Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ वा १० गुरुवार शके १७१५.
पु राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.
विनंति. उपरि तनखाबाबत यैवज यैकंदर पौ वसुल वजा होऊन बाकी तीन लक्ष बेवीस हजार सातसें नवद रुपये सवा पंधरा आणे निघाले. यापैकीं पटणचे स्वारींत मध्यस्ताचे विद्यमानें जगधन साहुकार याचें कर्ज सवातीन लक्ष राजश्री हरिपंत तात्या यांनीं सरकारांत घेतलें. त्या यैवजीं हलीं येक लाख रुपये वसूल त्या रोख्यामागें घातला. यैवज औरंगाबादीं द्यावयाचा सबब तेथील हुंडावन दर सेंकडा दोन प्रों दोन हजार रुपये यानीं घेतला. हुंडावनीचें बोलणें बहुत होतें. परंतु सेवटीं दोन रुपये प्रों ठरलें. सारांश येक लाख रुपये रदकर्जी वसूल पावला. पेशजी जगधनाकडे भरणा सर बुदंलजंग घासीमिया वगैरे यैवजबाबत एक लाख बतीस हजार नऊसें पंचवीस जाला, हलीं हे लाख पावले. यासिवाय येथून पत्र राजश्री हरिपत तात्या यांस मध्यस्तांनीं पेशजी चोबीना खरीदीकरितां येक लाख ब्याणव हजार रुपयाचे मागितल्यावरून दिलें. त्यापैकीं तेथें वसूल काय दिल्हा हें लेहून पाठवावें, ह्मणजे येकंदर वसूल रुजू करून रोख्या चा हिसेब व्याजसुद्धां करून पाठविण्यांत येईल. तनख्याचे ऐवजीं लाख रुपये हुंडणावळसुद्धां रदकर्जी द्यावे म्हणोन तुमचे लिहिण्यांत आलें, त्यावरून दिल्हें. आणि बाकीची जगधन याजवर चिठी घेऊन, पा आहे. चिठबिमोजीब साहुकारी दुकानावर यैवज घ्यावयाचा , अहसनुदौली यांस सोळा हजाराविसीं पत्र मध्यस्ताचें पों आहे हें रवाना करून तगादा करून यैवज घ्यावयास ढील पडूं नये. रा छ २३ जिल्हेज हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १८२ ] श्रीराम. ५ ऑक्टोबर १७४८.
श्रीमंतजीचे सेवेसी विनति ऐसीजेः-
पूर्वी आपाजी मलकोजी जासूद याजबरोबर पत्र लिहिलें आहे कीं, पाच हजार स्वारींची बेगमी येथें केली आहे. जमातदारांचीं नांवें पूर्वी लिहिली आहेत त्यावरून कळों आलें असेल सांप्रत आपाजी वगैरे जासुदांस दोन महिने जाले, न आले. ह्मणून वसवास झाला कीं, मार्गी नदीनाला व चोर वगैरे कांहीं उपद्रव जाला. मारले गेले ह्मणून येमाजी रंगोजी जोडी पाठविणें अगत्य जालें. स्वामीस या कार्याची उभारणी करणे अगत्य असलें तरी उत्तर तैसेच लिहावें आणि जमातदार यांचे वकील हजर आहेत. त्यांचे नांवे कौल पाठविणें. हकीमबेग जमातदार राऊत ५०० व खोजे रहमतुला जमादार ५०० व सिदोजी जलगांऊकर पाटील ५०० व भीमसेन हजारी १००० व खानदेशचे जमातदार नामीबचुमिया व चांदसाहेब व अलीसाहेब फारोखी दखनी १५०० राऊत चांगले नामांकित तजवीज केले आहेत. यांचे नांवें कौल आधीं अलाहिदे पाठविले पाहिजेत कीं, ते चांगले घोडे व राऊत करतील. अथवा हें कार्य करणें नाहीं, तरी खरें उत्तर साफ पाठवणें कीं, आपण या कामापासून दूर आहों. हात उचलून एक वरीस जालें कीं, या कामांत आपण श्रम करितों आणि हा कालपर्यंत जाबसालच पुरता नाहीं. मग काम कधी होणार ? स्वामीचा दरबार एकवचनी थोर ह्मणून श्रम केले. दिसोन आलें कीं, श्रम साध्य नाहीं नस्ता सर्व अमीर व मुत्सद्दियामधें लटिका वाद आला. नित्य थोर लोकाशीं मिथ्या किती बोलावें. व दरबार मोंगलाई आहे येथें एक वेळ लटकें पडलें ह्मणजे मनुष्यास पुन्हा जवळ उभें राहूं देत नाहींत. येथील रव या प्रकारचा. स्वामीकडील उत्तर निर्मळ येत नाही मध्यस्थानें कोठपावेतो मिथ्या भाषण करावें ? हें कर्म कार्याचें नाहीं. देखत पत्र कर्तव्य असले तरी सरंजाम लिहिलेप्रमाणें पाठविणें. कर्तव्य नाहीं तरी उत्तर साफ व गगाजी संकपाळ यास अतिसत्वर जासुदाबरोबर पाठवणें. विलंब करावयाचें कार्य नाहीं. स्वामी समर्थ व सुज्ञाप्रति विशेष लिहिणें नलगे. हे विनति.
