लेखांक ५७
१५७५ चैत्रशुद्ध ३
बजानेब कारकुनानि पा। क-हाड बिदानद की सु।। सन सलास खमसैन अलफ
दरीविले अतभट बिन आपदेभट नादूरदार सो। पा मजकूर हुजूर मालूम केले जे आपणासी इनाम जमीन ॥ दर सवाद मौजे कोणेगाउ कुलबाब कुलकानू दुबाला असे सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी चालिले असे हाली साहेबास मुकासा अर्जानी जाहाले माहाली ताजा खुर्द खताचे उजूर करिताती ह्मणून तरी हे काय माना असे आता रसीदन खुर्द खत जुनारदार मजकुराचे इनाम सालाबाद कारकीर्दी दर कारकीर्दी ता। साल गुदस्त भोगवटा तसरुफाती चालिले प्रमाणे इनाम दुबाला कीजे तालीक लिहोन घेउनु असल परतून दीजे.
तेरीख १ माहे जमादिलावल