लेखांक २४२ १५७१ आश्विन वद्य १४
अज रख्तखाने राजश्री सीवाजि राजे दामदौलतहू बजानेबु कारकुनानि हाल व इस्तकबाल व देसमुखानि पा। पुणे बिदादन सु॥ खमसैन अलफ दरीविले श्री माहादाजी गोसावी मोरेस्वरकर हुजूर मालूम केले जे आपणास इनाम मौजे मोरगौ ता। कर्हेपटार पा। मा। तेथे जमीन चावर निमे विहीरटिके सेत कळस रुके ३॥. साडे तीन देखील नख्तयाती व महसूल व सेलबैल व पायपोसी व खर्चपटी व तोरणभेटी व मोईन सादीलवार व सरदेसमुखपटी व स्थलजकाती व भेटी व उलफापटी व बकरीद व मुशाहिरा देसकुलकर्णी व गावकुलकर्णी व बाजे इकलाजिमेदारानि व तूप व बकरे व खामदल व कडबा व पाडेवार चालत आले असौनु हाली हुदेदार मोजे मा।र इस्कील करून पटियाची तसवीस लावितो ह्मणउनु मालूम केले बिनावरा इलतमेश खातिरेसी आणौनु श्री माहादाजी गोसावी मोरेस्वरकर इनाम मौजे मोरगाव ता। कर्हेपठार पा। मा। जमीन चावर निमे सेत विहीरटिके चावर निमे .॥. कलम रुके
३॥ देखील नख्तयाती व महसूल व सेलबैल व पायपोसी व खर्चपटी व तोरणभेटी व मोईन सादीलवार व सरदेसमुखपटी व स्थलजकाती व भेटी व उलफपटी व बकरीद व मुशाहिरा देसकुलकर्णी व गावकुलकर्णी व बाजे हकलाजिमेदारानि व तूप व बकरे व खामदल व कडबा व पाडेवारी व पेस्तर नविया पटिया होतील त्या कुल दुमाले केलिया असेती वेठी अगर जेवा कोण्हे बाबे एक जरा तसवीस नेदणे दर हर साल ताज्या खुर्द खताचा उजूर न करणे तालीक घेउनु असेली खु॥ फिराउनु देणे
तेरीख १२ माहे सौवाल
सौवाल सुरू सूद