Deprecated: Required parameter $article follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $helper follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57

Deprecated: Required parameter $method follows optional parameter $type in /home/samagrarajwade/public_html/libraries/regularlabs/src/Article.php on line 57
Super User

Super User

पण तोफांचे शस्त्रसाधन करणे याचे महत्त्व राजवाड्यांना माहीत होते व त्याबाबतच्या शास्त्राबद्दल मराठी विद्वान व राज्यकर्ते गाफिल व गबाळ ठरले असे त्यांचे मत आहे; त्याची तात्त्विक बैठक शोधायची तर या घटनेच्या चर्चेसाठी मार्क्सवादी शास्त्रच वापरावे लागेल. ते काम राजवाडे करू शकले नाहीत हे खरे; पण या अत्यंत महत्त्वपूर्ण प्रश्नाबद्दल हा विद्वान शास्त्रज्ञ गाफील नव्हता. शहाजीवरील निबंधात ते लिहितात : "या प्रश्नाला उत्तर एकच आहे व अगदी साधे आहे. ते हे की उत्तम रेखीव व नेमके हत्यार बनविण्याची कला पैदा होण्यास शास्त्रीय ज्ञानाची जी पूर्वतयारी राष्ट्रात व्हावी लागते ती त्या काली महाराष्ट्रात नव्हती. शहाजीच्या हयातीत युरोपात डेकार्ट, बेकन इत्यादी विचारवंत सृष्टपदार्थसंशोधनकार्याचे वाली जारीने पंचभूतांचा शोध लावण्यास लोकांना प्रोत्साहित करीत होते आणि आपल्याकडे एकनाथ, तुकाराम, दासोपंत, निपटनिरंजन इत्यादी संत पंचमहाभूतांना मारून ब्रह्मसाक्षात्कारात राष्ट्राला नेऊन मुक्त करण्याच्या खटपटीत होते. अशाना स्कू, टाचणी, बंदूक व तोफा यांचा विचार वमनप्राय वाटल्यास त्यात नवल काय ? ज्या दिवशी व्हास्कोने कालिकतच्या चातुरीच्या थोबाडीत मारली तोच हिंदुस्थानचे साम्राज्य युरोपियनांच्या हातात जाऊ लागण्याचा पहिला दिवस होय... लांब पट्टयांची कारीगार हत्यारे त्यात त्यांचे सामर्थ्य होते. ही हत्यारे म्हणजे युरोपियन शास्त्रीय संस्कृतीचा केवळ निष्कर्ष होत...तेव्हा दोषाचा वाटा शहाजीप्रमाणेच तत्कालीन समाजावर पडतो हे उघड आहे...या बाबतीत दादाजीच्या पंक्तीस अकबर, शहाजहान, मीर जुमला व अवरंगजेब असे सारखेच बसतात. तेव्हा हा तत्कालीन भारतवर्षीय संस्कृतीलाच सर्वधारण दोष होय हे कबूल करावे लागते.'' ('राजवाडे लेखसंग्रह ' पान २०६ साहित्य अकाडेमी प्रत )

पण हिंदी समाज तरी असा कां राहिला याचे उत्तर मिळत नाही. त्यासाठी मार्क्स-एंगल्सप्रणीत शास्त्राकडे वळावे लागते. नाहीतर आजच पहा ना ? समाजवादी राष्ट्रांचे शास्त्रीय व सामग्री-सहाय्य व त्याचबरोबर त्याच शास्त्रांचा अभ्यास करून व आपले बुद्धिबल, संपत्ति व राज्यसाधन यांचा वापर करून परकीय तोफानी मार खाल्लेल्या या आपल्या देशातील बुद्धिमतानी शास्त्रज्ञांनी आणि राज्यकर्त्यांनी इथेच बनविलेला रॉकेट तयार केला व न्यूक्लिअर स्फोट करून आमच्या स्वातंत्र्यवाढीला धमक्या देणाच्या साम्राज्यवाद्यांना निरर्गल बडबड करायला लावली. हे पहाण्यासाठी राजवाडे हयात असते तर त्यांनी या नव्या समाजवाद-शास्त्राचे नवे पुरुषसूक्त रचले असते व चातुर्वर्णिकांच्या भुवनसंस्थेतून "एकवर्णी " समाजसत्तावादाचा कम्युनिस्टप्रणीत शास्त्राचा प्रचंड खंड लिहिला असता असे कां म्हणू नये ?

