लेखांक ५४
१५२४ चैत्र शुद्ध १० गुरुवार
श्री
श्री सकलगुणसपन्न यजनयाजनादिकषट्कर्मनिरत राजमान्य राजश्री वेदमूर्ती मोरेश्वरभट व वीरेश्वरभट गिजरे गोसावी यासी श्रीकराच्याये पडितराय नमस्कार राज्याभिषेकशके २९ चित्रभानु सवत्सर चैत्र शुद्ध दशमी गुरुवासरे मौजे सैदापूर राजेश्रीकैलासवासी स्वामीनी समस्त ब्राह्मण क्षेत्र क-हाड यास सर्वमान्य आग्रहार देऊन सिवापूर नाव ठेविले तेथील विभाग ब्राह्मणपरत्वे करून जाबीता करून घ्यावयाविषई राजश्रीनी आह्मास आज्ञा केली आह्मी ब्राह्मण मनास आणून नावनिसीवार नेमणूक करून पूर्वी जाबीता करून दिला आहे त्या पैकी जे कोण्ही गयाल मयत होतील त्याचे असामीचे जाबीते मध्ये नेमणूक आहे यैसियास जाबीतेचे वेळेस ब्राह्मण नव्हते ते कोणकोण्ही आह्मा पासी येऊन विदित करिताती की जाबीतेचे वेळेस आपण सनीध नव्हतो आपल्या योगक्षेमाची काही अनुकूलता होय यैसे केले पाहिजे ह्मणून विदित केले यैसियास सदरहू जाबीते मध्ये असामीचे नेमणूक आहे त्यापैकी गयाळ मयत असामीचे नेमणूक पैकी भले ब्राह्मण साक्षर कुटुबवत्सल जाबीते मध्ये ज्याची नेमणूक नाही त्यास यथायोग्य मनास आणून त्यास सदरहू ऐवज नेमून देऊन पावित जाणे प्रतिवर्षी नूतन पत्राचा आक्षेप न करणे तुह्मास एकतर हे पत्र दिल्हे आहे जाणिजे छ ८ जिल्हेज सु।। सलास मया अलफ पा । हुजूर हे विज्ञप्ती