Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Super User
महिकावती (माहीम)ची बखर
तें आईकोन नागरसें आंधेरिकरांला छत्रि दिधली ।। वारने वांदरें नावा जिले।। त्यासि हि छत्रि दिधली ॥ साहारकरांला आणि पालवणकरां हात सांकळ्या पावले ॥ त्या उपरांत देसलिक हादपुरोचा बंधु सोम ठाकुर देसला जाला ।। मालाडि प्रवर्तुं लागला ।। आणि मरोळा कान्हा ह्मातरा त्याचा पुत्र कुंडम्हातरा देसला जाला ।। हे देसले मालाड व मरोळा प्रवर्तुं लागले ॥ त्या उपर त्या नागरस्यान जैतचुरी बोलावोन आणिला ॥ धर्मपुत्र म्हणोन दळाचि नाईकी दीधली ।। आणि येसावें चौफेर बंदरकी ते ही प्राप्त जाली ।। जैतचुरी वेसावें आपुलें मत्तें प्रवर्तुं लागला ।। या उपरांत दील्लिचा राजा दिल्लेश्वर तेथे तुर्क अवतार म्लेंछ जन्मला ।। तो गोवळा होवोन प्रवर्तु लागला ॥ तो कैसा वंशवृद्धि पावला कवणे परी ॥ द्वारका नगरी गुजराथ पदरी नगरसेठ विठलदास ।। वर्ण वैश्य ।। गणेश उपाशक ॥ त्यास संतान नाहि म्हणोन सर्व देशिचे ज्योतिषी विद्यार्थि बोलाविले ॥ अतित संन्यासि सर्व जमा जाले ।। पृछा सेठान केली ॥ जर काहिं उपदेश पाहावा जेणेकरोन पुत्रसंतति होये।। यैसा प्रस्त्र आरंभिला ॥ तेधवां धर्मशास्त्र पाहिलें ।। सोमयाग आणि ठाकुरजीचें देवालय बांधावें ॥ यैसा निर्वाह सांगितला।। तो विठलदासास मानला ॥ त्या उपरांत वर्ताळा केला ।। तेधवां म्लेंछ उत्पन्नता सांगितली ॥ जर दिल्ली मध्यें सुलतान उपजला आहे ॥ तो पातशाहि करिल ॥ तेधवां धर्म लोपेल ॥ देवालय भंगिल ।। राजे देशोदेशिचे शरण म्लेछांसि होतिल ॥ म्लेंछधर्म वृद्धी पावेल ॥ कलयुगभाषित भविस्यार्थ आहे ॥ यैसि वाग्वाणि आईकान पृछा पुन्हा सेटे केली ॥ जर यासि येत्न पाहिला पाहिजे ॥ तर आपण दील्लिस जावोन त्या सुलतानखत आणितों जर देवालय चिरायु राहेल ।। ह्मणोन द्रव्य उटें च्यार घेवोन विठलदास द्वारके होवोन दिल्लिस गेला ।। पृछा आदरिली जर सुलतानका डेरा काहां ।। पुकारित जात येक खेापटि देखिली ॥ त्या मधोन ह्मातारि वृद्ध आलि ।। विचारों लागलि जर सुलतान माझा बेटा ॥ तुम्हासि काय दरकार पुसाव याची ॥ आईकोन सेट बोलिला जर त्याचिं भेट घेणे आहे जरुर ।। त्या योग्य काम जाणेान आलों आहे ।। ती म्हणो लागलि जर सुलतान गोवांरे घेवोन चारायास नेलें।। त्यासि गोठणि भेट होईल।। तेधवां त्या म्हातारिस समागमे घेउन गोपचारा पाहित गोठणि गेले ।। तेधवां त्या सुलतानें काये आरंभिलें तें ।। आपण धोंडि वर आसन घातलें आहे ।। मोवंळे चौफेर उभे केले आहेत ।। बोलणे मंजुळ दृष्टि कुर्म पाईं पद्म शुभलक्षणें मंडित ।। विठलदासें देखोन मनि गांठ घातली जर हा छत्रपति होईल ।। तेधवां संटे अर्ज केला ॥ जर मी मागेन तें दीधले पाहिजे । तें आईकोन सुलतान बोलता जाला ।। तर आम्हि गोवंळे पशु राखावीं ॥ आह्माजवंळ काये आहे तें तुमचें ॥ जाणोन मागणे नलगे ।। आह्मा आज्ञा प्रमाण ।। मग सेट बोलता जाला जे तूं आज गोवळ परंतु पातशा होसिल ।। राज्य पृथ्विचें करिसिल ।। तरी येक माझें मागणे ।। जर आपण देवुळ द्वारकेस बांधितों ॥ ते कोण्हि भंगावें नाहि ॥ यैसें खत तुज पें मागतों ॥ तें दिधलें पाहिजे ।। मग प्रतिउत्तर केलें ।। जर माझे देणे या युगांत चालेल तें देतों ।। तर देवालय सुखें बांधावें ।। परी आकार वरि मसिधिचा करावा ।। जे दुसरे पातस्याहि होतिल ते हि पाळितिल ।। यैसें आपले हातिचें खत सेट विठलदासास दीधलें ।। मग त्या वाणियान सुलतानास द्रव्य उटें दोन दीधली ।। आपण परतला ॥ द्वारकेस आला ।। देवालय बांधिलें ॥ उपर सुलतान घरि आला ।। द्रव्याचि गणित पाहिली ।। द्रव्य ८ लक्ष हुन जाणोन हर्षला ।। आपलि ज्ञात जेथे होति तेथोन बोलावोन जमा केली ।। ५ सहस्त्र जमा जाली ॥ त्या उपरांत येक दिवस राजा दिल्लेश्वर पारधिसिं गेला ।। दळ सवें गेलें ।। तें देखोन ईश्वरि इछा शक होणार ह्मणोन सुलतांन चढाये केलि ।। जावोन किल्ला घेतला ।। रायासि कळलें ॥ तेथें युद्ध जालें ।। राजा मारिला ॥ या परि पातस्या सुलतान तकतिं बैसला ॥ पातस्थाहि करों लागला ॥ त्यासि पुत्र जाला ॥ नावं सुलतान आलावदिन नाव ठेविलें ॥ त्याणे निकामलिक वजिर केला ॥ त्या उपरांत दिल्ली होउन भाट कोकणि आला ॥ माहिमा राजा नागरशा त्यासि देखोन, पातस्या जीवें, सुलतान आलावदिन ॥ पद वाने वाखाणिलें ।। तें आईकोन त्रिपुरकुमर कोपला ।। ह्मणे हा दुर करावा ।। नासिक छेदावें ॥ ग्रामा बाहेर देशि हाकलावा ॥ तो अपमान पावोन भाट दिल्लीस गेला ॥ जावोन पातशासिं अर्ज केला ॥ पातस्या जीवें, कोकणि अपेश पावलों ।। तें देखोन आलावदिन कोपला ॥ मग निकामलिक पाचारोन हुकुम केला हिंदु चढ्या घोड्यासिं फत्ते करावें ॥ राजे दक्षणेचें घ्यावें ।। सवें दळ घोडे १२०० फौज चालिली ।। अमदाबाजीस आले ।। चापानेर पाटणी राजा जयसिंग त्याचे राज्ये घेतलें ।। ते हि समागमि घेवोन कोकणि आला ।। कळब्या पावला ।। तेथोन ठाणे काबिज केलें ।। तेथें युद्ध थोर जालें ।। तेथोन सिवां उतरला ॥ माहिमास गेला ।। तवं राणिने गलबला आईकिला ।। सेवक रायासिं पाठविला ।। वाळकेश्वरि राजा गेला होता ॥ मग राणिन युद्ध केलें घटिक १०॥ समरंगाणि राणि पडलि ।। मग राउळ लुटिलें ॥ तेथोन भाईखळ्या येतां रायासिं भेट जाली ।। भाईखळ्या युद्ध जालें ॥ तेथें राजा मारिला ॥ राजा राणि मारिली ।। निका मालिकें राज्य घेतलें ।। मग तेथोन निका मलिक परतापुरि आला ॥ राउळ उत्तम देखिलें ॥ तेधवां जैतचु-याचा पुत्र भागडचुरि प्रथम निका मलिकास भेटला ।। देसाची जमि सांगितली ॥ माहाले प्रगाणे खापणि गावे वोळी ।। हवाले मसाले हाट बखाल आदाय खर्च ।। सर्वे निका मलिकास सांगितलें ।। तें आईकोन निका मलिक मेहरवान होउन भागडचुरि हुजुरमजलसि-पद दिधलें ॥ मग निका मलिक परताबपुरि राहिला ।। मग तेथोन पत्रें दिल्लीस पाठविलीं ।। खबर दिधली ।। जर कोकण घेतलें ॥ तेधवां निका मलिकाचा बंधु मलिक आलावदिन नामजाद केला ।। त्यास हि कोकणि पाठविलें ॥ तो ठाण्यासिं आला ॥ निका मलिक बंधुसि भेटला ॥