पेशवियांचे व यांचें चित्त शुद्ध नाहीं चपाषष्टी जाहलियावरी यांचा त्यांचा हर्षामर्ष होऊन युद्धप्रसंग होणार. ऐसियामधे जमलें तरी चित्तानुरूप कार्य होईल तेथें फौजेचा सरंजाम होत नसला तरी राजश्री शिवरामपंतास एक हजार स्वार समागमे देऊन काहीं खर्च देऊन पाठविजे येथे जुळू मुलाजमत करवून मग राजश्री कृष्णराऊजीस बोलाविलें जाईल सरंजामही होऊन येईल. जागिराचें काम फत्ते केलें जाईल विनति अडिच शेर गहू व अर्धा तूर १ रुपयाचे जासुदाबरोबर पाठविजे.
विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ वा १० गुरुवार शके १७१५.
पु राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.
विनंति. उपरि तनखाचे यैवज पो सरकारांत वसूल औरंगाबादचे सुभ्याकडून पावला याचा मुकाबिला पुण्याहून याद आली त्यासी व यांजकडील तेथून सुभ्याचें पत्र व रसीदांसी करितां कोंपरगांवची वरात व सखो जिवाजी येकूण दोन रकमांचा ताळा यादीसी व रसीदांसी नीट पडला यासिवाय राजश्री दाजीबा यांच्या दोन रसीदा येक पंनास हजारांची व दुसरें पत्र तीस हजार येकसें ब्याणव रुपये सवा पंधरा आण्याचें पैकीं तेवीस हजार यैवज पटला ह्मणोन पत्रांत लेख येकूण त्र्याहातर हजार रुपये पत्राप्रमाणें यैवज वसूल लिहिला. व यापौ पोत्यास दाखल व कुरणाकडील परातेबाबत यैवज पुण्याचें यादींत बतीस हजार सातसे साडे त्र्याणव रुपये ह्या रकमा ह्यांचे हिसेबीं आलाहिदा नाहींत. त्या पक्षीं त्र्याहातर हजारांत असतील. सबब वजा जातां चाळीस हजार दोनसें साडेसहा रुपये पुण्याकडील यादीसिवाय ज्याजती वसूल राजश्री दाजीबा यांचे पत्रान्वयें पावला. याची रुजवात तेथें पाहावी ह्मणजे समजण्यांत येईल.
रा छ २३ जिल्हेज हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १८४ श्री १६५१ भाद्रपद शुध्द ७
स्वस्ति श्री राज्याभिषेकशके ५६ सौम्यनाम संवत्सरे भाद्रपदशुध सप्तमी मंदवासरे खत्रियकुलावतंस श्री राजा शंभु छत्रपती स्वामी याणी राजश्री देशाधिकारी व कारकून वर्तमान व भावी सुभा प्रा। सातारा यासि आज्ञा केली ऐसी जे राजश्री कालोजी बिन जोगोजी जाधव पाटील कसबा उंब्रज हे स्वामीच्या राज्यातील पुरातन एकनिष्ट सेवक याचे आजे कालोजी जाधव खटावाचे मुक्कामी ताम्राचे जुझी तीर्थस्वरूप राजश्री थोरले कैलासवासी स्वामीचे वेलेस स्वामिकार्यावरी पडिले व याचे बाप थोरले राजश्री संभाजीराजे याचे कारकीर्दीस ताम्राचे युध्दप्रसंगी तेही स्वामिकार्यावरी खर्च जाले व याचे भाऊ खेत्रोजी जाधव राजश्री उदाजी चव्हाण हिंमतबाहादर याजबराबर स्वामिकार्यावरी पडिले मशारनिले स्वामीच्या पायासी निष्ठा धरून एकरूप निष्ठेने शेवा करित आहेत स्वामीच्या पायाविना दुसरे जाणत नाही साप्रत याणी स्वमिसनिध विनती केली की कसबे मजकूर माहाराजानी मेहेरबान होऊन इनाम करून दिल्हा पाहिजे ह्मणून विदित केले त्यावरून मशारनिले स्वामीचे पुरातन याचे बाप आजे स्वामिकार्यावरी खर्च जाले आहेत याचे सर्व प्रकारे चालवणे स्वामीस परम