हिंदुस्थानातील जनतेच्या जीवनाला लागणा-या सर्व वस्तूंची उत्पादनक्रिया अत्युत्तम यंत्रबलाने व तज्जन्य भौतिक व मानसिक शास्त्राने सिद्ध होऊन, त्यावरचा भांडवलदारी अर्थसंबंधांचा व राजकीय पकडीचा पूर्ण निरास होऊन हा आपला समाज अत्युच्च समाजवादी संघटनेच्या स्तरावर पोचेल तेव्हाच सर्व जातिभेदांची व वर्णांची इतिश्री होईल हा सिद्धान्त त्यांच्या आकलनात आला नाही. नाही तर राधामाधवचा व पुरुषसूक्ताचा एक नूतन आविष्कार आपल्याला पाहावयाला मिळाला असता.

ही इतिहासज्ञानाची शोकांतिका टाळता आली असती का? हेगेल आणि कॉम्टच्यापुढे त्याना व त्यांच्या ऐतिहासिक-भाषिक ज्ञानभांडाराला नेता आले असते का? या प्रश्नाला माझे स्वतःचे उत्तर होय असे आहे .पण त्याला एकच अट होती की त्यांच्यासमोर मार्क्स- एंगल्स ठेवायला हवा होता.

असे ठाम विधान करण्यासाठी काय आधार आहे ? मराठ्यांच्या पराजयाची कारणे शोधताना त्यांना पोर्तुगीज, फ्रेंच, इंग्रज फौजांच्या लांब पट्यांच्या तोफांची अत्यंत प्रभावी व प्राणघातक व विजय-संपादक कामगिरी ध्यानात येऊन चुकली होती. तोफखाना, बंदुका, दारूगोळा हा मराठ्यांना अपरिचित नव्हता. शिवाजीला तोफा मिळविण्यासाठी इंग्रज, फ्रेंच, पोर्तुगीजांची काय काय मनधरणी करावी लागे, धमक्या द्याव्या लागत व पैसा आणि व्यापारसनदा द्याव्या लागत याचा पसारा त्यांच्या पत्रव्यवहारात आहे. असे असूनही हे इतके भयानक अस्त्र व शस्त्र इथेच निर्माण करणे, त्याचे मूलभूत शास्त्र अभ्यासणे या सर्वांना कां जमले नाही ? पेशवाईअखेर दिल्लीश्वरावर जरब बसवून महादजी शिंद्यानी आग्याजवळ तोफा करण्याचा कारखानाही फ्रेंच इंजिनियरना हाताशी धरून काढला होता; पण त्यासाठी त्याने लोखंड, सर्पण व रासायनिक सामग्री कुठून आणली याची चर्चा आपल्या इतिहासात नाही. ग्वाल्हेरचे दप्तर ज्या वेळी उघडले जाईल तेव्हा त्याचा खुलासा काहीतरी मिळेल.

जातिसंस्थेच्या उत्पत्तीची, विकासाची व स्थैर्याची जी परंपरा राजवाडे यांनी वर्णन केली त्यामध्ये मुख्य बिंदू वृत्ती हा आहे. वृत्ती बांधून देणे म्हणजे काय हा खरा प्रश्न आहे. वृत्ति-सामर्थ्याच्या रचनेवर आधारलेला जो समाज तो जातिबद्ध समाज. जात आणि वृत्ती ही जोडी सा-या समाजरचनेची फ्रेम आहे. त्याचा मूळ पाया म्हणजे वृत्तिकाराला म्हणजे जाति कुटुंबाला गावाभोवती जमिनीचा एक भाग मिळे, शिवाय त्यांची समाजोपयोगी वस्तू उत्पन्न करण्याची हत्यारे असत. ती त्याच्याजवळ असत आणि त्यांच्या वापरातून म्हणजे त्याच्या श्रमातून त्याला इतर जातिवाचक समूहांच्या श्रमाचे फल गावांतर्गत देवघेवीत मिळे व त्यावर त्याचा संसार व त्या सर्व वर्णीयांचा व जातींचा समाज भ्रम किंवा कर्मविभागणीनुसार चाले. जमिनीचा हिस्सा व अवजारांचे अखंड सातत्य यानेच बांधलेल्या हिंदु-जाती हजारो वर्षे अभेद्य व इतिहासाच्या पुनरावृत्त्या करीत राहिल्या याचे मूलभूत विवरण मार्क्स-एंगल्सने केले आहे. याचीच वर्णनात्मक व समाजरचनावाचक मांडणी राजवाड्यांनी केली.