महिकावती (माहीम)ची बखर
श्लोक
बकदालभ्यं यदा गेात्रं प्रभावति कुलदेवतः ।।
ठाणे स्थाने कृतं राज्यं मम मुद्रा विराजितं ॥ १ ॥
ऐसिं खतें राया नागरस्याने पाहीली ॥ त्या वरि आपण हि सहि घातली ।। त्यांचिं त्यांपें दिधली ।। मग पाठविले घरोघरीं ।। त्या उपरांत राणि कोनि नीघाली ।। पुत्र जाला तेधवां नागरस्याने बहु धर्म केला ॥ ठाण्या हवालदारासिं पत्र लिहिलें ।। धर्म लक्ष दमाचा ।। माहिमा जोतिषि वर्ताळा करोन नामाक्षर केलें ।। नाम त्रिपुरकुमर ठेविले ।। ब्राह्मणासि लक्ष दाम दिधले ।। त्या उपरांत चेउल चंपावति तेथे राजा भोज तो प्रमादला ।। त्याचं हि कुळि पुत्र नाहि म्हणोन तें हि राज्य नागरस्यासि जालें ।। मग दळ रायें नागरसें आपुले देशोदेशि ठेविलें ॥ ते संख्या ।। चेवलास राजप्रधान आणि दळ घोडे २००० हस्ति १४ ।। सजणगांवी ठेविलें घोडे ९०० हस्ति ६॥ सैलान ठेविले घोडे २०० हस्ति ५।। चिखलिनवसारि ठेविले ५० ॥ प्रदापुर ठेविले २०० हस्ति १ ॥ मुळगांवि ठेविले १०० ।। ठाण्या ठेविले १००० हस्ति ५ ।। एवं अवघे दळ चार सहश्र नवस ॥ हस्तिं ३० ।। या उपरांत मेहुणा नागरस्याचा बोलिला जर तुह्मि अवघा देश काबिज केला सत्ता आपुलि चालविता तर मी जे काहि तुमचे समागमि आलों मला काहि ठिकाण द्यावें ।। जें मी नेमिलें आहे तें सांगतों ।। ठाणे मालाड व मरोळ हे तीन गावें आपणासिं द्यावें ।। तेधवां नागरस्या बोलिला जर अवघा देश तुमचा आहे ।। परंतु हे तीन ठिकाणे सांडोन दुसरिं पाहिजतिल तीं सुखें घ्यावी ॥ तेधवां शब्द अमान्यता दिसोन आला म्हणोन तिघे भाव फिरावण जाले ।। ते तेथोन निघाले ।। ते देवगिरिस जावोन रामदेरायासी भेटले ॥ वृतांत सांगितला जर अवघे कोकण यावत् चंपावति राज्य नागरसें घेतलें ॥ आमचे बळें ।। आतां फिरावण जाला ॥ आम्हासि दवडिलें ।। ह्मणोन शरण तुजला ।। जर आम्हास साह्यें तुह्मी व्हावें ।। राज्य नागरस्याचें घ्यावें ।। आईकोन रामदेराव आपले दळे त्यांसि साह्मे होवोन नागरस्या वरि चाल केलि ।। कटक ठाण्यासिं आलें ।। खबर राया नागरस्यासि कळली ।। तेधवां चेदणिकर पाटेल आपले दळे रामदेरायासि भीडला ॥ युद्ध थोर जालें ।। ठाण्या होवोन कळ व्यास पिटाळोन रामदेराय घातला ॥ जहर केला ती खबर राया नागरस्यासि पावली ।। जे चेंदणिकर पाटेल आपलें परिवारें युद्ध केले ।। तवं राजा ठाण्यासि आला ॥ सर्वांसि भेटला ।। चेंदणिकर पाटेल बोलावोन आणिला ।। सभे माजि नावाजिला ।। छत्र सुवर्णकळसाचें दिधले ।। मग नागरस्याचा पुत्र त्रिपुरकुमर पित्रु-आज्ञा घेउन शेषवंशाचि बहु योजोन युद्धि प्रवर्तला । युद्ध थोर जालें ॥ मग त्याहि काढावा काढिला ।। माहुलि प्रवेशले ।। तेथे ही त्रिपुरकुमर पावला ॥ दळाधिपति हेमपंडित हारविला ॥ दळ भंगिलें ।। ऐसें नागरस्याचें पुत्रास जालें ।। नानोजी ।। विकोजी ।। व बाळकोजी हें हि हारविलें ॥ मग त्रिपुरकुमर येशस्वी आपुले गांवि आला ।। रायासिं भेटला ।। तेधवां माहिमकर म्हातारा दादपुरो थोर झुंजला ।। ह्मणोन रानवटकर पद राणे पावला ।। राणेपद राया नागरसें दिधले ।। हें देणे राया नागरस्याचें ।। व पाटेकर अनमानिले ।। दळवाडियेसि नव-अर्बुदे नाव ठेविलें ॥ दुसरे बहु झुंजले त्यासि नांव बहुतका पदाचिं दीधली ।। पाटकर आणि राणे हे पूर्वसमंधि ह्मणोन पालवण कडु-पद चालोन आले ।। साष्टिचा देसला आपले दळें बहुत झुंजला ।। स्यासि सरचौक आधिकारिपद जालें ॥ गोहारिकरा पाईकाला विराण दिधलें ।। नाउरकरांला नेजा काहाळा ।। कांधवळकरांला घोडा दिधला ।। साहारकरा पाईकां पाटवृंदे ।। हें देणे राया नागरस्याच ॥ छ ।। ॥ छ ।।
त्याउपर देवगिरिचा राजा रामदेराव त्याणे जोडा अहिनळवाडापाटणि लिहिला जर राजश्री जयसिंगदेवो जर केशवदेव निमाला ॥ ह्मणोन राजा नागरस्या घणदिवा होवोन येवोन राज्य घेतलें ।। देश आपला केला ।। त्याचे मेहुणे नानोजी व विकोजि व बाळकोजी माहाल मागतां त्यास अमान्यता केलि ।। म्हणोन आम्हास शरण जाणोन आपण हल्ला केला ।। तो निर्फळ गेला ।। म्हणोन तुह्मास लीहितों ।। जर साह्य आपण होवोन चढाये करावी ॥ राज्य घ्यावें ।। आपलें वृत शरणांगतास रक्षावें ।। ह्मणोन लिहितों की पत्र देखतां मुहिम आदरावीं ।। आह्मि सीद्ध असों ।। पत्र प्रविष्ट होतां च राजपुत्र आनंददेव दाहासहस्त्र अश्वासि अहिनळवाडेपाटणा होवोन निघाला तो देवगिरिस आला ।। रामदेरायासिं भेटला ।। तैसि च फौज कोकणा आलि ।। वेसावे प्रथम घेतलें ।। तेथोन आंधेरिसी आले ।। तेथे युद्ध थोर जालें ।। धावणे सिंध्याचे पावले ।। मारामारि जाली ॥ तेथे अहिनळवाडे-पाटणिचा राजपुत्र पडला ।। त्याची स्त्रि आधेरिस सती निघाली ।। तेथोन मोड जाली ।। छ ।।