अवश्यक यास्तव स्वामी याजवरी कृपालू होऊन यास कसबे उंबरज सुभे मजकूर देह १ एक रास नूनत इनाम कुलबाब कुलकानू हाली-पटी व पेस्तर-पटी जलतरुपाषाणनिधिनिक्षेपसहित खेरीज हक्कदार व इनामदार करून इनाम अजरामर्हामत करून दिल्हा असे तरी तुह्मी कसबे मजकूर पूर्व मर्यादेप्रमाणे याचे स्वाधीन करणे आणि इनाम यासि व याचे पुत्रपौत्रादिवशपरपरेने सुरक्षित चालवणे साल दर साल ताजा सनदेचा न करणे या सनदेची तालीक लेहून घेऊन हे पत्र भोगवटियास परतोन देणे निदेश समक्ष
रुजू
सुरु सूद बार
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड आठवा (१६४९-१८१७)
[ १८१ ] श्री. ५ ऑक्टोबर १७४८.
श्रीमंत राजश्री भगवतराऊजी सा। सेवेसीः-
विनंति सेवक नारो महादेव मुक्काम शहर अवरंगाबाद साष्टांग नमस्कार विनति उपरि येथील कुशल ता। छ २२ सवाल पावेतों स्वामीच्या कृपेकरून यथास्थित असे. विशेष. बहुत दिवस जाले महाराजाकडील काही वर्तमान कळों आलें नाहीं. त्यावरून चित्त उद्विग्न आहे. विशेष. आपाजी व मलकोजी हरकारे जोडी १ नबाब साहेबांचा इनायतनामा व पत्रें देऊन पाठविला. त्यासी आज सवा महिना जाला. परंतु सेवेसी पावला किंवा मार्गी नदींत बुडाले हें नकळे. येथें तों आपणास रोज उठोन ताकीद करितात जे, मा। रा। राऊजी आले किंवा नाहींत. ऐसा विचार येथें आहे. आणि स्वामीस तों या गोष्टीचें स्मरणही नसेल, ऐसें दिसोन येतें येथे नबाब नासरजंग यांचा इनायतनामा तयार होऊन पडला आहे. परंतु महाराजाकडील कांहीं वर्तमानच कळो येत नाहीं, त्यासी आपण काय करावें ? आपणास पूर्वीच कळतें जे, हा कारभार अवघा सत्यच आहे, तरी आपण या कर्मांत न पडतों. परंतु गंगाजी संकपाळ याने कितीएक प्रकारें आह्मांसी आणशपथ केली. आणि आपणही पूर्वीपासून जाणतों जे, स्वामीचा दरबार एकवचनी. ऐसें जाणोन आपण या कामांत आलों नाही, तरी आपण कांहीं उपाशीं मरत नव्हतों. तुमचे कृपेकरून सर्व अनुकूल होतें. परंतु हे कर्म अवलंबियाने इतकें जालें जे, दहा मुत्सद्दियांत लटिका वाद आला, आणि साउकारियांत पत खोटी दिसोन आली ! हें मिळविलें ऐसें जाले ! त्यासी, आपण इतकें उपरोधून लिहितों. परंतु येथें लहानथोर अंमलदार कुल जमा जाले आहेत आणि नबाबसाहेबीं दोन चार वेळां स्मरण केलें जे, राजश्री राऊजी अद्याप न आले, नबाब कुच करोन काळ्या चौत्रियावर डेरे जाले आहेत. दिपवाली जालिया भागानगराकडे जायाचा निश्चय आहे. यावर न कळे जर आपल्या चित्तांत हें कार्य कर्तव्य असलें तरी काहीं खर्चास व कोणी इतबारी पाठविजे. सर्व मनोदयाप्रमाणें घडोन येईल. नाहीं तरी तैसेचि उत्तर पाठविजे. त्यावरोन नबाब साहेबास अर्जी देऊजे. ते येत नाहींत. येथे जागिराची फर्द लिहून द्यावी, तरी आपणापाशीं मोहरही नाहीं, आणि तुमचाही कांही आश्रय दिसोन येत नाहीं. याकरितां आपण कांहीं बोली केली नाहीं. दिल्लीचे वर्तमान तर, पातशहा आगरियास आले यासीही फर्मान आला आहे याकरितां यांनीही कुच केलें आहे ऐसियांत आलिया उत्तम आहे सर्व मनोदयाप्रमाणे