हुताशनि जवंळ ह्मणोनी खाने आज्ञा सर्वां प्रत दीधलि ।। मोहोर निवाडा करावा ।। अत्र ठेवोन आज्ञा दिधली ।। त्या उपरांत कथा वर्तलि सही ॥ छ ।। याउपर कथा वर्तलि ते बोलिली ।। संवत् १४५९ तेधवां निवाडा केला ।। सोमवंशि सूर्यवंशि शेषवंशि आणि ब्राह्मण मिळोन बाहादुरस्या जवळ जमा सर्व जाला ।। अर्ज बाहादुराप्रत केला ॥ जर छत्र निशाण सोमवंशासि व सूर्यवंशासि युक्त ।। हुताशनी खेळतील ।। तेधवां केशव राउत बोलता जाला ।। जर आह्मि शेषवंशि उपनावं सिंधे तर छत्र निशाण सर्वां मोहोरे ।। आह्मि आपला समुदायें छत्र निशाण आमचें चालेल ।। तेधवां सीवाजि चुरि बोलता जाला जर आह्मि सोमवंशि प्रथम निशाण आमचें ।। खान आईकोन अजेब करि ।। खतें महझर पाहातां निवाडा प्रथम सोमवंश सूर्यवंशाचि छत्रि नीशाण ।। तेधवां सिंध्यासि खान बोलिला जर तुह्मा जवंळ खत अथवा मझर असेल तर दाखवावा ।। तेधवां केशव राउत बोलता जाला ॥ जर खत राया बिंबाचे स्वहस्ताक्षरि स्वसिक्यासिं आहे तें साष्टि येरंगळा राहिलें ॥ तेधवां हरठाकुरं बोलता जाला ।। खत आलजी नाखवा हस्तिचें मजंवळ आहे।। जर प्रथम निशाणं सर्वां मोहोरे शेशवंशाचे ।। युद्धी हुताशनी आमचें निशाण।। तें खत वाचोनि पाहातां निवाडा शेषवंशाचे निशाण मोहारे सीका आल नाखवा नवाईत माहिमचा राजा, सीका केळवी, सीका महिकावतां, प्रगाणसीका सीरगावं, लकसीसी आ+र ॥ ऐसा निवाडा पाहाता निशाण सिंधे शेशवंशि मोहोरे चालतिल ॥ ते वेळे खाने ठाकुरासी वीडा दीधला ।। खजिना हवाले केला ।। तो आपले ताबिन ठेविला ।। त्यासी केशवराउता जवळ पांचवा मान देवविला ।। आणिक अफदागीर ठाकुरासिं पद जालें ॥ ठाकुर नावाजिला ॥ तैसा सर्वाहिं शेषवंशियांहि नावाजिला ।। टीळे जाले ।। विडे खाने सर्वांसि दीधले ।। ईनसाफ निवाडिला ।। सर्वांस आज्ञा दीधली ॥ त्या उपरांत कथा वर्तली सही ॥ छ ॥
श्रीगणेशाय नमः ।। सवंत ११२५ राज बिंब आहिनळवाडिया होवोन येथे माहिम ।। राजगोत्र भारद्वाज कुळस्वामीण प्रभावती ।। १ ॥ या उपर सोमवंशि खुमे २७ त्याचि गोत्रें कुळदेवता व ठीकाणे तेथे आणि येथे ॥ प्रथम प्रगाणे साशष्टि तपें मरोळ ॥ तेथे मुख्य माहादेव देशला ॥ त्याचा बंधुं कृष्णजी पद ठाकुर ठीकाण पैठण ॥ १।। प्रगाणे मालाड-खापणेया ठाकुरा खाली ।। हे आद-टिळयाविड्याचे आधिकारि ॥ यांचे गोत्र पद्माक्ष कुळदेवता जोगेश्वरी ।। २ ।। आणि कृष्णाजी चोधरि पद चौघला वतन खुद पैठण ।। येथे पोईसर ठीकाण ।। गोत्र भद्राक्ष कुळदेवता वज्राये ।। ३ ।। आणि दामराव पद महंत वतन पैठण ।। येथे ठींकाण परजापुर ॥ येथे आलियावर निका मलिकाचे वेळे पद पालटलें ॥ चौघलें पद निका मलिकें दीधलें।। त्याचे गोत्र क्षवण कुळदेवता।। पद्यावतीं ।।४।। आणि अनंत कडु चौघला।। पुर्वा पासोन वतन चांपानेर ।। येथे ठीकाण आंकुलवली ।। ईनाम बिंबदेवा हात्तिचें ॥ ५ ॥ आणि नामराज साहाणि आदखानी पद चौघला ।। वतन अमदाबाज ।। येथे ठिकाण कोंदिवटे ।। गोत्र वैरक्ष कुळस्वामिण चपादेवी ॥ ६ ॥ आणि केशवराव ॥ दोंहों मानाचा आधिकारि ।। चौबला आद्यवंत राया समागमि आला ।। वतन चांपानेर ।।