महिकावती (माहीम)ची बखर
येकसारची पाखाडि बोखळि तेथिचा पाईक ।। त्यासी विरगांठ दिधली ॥ आणि वृत्त पोमदे राउताला बकसिस ।। आणि सिंध्यासि अफदागीर दिधलें ॥ रायें केशवदेवाही ।। सर्व आपुलें दळ पैराविलें ॥ मग राजा ठाण्या होऊन केझमरिस गेला ।। ठिकाण कान्हेरिस केलें ॥ राजा कान्हेरि राहिला ।। राजा भोज आज्ञा मागोन धारेसि गेला ।। या नंतर येक दिवसिं भोजराजे आंबे केशवदेवासिं धाडिल होते ते मार्गि देवगिरिचे राया जश्वद्यान घेतले ।। वेठे रिते दवडिले ।। ते येवोन राया केशवदेवासि भेटले ।। वृतांत सांगते जाले ॥ आंब्याचा वृतांत ऐकोन केशवदेव कोपला ॥ प्रधान बोलाविला जर यासि येत्न हा चि भाट पाठवावा ।। ततक्षणि रवाना केला ।। जर कींनिमित्य आमची भेट लुटावी ।। भले हो चोरि करावी ॥ बेईजति लोक तुह्मी ॥ ऐसे जावोन भाट बोलिला ।। आईकोन जस्वद्या कोपला ।। त्याणे भाट परता केला ॥ जर माझ्या दुर्गास येवोन नाथ फोडावी ।। या वचना भाट परता जाला ॥ येवोन केशवदेवांसिं भेटला ।। वृतांत सांगितला ।। आईकोन केशवदेव कोपला ॥ देसाला हंकारा केला ॥ आला देस सर्व मेळविला ।। सर्व जमा जाला ।। नगा-या घाव घातला ।। निशाणे उभारिली ॥ सिंधे शेषवंशि आपले निशाणे आले ।। सूर्यवंशि आपले निशाणे आले ।। सोमवंशि आपले निशाणे सन्निध जाले ।। नाईकराव आपले परिवारे साह्ये जाले ॥ दळ हंकारले ॥ भैस्यादुर्गा वरि चालिले ।। वेढा घातला ॥ चौ-यासि दुर्गे पालटिली ।। किल्ला अवगड हाति येत नाहिं ।। ह्मणोन डेरा दुर्गा खालिं घातला ॥ राज्याचा निश्चये ऐसा जर गड घ्यावा ॥ वरषें भरली १२ ।। चिंचवणि खादले ।। त्या चिंचो-याचे वृक्ष जाले ।। त्याच्या चिंचा खादल्या ।। ईतके दिवस राहिले ।। परि गड हातिं येत नाहिं ॥ या नंतर आंधेरिचा ह्मातारा त्याचि वृत देसल्यान काढिली ।। ह्मणोन ता पळोन त्या गडी वरि पाईक राहिला होता ।। त्याणे राजयास पालती दिधली ।। नाथ पडे ऐसें उपकर्म केले ।। घरचा भेदु म्हणोन पालत जाली ।। द्वादश वरुषा उपरांत पाईका पाईक जालि ।। भैस्यागड घेतला ।। राजा जश्वंद्या जिवंत सांपटला ।। शरणांगत म्हणोन रक्षिला ।। आपले ताबि मध्यें ठेविला ।। आणि त्या आंधेरिचे गोजबासि ह्मातारा पद दिधलें ।। वृति तीन बकसिस केल्या ।। कापासे ।। सिवार ।। डोंगरी ।। ऐशा वृति दिधलिया ।। मग सर्व मिळोन नवसारिस आले ।। तेथ राजा मदमस्त गोदराव त्यासिं युद्ध थोर जालें ॥ त्यासि ही हारविलें ।। नवसारि घेतली ।। तेथे आपले सेनेला नावाजिलें ॥ वाणे थोर थोर वांटिलीं ।। सिंधे शेषवशि यांसि तुरे मोत्याच दिधले ।। सिरपाव बहुत वांटिले ।। आणि माहिमकर विनाजि ह्मातारा ॥ त्यास हि वाण दीधलें ।। थोर नावाजिलें ॥ देवनरकर गोपाळजि ह्मातारा तो हि नावाजिला ।। तेथे चि पोईसकर त्यासि काहाळा दोन श्रृति।। साहारकर बळकट ह्मणोन पटे दिधले।। उत्तनकराला मोहोरसिंग ।। गोहारिकराला विरगांठ आणि सर्वेपणाचि प्रोढि ।। येकसारकरांला ।। मोहोरिसिंग तयांला ।। येसांवकराला नावाजिलें ॥ येरगणकर बावनवीर यैसे सर्व आपले परिवारेसि ठाणयांसि आले ।। देसाला आज्ञा दिधली ।। सर्व आपले घरोघर गेले ।। त्या उपरांत राज्य केले संवत्सर ५ ॥ मग अकस्मात राजा केशवदेव यास देवआज्ञा जाली ।। तेधवां तें राज्य करावयास राज्यवंश नाहि ।। म्हणोन प्रधान जनार्दन राजि बैसविला ।। देशे देश मिळाला ॥ तेधवां आपण प्रधान बोलतां जाला ।। जर नवां तपयासि आपण राजा ।। सर्वा हि मान्य ।। माझिया वचनि राहावे ।। वचना खेरीज जो होईल तो दसाखेरिज ।। आणि चवदा माहालांचे दाम आह्मांसि भरावें ॥ जे देतिल नाहि ते मी पाहिन ।। व ज्यासि वृति केशवदेवान दिधल्या आहेत त्या सुखें त्याहि भोगाव्या ।। त्यासि कोणाचि बळात्कारि होईल त्यास स्यास्त आपलें देईन ।। यैसा निर्वाह सांगितला ।। तो सर्वासि मानला ।। पानपटि वांटिली ।। टिळा सर्वांसि जाला ।। सर्व देसचे आपले घरांसिं गेले ॥ तें राज्य जनार्दनें केले संवत्सर ४ ॥ त्या उपरांत घणदिवा होवोन नागरस्या राजा वैश्य ॥ गणेशमंत्र उपाशक ।। गोत्र कपिल ।। कुळदेवत सोमनाथ ।। राजा नागरस्या आपलें दळें दवणे प्रगट जाला ।। संवत १२२८ तत् राजिंद्रच क्रचुडामणौ शालिवान शके ११६ ३ माघमासे शुक्ल पक्ष ७ भौमे ते दिवसिं राजा नागरस्या कोकणि आला ।। सवें पुरोहित देवदत्त यजुर्वेदि मध्यानदिन ।। कुळकर्णिक कायेस्त रखमाजि ।। सरजमातदार गंगाजि नाईक ।। सरसबनीस येशवंतराव ॥ या उपरांत पाईक येवोन ठाण्या प्रगट जालें ।। जनार्दनासि युद्ध जालें ।। तेधवां जिंतिला ॥ मग आपला प्रधान केला ।। राज्य काबिज केलें ।। माहिमा आपण नागरस्या जावांन राजमहालिं राहिला ।। मग सर्व देसचे मेळविले ।। देसाये चवघले चौधरि ह्मातारे साहाणे पाटिल ।। हवालदार ।। माहालदार ॥ हाटबखाल ब्राह्मण सर्व खुमे आपले समुदायें खते कागदें पट घेवोन राजभेटीसि गेले ।। सिरपाव जाले ।। बैसकार सर्वांसी दिधला ।। देसायांसी मुलुक विचारिला ॥ जर हा देश कितिक प्रगाणे माहालें आदाय जमा विचारिला तेधवां सर्व खतें कागदें हिसाब चवदा प्रमाणे चवदा माहाले दोन खापणे ।। चौफेर हिंसाब रायासिं दिधला ।। जमा खजिना १४ लक्ष गबर उपज आहे ।। हिंसाब दिधला तो राया नागरस्यास मानला ।। या नंतर देसलिकीचा पटा केशवदेवाचे सिक्यासी ।। देसला भाई ठाकुर पोईसरकराला उंच ओहाणे भाग ५ ।। कांधवळकराला ओहाणे भाग ४ ।। येकसारकराला ४ खाडिया ४ त्यांचि नावें सेरी १ पाहुडि २ वोवळि ३ वादळी ४ या च्यार खाडिया खते मझरी ॥ या उपर उतनकराला सुकडा नाही ।। यैसि खतें दाखविलिं ।। सिक्का केशवदेवाचा ।।
