लेखाक ३०७
१७२१॥२२ सुमार
श्री
वेदशास्त्रसपन्न राजमान्य राजश्री माणिक दीक्षित उबराणी व तात्या दीक्षित गिजरे स्वामीचे सेवेसी
विद्यार्थी सदाशिवभट नदा साष्टाग नमस्कार विज्ञापना ऐसी जे रेटरे बु॥ येथे राजश्री बाळाजी वेकाजी कुलकर्णी याचे घरी मुज पचमीची आहे व बाळाजी जिवाजी याचे घरी गर्भादान आहे ते दिवशी नरसिहपुरचे ब्राह्मणश्रेष्ठ येऊन दगा करणार तेव्हा ग्रहस्त खर्चाचे पेचात येतात त्यास सरकारातून रोखा होऊन बदोबस्त करावा पचमीचे आत काय करणे ते करावे नाही तरी ते आपले कार्य सिद्धी करून जातील मी निघोन आपणा कडे येईन याप्रो। वो बाबा श्रीधर याचे निरोप आले मुलाबाळाचे बोलणे नाही मुख्यामुख्याचे च आहे याज करिता विनति लिहिली आहे बहुत काय लिहिणे कृपा करावी हे विज्ञापना पत्राचे उत्तर सत्वर पाठवावे त्याचे मारामारी पर्यंत वेव्हार होणार माझे पारपत्य होऊन आपल्यास अपेश येईल कळावे हे विज्ञापना
Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57