लेखाक ७०
१६१५ श्रावणवद्य १४
आज्ञापत्र राजश्री कर्णराजा भोसले देसमूख प्रा। क-हाड व सरदेसमुखी माहाय ताहा मोकदमानी मौजे वडगाव पा। मजकूर सु।। अर्बा तिसैन अलफ वेदमूर्ती विस्वनाथभट बिन नरहरभट गिजरे सो। कसबा क-हाड ब्राह्मण भले योग्य कुटुबवछल योगक्षेम चालविला पाहिजे याकरिता मौजे मजकुरी देशमुखीचा इनाम आहे त्यापैकी जमीन बिघे ४३ तीन बिघे वृतीकरून दिल्ही असे लेकराचे लेकरी चालवावे ऐसा निछय केला आहे तरी तुह्मी मौजे मजकूर देशमुखीचा ईनाम पैकी सदरहू जमीन भटगोसावी याचे स्वाधीन करणे तेथील उपभोग भटगोसावी करतील प्रतिवर्शी नूतन पत्राचा आक्षेप न करणे तालीक लेहून घेऊन असल परतोन देणे छ २७ जिल्हेज मोर्तब सुद तीन बिघेयाचे उत्पन्न भटगोसावियाचे पदरी घालणे दरसाला ताजा खुर्दखताचा उजूर न करणे जाणिजे