महिकावती (माहीम)ची बखर
तेधवां चंपावति नगरी भोजराजा त्याणे चाल केलि ।। उरणा पासोन शाहाबाज प्रगाणा मारित कळव्या कटक आले ।। खबर राया बिंबदेवासि कळली ॥ तेधवां बिंबदेवें देशाला हंकारा केला ।। गावोंगावि पत्रें प्रविष्ट जालिं ।। दळ मिळालें जमा जालें सहस्त्र ८००० ।। कळव्या उतरान युद्ध थोर जालें ।। संवत १२४५।। तेधवां भोजराजा मारिला ।। दळासि मोड जाली ॥ तेधवां भोजरायाचा प्रधान साउमा जाला ॥ तें देखोन सिंधा शेषवंशि केशवराव उठावला ।। युद्धासि दोघे प्रवर्तले ॥ युद्ध थोर जालें । मग प्रधान मारिला ।। मग रायाचा पाळकपुत्र उठिला । त्या वर हंबिरराव मरोळचा देसाये ।। उठोन युद्ध जालें ।। हंबिरराव भोजाचा पाळकपुत्र मारिला । उरलें कटक पळोन गेलें ।। मग राजा मासवदा तळ्यावर आला ।। तेथें देसायाला वृती दिधल्या ।। तेधवां शेषवंशि केशवराव नांवाजिला ।। पदक गळ्याचे दिधले आणि पद चाघरि पावला ।। या रिती केशवराव चोधरि जाला ।। या उपरांत देवनरचे पाईके नामुस केला ।। म्हणोन पद ठाकुर पावला ।। मरोळचा देसाये थोर झुंजला म्हणोन काहाळा दोन श्रृति ॥ या उपरांत नाईकराव थोर युद्धी म्हणोन वाद्ये विराणे आणि वीरगांठ सावखेडकर पावले ।। आणि रघुनाथपंत थोर झुंजला ।। म्हणोन निशाण आणि सरदेशकि पावले ।। उतनाचे बारा राउत पडले त्याचे कुळास पद राउत जालें ।। कांधवळिचे १० पाईक पडले म्हणोन उरले कुळास पद चवघले जाले ॥ च्यार मान च्यार टिळे हातकडि पावले ।। साहारकर हातकडि वले ।। कोडिवटिकर कुशळ जाणोन शाहाने हात-सांकळ्या घातले ॥ देवनरकर जुनाई झुंजार म्हणोन सरनाईकी-पद पावले ।। चेभुरकर ठाकुरपद पावले ।। उतन गांहारीस मोहोरिसिंग नरसापुरकर विरगांठ ।। यैसें पदें हे देणे या बिंबदेवाचें ॥ पदे पानपटिं टिळे देवोन देसाय गावोगाविं गेला ।। राजा माहिमास आपुले कुटुंबि गेला ।। तेथे राहिला संवत्सर ९ ।। मग पोटि पुत्र जाला ॥ धर्म बहुत केला ।। या उपरांत राजा बिंब प्रमादला ॥ राजाची राणी माई ॥ पुत्र वरुषा ५ नावं केशवदेव ।। या उपरांत कामाईचा अभिळाष प्रधानें करों आदरिला ।। तेधवां कामाई आपले मनि खोंचली ।। जर यासिं कैसें करावें ।। तेधवां माहिमाचा आपला अधिकारि बोलाविला ।। त्यासि वृत्तांत सांगितला ।। जरि प्रधान दुष्ट बुद्धी त्यास कैसा येत्न करावा ।। हरद पुरो अधिकारि बोलिला ॥ जर तुं आमचि माता ।। तुज पाहे ऐसा कोण आहे ॥ मग दिघिपाळिचे राउतासिं स्वज्ञा केलि देश मिळविला ।। वाडिया दाहा मध्यें रिवार मेळावा मिळाला॥ खुशालि केलि ।। कुसुंबा भांग प्याले ॥ सूर्यअस्त होतां च माहाल प्रधानाचा वेढिला । तेथें युद्ध जालें ।। पाहाल्या पाहाल्या प्रधान मारिला ।। सीर घेवोन कामाई जवळ गेलें ।। राण खुस्याल जाली ।। हरद पुरो आधिकारि आळंगिला ।। देसला नावाजिला ॥ मग देसायाला वृति दिधल्या ।। दीर्घिपाळिचे राउताला वृति वाडिया दाहा बकसिस ॥ प्रथम मान टिळा विडा अधिकारि यांस ।। सर्वेपणाचि प्रौढि तयाला ।। मग अधिकारियान देसायाला हंकारा केला।। मरोळकर मालाडकरांला येकसरकर पोई सरकर उत्तनकर सिंधे ईत्यादिकं सर्व देसाय मेळविले ॥ आणि पळसवलिकर ब्राम्हण राजगुरु पाहाडकर वनेवाळकर समस्त ब्राम्हण बोलावोन ।। केशवदेवासि अभिषेक केला ।। राजासेक्के गळा घातले ।। मग केशवदेवें कामाईस मिळोन देसायांला वाणे दिधलीं ।। मरोळकर माधवजि देसले त्यासि वृत ९ स्यां फद्यांची ।। त्या खालते चौघले त्यांसि फद्या ५ स्यां पाच ।। त्या खालते तारे यांस फद्या ४ स्यांचि ॥ त्या खालते साहाणे फद्या ३ ।। तैसे च मालाडखापणे देसला कमाजिराव ॥ त्यास हि वृत्त फद्या १० ॥ त्या खालते चवघले त्यासि फद्या स्यां ६ ।। ह्मातारेयांला फद्या स्यांचि ।। साहाणें यांला फद्यां ३ ॥ येकसरकर बोरवळि तेथिचा पाईक पामराउत तयाला वृत फद्या ९ ॥ येरगळकर सिंधा त्यासिं उत्तनजुहुचे पाटेलकी बकसिस वृती ५।। ठाणेकरांला वृति बकसिस ।। चेंदणि उतळश्वरकराला टेभ बकसिस ।। सिंधा शेषवंशि हरबा राउत आणि पाटेल दोघे मिळोन वृत टेंभ बकसिस ।। हें देणे राया केशवदेवाचें ॥ मग केशवदेवें ठाण्यासिं राज्य केले वरुषें १२ ।। तेधवा धारेसिं भोज या जवळ गेला ॥ राया केशवदेवाची पदें वाखाणिली ॥ पितामोहो यैसि गद्यपद्य म्हणता जाला ।। तेधवा राजा भोज कोपला ।। कालिचें पोर ऐसा अभिमान धरिला ॥ दळवै बोलाविला ।। आज्ञा दिधली जर सेना सिद्ध करावी ।। हल्ला ठाणे कोकणि ह्मणोन ।। दळ सिद्ध जालें ।। मुहिम केली ।। थेट कळव्यास आले ।। परदळ देखतां हाहाकार जाला ॥ येक केशवदेवा प्रति सांगो आले ॥ जर कटक भोजरायाचे आलें ।। देसायांला हंकारा केला ।। देसाय देसाय देस मिळाला ।। सिंध्याचा जमाव थोर जाला ।। नगा-या घाव घातला ॥ करणे बांके सिंगे डफ काहाळां विराणी वाजली ।। पाईकापाईक जालि ।। कळव्या युद्ध थोर जालें ।। तेधवां देवनरेचे विनायक ह्मातारे याणे राया भोजाचें छत्रिची खिळ विंधोन छत्रि पाडिली ।। दुसरे बाणे सीरिचा गाळटोप पाडिला ।। युद्ध थोर जालें ।। राजा भोज अपेसि जाला ।। या नंतर भैसेदुर्गाचा राव त्या भोजासवें आला होता ।। तो हि युद्धी मिसळला ॥ त्या वर येकसकर पाईक उठावला ।। तो सिंध्याहि वारिला ।। मज असतां बापुडें म्हातारें युद्धी दबाजा करिताती म्हणोन संभाजी पाटेल शेषवंशि उठावले ।। युध्या लागि प्रवर्तले महामारि पेटले ।। दळ भोजाचें भंगिलें ॥ आणि भैस्यदुर्गाचा राव जीवंत धरिला । मग आपलें दळ आलें ।। केशवदेवासिं भेटलें ॥ बंद हवाले केला ।। या रिती केशवदेव येशवंत जाला ॥ भोजराजा शरण आला । मग केशवदेवें तयासि बहुत मान केला ।। पांच लुगडि सीरपाव दिला ॥ तैसें चि आनंदरावासि पैराविलें ।। तत्समइं भोजरायें भोगाईत ठाण्यासि रचिलें ॥ या उपरांत केशवदेवें सिमल ह्मात-यासिं वाहाते यंत्र आळा दिधली ।।