हे जरी खरे असले तरी समाजपरिवर्तनाचा हा अबाध्य व सनातन कायदा हाच हिंदू समाजाचा प्रेरक, पोषक व संरक्षक झाला आहे व तसाच तो राहावा व राहील अशी समजूत राजवाड्यांच्या मनात गम भरली होती. ही पद्धती आता नव्या उत्पादनतंत्रात बसत नाही, कारखानदारीत व त्यावर आधारलेल्या समाजात जातींना व जातिकर्माला जागा नाही एवढेच नव्हे तर त्या प्रगतीला मारक होतात व त्यांचे मरण समाजवादात संपूर्णपणे होणार हे त्यांच्या लक्षात येणे अशक्य झाले होते. म्हणून राजवाडे हे कर्मठ ब्राह्मण व इतर जातीद्वेषी अशी त्यांची ख्याती झाली. एवढ्या प्रचंड विचारशक्तीच्या व जुन्या सर्व शास्त्रांचा, रूढींचा, धर्मसमजुतींचा चेंदामेंदा करून त्याची ऐतिहासिक उत्पत्ती सांगणारा, परमेश्वरालाही न मानणारा, विचार आणि विकार प्रदर्शनाच्या साधनांची उत्क्रांती कशी झाली याचे क्रांतिगर्भ विवरण करणारा हा महान् शास्त्रज्ञ ऐतिहासिक भौतिकवादाचा मार्क्सवादी सिद्धान्तापर्यंत पोहोचू शकला नाही ही एक मोठी हिंदुस्थानच्या इतिहासाला हानिकारक अशी घटना घडली यात संशय नाही. हजारो जातींचे व धंद्यांचे श्रमजीवी लोक भांडवलदारी वर्गसमाजपरिवर्तनाच्या मुशीत जातिवृत्ती सोडून एकच वृत्तिबद्ध म्हणजे कामगारवर्ग कसे बनतात व वर्गयुद्ध करून समाजपरिवर्तन कसे करतात व समाजवादाचे नवे जग निर्माण करून शस्त्र, शास्त्र व वृत्ती यांचे नव्या पुरुषसूक्ताचे समाजवादी गणसंघ कसे रचतात याचा गंधही राजवाड्यांना लागला नाही. त्यामुळे त्यांच्या विवेचनामध्ये ते वर्णाभिमानी व जात्यभिमानी बनले. आदि व मध्ययुगीन समाजाचा भारतातील अखंडपणा, अलौकिकपणा, संततपणा पाहून त्यांचे लक्ष वर्णजातीपद्धतीवरेच खिळून बसले. इंग्रजानी आणलेल्या नव्या जातिविहीन कल्पना; समाजरचनेचा प्रचार व तसेच आपल्या देशातील जातिभेदाच्या व त्या नष्ट करण्याच्या चळवळीमध्ये स्वराज्यसाधन व राजकारण यांचा अभाव पाहून त्यांचे समाजशास्त्रीय सिद्धान्त कोंडीत सापडले; पण पूर्वीचा हिंदुसमाज हा एकवर्णी व जातिविहीन होता हेही त्यांना दिसत होते. त्याचे पुढे त्रैवर्णिक व नंतर शूद्रागमनाने, जातिरचनेने चातुर्वर्णिक व अनंत जातिबद्ध स्वरूप हे कसे झाले हेही त्यांनी पाहिले होते. तेव्हा हा जातीजातींच्या कलहात गुंतलेला समाज परत एकवर्णी होईल अशीही मांडणी करून त्यांनी वर्तमान कलहातून रस्ता काढण्याची कल्पना मांडली. पण ते कसे होणार हे त्यांना उमगेना. वर्ण व जातीच्या आवरणाखाली मूलभूत उत्पादन-वितरणक्रियेमध्ये मूलभूत ज्या शोषणकर्त्या वर्णजाति व शोषित वर्णजाति व त्यापासून निर्माण होणा-या राज्ययंत्र वगैरे सर्वांचे योग्य वर्णन व वाचन करूनही त्यांना उत्पादनाचे हत्यार व त्यातून निघणारे मनुष्यसमाजाचे विविध वर्गबंधनाचे ब्रह्मांड उमगण्याचा सिद्धान्त मिळाला नाही. हेगेलचा सिद्धान्त अपुरा पडतो म्हणून त्यानी रामदासांचा आधार घेतला. काही इंग्रज इतिहासशास्त्रज्ञांकडे जरा नजर टाकली पण मार्क्स-एंगल्स दिसला नाही.
म्हणून एकवर्णी समाज परत कसा होणार याचीही फोड जमली नाही. त्यांचे आयुष्य संपण्यापूर्वी समाजवादी रशियन क्रांती व सोविएट समाजाची आजची वर्गविहीन समाजवादी समाजाचे व नवमानवाचे दर्शन होण्याची संधी मिळाली नाही व त्यामुळे समाजकान्तीचे, विचारक्रान्तीचे व विचमिंथनाचे फळ त्यांना लाभले नाही.

