लेखांक २८० श्री १६०२ चैत्र शुध्द ५
राजमान्य राजश्री जाबजी कृष्ण प्रभू हवालदार व कारकून पेठ पाटगांव गोसावी यांसी -
स्नेहांकित गणोराम सुभेदार व कारकून सुभा परागणे कुडाळ व माहालानिहाय अनुक्रमे विनंति सु॥ समानीन अलफ पेठ मजकुरी सात पांच वरसें गलबलियाकरितां वसात करून नव्हते हाली श्री बावा येऊन राहिले यासाठी पेठ मामूर जाली त्याचेया प्रसाधे दिवाणीचा मामला खोबरे सुपारी खारिका होते. त्यास श्रीस्वामीस दुकान त्यांच्या नांवे त्यांस दिलियाने विशेष चालणार. याकारणे पेशजी तंबाकूचे गादीचे दुकान होते तेथे, हाली गादी नाही. याबदल ती दुकान स्वामीस देवविले आहे. ते स्वामीच्या स्वाधीन तुरुतगिरीचे हवाले करवणे. ते हरकोणी तेथे ठेवितील बावाचे नावे दुकान चालेल. त्या दुकानास महसूल न घेणे. वेठी ऊठ त्याचे दुकानी जो त्याचा असेल त्यासे न घेणे हा कागद तालीक लेहोन घेऊन असल देणे. छ ३ माहे रबिलावल