महिकावती (माहीम)ची बखर
।। याच देशले ।। रखमाजिराव ।। यांहि गावांचा वसुल करावा ।। यैसें खत दिधलें ।। रखमाजीराव देशला मरोळा स्थापिला ।। या उपर गंगाधरराव मालाडि स्थापिला ॥ दाहा सहश्र सजगाणिस खोति त्यासी दिधली ॥ त्याचे ताबिस गावं कोणकोण ॥ मालाड १ चिचघर २ डिडोसी ३ कुन्हार ४ पाहाड ५ बीलवड ६ वोळणे ७ मालवण ८ कांधवळी ९ सिंपोवली १० येकसर ११ बोरवळी १२ कणेरी १३ माघठाण १४ पोईसर १५ दहिंसापुर १६ नरसापुर १७ फोंजिवरे १८ लाजीवरे १९ अव्हेलि २० केतवली २१ विराळि २२ ऐसें बाविस गावें मालाड खापण्या खालिं ।। गंगाधर या गावांचा देशला ॥ वसुल जमा करावा ॥ ऐसें खत राया हस्तिं साक्षसि दिधलीं ।। या रिती देशले स्थापिले ।। छ ।। या उपरांत सिंधे शेषवंशि खलक पाईक गणति सहश्र ३००० त्या मध्यें मुख्य बाळाजी सिंधा ।। शेषवंशि त्याचे हवालें बंदरकि चौफेर दिधली ।। त्या मध्यें पांच गावं ईनाम ।। वरकड सा हजार सजगाणि राजपैकि मसाला ।। ठीकाण उत्तना।। उत्तन १ गोराई २ मनोरी ३ सावरी ४ वाडा ५ हीं गांवें इनाम ।। ईतर मसाला ।। येरगण आगसं २ पढ ३ बेतावं ४ आंबौलि ५ बाधौलि ६ आंधेरी ७ ईळे ८ पाटळे ९ तुरेर १० खारी ११ दांडे १२ जुहूं १३ कपासे १४ लाजुरलें १५ वसारे १६ डोंगरी १७ यवं गावें स १७।। मसाला ६ सहश्र सजगाणि ।। ऐसें खत रायें सिकाबंद दीधलें ।। बाळाजि सिंध्या कारणे ।। विडा पाटिलिकिचा रायें दिधला ॥ यापरि तो पाटिल सर्व आपले खुमाचा ।। त्याणें उत्तनास चउक बांधिला ॥ त्याचा निजांग पुतण्या तो जुहांस स्थापिला ॥ त्यास हि पाटिलपद जाले ॥ खाशाचा पुतण्या म्हणोन तो हि पद पावला ।। त्याणे जुहांस चउक बांधिला ॥ नावं पोमाळ ठेविलें ॥ त्याचे ताबिस कबिले ५० त्यांहि जुहा घरबंद केला ।। दुराठि वसविली ।। यावत् ताराघर बंद केला ।। या उपरांत सूर्यवंशि गंभिरराव सरिचटणीस गोत्र वशिष्ट ।। कुळदेवता काळिका ।। त्यासि ईनाम वरोळि पद पुरो देवोन आपले खुमासिं स्थापिला ॥ या उपरांत राजा तेथोन प्रभावतिसी आला ॥ दीर्घीपाळिसिं माहाल बांधिले ॥ नावं माहिम ठेविलें ।। राजा माहिमा राहिला ।। संवत्सर ९ माहिमा राज्य केलें ॥ राजपुत्र महिबिंब तो ठाण्यासि राहिला ॥ त्याणे ठाणे बळकावलें ।। समागमि विठोबा सोमवंशि सर फौजदार ।। त्याणे पांच पाखाड्या मसाल्यासिं घेतल्या ।। मसाला महीबिंबासि द्यावा ।। हजार ४ सजगाणि खत घेवोन पांचपाखाडि माहाल बांधोन राहिला । ताबिस राउत ५०० ॥ आाणि सिंधा शेषवंशि धमोंजि आवल्या दळासिं चेंदणिं राहिला ॥ मसाला सहस्त्र ३ ।। चेंदणी १ माघेरी २ टेंभ ३ उतळेश्वर ४ ही चार गावें मसाला कबुल करोन ।। धर्मोजिराव उतळेश्वरि राहिला ।। माहाल बांधिला ॥ पद वरातदार।। या रिती धर्मोजिस वरातदार पद जालें ।। राज्यास वरात मसाला सहश्र ३ सजगाणी ।। या उपरांत कोलभाट वसविली ॥ पाईकाहि ते सोमवंशि ।। त्याहि नांव कोलभाट ठेविलें ॥ तेथे राउत राहिले । त्यो उपरांत सरफोजदाराचा गुमस्ता हरबाजि तोरणा ॥ त्याणे माहाल हवाल्यासिं गावें १३ तेरा कबुल केलीं ।। सरकारजमा सहस्त्र ६ सजगाणि खोति खत घेतलें।। गुदगांव १ व्यांडे २ नाउर ३ भांडुप ४ मुळुंद ५ हरेळि ६ विखरवळि ७ कानझुरें ८ कोंपरें ९ कि-होळ १० तुरभे ११ माडळे १२ मानी १३।। त्याणे आपला समुदाये घेवोन व्याडासी तटाकातिरी गांव रचिला ।। गुदगाव तो हि वसविला ।। या उपरांत सरसबनिसाचा गोत्रज देवनरे ।। तागईत बारा गावें खोति केली ।। बारा सहश्र सजगाणि खत घेतलें ॥ आपण देवन-या राहिला ।। देवनरे । चेभुर २ वाडेवली ३ ह्याउल ४ घांटे ५ कोंपरे ६ चउक ७ चिल्हाणे ८ पारडि ९ बोरलें १० तुरफें ११ कोळगांव १२ हीं बारा गावें गंगाधरराये करोन आपण देवन-या आपल्या समुदायें गावें वसविलीं ।। तो तेथे राहिला ।। या उपरांत राजा माहिमा होउन ॥ आपला कुळकर्णिक त्यास घोडबंदर ईनाम दिधलें ।। तो घोडबंदरा. पाठविला ॥ त्याण्हे नदाथडिचे गावं खोति ४० सहश्र सजगाणि खत घेतलें ।। राजसिका घेवोन घोडबंदरा आला ।। डोंगर चौफेर पाहिला ।। उदक उत्तम जाणोन सेकनाड वसविलें ॥ तेथे शेषवंशि दादराव आपुलें समुदायें स्थापिला ।। आपण घोडबंदर वसविलें ।। ताबिस गावें गणति पाहातां । घोडेबंदर १ बोरभाट २ सेकनाड ३ चेने ४ वडवोळी ५ कावेसर ६ वोंवळे ७ बाळखंभ ८ माझिवडे ९ केबळी १० घोडगांव ११ खराळें १२ कासिमिरे १३ चादवोळ १४ भाईदर १५ गोरदेव १६ पाडेखल १७ सारवडी १८ नवधर १९ रेपवडे २० आगठो २१ माडलि २२ मुडधे २३ मोरवे २५ गोगरी २६ पाल २७ तारवडी २८ पाटालि २९ ह्मारवड ३० राये ३१ हीं गावें येकतिस ॥ तुरफे ३२ कोलसेद ३३ घालोन गावें तेतिस ।। सरसबनिस आनंदराव ।। शेषवंशि ।। गोत्र हरित ।। कुळदेवता हरबाये ।। यांहि मसाला कबुल करोन आपले पैकि सत्तेसि राहिले।। इतक्यांत राजा प्रमादला ॥ रायाचि राणि सती निघाली ॥ मग बिंबदेवाने राज्य केले वरुषे ६५ ।।
