लेखांक २२८
१७७९ वैशाखशु॥ ८
श्री
वेदशास्त्रसंपन्न राजमान्य राजश्री समस्त ब्रह्मवृद क्षेत्रकराड यासि
समस्त ब्राह्मण कसबे उब्रज साष्टांग नमस्कार विनति विशेष तागाइत वैशाखशु।। ८ शके १७७९ पावे तो क्षेम असो विशेष पेशजी आपण पत्र उभयता उंब्राणी पालकर याज विषी पाठविले होते त्या प्रमाणे वहिवाट चालली हाली उभय उब्राणी पालकर याणी श्रीजगद्गुरुशकराचार्यस्वामीचे पत्र आणिले त्याची नकल अलाहिदा पाठविली आहे उब्राणी याचे ह्मणे पत्रा प्रमाणे वहिवाट चालवावी नाहीं पेक्षा पत्र माघारी घ्यावे सबब आपणांस लिहिले आहे तर जगद्गुरुचे पत्र माघारी देणे हे हि कठीण याज करिता उत्तर यावे बहुत काय लिहिणे लोभ करावा हे विनती
उत्तर
विशेष श्रीस्वामीजगद्गुरु याचे पत्राची नकल व आपले पत्र पा। ते पावले लिहिला मजकूर कळला या प्राती पूर्वी पासून मठाधिकारीचा साप्रदाय नाही हे आपणास माहीत च आहे त्यास श्रीस्वामी जगद्गुरुचे पत्र आले ते ठेऊन घेऊन पूर्वी क्षेत्रा हून पत्र आपणास गेले आहे त्या प्रमाणे वहिवाट ठेवावी सूज्ञा प्रति विशेष काय लिहिणे हे नमस्कार व अनुक्रमे आशीर्वाद मिति १७७९ वैशाख शुद्ध १०