Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आहसनुदौला व राजे कृपावंत यांनीं आपले मोहरेनसीं वसुलाची याद पाठविली व रसिदीच्या नकला पाठविल्या. त्यांत १६८९५|| याची रसीद नाहीं. हे मजुरा द्या ऐसें मध्यस्ताचें ह्मणणें. याजवर आमचें बोलणें, रसीद नाहीं. तेव्हां मजुरा देत नाहीं. तेव्हां मध्यस्तांनीं फारसी पत्र आहसनुदौलास दिल्हें. त्याचा तरजुमा मुबलग १६८९५॥॥। सोळा हजार आठसें पंच्याणव रुपये सव्वाचौदा आणे, येक लाख ऐकावन हजार दोनशें रुपये सवा तेरा आणे. पै॥ तनखाचे ऐवज पै। बाकीबाबत चौथ व बाबती व सावोत्रा वगैरे राव पंत प्रधान बाबत माहलांत सुभे महमदाबाद तालुके जफरुदौलात रुपये दिल्हे नसल्यास सदरहू रु। जलद निशा करून रसीद घ्यावी.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
पारसी चिठी जगधनाचे दुकानीं औरंगाबादेवर
रोशन राये यांचे मोहोरनसी.
पारसी चिठीचा तरजुमा
हिंदवी राजे रोशन राये
यांचे मोहरे नसी.
चिठी बइस्म विरजलाल संभूनाथ साहू दुकान बुलदे खुजस्ते बुनियाद अंकी मुबलग २२०७९०= याचे निभे एक लाख दहा हजार व तीनसें पंचाणव रुपये साडे सात आणे होतात. चौथ व बाबती व सावोत्रा वगैरे रावपंत प्रथान बाबत माहालांत सुभे महमदाबाद वगैरे त। सन १२०१ फसली व आलल हिसेवी सन १२०२ फसलीचे तनखाप्रों अहसनुदौला बाहादुर व राजे कृपावंत यांजकडे वाजवुलतलव होते. त्याचे मुबादला आजमुलउमरा वाहादूर यांनीं देविले. त्यास राव पंतप्रधान यांजकडे जो कोणी पैका न्यावयास येईल त्यास येथून रासिदीचा मसोदा दुकानास प।। आहे त्याप्र।। रसीद घेऊन छ २० जिल्हेज सन १२०७ हिजरी पासोन। दोन महिन्याचे वायद्यानें पावते करावे. पुढें मुबलग म॥र सरकारचे खजान्याचे हिसेबीं या चिठीप्रों व रसिदीप्रों मुजरा व मुहसूब होतील.
३२२७९०॥
पे।। १०२००० येक लाख दोन हजार याची चिठी लस्कर फेरोजीचे दुकानावर दिल्ही बाकी
२२०७९०॥॥
छ २० जिल्हेज सन १२०७ हिजरी
रसीदीचा मसविदा प। आहे
या प्रो रसिद द्यावी.
राजश्री जगधन साहू दुकान वुलदे
औरंगाबाद, गोसावी यासः----
अखंढित लक्ष्मी आलंकृत राजमान्य श्र्ने। फलाना फलाना ग्रहस्त नि।। श्रीमंत राजश्री पंत प्रधान अंकी २२०७९०।।।। मुबलग दोन लक्ष वीस हजार सातसें नव्वद रुपये सवा पंधरा आणे बावद चौथ व बाबतीं व सावोत्रा वगैरे ब। महालांत सुभे महमदाद वगैंरे त।। सन १२०१ व आलल हिसेबी सन १२०२ तनखापो आहसनमुदौला बाहादूर व राजे कृपावंत यांचे जिमेस वाजबुलतलब येणें होते. त्याचे मुबादला नवाब निजामुदौला बाहादूर यांचे कारपरदाज यांनी हुंडी सदरहू रुपयांची औरंगाबादेस तुमचे दुकांनी दोन महिन्यांचे वायद्याची राजश्री गोविंदराव कृष्ण यांचे विद्यमानें करून दिल्ही. त्यास सदरहू रु।। हुंडीप्रा तुमचे दुकानीहून आह्मास पावले. हे रसीद लि।. सही. बहून काय लि।।? मिती, तारीख, सन.