लेखाक १२१
१६५८ मार्गशीर्ष शुद्ध ९
श्री
कौलनामा ता । मोकदमानि मौजे सैदापूर परगणे कराड सु।। ११४६ बिदानद दरीविला दादे कौलनामा ऐसा जे मौजेमा।र हा गाव परगणे मजकूरचे ब्राह्मणाकडे चालत आहे त्याप्रमाणे सरकारतर्फेने गाव ब्राह्मणाकडे दिला आहे तुह्मी कोणे बाबे शक न धरिता गांवावर राहून सुरलित वसूल देत जाणे सरकार तर्फेने काही आजार लागणार नाही बेवसवास राहाणे दरी बाब कौल असे जाणिजे छ ७ शाबान