महिकावती (माहीम)ची बखर
तेथोन वाळुकेश्वरि गेला ।। मुख्य प्रधानासि भेटला । तेथोन मग विचार केला ॥ जे येथे लोक भले आणावे ।। देश वसवावा ।। ऐसा विचार केला ।। मग पत्र अहिनळवाडा पाटणि ।। व पैठणि लीहिली ॥ जर हा देश उत्तम स्थळ जाणोन रहित पंचाइत पाठवावी व चीरंजीव बिंबदेवास पाठवावें ।। मुजा देश वसवावा ।। म्हणोन पत्रें प्रविष्ट पैठणिं जाली ।। तेथोन अहिनळवाडा पाटणि पत्रें प्रविष्ट जालीं ॥ राया गोवर्धनबिंबा प्रति पावलीं ।। वाचुन अभिप्राव मनास आणिला ।। मग बिंबदेवा प्रती निरोप दिधला ।। तेघवा बिंबदेवाचे समागमौ कुळे ६६ देवोन रवाना केला ।। तीं कुळें कोण कोण ।। सोमवंशी कुळे २७ सूर्यवंशि कुळे १२ शेष वंशि कुळें ९ आणि पंचाळकुळें ५ मनुमाया २ सीलीक ३ त्राठक ४ देवाज्ञ ५ घोडेलकुळे ७ गुर्जरवैस्यकुळे ६ लाड १ दशालाड २ वीसालाड ३ मोड १ दसामोड २ विसामोड येवं अवघिं कुळें ६६ राजा बिंब घेवोन पैठणि आला ॥ आणि पैठणा होउन ।। राया समागमे ब्राह्मणसमुदाय यजुर्वेदि माध्यानदिन भेद वाजस्निशाखेचे ।। शास्त्रधारि वैदिकः पंडित: आचार्य उपाघ्येः जोतिर्विदाख्यः प्रोहितः नाइकः हा समुदाय राया समागमे पैठणा होऊन मुख्य गंगाधर नायक सांवखेडकर गोत्र पौतमाक्ष त्रिप्रवर ।। कुळस्वामिण यकविश ।। सेनादिपत्य मेघडंबर सुर्यापान ।। वीरगांठ हा राज्य मान्य ।। व कुळगुरुत्व सिंधे शेषवंशिकाचे जाणुन सहकुटुंबि ।। व विश्वनाथपंत कांबळे राजप्रोहित ।। भास्कर पंडित चामरे ।। गोवर्धनाचार्य देवधर प्रधान ।। अनंत नायक छत्रे ।। केशवराम घोडे ।। ईत्यादिक मोगरे।। जाधवे:हेमटे ॥ हा देशस्तब्राह्मणसमुदाये ।। राया समागमि आला ।। यांस मुख्य ठिकाण ।। पसपवलि इनाम गंगाधर नायकांस।। विश्वनाथपंतास पाहाड ॥ यां संमतें सर्व वृति धरून दुजे गावोंगाविं राहावविलें ।। आपण ठाण्यास येऊन वालकेश्वरि रायास भेटला ।। उभयांस भेट जालि ।। आलिंगनवृत्ति संपादिली ।। स्वस्तिक्षेम पुसोन साषष्ट कुळे जीं आलिं ।। त्यांहीं राजा प्रणामिला ॥ व ब्राह्मणि आशिर्वाद संपादिला ।। जाणोन राजा फार संतोषला ।। मग दिवस ५ तेथे क्रमिले ।। मागे सर्व समुदाये आपण वाहिनळें राजण फरास उत्तम ॥ जागा जाणोन वसाइत केली ।। दुसरि वसाईति मरोळि खापणे ॥ माहाळजापुर ।। मालाड खापणे ।। नरसापुरिं हि करविली ॥ प्रधान येत समईं कान्हेरि योगेश्वरि ।। महाकाळभैरवि ठीकाण ॥ सिद्धाश्रम ॥ राया हे हि कौतुकें सांगितलीं ॥ तीं रायें दृष्टि अवलोकिली ॥ कान्हेरिस राज्यधाम जाणुन तेथे वस्ति केली ॥ समुदाये आपला तेथे मेळविला ।। देशा आलिया कुळास वृति दीधल्या ॥ सूर्यवंशि राज्यधामि भाहिमी स्थापिले ॥ शेषवंशि सिंधे कुळे ९ नव त्यासि चवघले व मुख्य करोन दिधले ।। धारापुरकर बाळकोजी १ व दुसरा विठोजी गव्हाणकर २ व तिसरा थेवखंडकर ३ व चवथा पाचघ-या ४॥ या उपरात सोमवंशि रखमाजिराव देशले २७ कुळाचे ।। व या खालते चौघले ॥ येशवंतराव प्रथम १ सिवाजीराव २ गोपाळराव ३ मुकुंदराव ४ हे मुख्य टिळ्या विड्या चे ।। यानंतर सूर्यवंशि कुळे १२ ॥ त्या मध्यें राजगोत्रि देसाये ।। चौघले दामोदर १ बाळसेन २ श्रीदत्त ३ लक्ष्मीधर ४ हे मुख्य टिळ्या विड्या चे ।। गुजर बखाल गावोंगावि दुकाने मांडाविं ॥ तीन संवत्सर मोफत दुकानास मसाला नाहि ॥ उदिमी सुकडा नाहिं ॥ हरदेशिचा उदिम आणावा ।। त्यास जखात नाहि ।। संवत्सर ३ ॥ मग बंदिस्त होईल ।। ऐसिं खतं राया बिंबाने दिधलीं ॥ तेधवां पटवर्धन उभे राहिले जर आह्मि येथिचे स्थळगुरु ।। आह्मास राजराजश्रीहि वृत्त आमचि आम्हास द्यावी ।। मग राजा बोलिला । तुमचि वृत काढि ऐसा कोण आहे ।। जी तुमचि वृत्त आहे ति तुह्मी सुखें खावी ।। गावे वसवावी ।। हे जे काहि नूतन आले आहेत आमचे समागमि त्यांचे हि मुळगुरु आले आहेत त्यासिं तुम्हासि तालुका काहि लागत नाहिं ।। ऐसा निवाडा जाला ।। गावोगाविं रहित स्थापिली ।। ब्राह्मण येजुर्वेदि पळसौलिग्राम वृति ईनाम दीधला ।। ते पळसौलिस राहिले ।। या नंतर रखमाजिराव मरोळखापण्यासिं स्थापिला ॥ हवाला माहालें दिधली ।। नव हजार सजगाणि वर्षास रायासी द्यावें ॥ त्याचे ताबिस गांव मरोळस्वापण्या खालीं ।। मुळगांव १ चाचाळे २ कालिणे ३ कुराळे ४ साहार ५ कोडिवटे ६ राजवोळ ७ परतापुर ८ दळगांव ९ मोरवोळ १० वरवसं ११ तुगवे १२ सांखळी १३ चेंदरली १४ कोपरी १५ पोंवै १६ साहि १७ पळसवलि १८ कोसिंबे १९ माहाळजास २० गोरखगांव २१ आरे २२ ही गांवें मरोळा खालि
महिकावती (माहीम)ची बखर
श्रीगणेशायनमः
।। श्री कुळदेवतायनमः ।। श्रीगुरुचरणकमलेभ्यों नमः ॥