उबगणें [ उपगमन = उबगअण = उबगण = उबगणें ] ( भा. इ. १८३२ )

उंबरठा [ औदुंबर प्रकोष्ट: = उंबरठा ] ह्या ठिकाणीं उंबराच्या लांकडाचा उपयोग करीत.

उंबरा [उंबरक (दाराच्या वरची फळी) = उंबरा ] (भा. इ. १८३४)

उभ [ उर्द्धव = उब्भ (पाली ) = उभ ( भा-भी-भें )] ( भा. इ. १८३२)

उभट [ अवभ्रट = उभट ]

उभा १ [उद्वाहुः = उभा ] तो मुलाला घ्यायला उभा आहे. तो खायला उभा आहे.

-२ [ऊर्ध्वः = उब्भा = उभा ] ऊर्ध्वरोमन् = केंस उभे राहिलेला.

-३ [भा २ दीप्तौ. उद्भा = उभा ] शत्रू उभा करणें म्हणजे to make an enemy visible. उर्द्ध्वः पासूनचा उभा निराळा. ( धा. सा. श.)

-४ [उद्‍भा to become visible = उभा visiblel ] माझ्यापुढें भय उभें राहिलें catastrophe became visible.

उभें [ऊर्ध्वं] ( ज्ञा. अ. ९ पृ. ३७ )

उभ्या पिकाची जमीन - यद् एकस्मिन् संवत्सरे द्विः फलति तद् उभयतः सस्यं क्षेत्रं । ( आश्वलायनगृह्यसूत्रगार्ग्यनारायणीयवृत्ति-१-५-६ ) उभ्या पिकाची जमीन म्हणजे ज्या जमिनींत वर्षांतून दोनदा पीक येतें. (भा. इ. १८३६)

उमगणें [ उगमणें पहा ]

उमळा [ ह्मल:, ह्माल: = उमाळा, उमळा. ह्मल् चलने] उमाळा म्ह० हळहळ, मन:क्षोभ.

उमाठा १ [ ( उद्) मंथ्]

-२ [उन्माठ: = उमाठा. उत् म्ह० वर व माठ म्ह० रस्ता ]. उमाठ म्ह० ऊर्ध्व रस्ता, अंतरिक्ष.

उमासा [ उत् + मश् १ रोषकृते, क्रोधे ] तिटकारा. ( धातुकीश-उमस ६ पहा)

उमाळा [ ह्माल: ] ( उमळा पहा)

उमेठा [ उन्मेथ: ] जमाव. ( धातुकोश-उमेठ पहा)

उरदाणा [ उर्वरित धान्यं = उरस्फोड ]

उरफोड १ [ उरस्फोटः = उरस्फोड, उरफोड स्फुट् १० भेदने ]

-२ [परिस्फुटता = उरस्फोड complete esplanation)

उरस्फोड [ उरस्फोटः ] ( उरफोड १ पहा )

कथा वर्तलि सत्य ।। ती आईका आतां ॥ २९३ ॥
पैठणि राहिले नव जण ।। शेषवंशि जाण ।।
त्यांचि कुळगोत्रें येथुन ।। कुळदेवतायुक्त ॥ २९४ ॥

काळदंत    १ गोत्र हरिद्र      १ कुळदेवता हिरबाय       १
सोमदंत     २ गोत्र हरित      २ कुळदेवता हरबादेवी     २
विख्यात     ३  रेणुक            ३ कुळदेवता जोगेश्वरी      ३
हेमरक्त      ४ कपिल           ४  कुळदेवता काळिका      ४ 
कृतांत       ५ कपिलध्वज    ५  कुळदेवता वज्राये          ५ 
विरुदंत      ६ कासेश्वर        ६  कुळदेवता येकविरा       ६ 
येक्षदंत      ७ आस्तिक        ७  कुळदेवता महालक्ष्मी      ७ 
काळकोट   ८ विरोध           ८  कुळस्वामिण वज्राय       ८
शुभ्रमणी    ९ नृसिंह           ९  कुळस्वामिण येकविरा     ९

