श्री.
आषाढ वा १ बुधवार शके १७१५.
विनंति. उपरि रावरंभा यांस यैवज तुह्मीं पुण्याकडे गेल्या ता जिल्हेज आखर पावेतों येकंदर दिल्हा. याचा ता पेशजी लिहिल्यावरून समजला असेल. साडें सोळा हजार रुपयाच्या वराता रावरंभांनीं हरिपंतावर आपल्या यैवजाच्या केल्या होत्या. त्या फिरोन आल्या येविषीं त्यांनीं मध्यस्तास बोभाट सांगितला. मध्यस्त आह्मासी बो (ल) ले त्याचा तपसील तुह्मांस लेहून फार दिवस जाले. परंतु उत्तर आलें नाहीं. त्यापैकीं जाधव मारवाडी यास येक हजार रुपये देण्याची निकड रावरंभांस भारी बसली. त्यांनीं मारवाड्याकडे नवाबाचे सरकारचा यैवज पटीबाबत, त्यांचे मागें चोपदार सबब, बाजींनीं या वरातेपैकीं यैवज त्यांस लाऊन दिल्हा. दोन महिन्यांचा वायदा तोही होऊन गेला. मध्यस्त आह्मासी बो(ल)ले येक हजार रुपये यास वराती. यैवजीं द्यावे. तुम्हांकडून उत्तर आल्यानंतर द्यावे यैसें होतें, परंतु इकडून जीं पत्रें लिहिण्यांत येतात त्यांचीं उत्तरेंच येत नाहींत. प्रसंगास तर अशा अडचणी पडतात. यैवज देणें प्राप्त. तेव्हां वरात व कबज घेऊन येक हजार रुपये दिल्हे. कळावें. तुम्हीं म्हणाल कीं, रावरभांकडे यैवजाचा भरणा बेमुबलग जाला. हा यैवज उगवेल कसा ? त्यास हें सर्व खरें आहे. परंतु येथें मध्यरतांसी बोलण्यांत येतें. उत्तर येतच नाहीं. येथील तर निकड या त-हेची-अचडण ! तेव्हां समजोन यैवज द्यावा लागतो. उपाय नाहीं ! यास्तवं पत्राचे मार याचीं उत्तरें वरचेवर लिहित जावीं. त्याप्रों मध्यस्तासीं बोलण्यांत येत जाईल. रा छ. १५ जिल्हेज है विनंति.
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Published in
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)