लेखाक १८९
१७६२ माघमास
श्रीशंकर
अनेकश क्तिसघटप्रका शलहरीघनध्वा तध्वसो विजयते विद्याशकरभा रती ।।
श्रीमच्छकराच्यार्यान्वयसजाताभिनवश्रीविद्यानरसिव्हभार-
रतीस्वामिकरकजोद्भवश्रीविद्याशकरभारतीस्वामिकृतनारायण-
स्मरणानि
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री रघुनाथ दीक्षित गिजरे रा। क्षेत्रकरहाटक परमसिष्योत्तम यासी विशेषस्तु तुमचे कल्याण इच्छित श्रीनिकट असो अत्रत्य कुशल जाणून स्वकीय लेखनी मानस सतोषवीत असले पाहिजे तदनतर वो। राजश्री नरसिव्ह दीक्षित याणी विवाहा प्रकर्णी मजकुराची विनति केली त्यास तुह्मी च मठ सकेश्वर मुकामी येणे ह्मणजे समक्ष च आज्ञा होईल तर सत्वर येऊन पाहोचावे विशेष लिहिणे ते काय शके १७६२ शार्वरीनामसवत्सरे माघमास महानुशासन वरीवर्ति ۔