 ऐसिं सांगितली घोत्रें कुळदेवता ।। १३५ वर्षे भरलिं पैठणि नांदतां ।। 
या परि शेषवंशउत्पनता ॥ विश्वामित्रवाक्यें ।। १ ।।
पुढा परंपरा चालिली ।। कथा सविस्तारें सांगितली ।। 
साक्ष ब्रम्होत्तरी दिधली ॥ विश्वामित्रवाक्यें ॥ २ ॥
स्वधर्म शेषवंशाक्षी ।। द्वादश वरुपिं संस्कार तथासी ।। 
गणेशमंत्र जपमाळिकेसी ।। सांगितला असे ॥ ३ ॥
पुराणमंत्रि क्रियाकर्म ।। वर अश्व आसन ।।
बाहुटा आरक्तवर्ण ।। छत्र येक ॥ ४ ॥
सोहोळा दिवस नव ।। करावा लग्नउत्साव ।।
शेषवंशिचा निर्वाह ।। सांगितला सत्ये ॥ ५ ॥ 
पुढां लोमक प्रतिलोभक ॥ ज्ञाति जाल्या अनेक ।। 
त्या भविष्योत्तरपुराणि सकळिक ।। सविस्तारें सांगितल्या ।। ६ ।।

इति श्रीब्रम्होत्तरखंडे भविष्योत्तरपुराणे महाऋषिसंवादे
वंशविंवचनाधर्मस्थापननाम द्वीतियोध्यायः ॥ २ ॥

२ वाहाणा रूप संस्कृत उपानहौ या रूपावरून निघालेलें नाहीं. अक्षरविपर्यास झालेल्या जुन्या मराठी उपाहाणौ या रूपा वरून झालेलें आहे. संस्कृत उपानहौ पासून अपभ्रंश येणेंप्रमाणें होतील:-
उपानहौ = (उ लेप) वाणहौ = वाणहा

जुन्या मराठींत उपानहौ हें संस्कृत रूप येतांना प्रथम अक्षरविपर्यास होऊन उपाहाणौ असें रूप झालें व त्याचे वर्तमान मराठींत अपभ्रंश येणें प्रमाणें झाले :-
उपाहाणौ = (उ लोप) वाहाणौ = वाहाणा

उघड आहे कीं वाहाणा हें रूप अपभ्रष्ट उपाहाणौ या रूपापासून निघालें आहे.

३ मराठींत आद्य उ चा लोप होण्याची लकब आहे. उदाहरणार्थ-
१ उपास्थापनं = (उलोप) पाठवणें = पाठवणें. उपास्था म्ह० ( कोणत्याहि वस्तूकडे) जाणें. उपास्थापन (णिच्) म्ह० जाववणें.
२ उपोहनं = पोहणें
३ उपाध्याय = पाध्या
४ उपविश् = बइस = बैस
५ उपवादः=पवाडा ( निंदा) (हा अर्थ ज्ञानेश्वरींत येतो).
६ उपनमनं = वणवणें = ओणवणें
७ उपधारणं = पधारणें (गुजराथी ) (भा. इ. १८३७ पृ. १८५)

उपेरणें [ उपारंधनि = उपेर्‍हाणँ = उपेराणँ = उपेरणें उपरणें ] उपेरणें असा उच्चार करतात व तो शुद्ध आहे. (भा. इ. १८३३)

उफळणें [फुल् संचलने ] ( फुलें पहा)

उफाडा १ [ उत्फाल: = उफाडा ] उत्फाल म्ह० जोरानें विकास पावणें. (भा. इ. १८३७)

-२ [ फल् १ निष्पतौ. उत्फाल: = उफाडा]
उत्फालय् = उफाडणें (to expand by spliting).
उ०-मुलगी उफाड्यानें वाढते आहे म्ह० grows as it splitting like a शिताफळ ( धा. सा. श.)

उफ्राटें [ अवभ्रट a turned up flat nose = उफ्राटें ] उलटें वसकें फेफटें नाक.

उपस [ उपसह् मर्षणे ] उ०- नाना दुःखें उपसलीं to bear.