घडोन येईल यावर स्वामी समर्थ आहेत तरी कृपा करोन गंगाजी संकपाळ यासी येथवर पाठविजे आपला जिमा साख्त करोन जाईल. नबाब नासरजंग यांचा इनायतनामा पाठवावा तरी साउकराचे घरी आहे विना त्याचा पैका दिलियावेगळा हातास येत नाही आपणाकडील तो पैसा एक दृष्टीस पडत नाहीं याकरिता साउकारास खरेंपण वाटत नाहीं यमाजी हरकारे दोघे पाठविले आहेत. यासी अजुरा रुपये २२ देणे, अत पर उत्तर आलिया मनुष्य पाठविणार नाहीं स्वामीस कार्य कर्तव्य नाहीं आणि आपण नाहाक श्रम करावे, यांत जीव नाहीं. तरी गंगाजीस पाठविजे कृपालोभ असो दीजे. हे विज्ञप्ति. यमाजीस अजुरा रुपये २२ त्यापैकीं येथे दिले रुपये ६, बाकी देणे रुपये १६. हे विनंति. सांप्रत वर्तमान दाभाडे याचीं वस्त्रें व घोडे २ व नजर ५०० मोहरा आल्यात. व राणा उदेपूरकर व सवाई जेसिग याची वस्त्रे वगैरे नबाबसाहेबांस आलीत हुजुरून एक फर्मान पहिले आला होता. साप्रत फर्मान व हत्ती एक व पांच घोडे व कलगी व सिरपेच व मोतियांची माळ व स्त्रें व तरवार आली बदस्तुर साबिला मोठे नबाब हे बहाल जाले. यामुळें नबाब नासरजंग बहुत खुशवखत आहेत. या खुशबखतीमध्यें स्वामीचे स्मरण जालें लहान थोर अमिरांस कळों आलें कीं, राऊ येथे येतात. राजश्री प्रधान यांसही परस्परें श्रुत जाले कीं, राऊनींही या दरबारांत परिश्रम केला नबाबांनी बहुत चहा करोन बोलाविलें आहे, ऐसें जनामध्यें प्रसिद्ध जालें आणि स्वामीकडील वर्तमान, गंगाजी संकपाळ गेलियासी पांच महिने होत आले, आणि आपाजी व मलकोजी जासूद जोडी गेलियास आज दोन महिने जाले, अद्याप कोणी फिरत नाहीं स्वामी सरदार व मनसुबा उमदा जाणून या कार्यांत आलों तेथें मनसुबा उत्तम दिसोन येत नाहीं. याचा भावगर्भ काय तो न कळे. पत्रें येथून वर्तमान सर्व लिहून सेवेसी पाठवितो आपले दृष्टीस स्वामी अवलोकितात कीं नाहीं, हेंही कळत नाही. थोरपणास लौकिक राहे, आणि श्रीमंत कैलासवासी यांच्या नावापरीस विशेष. कीर्ति होय, जनामध्ये हासे न होय, तें केलें पाहिजे. स्वामीचे नांवास दहा वीस हजार रुपये खर्च जाले. ते बहुत नाहींत काम थोर आहे. न जाणो आपण काय तजविजीमध्यें आहेत. आपलें नेत्र अहर्निस तिकडे लागून राहिले आहेत. तेथे दरबारांत ज्या थोर लोकाचे विद्यमाने कार्याची उभारणी केली आङे, त्यांचीं माणसे नित्य येऊन शरमिंदे करितात. नजरबेगखांजी नित्य ह्मणतात कीं, ऐसें न करणे कीं, मजवरी शब्द ये माझें कार्य नासलें नवे दिगर जाले तरी मजवरी इतराज होतील, कीं लटिका मनसुबा तुमचा आहे ऐसें वर्तमान येथील आहे स्वामीस आपल्या नावासारखें कर्तव्य तरी दोन्ही इनायतनामियांचा खर्च रुपये सा हजार व वस्त्रें वगैरे सरजाम पाठवून देणें कार्याची तरतूद केली जाईल कर्तव्य नसले तरी स्पष्ट उत्तर लिहावें, की आह्मांस कर्तव्य नाही आणि गंगाजीस अतिसत्वर पाठवणें, की आह्मांस साउकारापासून मुक्त करून जाई बहुत काय लिहिणें. हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ वा १० गुरुवार शके १७१५.