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड वीसावा (शिवकालीन घराणी)
लेखांक १८५ १४९२ ज्येष्ठ शुध्द १ स्वस्ति श्रीशके १४९२ वरीशे प्रवर्तमाने प्रमोद नाम संवछरे जेष्ट सुध प्रतीपदा सुक्रवार तदीनी माहाजर ऐसाजे बिहूजूर समस्त ब्राह्मसभा तथा राजमुद्राधीक्ष करून समस्त माहाजन का। अस्टे पाटोळ्याचे
माहादो राम पेशवा राजश्री निस- कराऊ रामाजी माईदेव ठाणदार का। अस्टे पाटोळेचे वालो विस्वनाथ सोनजी पटेल पाटोळे कोमरसेटी सेटिया रुद्रोबा माहाजन तान्होबा कुलकर्णी केकदेभट बिन दामवणभट जोतीसी नरसीभट धर्माधिकरणी सिराले |
बळवंतराऊ कचो भासकर मजमूदार सेकीन मौजे कबज सीवनगी मामले विज्यापूर सूरसेटी चौगला तमीसेटी पफुणा विठोबा धडी जाखो सुरदेव मु॥ अस्टे समस्त जन व ब्रह्मसभा व बाजे लोक माहाजन वालवेकर जोतिसी विस्वनाथभट |
केला माहाजर जे पोसीभट लाटीकर व वीरपाक्षभट वेदाती हे उभयवर्ग कोल्हापुरीचे ग्राम उपादीक समधे झगडत दिवाणात आले तेथे पोसीभट लाटीकरे दिवाणात कतबा लिहून दिल्हे जे माध्यजन शाखेचे ग्रामउपाध्या रुद्र पाटकाच वडील वडील अनादसीध नेताती आपणासी वा माध्यजन शाखेचे उपाधिकीस समध नाही तरी आता रुद्र पाटकास व पोसीभट लाटीकरास अर्थअर्थ समंध नाही ऐसा निणयो जहाला त्यावरून समस्त जनाचे मनास आले जे चतुशाखेचे उपादिये वेगले माहाजर मोर्तब
तिमणभट गोटखिंडीकर नरसींह पाटक उपाध्या अस्टे गोदोबा भालुवी चंदोबा कुलकर्णी मौजे मनेराजुरी नारोपंडीत बिन देवणा पंडित |
होनाबा तगार्या मुदगलभट मलीभट विस्वनाथभट दामवणभट गोविंद पाठक पंढरपूरकर |
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
राजश्रि विराजित राजमान्य राजश्री,
बळवंतराव राजे कृपावंत बाहदुर स्वामीचे सेवेशी.---
पो चिंतामण हरि सा नमस्कार विनंति. उपार येथील कुशल जाणुन स्वकीयें कुशल लि जावें. विशेष तुम्ही पत्रें छ २३ व छ २४ जिल्कादचीं पाठविलीं तीं पावलीं. लि मार सविस्तर कळला. सरकारचे वरातीचे येवजीं रुपये.
२३००० हुंडी थान १ पीतांबर जीवनदास यांजवर चांदवड रुपयाची चलनी.
७१९२।। चिठी राजश्री त्र्यंबकराव राजाराम कादार अंतूर व खुलदाबाद याची मुदतीची.
