श्री.
आषाढ वा १ बुधवार शके १७१५
राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसीं.
विनंति. उपरि प्यादे दि॥ रामजी नाईक गलांडे नि।। सरकार यास पेशजी माहागाईमुळें पटणचे स्वारींत व हैदराबादीं आगाव ज्याजती रोजमरे च्यार, खर्चास नाहीं सा, दिले; तो यैवज उगवून घेतला पाहिजे. येविषयीं तुह्मास जातेसययीं सांगितलें होतें. परंतु अद्याप यैवजाचा फडच्या करून घेतला नाहीं. तर येविषीं राजश्री नानास विनंति करून यैवज उगवावा. न उगविल्यास हे गरीब बुडतात; व आपला यैवज फसतो. याची काळजी आपणास असावी. याजकरितां लिं असे. तर हें काम आधीं करून घ्यावें. येविषीं बगाजी प्यादाही तुह्मा समागमें स्मरण द्यावयास दिल्हा आहे. तर यैवज उगवून घ्यावा. रोजमरे तैनात इजारा करून घेण्याची याद तुमचे रूबरू केली होती. ती रोजमुरे याचा यैवज उगऊन घ्याल त्याने समागमें करून घ्यावी. पेशजी रोजमरे आगाव पावले च्यार व यासिवाय तुह्मी गेलियावर आणखी येक रोजमरा ईजाफा, खर्चास नाहीं, ह्मणोन दिल्हा. येकूण रोजमरे पांच. याचा यैवज ष्याद्याकडून उगविला पाहिजे. याजकरितां हे पेचांत; व आपला यैवज उगविला पाहिजे. तर सरकारांत बोलून यैवज उगवावा ह्मणजे हे पेचांतून निघतील; व आपलाही यैवज उगवेल. तर पत्र पावतांच कामाचा फडच्या करून घ्यावा. र॥ छ. १५ जिल्हेज हे विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)