[ १८७ ] श्री. १७ जानेवारी १७७४.
राजश्री येशवंतराव शिंदे गोसावी यासीः-अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य स्ने।। रघुनाथ बाजीराव प्रधान आशीर्वाद उपरि येतील कुशल जाणून स्वकीय कुशल लिहित जाणें. विशेष राजश्री सुबराव पंडित अमात्य याजकडील गांव खेड्यास व जिल्हेच्या अमलास खलेल करितां, उपसर्ग देता, ह्मणून हुजूर बोभाट आला. त्याजवरून हें पत्र तुह्मास लिहिलें असे तरी कराराप्रमाणें चालवणें नवीन काडीमात्र उपद्रव न लावणें. फिरोन बोभाट येऊं न देणें. जाणिजे छ ४ जिलकाद सु।। अर्बा सबैन मय्या व अलफ बहुत काय लिहिणें.
लेखनावधि.