Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

श्री.
श्रावण वद्य ३ शनिवार शके १७१५.

विनंति. उपरि या फर्देप्र॥ नवाबही कबूल करितील असें कोणी येक बो ( ल ) ले त्यावरून कबूल करतील. या साधकाचा प्रकार तुह्मीं लिहिला. त्यास ही दौलत आहे. श्र्नेहे जाला ह्मणोन आपले दौलतीचा हुस्न कुबः पावणार नाहीं असें नाहीं. तुह्मीं अंश लिंहिला त्याप्रमाणें येथें यांनीं कबूल करण्याचें कांहींच दिसलें नाहीं. ज्या दिकती यांचे मनांत वाटल्या त्या यांनीं स्पष्ट सांगोन लिहिविल्या. तेव्हां कोणी एक बो ( ल ) ले असतील ते भया-याची गोष्ट इतकें समजावें ह्मणोन लिहिलें असें. र॥ छ १६ मोहरम. हे विनंति.

श्री.
श्रावण वद्य ३ शनिवार शके १७१५.

विनंति. उपरि. स्वराज्याकडील जुजयातीच्या फर्दा आठ पुढील तोंडी लाविल्या हें समजोन आहे. असें असतां बाबाराव बो ( ल ) त्यानें फडचे होत असल्या अवश्य व्हावे. यांत सरकार काम जाल्यास उत्तम ! हेच इच्छा आहे. यास्तव बाबाराव यांस घेऊन करावें. येणेंकरून निमित्य वारलें. त्यांचाही उमेद समजेल, याचा त।।येक दोन पुरवण्या लिहिल्यावरून सर्व कळेल. त्यास तुम्हीं लिहिल्या अन्वयेंच करावयास येईल. परंतु, यांत येक निश्चय सरकारचा असावा कीं जे फर्द ठराऊन पाठविली याप्र।। जाल्यास ऐकावयाचें. दुसरी तोडजोड नाहीं. असा निश्चये असल्यानंतर बाबाराव यांस घेऊन केल्यास चिंता नाहीं. यांत सरकारचे मुध्यामाफीक-तोडजोड न पडतांकलमें उगवून आल्यास सरकार काम जालेंयास चिंता नाहीं. बाबाराव यांसही दरमियान घेतलें आणि तोडजोड ठरूं लागली तर कांहींच नाहीं. हें तुमचे समजण्यांत असोन याजवर लक्ष असावें. र॥ छ १६ मोहरम हे विनंति.

श्री.
श्रावण वद्य ३ शनिवार शके १७१५.

विनंति, उपरि वसमतेवरील तनखाचा ऐवज वीस हजार, घेतला, व वीस हजार साहुकारांत पडला. राजश्री नाना यांची परवानगी घेऊन पाठवितों, ऐसें तुम्हीं लिहिल्यास किती दिवस झाले ! परवानगी येत नाहीं. साहुका-यांतील प्रकार विलक्षण जाला आहे, यास्तव ऐवज यावयाचा नाहीं, ऐसें तरी निक्षून समजल्यानंतर तसेंच सांगावयास येईल. उत्तर ८ दिवसांत यावें, आळस करूं नये. र॥ छ १६ मोहरम हे विनंति.

श्री.
श्रावण व. ३ शनिवार शके १७१५.
विनंति, उपरि.

१ जफरुदौला यांचे पत्राचे जाब तयार करविले. मुनषीकडून पत्रें तयार होऊन आलीं ह्मणजे लौकर पाठवितों. मतलब पत्रांतील समजावयाकरितां मसविदा पा आहे. श्रीमंत नानांनीं येविषीं आपल्यास पत्रें लिहिलीं, दिवस येक प्रकारचे, करणें बोलणें बहुत समजोन होत असावें हे भाव घराऊ श्रीमंतांचे पत्रांत आहेत ह्मणोन लिं. त्यास, मसोदा पावला. पत्रें पारसी तयार लौकर पाठवावीं. नानांनीं पत्रांत लि अर्थ तितके खरे. परंतु कांही चळवळ केल्यासिवाय दुस-याचें समजतही नाहीं. कर्तानां समजूनच सांभाळून उद्योग करावा, इतकें समजोन तेथील आज्ञेप्रा करीत आहें. इतकें विच्यारानें करीत असतां सांभाळणें नाना यांजकडे आहे. कलम-
१ इंग्रज संमंधे सरकारचें पत्र व इंग्रजास करार करून देण्याची फर्द ठराविली ती छ २२ जिल्हेजीं रवाना केली. ती पोंहचून हजरतीसीं बोलणीं होऊन जाब सत्वर पाठवावे. जाब कधीं येतील ह्मणोन श्रीमंत दिवस मोजितात, ह्मणोन लि।, त्यास पत्रें आल्यावर दुसरे रोजीं जाऊन मध्यस्तास, नवाबास दाखविलीं; नंतर त्यांची भवति न भवति होऊन उत्तरें ल्याहवयाचीं सांगितल्याप्र॥ लिहिलीं आहेत. मोहिमेचे दिवस होते, याज करितां नवाबाकडून जाब होण्यास च्यार दिवस लागले. त्यास छ म॥रीं जाब रवाना केले आहेत. हे प्रविष्ट करावे कलम:----
दोन कलमें र॥ छ १६ मोहरम हे विनंति.

