लेखाक १९४
१७६५ज्येष्ठमास
श्रीशंकर
श्रीमत्परमहसपरिव्राजकाचार्यश्रीमच्छकराचार्यान्वयस-
जाताभिनवश्रीविद्यानरसिव्हभारतीस्वामिकरकजोद्भवश्री-
विद्याशकरभारतीस्वामिकृतनारायणस्मरणानि
श्रीमत्सकलगुणालकरण श्रीगुरुभक्तिपरायण मठाभिमानिधुरधर गगाजळनिर्मळात कर्ण सावित्रीबाई परमसिष्योतम यासी विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित छात्रसभासमवेत श्रीनिकट असो अत्रत्य कुशल जाणोन स्वकीय लेखनी मानस सतोषवित असले पाहिजे त्या नतर स्वस्थानदेवतेची स्वारी साचारउद्देशे निघोन कराडास आगमन जाहले आहे येथोन साता-यास जाणे होईल कैलासवासीरावजी कोलटकर
यासी अतकाळसमई सर्वप्रायश्चित केले ए विसी वेदशास्त्रसपन्न राजश्री बाबा दीक्षित गिजरे व रघुनाथ दीक्षित गिजरे वगैरे समस्त क्षेत्र करहाटक येथील ब्राह्मण तुह्माकडे आले आहेत क्षेत्रस्त ब्राह्मण विद्वान सत्पात्र आहेत सविस्तर मजकूर तुह्मास समजावितील निरतर विनतिपत्रिका प्रेषून सस्थानदेवतेच्या परामृषास अविस्मरता असावी विशेष लिहिणे ते काय शके १७६५ शोभकृतनामसवत्सर जेष्टमास महानुशासन वरीवर्ति