येकूण तीस हजार येकसें ब्याणच रुपये सवा पंधरा आणे याच्या पात्या पावल्या. त्याजपै। तेवीस हजार रु पितांबर जीवनदास याजकडील चांदवड छापी सुलाखी पटले. मुदतीबमोजीब बाकी सात हजार येकसें पावणे त्र्याणव रुपये सवातीन आणे याची चिठी श्रावण शु॥ १५ निभे व भाद्रपद शु।। १५ निमे या प्र॥ घ्यावे ह्मणोन लि।. त्यास श्रावण मासचा हप्ता अद्याप पडला नाहीं. त्याजवरून राजश्री सदाशिवपंत यांस ताकीद केली. म।।र निले त्र्यंबक राजाराम क।दार यांजकडे मुजरद जासूद र॥ केला आहे. तुह्मीं त्याजला ताकीद करून मुदतीप्रो ऐवज देवावा. त्याकडील रु।। आल्यानंतर पावती पाठवूं. ऐसीं हजार रुपयाचा भरणा हल्लींचे ऐबजा सुद्धा केला ह्मणोन लि।. त्यास पेशजी पंनास हजार रुपयांचें पत्र अलाहिदा गेलें आहे हल्लींचे ऐवजाचा मार सदरीं लिहीला आहे त्यावरून कळेल बाकीचे ऐवजाचा भरणा सत्वरच करितों ह्मणोन लि. त्यास येथील हुंड्या पाठवाल त्या शाहाजोगाच्या पाठवाव्या. राजश्री शामराव बलाळ यांजकडील मर व कलमबंदीची याद प॥ ती सदाशिवपंत यांनी दाखविली. त्यावरून श्रीमंत राजश्री नानास विनंति केली, त्याचें उत्तर नवाब आहसनुदौला बाहादुर यांस श्रीमंत नानानीं लि।। आहे त्यावरून समजेल, आटोळे यांस ताकीद पत्राची परवानगी सरकारची घेतली. मागाहून लौकरच रवाना करूं. कारंज्याचे फवारे जलद रवाना करावे. वरकड मार राजश्री सदाशिवपंत लिहीतां कळेल. दुसरा ऐवज लौकरच रवाना करावा. र॥ छ ५ मोहरम (भाद्रपद शुद्ध ७ गुरुवार शके १७१५) बहुत काय लि।।? लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
वैशाख शुद्ध ७ शुक्रवार शके १७१५.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री,
बळवंतराव राजे कृपावंत बाहदुर स्वामीचे सेवेसी.
पो चिंतामण हरि सा नमस्कार विनंति, उपरि येथील कुशल जाणून स्वकीयें कुशल लि जावें. विशेष आपण पत्र छ २९ माहे रमजानचें पा तें पावलें. श्रीमंत पंत प्रधान यांच्या वराती पौ हुंडया पंनास हजाराच्या जीवनदास अंबाजीदास यांच्या दुकानच्या पाठविल्या त्या पावल्या. लिहिलें कीं वरातेची नकल व हप्तेबंदीची नकल पाठवावी. त्यास मागाहून नकला पाठवून देतों त्याप्रो यैवजाचा भरणा करावा. तिर्थरूप राजश्री तात्या येथें जेष्ठ शु पंचमीस दाखल झाले. राजश्री सदाशिवपंत यांनी लि आहे त्यावरून कळेल. राजश्री हरबाजी नाईक चाबूक सवार यांचे नांवच्या चिट्या लौकर पाठवाव्या रा छ ६ शवाल बहुत काये लि लोभ कीजे हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
अधिक वैशाख वद्य १ शनिवार शके १७१५.
राजश्रिया विराजित राजमान्य राजश्री
बळवंतराव व्यंकटेश राजे कृपावंत बाहदुर सुभा औरंगाबाद स्वामीचे सेवेसी.
पौ सखो जिवाजी कारकून नि। सरकार कृतानेक सां। नमस्कार विनंति उपरी नवाब निज्याम आलीखान बाहदुर यांनीं सरकारचे यैवजाच्या तनखा। तुह्मावर दिल्ह्या त्याचे यैवजीं येथें खर्चास पावलें ई छ १ माहे रजब ता। छ १५ रमजान पावेतों यैवज पावला तो रुपये ५००० पांच हजार पावले असते. या पांच हजारां पौ। राजश्री नारायणराव भवानीदास वकील यांजजवळ तुमचें नांवची पावती साडेतीन हजाराचा आलाहिदा छ ४ शाबानची आम्हीं दिली आहे ते रद असे. सु॥ सलास तिसईन मयां व अलफ, छ १५ रमजान सन १२०२ बहुत काय लिहिणें? हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ वा १० गुरुवार शके १७१५.
पु॥ राजश्री गोविंदराव स्वामींचे सेवेशी,
विनंति. उपरि तनखा बा।। ऐवजाविषयीं यादी व पुत्रें-प॥ बि।।.
४ रसीदाच्या नकला
१ बापूजी रामचंद्र यांची ५६३०४ ।।।
१ सखो जिवाजी याची ५०००.
२ दाजीबा यांचे नांवच्या.
१ किता ५००००
१कि।। ३०१९२॥। पौ। २३०००.
----
२
------
४
२ मध्यस्ताचें पत्र अहसनुदौलीस रुपये १६७९५।।
१ पारशी पत्र.
१ हिंदवी तरजमा.
----
२
२ चिठी जगधन साहु याचे दुकानावर छ २० जिल्हेजपासोन दोन महिन्याचे मुदतीनें रुपये २२०७९०।।. व त्याचा हिंदवी तरजुमा.