स्वस्ति श्रीनृपविक्रमार्कसमयांतिसंवत ११२५ तत् राजिंद्रचक्रचूडामणौ शालिवान-शके १०६० शशीरुतौ महामांगल्यमासोत्तम-माघमासे शुक्लपक्षें ५ सोमवासरे तद्दिनी अहिनळवाडेपाटण तत्समीप चांपानेरपच्यासि प्रगणे मुख्य माहालें तेथें राजा सूर्यवंशि प्रतापबिंब गोत्र भारद्वाज पंचप्रवर शाखा कात्यायनि कुळदेवता ॥ प्रभावति त्याणे जेष्टबंधु जवंळान्न मुहिम करों आदरिलीं ॥ ते वेळि जमा सेनादिपति नाइकराव व सरकारकोन रघुनाथपंत बोलावोन दृढाव केला ।। जरि चढाये कोकणि करावी ।। तत् समइं राजगुरु हेमाडपंडित यजुर्वेदि माध्यान वाजस्त्रि-शाखा भार्गव-गोत्र त्रिप्रवररान्वित कुळदैवत चंडिका सप्तश्रंगि उपनावं चामरे ।। त्यांसी विनंति केलि जरि स्वामिने कृपा करोन आमचे समागमि यावें ।। तेधवां सुमुर्त राजा प्रतापबिंब १० सहस्त्र अश्वासि चालि केलि ।। राया समागमि सरसुभेदार ।। केशवराव सोमवंशि ॥ गोत्र बकदालभ्य ॥ कुळदेवता पद्मावती ।। आणि सरसबनीस शेषवंशि आनंदराव ॥ गोत्र हरित ।। कुळदेवता हीरबादेवी व सरचिटणिस गंभिरराव सूर्यवंशि ॥ गोत्र वशिष्ट ।। कुलदेवता काळिका ।। व हवालदार सोमवंशि पुरुषोत्तम ॥ गोत्र गौतम ।। कुळदेवता नारायणी ॥ व मुजुमदार सोमवंशि ।। गोत्र विश्वामित्र ।। कुळदेवता ललिता ! व कोटवाल पटवर्धन गंगाजी ।। गोत्र रेणुक ॥ कुळदेवता योगेश्वरी ।। व मुख्य प्रधान बाळकृष्णराव सोमवंशि ।। गौत्र कौंडण्य ।। कुळदेवता कुमारिका ॥ हा सर्व समुदाय घेवोन चाल केली ।। राजा प्रतापबींब सहकुटुंबि पैठणि आला ॥ तथ राजा विक्रमभोंम सूर्यवंशि त्याणे अतिभ्य विशेष करोन राया प्रतापबिंबास सन्मानल ।। विनति करोन रायास पैठणि स्थिरावलें। वर्षे २ राजा प्रतापबिंब पैठणी राहिला ।। ईतक्यांत मुख्य प्रधान बाळकृष्ण राव बोलता जाला ॥ जर लस्करि खाजना लघु जाणोन मुहिम कोकणि अनमानिली । बुद्धा रायासिं मानली ॥ तेधवां हंकारा कला सैन्य चालिलें ॥ तेधवां पैठणा होउन दशल हरबाज राया समागमी आपले परिवारें निघाले ।। व बाळाजि सिंधा राया समागमी आपल परिवारे ।। सरजमातदार राजयुद्धी प्रखर जाणोन या विक्रमभामें पानपटि देवोन पाठविला ।। सहश्र दोन घोडे ताबी रायान दिधले ।। दक्षणे चालि केली ॥ ते येवोन दवणे प्रविष्ट जाले ॥ तेथे राजा काळोजि सीरण्या त्यास हेर पावतां च शरण तो जाला ।। लोढि दवण यावत् चिखली काबिज केलि ।। मुलुख उद्दस देखोन रायें विचार केला ॥ रम्य स्थळ समुद्रतीर देखोन संतोषला ।। तेथे कुळकर्णिक हरबाजि कायस्त ठेविला ।। आपण राजा दळेसि चाल केली ॥ तारापुरा पासोन यावत् महिकावती प्रविष्ट जाले ।। तेथे राजा विनाजी घोडेल ॥ त्यास दुर करोन ।। राजा महिकावतिस राहिला ।। देशाचि जमा पाहिली ॥ देश उद्दश ठाइं ठाइं अतिशुद्र घोडेल निचयाति उघडे लोक देखोन विचार मांडिला ।। जर या देशिं भले लोक असते तर देश वसाईत होईल ॥ ईतक्यांत मुख्य प्रधान बोलता जाला ।। जरि स्वामिने आपले दृष्टि प्रथम देशाचि जमि पाहावी ।। कीतिक प्रगाणे माहाले स्थापणे ॥ त्या प्रमाणे केलें जाईल ॥ बारा सहश्र फौजीस आदा पाहावा ।। मग जो विचार केला तो केला जाइल ।। वचन रायासिं मानलें ।। बोलता जाला जर तुह्मी दळ घेवोन मोहिम करावी ॥ देशाचि जमी पाहावी ॥ यावत् वाळकेश्वरि जावें ॥ देश काबिज करावा ॥ मुलुख पाहावा ।। त्या प्रमाणे केलें जाईल ।। म्हणोन मुख्य प्रधान बाळकृष्णरावसंन्निध जाब केला ॥ जर आज्ञा प्रमाण स्वामिची ॥ विडा रायें दिधला ॥ हंकारा केला दळ सवें दाहा सहश्र ॥ देवोन रवाना केला ।। मग महीकावति होन प्रधान निघाले ।। थेट हाटदळ पापडि पावले ।। तेथोंन ठाणे-कोकणा प्रविष्ट जाले ॥ तेथे राजा येशवंतराव त्यासि युद्ध जालें ।। येशवंतराव मारिला ।। राज्य घेतलें ।। कळव्यांत ग्रामस्त कोकाट्या तो हि शरण आला ।। प्रगाणा पाहिला ।। चित्तास आला ॥ मग तेथोन मठास गेले ।। तेथे देवालय हरबादेवि ग्रामदेवता ।। आणि मुक्तेश्वर देव ।। तडाग ब्रह्मकुंड ।। ये साव्या पासुन जुहु ॥ यावत् वाहिनळें ॥ राजण फार पाहोन वाळुकेश्वरि गेले ।। बाप्पगंगा देखिली ।। हनुमाप्रतिमा लक्षिली ।। तेथें स्थिर जाले दिवस ५ ॥ मग तेथोन जमि पाहिली ॥ गणति जमिची पाहातां ॥ यावत् वाळुकेश्वर महिकावति मध्य ।। विलाथ अगणित पके कोस २८ महाअरण्य उद्दस जाणोन ।। कागद राया प्रति लीहिला ।। जर अवधि जमि देशाचि पाहिली ।। गणति कोस २८ पके जाणिजे ।। आज्ञा प्रमाण रायाचि ॥ जे विलाथ उद्दस जाणोन जें विनवाल तें केलें जाईल ॥ पत्र महिकावति प्रविष्ट जाले ॥ रायानें वाचिलें । वर्तमान मनास आणिला ।। तेघवा राजा आपण ।। महिकावति होवान ।। हंकारा केला ।। ठाणेयासि येवोन राहिला ।। विलाथ आपले दृष्टि पाहिली ॥ ते चित्तास आली ।।
कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना
राजवाड्यांचा वैचारिक-तात्त्विक पुनर्जन्म होणं शक्य होते, पण ते अशक्य झाले; कारण साधनसाहाय्याच्या अभावी गावोगाव हिंडून मराठ्यांच्या इतिहासाच्या साधनासाठी अनेक घराण्यांचे माळे साफ करून पायी प्रवास करून, सापडलेल्या दप्तरातून इतिहास-सुवर्णाचे कण काढण्यात सर्वच आयुष्य घालवायचे, व जाता जाता मिळेल तिथे चिठ्ठया लिहून धातुकोशासाठी धातूंचा संग्रह करायचा, व्युत्पत्त्या शोधायच्या, एकाद्या जयराम पांडेसारख्या भाटाच्या पद्यरचनेचा बहाणा करून शहाजी-शिवाजी यांच्या स्वराज्यस्थापनेचा विचार करता करता हिंदुसमाजरजनाशास्त्राचा अमोल राधामाधव ग्रंथ लिहायचा ! अशा आयुष्यक्रमात या विलक्षण बुद्धिमंताची झेप मार्क्स-एंगल्स किंवा रशियन क्रांतीपर्यंत पोचली नाही, हे आपल्या इतिहासशास्त्राचे व विचारसाधनांच्या हिमालयाचे एक एवरेस्टच शिखरच अज्ञातात दडून पडले असे वाटते. हे पाहून मनाला खिन्नता येते. भाषाशास्त्राची, संस्कृत भाषेच्या ज्ञानाची, इतिहासशास्त्रसंभाराची उकल करणारी हिंदुस्थानातली एक "जीनियस"च आपल्या जनतेने अकाली घालविली. इतिहासमंथनाच्या मेरू पर्वताला बांधणारा वासुकीचा दोरच महासागरात निखळून पडला व मंथन खुटले. त्या ताटातुटीच्या पन्नासाव्या वर्षादिनी ती मंथनक्रिया नव्या साधनातील सिद्धान्तानी परत सुरू करण्याचा आपण सर्व विद्वज्जनांनी निर्णय घ्यावा,
