श्री.
आषाढ वा ३ शुक्रवार शके १७१५.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामींचे सेवेसी.
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति, उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लि जावें. विशेष येहतषामजंग नफरुदौला मुबारनुल मुलुक बाहादुर यांनीं शहर ब-हाणपुर येथें किनखाब वगैरे जिंनस दाहा हजार रुपयांचा खरीदी करविला. ते जटील कारीगर यांजकडून चौरती कलाबत तयार तीन हजाराचा करविला. त्यास कारिगर परवानगी मागतात. याजकरितां बाहादुर मवसूफ यांनीं बहुत अगत्यवादानें आह्मास सांगितलें. त्यावरून लिहिलें असे. त्यास येविषीं राजश्री नाना यांस विनंति करून ब-हाणपुरकर सुभेदार यांस राजश्री पाटिलबाबा यांचें पत्र कलाबतू व किमखाब वगैरे जिंनस दहा हजारांचा खरीदी करतील त्यास महसूल वगैरे मुजाहिमत न करितां -हादारीचें दस्तक वगैरे बंदोबस्त करून देऊन जिंनस रवाना करावा, याप्रों निक्षूण ताकीद महमद ईसफ तुह्मास सांगतील त्याप्रों द्यावी. रा। छ १७ माहे जिल्हेज बहुत काये लिहिणें? लोभ किजे हे विनंति.
छ २० जिल्हेजीं शमषुल उमरा यांनीं मागितलें सबब.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)