।। जर चतुर केशव राउत व तयाचा गुरु चतुर ।। जर नितिन अकलेन ईसारतिन मान तर तुह्मी सिरपत नायक हकिम मारे व तमारा ईनाम आज पासुन सही जाला ।। वे राउत सीधे यांस आज पासुन पंधरासें हुन बकसिस ।। आपले मुखीं वांटुन ताडे माड वसइं आगराचे कुल कमाइस करुन खावे ।। थकटका जयाचे वाडित असेल त्यास द्यावा ।। व माझी आज्ञा जर बाहादरपुर वसाईत नवी वसवावी ।। तेथे पाटेल सरखुमा वर ।। व जे प्रजा तेथे सर्व जातिची राहेल त्यांचे ही पाटेल ।। दर घरास टका १ वरसास यांस द्यावा ।। व याहि तीनसे राउत जमा निशाण अफदागिर माझे सेनेपुढें युद्धास मान ।। हा महजर ईनामि खुशालिन खानसायेबि दीधलें ॥ व पानपटि दीधली ॥ यैसे सुखि करोन घरि पाठविले ।। मागे वसाईत बाहादरपु-यास जाली ।। भंडारि सिंधे खुम घरें ५० येउन राहिलीं ॥ या कबिल्यास राउत समुदाये तीनसें नित्य मजलसिस केशवराउतें जावें ॥ ते समईं खत केलें जर या कबिल्यान माडे ताडी ३५५ वाहावि ।। ही टाकित दुसरिं दुस-या सा-यांस वांटुन गावोगावि दीधली व मसाला बांधिला ।। वरसास सासें हुन सरपाटिलांस द्यावा ।। तयांसि जे समइं राउत खानसाहेबां समवेत कोठे स्वारीसिकारिस जातिल ते समइं पाटेलाहि आपले खर्चित यांस अडेच-सेरि द्यावि ।। हे सही
हा निर्वाह होतां गावें वसवाविं ।। तेधवा केशव राउत वरि येवोन कागद बांलवांस पाठविला ।। तेथोन सर्व आपला जमा सिंधे शेषवंशि धारेचे पाईक से ९ समभारें आपुले संप्रदायें हांटदळि आले ।। केशव राउतास भेटले ।। आज्ञा सिरी वंदुन बोलते जाले ।। जर किंनिमित्य बोलावोन आणिलें ।। तेधवां केशव राउत चौघलेंया प्रत बोलता जाला ।। जर खानसायबान तलब केलि आहे ।। जर आपला संप्रदाये अवघा आपले ताबिन ठेवावे ।। या करितां हुकुम खानाचा तुह्मास बोलावोन आह्मि आणिलें आहे ॥ मग सर्व समुदाय घेवोन केशव राउत खाना जवंळ मदलसिस नेले ।। जमा पाइंक समुदाये शस्त्रधारि देखोन खान संतोषला ।। जर हे क्षेत्रि अवल्ल माहामुदल ।। मग हांटवटा यावत् हीरा डोंगरी ईनाम केशव राउतास जालें ।। तेधंवा उत्तलेश्वरी तटाक केशवराउते बांधिलें ॥ शांतनादेवि तेथे स्थापिली ।। आणि गौराळि तटाक बांधिलें ।। तेथे गावं रचिला ।। वालिवंकर हरबजि राउत आपले खुमासिं गोरीजासि घरबंध केला ।। तेथे ह्मातार पैकि चवघला सीवाजी ह्मातारा राहिला ।। ईमारथा केल्या ।। दळवाडिये अर्बुदा नावं जालें ।। इजारा २४ वीसदाम ह्मातारे पैकि चालला ।। त ह्मातार टिळयाविड्याचे अधिकारी ।। राउत टिळयाविड्याचे अधिकारी ।। यैसे वर्तुं लागले ।। मग केशव राउत हांटदळि सीमगा खेळतां कच माळियांसि बनली ॥ ताम्रतळयासिं युद्ध जालें । माळियांचि छत्रि शेषवंशियांहि मोडिली ।। ती बोंब खानसाहेबासि गेला।। तेधवां खाने हुकुम चोपदार पाठवोन पाटेल चोधरि ह्मातारे राउत बोलावोन आणिले।। पुसो लागला जर या माळयांचि छत्रि मोडावि काये ह्मणोन ।। तेधवां जाब सर्वांहि केला ॥ जर हे माळि आदखानियांहि आमचे मागें खेळावें ।। मोहारे आमचे निशाण आणि छत्र ॥ त्या मागे सोमवंशि आणिक ईत्तर ।। यैसे पुर्वापार चालोन आलें ।। तेधवा जाब वर्तक बोलता जाला जर मोहोरें तुह्मी निशाण न्यावयाचे खत खानसाहेबास दाखवावें ॥ की आह्मी सर्वांचे मोहोरे सोमवंशि व सूर्यवंशि ॥ त्यामागें तुमचें निशाण ॥ हा जाब आईकोन खान बोलता जाला जर पुर्वा पासोन कोणकोणास छत्रि हें साकल्य सांगावें ॥ ते वेळि केशव राउते आपुला कुळगुरु बोलावोन खाना हुजुर मजलसिन वंदुन बोलिल ॥ जर प्रथम निशाण कोणाचें हें साकल्य खानाप्रत प्रविष्ट करावें ।। तेधवां देवदत्त नायक बोलता जाला ॥ जर सोमवंश आणि शेषवंश हे येकयकाकि अवलाद आणि अफलाद ॥ यांसि वाद व्यर्थ ।। परंपरा येकयका पासुन अनेक उत्पति होत आहेत ।। परंतु प्रथम निशाण सोमवंशि ।। त्यामागें शेषवंशि छत्रियांसि आणि त्यांसहि चालोन आलि ॥ यथे निवाडा पाहातां ॥ साकल्य पुराण संमतीकथा ।। व्यासें कंथिली पूर्व उत्पनता ।। तेथे निवाडा असे ।। आतां सोमवंशासि सिंहासन आणि छत्र कैसें प्राप्त जालें तें आइकावें ॥ छ ।।