लेखाक १२०
१६४८ वैशाखशुद्ध ४ रविवार
श्री
स्वस्तिश्री राज्याभिषेकशके ५२ पराभवनाम संवत्सरे वैशाखशुध चतुर्थी रविवासरे क्षत्रियकुलावतस श्रीराजा शाहू छत्रपती स्वामी याणी देशमूख व देशपाडे प्रा। कराड यास आज्ञा केली ऐसी जे वेदमूर्ती राजश्री नारायणभट बिन वीरेश्वरंभट उपनाम गिजरे गोत्र देवरात सूत्र आश्वलायन अग्निहोत्री वा । कसबे कराड हे बहुत थोर ब्राह्मण वेदशास्त्रसपन्न क्षेत्री राहून स्नानसध्यादि सत्कर्मे आचरोन स्वामीस व स्वामीच्या राज्यास कल्याण चिंतून आहेत याचा योगक्षेम चालविल्याने श्रेयस्कर आहे ऐसे जाणून त्याजवरी स्वामी कृपाळू होऊन मौजे टाळगाव ता। बारसे प्रा। मजकूर हा गाव पेशजीच्या मोकासीयाकडून दूर करून हाली वेदमूर्तीस कुलबाब कुलकानू स्वराज्य व मोगलाई अमल दो। दुतर्फा व इनाम तिजाई देखील हालीपटी व पेस्तरपटी जलतरूतृणकाप्टपाषाणनिधिनिक्षेपसहित खेरीज हकदार व ईनामदार करून नूतन ईनाम दिल्हा असे तरी तुह्मी मौजे मजकूर चतु सीमा पूर्वमर्यादे प्रमाणे वेदमूर्तीचे दुमाला करून पुत्रपौत्रादिवशपरपरेने ईनाम चालविणे प्रतीवर्षी नवीन पत्राचा आक्षेप न करणे या पत्राची प्रती लेहून घेऊन हे मुख्यपत्र भोगवटीयास परतोन वेदमूर्ती जवळ देणे जाणिजे लेखनालकार
मर्यादेय राजते
रुजू सुरू समंत सा। सा।
निविस सुमंत मंत्री सरकार
बरा सुद सुरू सुरू
बार बार बार बार