[ १८६ ] श्री. १७ जानेवारी १७७४.
अखंडितलक्ष्मीअलंकृत राजमान्य राजश्री आपाजी शामराव गोसावी यासीः -
सेवक रघुनाथ बाजीराव प्रधान नमस्कार सु।। अर्वा सबैन मया व अलफ राजश्री सुबराव पंडित अमात्य यांच्या गांवास घासदाण्याचा उपसर्ग करितां ह्मणून हुजूर विदित जालें त्याजवरून हे पत्र तुह्मांस सादर केलें असे तरी पंडित मशारनिलेंकडील गाव खेड्यास उपसर्ग न करणें कराराप्रमाणे चालविणे नवीन काडीमात्र उपद्रव न करणें. फिरोन बोभाट येऊं न देणें जाणिजे छ ४ जिल्काद आज्ञा प्रमाण.
लेखनावधि.