श्री.
श्रावण व. ३ शनिवार शके १७१५.

विनंति. उपरि, औरंगाबादेवर ऐवजाच्या तनखा घेतल्या तो यैवज कांहीं आला, कांहीं नाहीं, येविषयीं दफ्तरची याद पाठवावी ह्मणोन आज्ञा आली. त्यावरून पेशजी याद पा; व हल्लीं याद दप्परची घेऊन पा आहे. बाकी येणें फार. निकड होऊन जगधनावर चिठ्या घ्याव्या ह्मणोन लिं, त्यास पेशजीच्या यादीवरून येथें रसीदांसी रुजुवात पाहतां कांही मिळेना. येथें रसिदांच्या रुजुवातानें ऐवज बाकी येणें निघाला, त्यापैकीं येक लाख यांचे कर्जात देऊन बाकीची चिठी जगधनावर घेऊन पशजी पाठविली. व रसिदांच्या नकला वगैरे या प्रकर्णी ता पेशजीं लिहिल्यावरून समजलाच असेल. त्याप्रा दफ्तरीं रुजुवात पाहून चिठीप्रा ऐवज आणावयास कारकून तिकडे रवाना करावा. कांहीं लड़ा ऐवजाचा रसिदांपैकीं असल्यास लेहून पाठवावें, रा। छ १६ मोहरम हे विनंति.

श्री.
श्रावण वद्य ३ शनिवार शके १७१५.

विनंति. उपरि, श्रीमंत राजश्री नानांनीं आज्ञा केली कीं गोविंदराव यांनीं आमचे नांवें पत्र लिहूं नयेत. श्रीमंतांचे नांवें विनंतिपत्रें लिहीत जावीं. तीन प्रकरणें मात्र लिहूं नयेत. मध्यस्त जवाहिर व ज्याफत नजर वगैरे वगैरे नबाबास करितात हें येक, शिकारी प्रकरण दुसरें बायका प्रकर्ण तिसरें, तीन मार येतील ते आलाहिदा आमचे नांवें ल्याहावे. बाकी मार श्रीमंतांचे नांवें लिहीत जावा. येणेंकरून त्यांस माहितगारी होईल. ह्मणोन राजश्री नानाचे आज्ञेवरून लि. त्यास तीन प्रकरणांव्यतिरिक्त सर्व मार माहितगिरी होण्याकरितां लिहित जावा ह्मणोन आज्ञा केली हें उचित. परंतु आद्याप राजकारणाचे उंच निंच प्रकार व लिहिण्यांतील तोडजोडी ध्यानांत नाहींत. आलम जवानीचा. पुर्ते मनन न होतां भलतेंच मनांत येईल, बोलतील याविषीं बहुत अंदेशा मनांत आले. परंतु येक खातरजमा चिताची आहे कीं पत्रें वाचून दाखविणें, आंतले भाव, गर्भ समजावणें ते राजश्री नाना आपले रुबरु समजावितील. त्यापक्षीं चिंता नाहीं. परंतु तुह्मींही विनंति करावी कीं आपले समक्ष पत्रें दाखऊन जेथें ध्यानांत न ये तेथें समजाऊन सांगावें. आणि समक्ष पत्रें श्रीमंतांस दाखविलीं तरच पाहतील. पाठीमागें पाहणार नाहींत. पत्रें पाहणार नाहींत तेव्हां ध्यानांतही येणार नाहीं. हा पूर्वीचा संप्रादाय ठाऊक आहे, त्यावरून लिहिलें असे. अलीकडील प्रकार कसा हें कांहीं समजलें नाहीं. हल्लीं पत्रें श्रीमंतांचे नांवें लेहून खुला लाखोटा पाठविला आहे. नाना यांस प्रथम दाखऊन आज्ञा कारतील त्याप्रा श्रीमंतांचे सेवेंत प्रविष्ठ करावीं. रा छ १६ मोहरम हे विनंति.

श्री.
श्रावण वद्य ३ शनिवार शके १७१५.