खंडाळा, २५ डिसेंबर, १९७६
-एस. ए. डांगे
कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना
याचे खरे कारण तो रद्दड होता हे नाही. रेनॉल्डसने तिस-या जॉर्जच्या वेळची बादशाही घराणी आणि लंडनचे सरंजामी लॉर्ड गणांचा संघ यांच्या प्रेमकथांच्या, साध्या कुटुंबातील निरागस तरुणींना फसविण्याच्या लीलांच्या कथा "मिस्टरीज ऑफ दि कोर्ट ऑफ लण्डन" या दहा-खंडात्मक कादंबरीत उघड्यावर आणल्या. स्कॉटलंडचा कबजा घेण्यासाठी इंग्रजांनी काय कत्तली केल्या याच्याही कथा त्याने लिहिल्या. क्वीन एलिझाबेथने स्कॉटलंडच्या क्वीन मेरीला कसे मारले याचे क्रूर कथानक लिहिले आणि सगळ्यात मोठी कामगिरी या "रद्दड" कादंबरीकाराने बजावली तिचा उल्लेखही इंग्रजी वाङ्मयाचे इंग्रजी इतिहासकार करीत नाहीत. ते म्हणजे “सोल्जर्स वाईफ ” ( सैनिकाची बायको ) या कादंबरीत शिपायांना क्षुल्लक अपराधावरून श्रीमंत घराण्यातून आलेले अधिकारी "फटक्याची " सजा देऊन त्याचे अमानुष हाल करून जीवही घेत याचा स्फोट केला याची दखल घेऊन पार्लमेंटला हो फटक्यांचा प्रकार बंद करावा लागला. त्याची "सीमस्टेस "
( शिंपीण ) या कादंबरीतही कामगारस्त्रियांच्या परिस्थितीवरचा उल्लेख आहे.
असे असताही रेनॉल्डस्वर टीकाकार हल्ला करतात हे चमत्कारिकच दिसते असे मला वाटते. मी स्वतः याचे ग्रंथ १९१४ मध्ये वाचले तेव्हा मी चुकलो काय अशीही शंका येते. राजवाडे यांच्या आणखी एका सिद्धान्तवजा मताचा उल्लेख करून हे प्रकरण संपवितो.
संत रामदासांबाबत लिहिताना ते विचारतात की "भक्तिमार्गाचा, ज्ञानमार्गाचा, व कर्ममार्गाचा विस्तृत प्रपंच दासानी जसा केला तसा योगमार्गाचा का केला नाही ? ह्या शंकेचे उत्तर असे की मूळ वेदान्तात योगमार्गाचे महत्त्व विशेषसे मानलेले नाही...समर्थांनी योगमार्गाचा प्रपंच केला नाही इतकेच नव्हे तर केवळ हटयोगाचा त्यांनी उपहास केला आहे. आमचा पाण्यावर तरून जातो, जमिनीत पुरून घेतो, बीरमंत्र जाणतो वगैरे फटके असद्गुरूंना दासानी मारले आहेत. हटयोगाच्या बलावर अद्भुत चमत्कार करू जाणा-या भोंदूचा समर्थांना फार तिटकारा असे. शिवाजी व रामदास ही माणसे फसवेगिरीला विचारात किंवा आचारात बिलकुल भीक घालणारी नव्हती." ('राजवाडे लेखसंग्रह' साहित्य अकाडेमी प्रकाशन, पान २६४). आज आमच्या देशात चमत्काराचा धिंगा जो चालू आहे त्याबद्दल रामदास व इतर अद्वैत वेदान्ती तत्त्वज्ञान्यांचे हे विचार पहाण्यासारखे आहेत.
राजवाड्यांच्या लिखाणाचे व विचारभांडाराचे सर्वंकष दर्शन नुसत्या त्रोटक निबंधाने करणे अगदी अशक्य आहे. म्हणून हा अर्धवट व असखोल प्रपंच येथेच संपविणे बरे.
कॉ. श्रीपाद डांगे यांची प्रस्तावना
कादंबरी
राजवाड्यानी समाजशास्त्राचे जे विविध पैलू हाताळले त्यात जाता जाता त्यांनी साहित्याला हात लावला आहे आणि त्यातही त्यांची बुद्धिमत्ता, विशाल दृष्टी व वाचन किती होते हे त्यांच्या " कादंबरी" या निबंधात दिसते...."समाजातील हा जो पतित भाग आहे त्याच्या स्थितीचे प्रदर्शन करणे हे प्रत्येक कादंबरीकाराने आपले आद्य कर्तव्य समजले पाहिजे....या देशातील दारिद्याने गांजलेल्या, रोगाने पीडिलेल्या व विद्येने मागासलेल्या सामान्य जनसमूहाचा कैवार सहृदयतेचे मूर्तिमंत पुतळे जे कादंबरीकार त्यांनी घेतला नाही तर दुसरा कोण घेईल ?" साहित्यावरचे राजवाड्यांचे हे विचार "कादंबरी '' या निबंधात पाहून मराठीत साहित्यावर होणा-या वादावर बराच प्रकाश पडतो. पाणिनी, व्याकरण, वेद, प्रपंच, इतिहाससाधने, स्मृतिलुप्त झालेले नगर शहराचे संशोधन, धातुकोश एक ना दोन अशा शेकडो विषयांच्या अभ्यासात "कादंबरी" वाचनही चालू असे. ते केवळ मनोरंजन म्हणून नव्हे तर "समाजशास्त्राचा" भाग म्हणून.
त्या वेळच्या अनेक नामांकित साहित्यिकांचे त्यांनी मूल्यमापन केले. त्यात इंग्रजी भाषांतरित इतर देशातीलही लेखकांच्या कादंब-यांचे त्यांचे वाचन खूपच व्याप्ती करून केलेले होते. ह्युगो आणि टॉलस्टॉयची महती दाखविताना त्यांनी हरि नारायण आपटे यांना अलिकडच्या साहित्यसमीक्षकाप्रमाणे त्यांनी कच-यात टाकले नाही. हरिभाऊंची "काळ कठिण आला ” ही गोष्ट लिहून इंग्रजांचा राग ओढवून घेतला हेही इतिहासकार विसरले आहेत. माझ्या मनात एकच गोष्ट खटकली ती ही की त्यांनी फ्रेंच कादंबरीकार डुमासला एवढा मोठा दर्जा देण्याचे काय कारण ? आणि दुसरे असे खटकले की इंग्रज कादंबरीकार रेनॉल्डस् याबद्दल लिहिताना "इंग्रजी कादंबरीकारांतील अत्यंत रद्दड असा जो रेनॉल्डस् यांच्या भिकार कादंब-यांचेच आस्वाद घेणारे हरीचे लाल आपल्या इकडे पुष्कळ" हे विधान त्यांनी कां करावे ? त्याच्या अनेक कादंबच्या "रद्दड " समजायला म्हणजे नुसत्याच ऐतिहासिक गोष्टीवरचा रोमान्स आहे हे खरे. डुमासचाही तोच प्रकार आहे आणि हरि नारायण आपटे यांची 'रूपनगरची राजकन्या' किंवा 'वज्राघात' याच सदरात पडतील. रेनॉल्ड्सबद्दलचा हा समजच या अनेकांत पाहिला आहे. एवढेच काय तर इंग्रजी वाङ्मयाचा इतिहास लिहिणा-यांनी या ग्रंथकाराचा उल्लेखही केला नाही.