लेखांक २४७ श्री १६०१ ज्येष्ठ शुध्द ५
राजमान्य राजश्री त्र्यंबक गोपाळ सुभेदार व कारकून सुभा पुणे गोसावी यांस
सेवक अनाजी दतो नमस्कार सु॥ सन समानीन अलफ सीवाजी गोसावी याचे पिते माहादाजी गोसावी मोरगावकर यास इनाममौजे मोरगाऊ ता। कर्हेपठार पा। मा।र एथे सालाबाद चालत आहे साल गुदस्ता चालिले आहे ह्मणऊन एऊन सांगितले तरी ता। साल गु॥ जैसे चालिले असेल तैसे च चालवणे तालीक लेहोन घेऊन असल परतोन देणे नवी जिकीर न करणे रा। छ ३ जमादिलावल पा। हुजूर
सुरू सूद