येथे ईनाम नसरापुर ठिकाण ।। गोत्र गौतम कुळदेवता येकविरा ॥ ७ ॥ आणि दाम महंत ।। पद चौघला वतन चांपानेर ।। येथे ठिकाण येकसार ।। गोत्र श्रीपत कुळदेवता चंडिका ।। ८ ।। व नामाधिप ।। पद चौघला वतन चांपानेर ।। येथे ठिकाण कालिणे ।। गोत्र वशिष्ट कुळदेवता हिरबाय ।। ९ ।। आणि नाम राउत ।। पद घरथ दाढिमे वतन चांपानेर। येथे ठिकाण फोंजिवरे ॥ गोत्र वछ कुळदेवता काळिका ।। १० ।। आणि कृष्णाजि रक्ती ।। वतन देव्हेरी ।। येथे ठिकाण वांदरे रांजणफर ।। गोत्र कौंडण्य कुळदेवता कुमारिका ॥ ११ ॥ व नाम राउत दाढिमे ।। वतन चांपानेर ॥ येथे ठिकाण फोंजिवरे ।। गोत्र बकदालभ्य कुळदेवता काळिका ॥ १२ ॥ आणि त्रिंबक रुत ।। वतन अव्हेलि ।। येथे ठिकाण फोंजिवरे ।। गोत्र वछ कुळदेवता नारायणी ।। १३ ।। आणि दाद पुरो ।। वतन चांपानेर ।। येथे ठिकाण मुहिली ॥ गोत्र हरिंद्र कुळ देवता माहालाये ।। पद वरातदार ॥ १४ ॥ आणि नामराज उपनावं चुरी ।। वतन चांपानेर ॥ येथे ठिकाण मुहिली ।। गोत्र त्रिंबक कुळदेवता हरडाये ।। १५ ।। आणि दामुल सिंग ।। वतन पैठण ।। येथ ईळें पाडळें ।। पद म्हातार ।। गोत्र विश्वामित्र कुळदवता ललिता ॥ १६ ।। आणि दाम सवे ।। वतन पैठण ।। येथे ठिकाण मुहिली ॥ पद चौघल ।। गोत्र अंगिरा कुळदेवता वज्राये ।। १७ ।। आणि दाम सीळ ॥ वतन पैठण ।। यथे ठिकाण मुहिली ।। पद म्हातारे ।। गोत्र अंगिरा कुळदेवता माहेश्वरी ॥ १८ ॥ आणि जीवाजी श्रीत ।। पद. म्हातारे ।। वतन चांपानेर ।। येथे ठिकाण साही ॥ गोत्र श्रीचंद्र कुळदेवता चंदनदेवी ॥ १९ ॥ आणि दाम महंत ।। वतन चांपानेर।। येथे ठिकाण तुंगवें ।। पद ह्मांतारा।। गोत्र त्रिंबक कुळदेवता काळिका ॥ २० ॥ आणि चंद्र राउत ॥ वतन पैठण ।। येथे ठिकाण वांदरे रांजणफर ।। गोत्र जनार्दन कुळदेवता रक्तदंतिका ॥ २१ ।। आणि हैबतराव चे-हणेर ।। वतन चेरूण्हं ॥ येथे ठिकाण वानरें ।। गात्र भारद्वाज कुळस्वामिण माहेश्वरी ।। २२ आणि जानकोजि राउत ।। वतन निळापुर ।। येथे ठिकाण नाळें ।। गोत्र भृगु कुळदेवता त्वरिता ।। २३ ।। आणि नाम चाधरि ॥ वतन पैठण ॥ येथे ठिकाण कांधवळी ।। गोत्र मित्राक्ष कुळदेवता चंद्रायेणी ॥२४॥ आणि जातलोमक प्रतिलोमक ।। ते कोण कोण ॥ कवळी १ दरणा २ भोईर ३ पटयार ४ माळी ५ घरठी ६ भटयारी ७ सांखळे ८ उभार ९ नाईते १० गाण ११ विसे १२ ।। ही बारा खुमे ।। यांस हि आधार सोमवंशाचा ।। विभीचारि ह्मणोन मान्या वेगळे ।। आणिक तांडेल आणि वहिती ये ही मान्या वेगळे ।। जातिसमुदाई चालति ।। नीमित्य देसकें घेतले ह्मणोन ॥ सासष्टित चालती ।। ईतरकडे अमान्यता ।। सही ।। छ ।।