उपहुढ [उत्+ प्रस्वापः ] (धातुकोश-उपहुड २ पहा)

उपळसरी १ [ उत्पलशारिवा = उपळसरी]

-२ [ उत्पलसारिवा = उपळसरी ] (भा. इ. १८३६)

उपळा [ उत्प्लवः = उपळा ] उत्प्लव म्हणजे वर तरंगणें, येणें; पाण्याचा उपळा म्ह० वर येणें. (भा. इ. १८३७)

उपाइल ( ला-ली-लें) १ [ ( वैदिक ) उपम excellent, best + ल (स्वार्थे) = उपाइल (ला-ली-लें)] उत्कृष्ट, मोठें.

-२ [ उत् + प्री to love णिच् प्राययति ( बोपदेव ) निष्ठा उत्प्रायित + ल = उपाइल ( ला-ली-लें ) ] आवडतें:

उपाई [ उत्पादः = उपाईं] पुढले दोन पाय उभारून मागल्या पायांवर घोड्यानें उभें रहाणें.

उपास १ [ उप + अश् ९ भोजने ] ( धातुकोश उपास १ पहा)

-२ [ उपवासः, उपवासनं = भोजननिवृत्तिः उपान्वध्याड्वसः, ( १-४-४८) या सूत्रावर कात्यायनानें खालील वार्तिक रचिलें आहे.
वसे रश्यर्थस्य प्रतिषेधो वक्तव्यः ग्रामे उपवासति = भोजननिवृत्ति करोति । उपवास = उपआस = उपास उपोषण ( भोजननिवृत्तिः ) ] (भा. इ.१८३३)

उपाहाणौ - हा द्विवचनान्त शब्द ऊर्फ हें द्विवचनान्त रूप मानभावांच्या (लीलाचरित्र नामक) ग्रंथाच्या ७ सातव्या लीलेंत आलें आहे, तें असें :-
श्रीचरणीं उपाहाणी घातलींयां ॥

मूळ संस्कृत रूप उपानहौ. अक्षर विपर्ययानें उपाहाणौ असा अपभ्रंश सहाशें वर्षांपूर्वीच्या मराठींत झाला. द्विवचनें मराठी अपभ्रंशांत हि कायमच होत हें ध्यानांत ठेवण्यासारखें आहे. उपाहाणौचा अपभ्रंश वर्तमान मराठींत वाहाणा. तात्पर्य, वाहाणा हें रूप स्वरूपतः द्विवचनी आहे. आणि ज्या अर्थी उपाहाणौ हा कर्ता द्विवचनी आहे, त्या अर्थी घातलींयां हें क्रियारूप हि द्विवचनींच आहे. ग्रहिते असें मूळ संस्कृत द्विवचनी रूप. ग्राहिताचें मराठी घातली ( स्वार्थक ल प्रत्यय). घातलीचें द्विवचन घातलीया. मराठींत द्विवचनी व बहुवचनी रूपें एकसारखींच असतात. सबब, द्विवचनी रूप कोणतें व बहुवचनी रूप कोणतें तें कर्त्याच्या रूपावरून ओळखावयाचें असतें. मानभावी ग्रंथांत प्रस्तुत द्विवचनी रूप साक्षात् असल्यामुळें, जुन्या मराठींत द्विवचनी शब्दांचा व धातूंचा उपयोग क्वचित् होत असे, असें जें विधान मीं आपल्या ज्ञानेश्वरी-व्याकरणांत केलें आहे त्याला बळकटी येते.

उधोळणें [ उद्‍धूलन = उधोळणें = उधलणें (गुलाल, माती, राख ) ] (भा. इ. १८३३)

उन्हुन्हीत [उष्णउष्णित = उन्हुन्हीत (ऊनऊन ) भात वगैरे ]

उन्हून [ उष् दाहे. उष्णोष्ण = उन्हून ] (धा. सा. श.)

उपखा [उपक्रयः purchase = उपखा ] खर्च.

उपजनिपज [उत्पचनिपचा (मयूरव्यंसकादि)=उपजनिपज]

उपजलें [ उत् + पद् ४ गतौ. उप्पज्ज + ल = उपजलें ] (धातुकोश-उपज १ पहा)

उपटसुंभ [ उत्पथशुंभः = उपटसुंभ ]

उपटसंभ, उपटसूळ [ पथ् १० प्रक्षेपे. उत्पथ = उपट ] ( धा. सा. श.)

उपट्या [ औपस्थिक = उपट्या living by princation ] शेटउपट्या.

