तरेंच येत नाहींत. प्रसंगास तर अशा अडचणी पडतात. यैवज देणें प्राप्त. तेव्हां वरात व कबज घेऊन येक हजार रुपये दिल्हे. कळावें. तुम्हीं म्हणाल कीं, रावरभांकडे यैवजाचा भरणा बेमुबलग जाला. हा यैवज उगवेल कसा ? त्यास हें सर्व खरें आहे. परंतु येथें मध्यरतांसी बोलण्यांत येतें. उत्तर येतच नाहीं. येथील तर निकड या त-हेची-अचडण ! तेव्हां समजोन यैवज द्यावा लागतो. उपाय नाहीं ! यास्तवं पत्राचे मार याचीं उत्तरें वरचेवर लिहित जावीं. त्याप्रों मध्यस्तासीं बोलण्यांत येत जाईल. रा छ. १५ जिल्हेज है विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ वा १ बुधवार शके १७१५.
विनंति, उपरि मध्यस्तांनीं नवाबास अर्ज आह्मी समीप असतांच केला कीं चोबीना खरींद करण्याकरितां हरि पंडतजी यांजकडून यैवज येणें. त्यांचे पत्र, येक लाख बयाणा व हजार रुपयांचें, यांचें घेऊन पुण्यास पों होतें. त्यापैकीं सत्तर हजार रू नगदीं देतों, बाकीचाही कांहीं यैवज येथें देवितों, व तेथून कांहीं गोविंदराव यांजकडून देवितों याप्रा। तात्यांनीं रघोत्तमराव यांस सांगितलें. याप्रों रघोत्तमराव यांनीं लिं ह्मणोन मध्यस्तांनीं अर्ज केला. त्यास तात्या यांनीं यैवज तेथें किंती पटला व द्यावयाचा किती आणि आह्मांकडून किती देविवणार हें तुह्मीं कांहींच न लिं. त्यास याचा तपसील आधीं। इकडे ल्याहावा. ह्मणजे येथून ऐवज देणें लागेल त्याची तरतूद आगाऊ जाली पाहिजे. यास्तव आधीं सूचना ल्याहावी. रा छ. १५ जिल्हेज हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ वा १ बुधवार शके १७१५
मध्यस्ताचा उद्गार निघाला तो राजश्री नानास लिहिला आहे. त्याजवरून कळेल. हे विनंति.
पु॥ राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी. विनंति. उपरि छ. १३ जिल्हेजीं ईदीचे नजरेकरितां आह्मी नवाबाकडे गेलों. मध्यस्त समीपच होते. लोकांच्या नजरा झाल्यानंतर मध्यस्तांनीं अर्ज केला कीं, पुण्याहून चोबीना खरेदी करविला, त्यापैकीं पंच्यायैसी हजार रुपयांचा खरीदी जाला. पांचगजी नावा मिळाल्या. साहागजी व सातगजी तेथें नाहींत. सबब संगमनेराकडे खरीदी करण्यास गोविंदराव भगवंत यांनीं एक कारकून व रघोत्तमरायाकडील एक याप्रा रवाना जाले आहेत. दोन लाख रुपयापैकीं पंच्यायेसी हजाराचा चोबीना खरीद जाला. बाकीचा तेथें होणार. त्यास कोंकणपटीचा चोबीना भीमेचे पाण्यानें ताफे बांधून कलबर्ग्यास येईल. तेथून बेदरास आणावा लागेल. ताफे बांधण्याकरितां लांकडें खरीदी करावीं लागतील यैसेंही रघोतमराव यांनीं लिहिलें. सदर्हूप्रों चोबीना कलबुर्ग्यास येईल. मुजाका नाहीं लेकीन संगमनेर प्रांतीं जो चोबीना खरीदी होईल तो गंगेचे पाण्यानें वंजरासंगमास आणावयाचा पहिला बेत होता. परंतु यांत मोठी अडचण आहे कीं वंजरा-संगमास चोबीना दाखल जाल्यानंतर तेथून बेदरास वंजरेचे पाण्यानें येणें मुष्कील, सबब कीं, वंजरेचा वोघ फार नीच आहे. तेथून येणार नाहीं. ज्या ठिकाणीं चढवून आणावयाचा तेथून आणावयास प्रयत्न फार. याकरितां वंजरासंगमास चोबीना न आणितां गंगेचे पाण्यानें नांदेड येथें आणावा. तेथून बेदरास आणावयाची तजवीज वंजरेनें अथवा भारबरदारी पाठवून खुष्कींतून जशी सोये तशी करितां येईल. याप्रों अर्ज केल्यावरून गंगेचे पाण्यानें नांदेडास चोबीना आणावा याप्रों नवाबांनीं फर्माविलें. भीमोघानें कलबर्ग्यास येणार याची सलाह कशी? ह्मणोन महमद अजीमखां यांस मध्यस्तांनीं विच्यारिलें. त्यांनीं सांगितलें कीं कलबर्ग्यानजीक फेरोजाबाद व शाहाबाद हे दोन गांव भीमातीर तीन कोस कलबर्ग्यापासोन आहेत. तेथें चोबीना आणवावा, तेथून भारबरदारी सरंजाम पाठवून बेदरास आणावयाची तरतूद होईल. याप्रों बोलणें जालें. रघोत्तमराव यांनीं मध्यस्तांस लांकडाविषयींचा मार लि. त्यावरून मध्यस्तांनीं सदरहूपों बयान केला. याजवर हें बोलणें जालें. लांकडाविषींचा व बंदुखाचा मार तुह्माकडून इकडे कांहींच लिहिण्यांत आला नाहीं. येथें बोलणें जालें तें कळावें सबब लिहिलें असे. र॥ छ, १५ जिल्हेज हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ वद्य १ बुधवार शके १७१५.