विनंति. उपरि, नानांची पत्रें छ २१ जिल्कादचे तेरखेची छ २१ जिल्हेजीं तुम्हीं रवाना केलीं, याचें बहुत आश्चीर्य जालें. इतके दिवस पत्रास कां लागले याचें कारणही तुम्हीं लिं नाहीं. नानापासींच पत्रें इतके दिवस राहिलीं असें ह्मणावें तर येक तेरखेस सर्व पत्रांवर विनंत्या जाल्या. तेव्हां पत्रें आपल्यापासीं कशास ठेवितील ? तस्मात् तुह्मापासीं पत्राचा लाखोटा दिल्हा तो कोठें गैर विल्हेस पडला होता. तो जेव्हां सांपडला तेव्हां पाटविला. ऐसें मनांत आलें. त्यास हें राजकारणाचें काम. नाना यांजकडील पत्राचेकडें आमचे नेत्र असतात. पत्राचे जाब आल्यावर त्या आज्ञेप्रा येथें बोलण्याचीं धोरणें चालतात. हे प्रकार तुह्मांस समजत नाहींत ऐसें नाहीं. परंतु आलस्यामुळें विस्मृति होती. येविषंई तुह्मांस तेथें रागें भरून सांगावें असें कोणीं नाहीं. याजकरितां राजश्री नानाचे पत्रांत तुमचा गिला लिहिला आहे, याजमुळें तरी काळजी धराल, त्यास इतःपर असें घडूं नये. पत्राचे जाब लिहिण्यासही तुह्मांसीच देतात. असें असतां इतके दिवस लागणें हें तुमचें कालहरण. परराज्यांत आह्मी राहिलों. येथें व्यवहार सर्व तिकडील पत्रावर, जर पत्रें लौकर न येत तर कसें करावें ? त्यास या पत्राचें येकदां दोनदां मनन करून काळजी ठेवावी. ॥ छ, १६ मोहरम. हे विनंति.

श्री.
श्रावण वा ३ शनिवार शके १७१५.

विनंति. उपरि, आपले पत्राचे कांहीं जाब लेहून श्रीमंत राजश्री नानाकडे विनंत्या करावयास पाठविले. त्यांनी कांहीं विनंत्या करून दिलाती पुसावयाच्या ह्मणोन पुडकें ठेविलें. काल कागद काहडून दिल्हे. तेव्हां मी बोललों कीं तारीख विसावे जिल्कादची पडली. आज येकवीसावी जिल्हेज, उत्तर जालें कीं गोविंदरावे असें समजतील नानांनीं पत्रें करून दिल्हीं गोविंदराव यांचे आळसामुळें येक महिना रवानगीस जाला. यैसें बोलल्यानं. तर मी हंसून उगाच राहिलों, ह्मणोन लि तें कळलें. त्यास पत्रें येक महिन्याचे अंत-याचीं आलीं असतां याविषीं आम्हीं कांहीं लिहिलें नाहीं तर ह्मणतील कीं गोविंदराव यानां कांहीं सूचना केली, याजकरितां नानाचें पत्रांत गिला लिहिला व तुह्मासही पुरवणी आलाहिदा लिहिली आहे. दाखवावी. त्याजवर काय बोलतात हें अगत्य ल्याहावें. र॥ छ १६ मोहरम हे विनंति.

श्री.
श्रावण वद्य ३ शनिवार शके १७१५.

विनंति. उपरि इंग्रजांकडून पुढील टिपूचे मसलहतसमंधीं पारसी याद आली. त्याची भवति न भवति पाटीलबावा यास घेऊन राजश्री नाना व तात्या यांनीं करून येक कलमाची फर्द ठराविली. यांतील हुस्न लिहिलें. परंतु बोलावयाचे नाहींत. गोविंदराव यांनीं नवाबासी असें बोलावें ह्मणोन पाटीलबावानीं सांगितलें. तो प्रकार लिहिला आहे. परंतु केवळ तसेंच बोलण्यानें इंग्रजापासीं ते सांगतील याजकरितां सहजांत बाराय मसलहत गोष्ट बोलावी व सरकारचें पत्र व याद पाठविली आहे ती नवाबास. याचा जबाब काय ? मनांत वाईट मानितील इत्यादिक मदारुलमाहम यांचे मनांत यावी कीं नाहीं? मध्यस्तांनीं नवाबास अर्ज केला कीं हजरत फरमावितात याचप्रमाणें मदारुलमाहम यांचे मनांत. परंतु सात दफे इंग्रजांकडील न ठरावितां मुख्य सर फर्दच करार करावी. ऐसा आग्रह मदारुलमाहम याचा नाहीं. मगर माहदजीराव सिंदे व हरिपंडतजी यांनीं हे शकल काहडून समजाविलें असेल. यामुळें उपाये नाहीं र॥ छ १६ मोहरम हे विनंति.

श्री.
श्रावण वद्य ३ शनिवार शके १७१५.
टपा रवाना छ १६ मोहरम.
राजश्री गोविंदराव स्वामीचे सेवेसीं:----

विनंति, उपरि तुह्मांकडील पत्रें छ २१ व छ २६ जिल्हेज व छ ३ मोहरमचीं रवाना जालीं तीं छ २७ जिल्हेज व छ १ व छ ८ मोहरमीं पावलीं. याचीं उत्तरें आलाहिदा लिहिलीं आहेत त्यांवरून कळेल. रा छ १६ मोहरम हे विनंति.