१ औरंगाबादी यैवज जगधनाचे दुकानीहून घेतल्यानंतर रसीद देण्याचा मसविदा रुपये २२०७९०|| ।
१ याद येकंदर झाड्याची.
-----
१०
पत्रें सुमार दाहा–रसीदाच्या नकला, यैवजाच्या चिट्या, मसविदा, तरजुमा, यादीसहित पा आहेत. पावल्याचें उत्तर पाठवावें. रा छ २३ जिल्हेज हे विनंति.
रसीदाच्या नकला.
राजश्रीया विराजित राजमान्य राजश्री
राजे कृपावंत बहादुर स्वामीचे सेवेशीं.
पो। बापुजी रामचंद्र व लक्ष्मण तुकदेव नि गोविंद कृष्ण गोडबोले मु।। कोपरगांव सा नमस्कार विनंति. उपरि तुह्मांवर वरात सन १२०२ चे ऐवजीं नवाब बंदगान अली यांनीं श्रीमंत पंतप्रधान बाबत निर्मळचे चौथाई सरदेशमुखी यैवजीं दिल्ह्या त्या ऐवजीं श्रीमंतांनीं कोपरगांवचे खर्चास रुपये ७५००० पंच्याहत्तर हजार देविले त्या येवजीं तुह्मी आह्मांस माहलोमाहलीं वरती लाऊन दिल्या व कांहीं यैवज रोख बाबत रुपये ५६३०४॥ छपन हजार तीनसें पावणें पांच रुपये तीन आणे पावले. यासीवाय माहलपौ जाजती वसूल, तुह्मीं वरात दिल्ह्या त्यापैकीं लागु जाहल्यास, वरातीचे यैवजी मजुरा देऊ. आमच्या किरकोळ पावत्या तुह्माजवळ महालांत दिल्ह्या आहेत त्या रद असेत. रा छ १३ रमजान सन १२०२ शके १७१५ प्रमादी नाम संवत्छरे वैशाख अधिक शु। १५ सन सलास तिसईन बहुत काये लि? हे विनंति. सरकारची वरात पाऊण लक्षाची तुमचे हवालीं केली असे हे। विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ़ वा १० गुरुवार शके १७१५.
विनंति. उपरि तनखाचे यैवजापैकीं एकंदर वसूल सुभ्यांनीं नावाबाकडे लिहिला येक लक्ष येकावन हजार दोनसें रुपये सेवा तेरा आणे. पैकीं तनखादारास वसूल सोळा हजार आठसें पंच्याणव रुपये सवा चौदा आणे दिल्हा ह्मणून लिहिलें. परंतु सदरहु ऐवजाची रसीद नाहीं. तेव्हां आह्मीं मध्तस्तासी बो (ल) लों कीं हा यैवज वसुलीं मजुरा पडणार नाहीं. याची रसीद नाहीं त्यापक्षीं यैवज कोणास पावला ? मजुरा काय ह्मणोन द्यावा ? याजवरे मध्यस्त बो(ल)ले कीं आपलें पत्र अहसनुदौलास निक्षूण देतों. सदरहू यैवज श्रीमंताकडून वसुलास आले असतील त्यांस दिल्हा असल्यास रसीद दाखवावी. रसीद नसल्यास फडच्या करून देणें. याप्रा बोलून अहसनुदौलास पारसी पत्र मध्यस्तांनीं दिल्हें, तें पा आहे. हें पत्र त्यांजकडे पाठवून यैवज दिल्हा असल्यास उत्तम. पावला नसतां अहसनुदौलाकडून फडच्या करून घ्यावा. र।। छ २३ जिल्हेज हे विनंति.
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ वा १० गुरुवार शके १७१५.
पु राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.