यादी--- जाबीतजंग मरहुम यांजबाबत माहालचे स्वराज्याचा यैवज नवाबाचे सरकारांतून ता सन १२०१ व सन १२०२ पौ आलल हिसेबी याच्या तनखा अहसनुदौला व कृपावंत यांचे नांवें जाल्या होत्या.
-------- रुपये
पौ वसूल बमोजीवफर्द मोहरी अहसनुदौला बाहदुर
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ वा १० गुरुवार शके १७१५.
पु। राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.
विनंति, उपरि निर्मळ वगैरे माहालाबाबत स्वराज्याच्या यैवजाच्या तनखा औरंगाबादचे सुभ्यावर पेशजी घेतल्या. त्यापैकीं वसूल सरकारांत पावला; व बाकी येणें त्याची याद तुह्मीं पाठविली त्याप्नों मध्यस्तासी बोलण्यांत आलें. यांजकडे अहसनुदौला व कृपावंत यांनीं वसूल पावल्याचें पत्र व रसीदाच्या नकला पाठविल्या. त्यासी व आपले यादीसी मुकाबिला करून येकंदर याद ठरविली ती पा आहे. त्यावरून ता कळेल. र॥ छ, २३ जिल्हेज हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ वा १० गुरुवार शके १७१५.
राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.
विनंति, उपरि अलीकडे तुह्माकडून फार दिवस पत्रें येऊन वर्तमान कांहींच कळत नाहीं. याचें कारण काय ? सांप्रत तनखाबा यैवजाचा मार वगैरे इकडून त। लिहिलें आहे त्यावरून कळेल. राजश्री नाना यांस पत्रें पा आहेत. त्यावरून इकडील मार समजेल, व्यंकट रामदीक याजकडील अखबार व पत्र चेनापटणाहून आलें तें पा आहे. पेशजी पत्रासुद्धां जाब पाठवावे. इकडील पत्राचीं उत्तरें येणें फार राहिलीं आहेत. रवानगी वरचेवर करीत जावी. र॥ छ २३ जिल्हेज हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ वा १० गुरुवार शके १७१५.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति, उपरि येथील कुशल जाणून स्वकियें कुशल लिहीत असावें. विशेष, राजश्री हरिपंत तात्या याजकडील इमोहरी सनद मौजे आवराद शाहाज्यानी पा. उदगीर येथील सनदेकरितां राजश्री आबाजी बलाळ येथें दोनशें रुपये घेऊन आले होते. त्यास सनद तुह्माजवळ आहे. तरी आबाजीपंत तुह्मास पत्र लिहून सनद ज्यास देवितील त्यास दोनशें रुपये घेऊन सनद द्यावी. र॥ छ. २३ जिल्हेज बहुत काय लिहिणें ! लोभ किजे हे विनंति.
छ. २३ जिल्हेजीं डांकेवर.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ वद्य ८ मंगळवार शके १७१५.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेशी.
पो गोविंदराव कृष्ण सां नमस्कार विनंति उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें लि जावें. विशेष मौजे जवळें पा हवेली परंडा हा गांव माधवराव बांदल यांजकडे होता. त्याजकडून तुह्माकडे रदकर्जी गांव आहे. त्यास बांदल मार यांचा काल जाला सबब त्या गांवची जफ्ती राजश्री रावरंभाजी जयवंत निंबाळकर यांनीं करून कायत यास येथून राजश्री गोपाळराव बक्षीसुद्धां जफ्तीचे बंदोबस्तास पाठविलें. त्यास तेथें बाबूराव बल्लाळ यांनीं बांदला. कडील पैका येणें सबब गांवतजफ्तीस दिकत केली. याचा बोभाट पांजकडे आल्यावर मारनिलेंनीं आह्माकडे सांगोन पाठविलें कीं गोविंदराव यांचा यैवज बांदलाकडे किती ? त्यांत जवळें येथील वसूल काय पावला! ब बाकी यैवज येणें . किती ? याचा हिशेब आणवावा. त्याप्रों फडच्या होईल. जफ्तीस दिकत होऊं नये. त्यावरून लिं असे. तरी बांदल यांजकडे यैवज येकंदर किती, त्यांत वसूल पावला व बाकीं येणें याचा हिशेब तायार पाठवावा. र॥ छ २१ जिल्हेज बहुत काय लिं ? लोभ किजे हे विनंति.
आबाजी बलाळ आवरादकर नि। राजश्री हरिपंत तात्या यांचे मागितल्यावरून पत्र लिहिलें असे.