लेखांक १८३ श्री १६५१ भाद्रपद शुध्द ७
स्वस्ति श्री राज्याभिषेकशके ५६ सौम्या नाम संवत्सरे भाद्रपदशुध सप्तमी मंदवासरे क्षत्रियकुलावतंस श्री राजा शंभु छत्रपती स्वामी याणी मुकदमानि कसबे उंब्रज सुभा प्रा। सातारा यासि आज्ञा केली ऐसी जे कालोजी बिन जोगोजी पाटील कसबे मजकूर हे स्वामीच्या राज्यातील पुरातन सेवक वडील वडीलापासून स्वामीच्या पायासि निष्ठा करून त्रिकर्णशुध्दीने सेवा केजली याचे बाप व आजे स्वामीकार्यावरि पडिले व हाली याचे भाऊ खेत्रोजी जाधव राजश्री उदाजी चव्हाण हिंमतबाहदर यासमक्ष साहेबकामावरि खर्च जाहाले आणि मशारनिलेहि स्वामीच्या पायासि एकरूप निष्ठा धरून मनोभावे सेवा करीत आहेत याणी किले पनालाचे मुकामी स्वामीसनिध विनति केली कीं आपण स्वामीच्या राज्यात वडील वडिलापासून सेवा करीत आहो माहाराजानी मेहेरवानगी करून कसबे मजकूर आपले पाटीलकीचा गाव आपणास लेकराचेलेकरी चाले ऐसा इनाम करून द्यावयासि माहाराज समर्थ आहेत ह्मणून विदित केले त्यावरून मनास आणिता मशारनीले पुरातन वडिल वडिलापासून निष्ठेने वर्तत आहेत याचे बाप आजे भाऊ स्वामि कार्यावरी खर्च जाहाले याचे सर्वप्रकारे चालवणे हे स्वामीस परम अवश्यक हे वतनदार प्रामाणिक याकरिता स्वामीयाजवरी कृपाळु होऊन यास नुतन इनाम कुलबाब कुलकानू हाली पटी व पेस्तर पटी जलतरूपाषाणनिधिनिक्षेपसहित खेरिज हकदार व इनामदार करून कसबे मजकूर याचे पाटीलकीचा गाव यास इनाम अजरामर्हामत करून दिल्हा असे तरी तुह्मी याचे रजातलबेत वर्तोन गावचा ऐवज सुरक्षित देत जाणे आणि मौजे मजकूर इनाम मजकूर इनाम यासि व याचे पुत्रपौत्रादि वंशपरंपरेने चालवित जाणे निदेश समक्ष
रुजू
सुरुसूद बार