विनंति उपरी.
१ जीवनराव पांढरे यांचे प्रकर्णीं हिशेबाचे कागदपत्र कचे पाठउन देतों. त्यास हणमंतराव येथें आहे. तसाच गोपालराव जिवाजीपंत तर साहीत्यावर ! फत्तेसिंग निमित्य पाहतात. याजकरितां समेटून करीत करीत करावें. आनंदराव तेथें आहे त्याचे तोंडावर हात फिरवावा, जीवन राव, आपण याचा विचार करून लिहावें. तसें करीन ह्मणोन लिं. त्यास तुह्मी लिं त्याप्रमाणेंच तोंडावर हात फिरवून ढकलावें; परंतु त्याचे हातीं यैवज मात्र जाऊं नये; यैसें जीवनराव याचें ह्म(ण)णें. आनंदराव यांच्या चाली खोट्या. सजावरुदौलीकडील यैवज निठुर वगैरे आपल्या कर्जाच्या यैवजांत घ्यावा ह्मणोन तुमचीं पत्रें आलीं. यावरून त्यांकडे आह्मीं सांगून पाठविलें. यावरून आनंदराव यांनीं मध्यस्तास सांगविलें कीं मामलतीसमंधें जीवनराव यांजकडे सरकारचा यैवज येणें त्यांत माहाल लाऊन दिल्हे आहेत आणि निठुरचा यैवजही लाविला आहे हा घ्यावा. त्याजवरून त्यानीं रायरायांस विचारिलें. याणीं सांगितलें: -त्याचे दस्तयैवज पाहून सांगेन. यैसा प्रकार आनंदराव यांचा. याजकरितां तुह्मी कोठेपरियेंत झांकीत बसाल? तथापि तोंडावर हात फिरवून तुह्मास लिहून पाठऊं, जीवनराव यांचा पक्ष दरबारी. तेथें सोडूं नये, खचित असावें, याविषंई आलाहिदा पुरवणी लिहीली आहे. ती रघोत्तमराव यास दाखवावी. कलम-----१
१ तात्या वोक यांजकडील वीस हजार रु॥ त्याविसीं फार निकड समजून आपाजी बाबाजी यांजकडून येक महिन्याची खातरजमा करविली. त्रिमलराव बाबद सा हजार त्याविसीं बोलतात त्यास आश्याचा यैवज ठेऊं नये; आपल्याकडून हुंडी जालीयास पाठवावी ह्मणोन लिं. त्यास वीस हजाराचा हवाला आपाजीपंत यांचा दिल्हा. बरें केलें ! साहा हजार त्रिमलराव बाबत येथें मारनिलेकडील सदाशिवपंत यांस दिले. हुंड्या पाठविण्याविसीं लिं त्यास तूर्त सोये नाहीं. बाळाजीपंत यांची लवकर रवानगी केलियावर सर्व समजून हुंडी पाठविण्यांत येईल, आपाजी बाबाजी व तुह्मीं आपलेकडील हिशेब मारनिलेबरोबर पाठवावा. कलम----
१ श्री--रीकर स्वामी यांस सरकारांतून हजार रू देविले ह्मणोन सांगितलें, त्याजवरून दिल्हे ह्मणोन लिं तें कळलें, कलम----१
१ सुकलाल याजकडील हिशेब कितेब समजला आसाल. बाळाजीपंत याजबरोबर सर्व सांगून पाठवावे. कलम----१
------
४
च्यार कलमें र॥ छ. १५ जिल्हेज हे विनंति. नवाबाकडून येक ग्रहस्त फौज ठेवावयाकरितां आला, त्यास धरले याचा मजकूर लिहिला तो कळला.