लेखाक ८५
१६२१ ज्येष्ठशुद्ध १
श्री
राजश्री महादाजी सोनदेऊ देशाधिकारी व देशलेखक वर्तमान व भावी पा। क-हाड गोसावीयासि अखडितलक्ष्मीअलकृत राजमान्य सेवक शकराजी नारायण सचिव नमस्कार सु।। तिसा तिसैन अलफ वेदमूर्ती ब्राह्मण-समुदाय वास्तव्य कसबे क-हाड क्षेत्र यास राजश्री छत्रपति स्वामीनी यास आघ्रार मौजे सैदापूर पा। क-हाड हा गाऊ आहे त्याचे नाव सिवापूर ठेऊन क-हाड क्षेत्री ईस्वरसवछरी जन्माष्टमीचा पर्वी यथायोग्य सकल्प करून राजश्री स्वामीच्या नावे धाराउदक घालून अग्रहार देऊन राजमुद्रेची सनद राजश्री रामचद्र पडित याणी करून हे पेशजी का। मजकूरच्या ब्राह्मणास धर्मादाऊ मोईन होती व आदलशाहाचे वेळेसी इनामत होती ते कुली दूर करून ब्राह्मणसमुदायास मौजे मा। अग्रहार दिल्हा आहे याची सनद सुभे मजकुरी आलहिदा राजश्री स्वामीचीं सादर आहे त्याप्रमाणे मौजेमजकूर सर्वमान्य ब्राह्मणास यथाविधभागे भूमि वाटून देऊन सर्वमान्य खेरीज हकदार व इनामदार करून त्या प्रा। सुरक्षित चालवणे दर हर साल नूतन पत्राचा आक्षेप न करणे या पत्राची प्रति लिहून घेऊन असल परतून देणे जाणिजे छ २९ जिलकाद पा। हुजूर
बार सुरु सूद बार