उपड (डा-डी-डें ) [उपावृत्त = उपावड्ड = उपाड = उपड ( डा-डी-डें ) ]. ( भा. इ. १८३६ )

उपडा-डें-डी [उत्पाटित = उप्पाडिआ = उपाड = उपड = उपडें-डा-डी ] ( ग्रंथमाला)

उपडा १ [ उत्पादः = उप्पाडा = उपडा ] उत्पाद: म्ह० वर पाय केलेला. उपडा म्ह० वर पाय करून पडलेला. ( भा. इ. १८३७)

-२ [ पद् १० गतौ. उत्पादः (उत्पद्) = उपडा. ऊर्ध्वं पादौ यस्य ] तो उपडा जन्मला = सः उत्पादः जन्म आप. ( धा. सा. श. ) उपनलें [ उत्पन्न + ल ] (धातुकोश-उपज १ पहा)

उपरणें १ [ उपाभरणं = उपाहरणँ = उपारणँ = उपरणें ] उपारणें असा उच्चार गांवढे करतात. (भा. इ. १८३३)

-२ [ उपवरणं = उपारणें = उपरणें ] (भा. इ. १८३३)

-३ [ उपारंधनि ] ( उपेरणें पहा)

उपराट [ उत्स्फारयत् = उप्फराट = उपराट ( टा-टी-टें) सुस्फारयत् = सुफराटें ] (ज्ञा. अ. ९ पृ. १७८ ) उपरी, उपर्‍या [उपरिक: = उपरी, उपर्‍या] उपरिक म्ह० बाहेरचा माणूस.

उपलाणा [ उत् +पल्ययन: = उपलाणा ] बिन खोगरी घोडा, बैल इ०.

उपवढ [ उत् + प्रस्वाप: ] जागरण. ( धातुकोश-उपहुड २ पहा )

ते कवण कवण     ।।  नांवे तयाचि जाण ॥
तीं ऐका सावधान  ।।  श्रोते--हो ।। ३२ ॥
काळदंत    १          सोमदत्त     २           विख्यात    ३
हेमरक्त      ४          कृतांत       ५           विरुदंत     ६
येक्षदंत      ७          काळकोट   ८           शुभ्रमणी   ९

हे नवनाग येवोनी ॥ सजिव केलि बाहुलिं त्याणी ।।
मग युद्धासि जावोनी ॥ चक्रचुडामणि गंगे तिरी पावला ।। २८० ।।
मग जालि आदळाआदळ ॥ युद्ध जालें तुंबळ ।।
पैलतिरी विक्रम सबळ ।। राहिला असे ॥ २८१ ॥
सैन्य मारिलें शाळिवाने ।। विक्रमावरि केले पेणे ।।
नदि उतरतां सैन्य ।। उमळे शाळिवानाचे ।। २८२ ।।
तेधवा शाळिवान विचार करी ॥ मृतिका विरालि जळीं ।।
नवनाग धाविल ते वेळीं ।। शाळिवान रक्षावया ॥ २८३ ॥
मग पावला पैल तिर ।। विक्रम लक्षिला समोर ।।
बाण लाविला खडतर ।। विक्रमादित्य तेणें उडविला ॥ २८४ ॥
तो उज्जनि --नगरि पडिला ।। तेथें मुक्ति पावला ।।
शाळिवान शकाधिकारि जाला ।। पैठणासी ।। २८५ ॥
मग ते नाग नव जण ।। आज्ञा मागोन निघाले जाण ।।
शाळिवान विनवि त्यां लागुन ।। तें अवधारा ॥ २८६ ।।
नावेक राहावें स्थिर ।। आळंगिले सत्वर ।।
तुम्हा वेगळा आम्हासि कोण ।। आहे येथे ॥ २८७ ॥
मग ते राहिले तेथे ।। कार्ये कराविं समर्थे ।।
म्हणे शेषआज्ञा आणिन सत्य ।। तुम्हा कारणे ।। २८८ ॥
तुम्ही राहावें सावचित्त ।। मनिचा सांडोनि संकल्प ।।
विनति माझी दत्तचित्त ।। आईका स्वामी ॥ २८९ ॥
मी तरि शकाधिकारी ।। शेष अवतार महि वरी ।।
कलयुगिं धर्मरक्षणाईत कुमारिकाउदरी ।। येणे जाले ॥ २९० ।।
या उपरि आइका श्रोते ।। कथा वर्तलि सत्य ।।
ऋषि वदला वाक्य ।। वागेश्वरी ।। २९१ ॥
मग शाळिवान राज्ये करितां ॥ तयासि कोपलि पाताळदेवता ॥
शाप दिधला तत्वता ।। शाळिवाना लागी ॥ २९२ ।।

"पण संकरज प्रजेची संख्या वाढून त्यांचे आपसातील मायेचे कौटुंबिक संबंध वाढता वाढता त्याची पित्याच्या वर्गात जाण्याची गती थांबली व संकर जाती स्वतःच्या संघटनेत, वृत्तीत व धंद्यात स्थिर झाल्या.