विनंति. उपरी तनखापैकीं बाकीचे यैवजाची चिठी औरंगाबादेवर जगधनाचे दुकानची दोन महिन्याचे मुदतीची पाठविली. येविपीं राजश्री नाना तुह्मास ह्मणतील कीं तनखाचे यैवजास इतके दिवस जाले, आतांही मुदतीची चिठी घेण्याचें कारण काय होतें? त्यास मध्यस्त सदरहू मुदतीचा चिठी देऊं लागले तेव्हां आह्मी बोललों कीं तनखा आपण दिल्हा. त्याचे हप्तबंदीच्या मुदती कशा ? आणि सुभेदारांनीं यैवजाचा फडच्या अद्याप न केला. हलीं यैवजास वायदा न करितां नगदी फडच्या करून द्यावा. याजवर मध्यस्ताचें म्ह(ण)णें की हे चिठी बंतरीक हुंडी आहे. दोन महिन्यांची मुदत कांहीं विशेष नाहीं. येविषीं मदारुलमहाम यांस माझे तरफेनें तुझीं लेहून जरूर सदरहूप्रा। करावें. मुदतीस नेमाप्रा नगदी यैवज दुकानीतहून जगधनाचे घ्यावा. याप्रा दाट रदबदली बहुत कांहीं केली. त्यास विचार पाहतां मध्यस्त दोन महिन्यांचे मुदतीची चिठी देतात. येविषंई इकडून लेहून राजश्री नाना यांची आज्ञा आल्यावर करावें तरी पत्रें जाऊन तिकडून जाब येणें, त्याजवर यांसी बोलणें या खालेंच महिना पंधरा दिवस जातात. त्याजवर यांची चिठी घेऊन औरंगाबादेस पोंहचणें याचा आरसा पाहतां तितकेंच पडतें; बोलण्याचालण्याखालेंच दिवसगत लागोन सरकारी यैवजास लांबण पडती; हें समजोन सेवटीं मध्यस्तास सांगितलें कीं औरंगाबादेस चिठी पावल्यानंतर दोन महिन्यांची मुदत यैसें आपलें ह्म(ण)णें हें तर सहसा कबूल होणार नाहीं. चिठी पोंहचतांच फडच्या व्हावा. तेव्हां मध्यस्तांनीं ठराऊन नेम करून सांगितलें कीं चिठी पावल्यावर मुदतीची शर्त नाहीं. आज छ २० जिल्हेजपासोन दोन महिन्यांनीं यैवज फडच्या करून घ्यावा. याप्रा होऊन जगधनाचे दुकानची चिठी ई छ २० जिल्हेजपासून छ २० सफर दोन महिन्याचे मुदतीनें सदरहू यैवज फडच्या करून द्यावा यैसी घेऊन पा आहे. सदरहु अन्वयें तुंह्मी विनंति करावी. सरकारांतून चिठी औरंगाबादेस रवाना करून करारबमोजीव यैवजाचा फडच्या करून घ्यावा. दोन महिन्यांचे वायद्याचें कारण जगधन याचे दुकानांत यैवज थोडा. दोन महिन्याचे मुदतींत त्याजकडे भरणा होईल. चिठीस दिकत न पडावी याजकरितां इतकें बोलणें ह्मणून मध्यस्त बो (ल) ले. र॥ छ २३ जिल्हेज हे विनंति.
पु राजश्री गोविंदराव स्वामींचे सेवेसी,
मराठ्यांच्या इतिहासाची साधने खंड सातवा (१८ वे शतक)
श्री.
आषाढ वा १० गुरुवार शके १७१५.s
पु। राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसी.
विनंति. उपरि तनखांचे यैवजाची बाकी तीन लक्ष बावीस हजार सातसें नवद रुपये सवा पंधरा आणे निघाली. यापैकीं रदकर्जाबाबत यैवज वसूल रोख्या यैवजीं येक लाख व हुंडावन औरंगाबादची दोन हजार वजा जातां बाकी दोन लक्ष वीस हजार सातसें नवद रुपये सवा पंधरा आणे याची चिठी औरंगाबादेवर जगधन साहू याचे दुकानीं घेऊन पा आहे. चिठीचा वायदा ई।। छ २० जिल्हेज पासोन छ २० सफर येकूण दोन महिन्याचा आहे. सदरहू मुदतीस रोख यैवज घ्यावा याप्रों ठरून चिठी निखालस पा। आहे. सदरहूप्रों तनखाबाबत यैवजाचा फडच्या जाला. मुदतीप्रा जगधनाचे दुकानींहून औरंगाबादीं सदरहू यैवज घेऊन रसीद द्यावी लागेल. त्या रसिदीचा मसविदा पा आहे. त्यास सरकारांतून यैवज घेण्यास जातील त्यानें आपले नांवची रसीद सदरहू मसविद्याप्रा देऊन यैवज रोख घ्यावा.
रा छ २३ जिल्हेज हे विनंति.