लेखाक ८७
१६२१ भाद्रपदवद्य ११ शनिवार
श्रीस्वस्ति श्री राज्याभिषेकशके २६ प्रमाथी नाम सवत्सरे भाद्रपद बहुल येकादसी मदवासरे क्षत्रियकुलावतस श्री राजाराम छत्रपति याणी वेदमूर्ती मोरेश्वरभट गिजरे यासि आज्ञा केली अैसी जे तुह्मी स्वामी समीप येऊन विदित केले की राजश्री कैलासवासी स्वामीने आपले पत्र विश्वनाथभट गिजरेयास क-हाड क्षेत्र सनिध कृष्णाकोयना ++ दा नदी येथील तीर्थपुरोहितपण आपले वृती करून देऊन इनाम करून दिल्हे ते धामधुमे करिता गेले तरी स्वामीने आपले नाव पत्र करून दिल्हे पाहिजे व आपणास स्वामीने उभयता नदीचा नित्याभिषेक दिल्हा आहे त्यास मौजे शिवापूर ता । क-हाड हा गाव क्षेत्रीचे ब्राह्मणास अग्रहार करून दिल्हा आहे तेथे यथाविभागे काही ईनाम देविला पाहिजे ह्मणोन विनती केली यावरून स्वामी तुह्मावरी क्रुपाळू होऊन कृष्णावेण्या येथील आपले तीर्थउपाध्येपण स्वामीने तुह्मास करार केले असे तरी तुह्मी पुत्रपौत्रादिवषपरपरेने चालवीत जाणे व तुह्यास उभयता नदीचा नित्याभिषेक सागितला आहे यास्तव मौजे शिवापूर पैकी तीस बिघे ईनाम दिल्हा असे सनद राजश्री श्रीकराच्यार्य पडितराउ याची सादर आहे तेणेप्रमाणे ईनामाचा उपभोग करून सुखरूप असणे जाणिजे निदेश समक्ष
रुजू सुरू निविस
सुरू सूद बार