"ज्या समाजाची वृत्ती, फक्त बीजक्षेत्राचा व्यवहार त्या समाजातल्या समाजात होऊन जाते, अन्य कोणत्याही रीतीने होत नाही त्या समाजास जाती म्हणतात. जाती फक्त जन्माने प्राप्त होते. इतर कोणत्याही त-हेने प्राप्त होत नाही. जातिसंस्थेने एक कार्य अगदी बेमालूम होते ते हे की बीजक्षेत्राची शुद्धी परिपूर्ण राहते व जिवलगांची ताटातूट होत नाही. संकरांच्या वणन्नतीचा प्रश्न सोडविता सोडविता आर्यांना ही जातिसंस्था निर्माण करण्याची क्लुप्ती सुचलेली आहे. तीच क्लुप्ती एतद्देशज अनार्य समाजाची स्थापना ग्रामसंस्थांत करताना आर्यांनी अमलात आणली, त्या त्या अनार्य समाजांची आर्यांनी स्वतंत्र जात म्हणून गणना केली.
“संकरांची व्यवस्था करण्यात जातिसंस्थेची कल्पना सुचली आणि ती कल्पना आर्यांनी अनार्य समाजांना लावली. इतकेच नव्हे तर स्वतःच्या चातुर्वर्ण्य संस्थेलाही लाविली, संकरातून बीजक्षेत्र-शुद्धी झाल्यावर व्यक्तींना चातुर्वर्ण्यातील कोणत्याही मूळवर्णात परत जाता येत असे तसेच चातुर्वर्ण्यातील कोणत्याही खालच्या वर्णाच्या व्यक्तीला गुणकर्मांचा उत्कर्ष साधल्यास म्हणजे तपश्चर्या केल्यास ब्राह्मणवर्गात प्रविष्ट होता येत असे. जातिसंस्थेची कल्पना सुचल्यावर ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चारी वर्णही जाती बनले. सध्या ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे चार वर्ण असून शिवाय चार जातीही आहेत. खेरीज सुतार, चांभार, शूद्र, लोहार, सोनार वगैरे स्थिर झालेल्या संकर जातीही आहेत. शिवाय नाग, कोल, राक्षस वगैरे एतद्देशज अनार्यांच्या संस्कारापासून झालेल्या अंत्यज व बाह्य जाती झाल्या त्या वेगळ्याच.

"एतद्देशज अनार्य असोत की बहिर्देशज अनार्य असोत, हिंदुस्थानात त्यांना कायमचे रहायचे म्हणजे जात बनूनच हिंदुसमाज राहू देत असे. म्हणजे अनार्यबाह्य समाजाला जात बनवून त्याचा समावेश हिंदुसमाज आपल्यात करून घेत असे. जात बनल्याशिवाय नागरिकत्वाचे किंवा ग्रामस्थाचे हक्क मिळत नसत. म्हणजे स्थानिक स्वराज्याच्या व साम्राज्याच्या छत्राचा आश्रय मिळत नसे, हिंदुसमाजात बाह्यांचे राजकीय समावेशन जातीचे रूप घेतल्यानंतर होत असे. बाह्यजातिसंस्था झाले म्हणजे त्यांना त्यांच्या अनुरूप वृत्ती मिळून किंवा धंदा मिळून हिंदुसमाजात व हिंदुदेशात देशातील राज्यछत्राखाली सुखरूप राहता येत असे. अशी जाती देशात फार काल राहिली, येथील अभिजन बनली व हिंदुसमाजाचे सामान्य धर्म पाळू लागली म्हणजे त्या जातीला हिंदू हे अभिधान प्राप्त होई. नंतर त्या जातीचा जो देव असेल त्याची स्थापना हिंदूंच्या तेहतीस कोटी देवतामंडळात होऊन, पूर्ण हिंदुत्वाचा शिक्का त्या जातीवर कायमचा बसे.''